#टी��्ही बातम्या
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 6 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 09 November 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०९ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वच पक्षांचा जोमाने प्रचार सुरु, मराठवाड्यात दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा • भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज अकोला आणि नांदेड इथं सभा • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीत बंडखोरी करणारे आठ जण निलंबित • मतदार जनजागृतीसाठी 'उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा' या विशेष अभियानाचा शुभारंभ आणि • दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा ६१ धावांनी विजय
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वच पक्षांचा जोमाने प्रचार सुरु असून, सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी राज्याच्या दौर्यावर असून, आज त्यांच्या अकोला आणि नांदेड इथं सभा होणार आहे. नवीन नांदेड मध्ये कौठा इथल्या मैदानावर ही सभा होईल. दरम्यान, मोदी यांनी काल धुळे आणि नाशिक इथं जाहीर सभा घेतल्या. धुळे इथं सभेला संबोधित करताना त्यांनी, महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्याचं काम केवळ महायुतीचं सरकारच करु शकतं, असं सांगितलं. महिला सक्षमीकरण, युवकांना रोजगार, आदिवासींचे हक्क इत्यादी क्षेत्रात युती सरकारने राबवलेल्या योजनांचा उल्लेख त्यांनी केला. महाविकास आघाडीने अनेक विकासप्रकल्पांच्या मार्गात खोडा घातला असा आरोप करत, आघाडीमध्ये आपसात भांडणं असल्याबद्दल त्यांनी टीका केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल धाराशिव इथं धाराशिव ��तदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे आणि तुळजापूर मतदारसंघाचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. राज्यात महायुतीचं सरकार आल्यावर पहिल्या शंभर दिवसांचं व्हिजन मांडत त्यानुसार काम करणार असल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. आज त्यांची परभणी इथं सभा होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या नऊ विधानसभा मतदारसंघात उमेदवार जनसंवाद आणि पदयात्रेवर भर देत आहेत. काल औरंगाबाद मध्य मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार सुहास दाशरथे यांनी मतदारसंघात पदयात्रा काढून नागरीकांशी संवाद साधला. महाविकास आघाडीचे औरंगाबाद मध्यचे उमेदवार बाळासाहेब थोरात तसंच औरंगाबाद पूर्व मतदार संघातले एम आय एम पक्षाचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी नागरिकाशी संवाद साधला. पैठण मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी आडूळ इथं प्रचार सभा घेतली. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथं आज विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या तीन प्रचार सभा होणार आहेत. महायुतीच्या उमेदवारांसाठी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सिडको परिसरात बजरंग चौक इथं संध्याकाळी सभा होईल. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सिडको एन-फोर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं तसंच एम आय एम पक्षाचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांची हर्सुल परिसरात संध्याकाळी सभा होणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव इथं महायुतीचे उमेदवार तानाजी मुटकुळे यांच्या प्रचारार्थ भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सभा घेतली. लोकसभेला फेक नरेटीव्ह पसरवून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला आणि महायुतीचं मोठं नुकसान केलं, आता विधानसभेला मात्र फेक नरेटीव्ह चालणार नाही, असं त्या म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल परभणी जिल्ह्यात सेलू इथं जिंतूर विधानसभा मतदारसंघातले पक्षाचे उमेदवार विजय भांबळे, तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथं महाविकास आघाडीचे उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. पवार यांच्या आज बीड जिल्ह्यात परळी, आष्टी आणि बीड इथे सभा होणार आहेत. लातूर शहर विधानसभेचे काँग्रेस उमेदवार अमित देशमुख यांच्या प्रचारार्थ काल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सभा झाली. महाविकास आघाडीची सत्ता राज्यात आल्यास लातूरला सोयाबीनचं विशेष केंद्र उभारणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काल जालना इथं सभा घेतली.
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणार्या आठ जणांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निलंबित केलं आहे. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी यासंदर्भातलं पत्रक जारी केलं. यामध्ये नांदेड इथले विश्वंभर पवार, पूजा व्यवहारे, आनंद सिंधीकर यांचा समावेश आहे.
राज्यात येत्या २० तारखेला होणार्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन अभिनेते सुनिल बर्वे यांनी ��ेलं आहे.
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचं, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं आहे. या निवडणुकीत युवकांनी मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं: जिल्हाधिकारी स्वामी यांची, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरचे वृत्त विभाग प्रमुख समरजीत ठाकूर यांनी घेतलेली ही मुलाखत, आज सकाळी साडे अकरा वाजता आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन प्रसारित होणार आहे. आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर, या यू- ट्यूब चॅनेलवर देखील आपल्याला ही मुलाखत ऐकता येईल.
विधानसभा निवडणूकीत निवडणूक आयोगाच्या स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदार जनजागृतीसाठी 'उत्सव निवडणुकीचा,अभिमान महाराष्ट्राचा' या विशेष अभियानाचा शुभारंभ काल मुंबईत करण्यात आला. यावेळी ‘ये पुढे मतदान कर’ या महाराष्ट्र मतदान गीताचं लोकार्पण करण्यात आलं. याअंतर्गत राज्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृती अभियान कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे सदिच्छा दूत श्रीगौरी सावंत आणि निलेश सिंगीत, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, अभिनेत्री वर्षा उसगांवकर, मतदार गीताचे गायक मिलिंद इंगळे, दिग्दर्शक रोहित शेट्टी, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर इथं या कार्यक्रमाचा शुभारंभ स्मार्ट सिटी सभागृहात करण्यात आला. आपल्या देशाची निवडणूक प्रक्रिया ही जगात आदर्श आणि पारदर्शक आहे, जास्तीत जास्त लोकांचा प्रतिनिधित्व करणारा प्रतिनिधी पाहिजे, त्याकरता सर्वांनी मतदान करणं आवश्यक असल्याचं यावेळी सा���गण्यात आलं. याअंतर्गत नांदेड जिल्हास्तरीय कार्यक्रम शहरातल्या तिरंगा ध्वज कॉर्नर या ठिकाणी घेण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात नांदेडकरांनी मतदान करण्याची शपथ घेतली.
मतदार जनजागृतीसाठी धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं स्वीप कक्षाच्या वतीने तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना मतदानाची शपथ देण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येत्या २० तारखेला मतदानाच्या दिवशी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारताने ६१ धावांनी जिकंला. काल डर्बन इथं झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने २० षटकात आठ बा�� २०२ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ अठराव्या षटकात एक चेंडु शिल्लक असतांना १४१ धावसंख्येवर सर्वबाद झाला. ५० चेंडूत १०७ धावा करणारा भारताचा संजु सॅमसन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
बीड जिल्ह्यात पाडळसिंगीच्या टोलनाक्याजवळ चारचाकी गाडीला अज्ञात वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात पिता-पुत्र जागीच ठार झाले, तर चार जण जखमी झाले. काल सकाळच्या सुमारास नातेवाईकाच्या लग्नासाठी मुंबईहून बीडकडे येणाऱ्या सय्यद कुटुंबियांच्या गाडीला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. यात सय्यद हमीद आणि सय्यद मुदस्सीर या पिता पुत्राचा मृत्यू झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं स्थानिक गुन्हे शाखेनं एका महिलेकडून १८ लाख रोख रक्कम जप्त केली. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या तपासणीत ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, पाटोदा तालुक्यातल्या भाकरेवस्ती इथं गुन्हे शाखेनं डीजे साहित्य चोरणारी टोळी पकडली असून, ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवाशांची वाढती मागणी आणि गर्दीचा ताण कमी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड - मुंबई - नांदेड रेल्वेच्या दोन विशेष फेऱ्या करण्याचं ठरवलं आहे. ही गाडी उद्या दहा नोव्हेंबरला रात्री अकरा वाजता नांदेड इथून सुटेल आणि परवा ११ नोव्हेंबरला दुपारी अडीच वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इथं पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी मुंबईहून दुपारी साडेतीन वाजता निघून मंगळवारी सकाळी सव्वासहा वाजता नांदेडला पोहोचेल.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा उद्या १० नोव्हेंबरला होत असून, बीड इथल्या १६ परीक्षा केंद्रांवर ही परिक्षा होत आहे.
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
महिला T20 आशिया चषक: भारत 7 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानशी भिडणार | क्रिकेट बातम्या
महिला T20 आशिया चषक: भारत 7 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानशी भिडणार | क्रिकेट बातम्या
भारतीय महिला संघाची फाइल इमेज© एएफपी पुढील महिन्यापासून बांगलादेशच्या सिल्हेत येथे सुरू होणार्‍या महिला टी-२० आशिया चषक स्पर्धेत भारत ७ ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडणार आहे, अशी घोषणा आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी मंगळवारी केली. 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या 15 दिवसांच्या स्पर्धेत सात संघ भाग घेतील. ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने आयोजित केली जाईल आणि अव्वल चार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 6 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 08 November 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०८ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
भ्रष्टाचार हा एक आजार असून तो मुळापासून उखडून टाकला पाहिजे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. आज नवी दिल्ली इथं केंद्रीय दक्षता आयोगाच्या दक्षता जागरूकता सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती मुर्मू बोलत होत्या. विश्वास हा समाजाचा पाया असून भ्रष्टाचारामुळे समाजातील विश्वास कमी होतो, असंही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या. भ्रष्टाचाराचा सामना करण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण योजनेसारखे उपक्रम शासनातर्फे राबवले जात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
नवी दिल्लीत आज पासून दुसऱ्या सैन्य परंपरा उत्सवाला सुरुवात होत आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा धोरण, परराष्ट्र नीती, लष्कराचा इतिहास आणि वारसा यांचा अभ्यास करणारे शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधक या महोत्सवात सहभागी होणार आहेत. याचबरोबर लष्कराच्या शौर्य गाथा प्रकल्पाचा शुभारंभही यावेळी होणार आहे. शिक्षण आणि पर्यटनाच्या माध्यमातून देशाच्या लष्करी परंपरांचं संवर्धन आणि प्रसार करणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यातल्या प्रचारसंभांना आज��ासून सुरुवात झाली. आज ��हिली सभा धुळ्यात मालेगाव रोड, महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्राजवळ पांजरापोळ गोशाळा इथं सुरू झाली आहे. त्यानंतर दुपारी नाशिक इथं तपोवन परिसरात मोदी यांची सभा होणार आहे. या सभेच्या निमित्ताने प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, सुरक्षा व्यवस्था चोख आहे. तपोवनासह सुमारे ११ मार्गांवरील वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. महायुतीततल्या घटक पक्षांचे वरिष्ठ नेते या सभांना उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, भाजपनेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सांगली इथं सभा सुरू आहे. त्यानंतर ते सातारा जिल्ह्यात कराड इथं जाहीरसभा घेणार आहेत. शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज धाराशिव जिल्ह्यात तीन प्रचारसभा होणार आहेत. यात परंडा, धाराशिव आणि उमरगा इथले महायुतीचे उमेदवार अनुक्रमे डॉक्टर तानाजी सावंत, अजित पिंगळे आणि ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारासाठी या सभा होत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज परभणी जिल्ह्यात सेलू इथं आणि हिंगोली जिल्ह्यात वसमत इथं प्रचार सभा होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आज लातूर इथं तीन सभा होणार आहेत. लातूर शहर मतदारसंघाचे उमेदवार आमदार अमित देशमुख आणि लातूर ग्रामीण मतदारसंघाचे उमेदवार धीरज देशमुख यांच्या प्रचारार्थ लातूर शहर तसंच निलंगा आणि गंजगोलाई इथं या सभा होणार आहेत.
आचारसंहिता काळात राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर कालपर्यंत एकूण तीन हजार एकशे अठ्ठावीस तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी तीन हजार एकशे बारा तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली. राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ आणि मौल्यवान धातू या स्वरूपात एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेनं आजपासून १६४ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यादृष्टीनं रेल्वेनं ४७६ गाड्यांचं नियोजन केलं आहे. रेल्वे विभागातर्फे आतापर्यंत चार हजार ५२१ रेल्वे गाड्या चालवण्यात आल्या असून ६५ लाख प्रवाशांनी याचा लाभ घेतल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. या महिन्याच्या चार तारखेला एकाच दिवसात तीन कोटींपेक्षा जास्त प्रवाशांनी रेल्वे प्रवास केल्याचंही मंत्रालयानं सांगितलं.
नांदेड बिदर महामार्गावर एकुर्का रोडवर टेम्पो आणि कारच्या भिषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जण ��ार झाल्याची घटना काल दुपारी घडली. कारमधील सर्वजण कपड्यांच्या खरेदीसाठी उदगीर इथं जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव टेम्पोने कारला धडक दिली. यात आई, दोन विवाहीत मुली आणि नातीचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
भारताचा उदयोन्मुख बुद्धिबळपटू अर्जून इरिगाईसी यानं फिडे जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत दुसरे स्थान पटकावलं आहे. काल चेन्नई ग्रांड मास्टर्स स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीअखेर त्यानंतर अॅलेक्सी सरानावर विजय मिळवला.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान चार टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज डरबन इथं खेळला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात ही मालिका होत आहे. भारतीय वेळेनुसार रात्री साडे आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल.
कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या किरण जॉर्जने आपलं स्थान निश्चित केलं आहे. आज सकाळी उपांत्यपूर्व फेरीत त्याने जपानच्या खेळाडूचा २१-१४, २१-१६ असा पराभव केला. तत्पूर्वी, काल झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीत जॉर्जने तैवानच्या खेळाडूचा पराभव केला.
0 notes
airnews-arngbad · 6 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 08 November 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०८ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय प्रचाराला वेग आला आहे. भाजपनेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज धुळे आणि नाशिक इथं प्रचारसभा घेणार आहेत. दुपारी १२ वाजता धुळे आणि दोन वाजता नाशिक येथील सभांमधून जनतेचा आशीर्वाद घेणार असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. दरम्यान, भाजपनेते आणि केंद्रीय गृहमंत्री अ��ित शहा आज सातारा जिल्ह्यातील कराड येथे जाहीरसभेला संबोधित करणार आहेत. शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज धाराशिव इथं जाहीरसभा आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज परभणी आणि वर्ध्यात सभा घेणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड इथं सभा सुरु आहे.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप अंतर्गत, मतदान जनजागृतीसाठी 'उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा' हे विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथून संध्याकाळी पाच वाजता या राज्यस्तरीय अभियानाला सुरूवात होणार आहे. निवडणूक आयोग तसंच राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे वरीष्ठ अधिकारी, चित्रपट, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय संचार ब्यूरो, मुंबई महापालिका आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं एक फिरतं प्रदर्शन आयोजित केलं असून प्रदर्शन लावलेल्या या गाड्या १५ निवडक जिल्ह्यांमध्ये मतदानविषयक जनजागृतीचा संदेश घेऊन जाणार आहेत.
आचारसंहिता काळात राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर कालपर्यंत एकूण तीन हजार एकशे अठ्ठावीस तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी तीन हजार एकशे बारा तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली. राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ आणि मौल्यवान धातू या स्वरूपात एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
परभणी विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा निवडणुकीची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातल्या चारही मतदार संघात निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा आणि पोलीस प्रशासन तसेच संबधित नोडल अधिकारी, आणि कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी. तसंच मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सुचना केल्या. सर्व उपस्थितांना यावेळी मतदानाची शपथ देण्यात आली.
लातूर ग्रामीण, लातूर शहर आणि औसा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची पहिली तपासणी उद्या संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात होणार आहे. यावेळी उमेदवारांनी आवश्यक सर्व अभिलेख्यासह कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना कार्यालयाच्यावतीनं करण्यात आलं आहे.
जळगाव जिल्ह्यात मतदान जनजागृतीसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाअंतर्गत महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेतर्फे मतदान जनजागृती रील्स तयार करण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. सर्वोत्कृष्ट रील्स बनवणाऱ्या स्पर्धकाला प्रशासनाकडून पारितोषिक दिलं जाणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी दिली.
धुळे शहरात १० नोव्हेंबरला गृहमतदान होणार आहे. याअंतर्गत २६८ वृद्ध आणि दिव्यांग मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. अशी माहिती धुळे शहर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी दिली.
नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथल्या नाशिक मर्चंट बँकेतील कर्मचाऱ्यांविरोधात काल पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बँकेच्या शाखेत गेल्या काही दिवसांमध्ये नव्व्द कोटी रुपयांचा संशयास्पद व्यवहार झाल्याचा आरोप शिवसेना पक्षाच्यावतीनं करण्यात आला होता. याप्रकरणी जयेश मिसाळ याच्या तक्रारीवरून मालेगाव पोलिसांनी काल सिराज नावाच्या एका व्यक्तीसह बँकेच्या स्थानिक आधिकऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
श्री क्षेत्र पंढरपूर इथली कार्तिकी एकादशी निमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेनं आदिलाबाद-पंढरपूर, नांदेड-पंढरपूर, बिदर-पंढरपूर या अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान चार टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज डरबन इथं खेळला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात ही मालिका होत आहे. भारतीय वेळेनुसार रात्री साडे आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल.
चेन्नई इथं सुरू असलेल्या चौदाव्या हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी उत्तर प्रदेश, कर्नाटक, चंदीगड, मिझोराम, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू संघांनी विविध गटात विजय मिळवला. उत्तर प्रदेशने दिल्लीचा ४-१ असा पराभव केला. तर कर्नाटकने त्रिपुरा संघाचा ५-० असा पराभव केला. चंदीगडने उत्तराखंडविरुद्ध ९-० असा विजय मिळवला.
0 notes
airnews-arngbad · 25 days ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक : 21.10.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
ठळक बातम्या
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर-मराठवाड्यातल्या १६ मतदारसंघांचा समावेश-भोकरमधून श्रीजया चव्हाण तर फुलंब्रीतून अनुराधा चव्हाण यांना संधी 
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची विधानसभा निवडणुकीसाठी संमिश्र भूमिका
कळमनुरीचे आमदार संतोष लक्ष्‍मण बांगर यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा
कृषी उत्पादनांचा भाव आणि किरकोळ विक्री किंमतीतली तफावत कमी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार
आणि
महिला टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंड अजिंक्य-बंगळुरू कसोटीतही न्यूझीलंडचा आठ गडी राखून विजय
सविस्तर बातम्या
विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने ९९ उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली. यामध्ये मराठवाड��यातल्या १६ मतदारसंघांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात किनवट इथून भीमराव केराम, भोकर - श्रीजया अशोक चव्हाण, नायगाव - राजेश पवार, तर मुखेड विधानसभा मतदारसंघातून तुषार राठोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हिंगोली मतदारसंघातून तान्हाजी मुटकुळे,
जिंतूर - मेघना बोर्डीकर, परतूर - बबनराव लोणीकर, बदनापूर - नारायण कुचे, तर भोकरदन मतदारसंघातून संतोष दानवे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री मतदारसंघातून अनुराधा चव्हाण,
औरंगाबाद पूर्व - अतुल सावे, तर गंगापूर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत बंब यांना उमेदवारी देण्यात आली आहे. केज मतदारसंघातून नमिता मुंदडा,
 निलंगा - संभाजी पाटील निलंगेकर, औसा - अभिमन्यू पवार, आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून राणा जगजितसिंह पाटील निवडणूक लढवणार आहेत.
याशिवाय नागपूर दक्षिण - पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस,
कामठी - चंद्रशेखर बावनकुळे, जामनेर - गिरीश महाजन, शिर्डी- राधाकृष्ण विखे पाटील, मुंबईत मलबाद हिल मधून मंगलप्रभात लोढा, तर कुलाबामतदार संघातून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी उद्या २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असून अर्जांची छाननी ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी संमिश्र भूमिका जाहीर केली आहे. काल आंतरवाली सराटी इथं झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत त्यांनी ही भूमिका विशद केली. ज्या मतदारसंघात निवडून येण्याची शक्यता आहे, तिथं उमेदवार उभे करावेत, अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव मतदार संघात मराठा आरक्षणाला समर्थन देणाऱ्या उमेदवाराला मतदान करावं आणि जिथे आपला उमेदवार उभा नसेल, तिथे जो उमेदवार बॉण्डपेपरवर आपल्या मागण्यांना समर्थन देईल, त्या उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय जरांगे यांनी जाहीर केला.
****
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची काल मुंबईत बैठक झाल्याचं वृत्त आहे. दरम्यान, आमदार आदित्य ठाकरे यांनी काल मुंबईत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्या संदर्भात होती असं ठाकरे यांनी भेटीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
****
दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी काल मुंबईत आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. बीड विधानसभेसाठी आपण पक्षाकडे प्रस्ताव दिला असून, संघटन���च्या स���माजिक कार्याला राजकीय जोड देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं ज्योती मेटे यावेळी म्हणाल्या.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतरही अनेक पक्षांचे नेते पक्षांतर करत आहेत.
Byte…
माजी आमदार कपिल पाटील यांनी काल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दिल्ली इथं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. 
**
नंदूरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं.
**
वंचित बहुजन आघाडीचे माजी पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांनी काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. मुंबई इथं पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. देवळे यांनी यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीतील आपल्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
**
बीड इथले भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी काल भारतीय जंतापक्षातुन बाहेर पडत असल्याचं  काल जाहीर केलं. आपली पुढची राजकीय दिशा लवकरच स्‍पष्ट करु, असं मस्के यांनी सांगीतलं आहे.
****
बीड जिल्ह्यात सहाही विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतदार संघात मतदान यंत्रांचं प्रथमस्तरीय संगणकीकृत सरमिसळ काल करण्यात आली. यावेळी दोन हजार ८९७ बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि तीन हजार १३८ व्हीव्हीपॅटचं वाटप विधानसभा मतदार संघांना करण्यात आलं.
****
लातूर इथंही काल ही प्रक्रिया पार पडली, जिल्ह्यात ६ विधानसभा मतदारसंघातील २ हजार १४२ मतदान केंद्रांसह एका सहाय्यकारी मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष लक्ष्‍मण बांगर यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याच्या कारणावरून कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  १८  ऑक्टोबर रोजी कळमनुरी इथं  कार्यकर्त्यांना संबोधित करताना मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्या वक्तव्यातून झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पं��ायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश बोथीकर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. या��्रकरणी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी भुत्ते यांनी बांगर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज ठाणे जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
कृषी उत्पादनं आणि बागायती उत्पादनांचा शेतकऱ्यांना मिळणारा भाव आणि या उत्पादनांची बाजारातली किरकोळ विक्री किंमत यातली तफावत कमी करण्यासाठी सरकार एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत एका कृषी परिषदेत ही माहिती दिली. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचं काम ही समिती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कृषी संशोधनाचे फायदे प्रयोगशाळेपासून शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी पुढच्या महिन्यापासून ‘कृषी चौपाल’ उपक्रमाचा प्रारंभ केला जाणार असल्याची माहिती चौहान यांनी दिली.
****
दिवाळी आणि छटपूजा या सणांसाठी उत्तर आणि पूर्वेकडच्या राज्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं ५७० विशेष फेऱ्या जाहीर केल्या आहेत. मुंबई, पुणे आणि नागपूरसह विविध ठिकाणांहून या फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. १३२ फेऱ्या मुंबईहून, तर १४६ फेऱ्या पुण्याहून निघणार आहेत. तर १०८ फेऱ्या लातूर, सावंतवाडी, नागपूर, पुणे, कोल्हापूर, नांदेड आणि इतर ठिकाणी पोचणार आहेत. दक्षिणेकडच्या करीमनगर, कोचुवेली, काझिपेट आणि बेंगळुरूसाठी ८४ फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
****
महिला टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघानं विजेतेपद पटकावलं आहे. काल दुबईमध्ये दक्षिण आफ्रिकेसोबत झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ५ बाद १५८ धावा केल्या, उत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेचा संघ ९ बाद १२६ धावाच करु शकला. न्यूझीलंडची अमेलिया कीर ही सामनावीर आणि मालिकावीर ठरली.
****
बंगळूरु कसोटीत न्यूझीलंडनं भारतावर आठ गडी राखून विजय मिळवत, तीन सामन्यांच्या मालिकेत एक-शून्य अशी आघाडी घेतली. पहिल्या डावात अवघ्या ४६ धावा करणाऱ्या भारतीय संघानं, दुसऱ्या डावात उभारी घेत न्यूझीलंडवर वर्चस्व गाजवलं होतं. मात्र, ३५६ धावांची पिछाडी भरून काढल्यावर भारतीय फलंदाजांना आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. विजयासाठी ठेवलेलं १०७ धावांचं माफक आव्हान पाहुण्या संघानं के��ळ दोन फलंदाजांच्या मोबदल्यात पार केलं.
****
परभणी इथं कालपासून राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धांना सुरुवात झाली. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं.
१४ वर्षाखालील मुले मुली यांच्यातल्या या तीन दिवसीय स्पर्धेत एकूण २०० खेळाडू सहभागी झाल्याचं क्रीडा अधिकारी कविता लावंदे यांनी सांगितलं
****
लातूर जिल्ह्यात, सध्याच्या सणाच्या काळात भाडेवाढ करणाऱ्या खाजगी वाहतूकदारांकडून वाजवीपेक्षा जास्त प्रवासी भाडे आकारल्यास प्रवाशांनी त्याची तक्रार करावी, यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या ई-मेल सुविधेचा वापर करावा असं आवाहन विभागीय प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर येथील विश्व हिंदू परिषदेच्या अंतर्गत  येणाऱ्या मंदिर अर्चक पुरोहित आसामच्या वतीने काल शहरातील धार्मिक परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या अभियानात शहरातील विविध संस्था,  संघटना तसंच उपासना मंडळाचे १६०० पदाधिकारी सहभागी झाले होते.
****
नांदेड जिल्ह्यात दोन दिवसात अतिवृष्टीची नोंद झाली. काल सकाळी अप्पर मानार धारणाचे पाच तर विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडला आहे. यंदा १०६ पूर्णांक ९३ टक्के पावसाची नोंद झाली असून, पावसानं सरसरी ओलांडल्याचं वृत्त आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 13 October 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १३ ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
प्रधानमंत्री गतिशक्ति योजनेनं भारताच्या  विकासातील मुलभूत  आराखड्याला नविन स्वरुप प्रदान करण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावल्याचं म्हटलं आहे.या योजनेला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यवारील आपल्या संदेशात हे गौरोवोद्गार व्यक्त के���े.योजनेमुळं देशाचा विविध क्षेत्रातील गतीमान आणि समायोजित विकास  सुनिश्चित करण्यासह प्रगती -उद्यमशिलता -नवोन्मेष यांना चालना मिळाल्याचं ते म्हणाले. नागरीकांसाठी याद्वारे नव्या संधी उपल्ब्ध होत असल्याचही पंतप्रधानांनी नमूद केलं.
****
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु या अल्जीरिया, मॉरिटानिया आणि मलाव�� या तीन अफ्रीकी देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या आहेत. आजपासून १९ ऑक्‍टोंबरपर्यंत हा दौरा असणार आहे. भारताच्या राष्ट्रपतीनं या तीन देशांचा दौरा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. राष्ट्रपती या दौऱ्यात समपदस्थांशी द्विपक्षीय संबंधावर चर्चा करणार आहेत. 
****
आसाममध्ये मध्यवर्ती भागात ब्रह्मपुत्र नदीच्या उत्तर किनाऱ्यावरील उदलगुड़ी जिल्ह्यात आज सकाळी पावणे आठ वाजता, भूकंपाचे झटके बसले. चार पुर्णांक दोन शतांश रीश्टर स्केल अशी याची तिव्रता होती.
तर, जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातही आज सकाळी सव्वासहाच्या सुमारास भूकंपाचे झटके बसले. चार पुर्णांक तीन शतांश रीश्टर स्केल अशी याची तिव्रता होती. या दोन्ही भागात भूकंपामुळे  कोणतीही जिवित अथवा वित्त हानी झाल्याचं वृत्त नाही.
****
माजी राज्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या काल संध्याकाळी झालेल्या हत्येची जबाबदारी कथित लॉरेंस बिश्नोई टोळीनं घेतल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यास तपास यंत्रणांनी अद्यापपर्यंत दुजोरा दिलेला नाही. या प्रकारणी, मुंबई पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे. संबंधीत तिघांपैकी दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं असून एक गुन्हेगार फरार आहे. घटनास्थळाचा पंचनामाही झाला आहे. सिद्दीकींच्या पार्थिव देहावर आज मुंबई इथं संध्याकाळी साडेआठ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सिद्दीकी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. याप्रक्ररणी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांनी पाय उतार होण्याची तर, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
****
नांदेडमध्ये आज शासनातर्फे  महिला सक्षमीकरण आनंद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. महिला भगिनींसह नागरिकांशी संवादाचा हा कार्यक्रम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची याला प्रमुख उपस्थिती असणार आहे.
****
नवी मुंबई महापालिका आणि परिसराला पाणीपुरवठा करणारी मोरबे धरणाची दोन हजार पन्नास मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी आज सकाळी फुटली. जलवाहिनीवरील मॅनहोल फुटल्यानं भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र इथून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला होणारा पाणीपुरवठा दुरुस्ती कामासाठी बंद करण्यात आला आहे. सध्या मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू असून दुपारी २ वाजेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळं नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन महापालिकेच्यावतीनं करण्यात आलं आहे.
****
आजच्या राजकीय परिस्थीतीमध्ये कोण कोणत्या पक्षात जाईल याचा नेम राहिला नाही, असं प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत सध्या सुरु असलेल्या पक्षाच्या मेळाव्यात केलं आहे.
****
कझाकिस्तानच्या अस्तानामध्ये आयोजित अशियायी टेबल टेनिस स्पर्धेत महिला दुहेरी��
अह्यिका मुखर्जी आणि सुतीर्था मुखर्जी या भारतीय जोड़ीनं उंपांत्य फेरीत मजल मारल्यानं भारताला एक पदक मिळणं निश्चित झालं असून या स्पर्धेत महिला दुहेरी प्रकारात  भारताकडून असं  पहिल्यांदाच होणार आहे.आजच्या स्पर्धेच्या समारोप दिनी उपांत्य फेरीत या जोडीचा सामना जपानच्या जोडीशी होत आहे.
****
महिला टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात, अंतिम चार संघात स्थान मिळवण्यासाठी संध्याकाळी साडेसातला शारजाह इथं सामना होत आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 07 October 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ ऑक्टोबर २०२४ सकाळी ७.१० मि.****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची रक्कम टप्प्याटप्प्याने वाढवणार, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
बळीराजा मोफत वीज योजनेला सुरुवात
नक्षलप्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक
९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड
आणि
महिला टी-ट्वेन्टी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताची पाकिस्तानवर मात 
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची रक्कम टप्प्याटप्प्याने वाढवणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान आणि राज्यस्तरीय विविध योजनांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. लाडकी बहिण ही योजना काही केल्या बंद होणार नाही, असा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. ते म्हणाले:
‘‘पहिल्या दिवसापासून आम्ही सांगितलं, ही योजना बंद होणार नाही हा विश्वास याठिकाणी व्यक्त करतो. कारण याची सर्व पैशाची तरतूद आम्ही केलेली आहे. हे काम निवडणुका असू द्या नसू द्या आम्हाला तुम्हाला पैसे द्यायचे होते, कारण तुमच्या संसाराला हातभार लावायचा होता.’’
लाडकी बहिण योजनेतून सर्वाधिक महिला लाभार्थी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. या योजनेचे नोव्हेंबर महिन्याचे पैसे देखील महिलांच्या खात्यात जमा झाले असून, महिलांना लखपती करण्याचं सरकारचं उद्दीष्ट असल्याचं ते म्हणाले. अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडी सरकारने केलेली कामं, आणि पुढच्या दोन वर्षात महायुती सरकारने केलेली कामं एकदा तपासून बघावी, असं सांगून त्यांनी विरोधकांवर टीका केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, खासदार भागवत कराड, पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.
याच कार्यक्रमात बळीराजा मोफत वीज योजनेचं मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. राज्यातल्या ४४ लाख शेतकऱ्यांच्या साडेसात एचपी शेतीपंपांना मोफत वीज दिली जाणार आहे. या योजनेसाठी सरकारनं १४ ��जार ७६१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसंच ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ ही महत्त्वाची योजना सरकारनं सुरू केली असल्याची माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली. मराठवाड्यातला दुष्काळ दूर करण्यासाठी पश्चिम वाहिन्या नद्यांचं पाणी मराठवाड्यात आणण्याच्या कामाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. पुढील काही वर्षात हे काम पूर्ण होणार असून, त्यानंतर मराठवाड्यातला दुष्काळ कायमचा दूर होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
रक्षाबंधनाच्या ओवाळणीनंतर आता बहिणींना भाऊबीजेची देखील ओवाळणी मिळणार असल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं.
****
या कार्यक्रमानंतर छत्रपती संभाजीनगर नजिक हर्सूल इथं महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय आभार मेळावा आणि मुख्यमंत्र्यांचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी बोलताना शिंदे यांनी, गावातल्या सर्व घटकांमध्ये समन्वय राखण्याचं काम पोलीस पाटील करत असतात, त्यांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून संवेदनशिलतेने निर्णय घेऊ, असं आश्वासन दिलं.
****
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काल अहिल्यानगर जिल्ह्यात अकोले इथं जनसन्मान यात्रा झाली. समाजातला कोणताही घटक विकासापासून वंचित राहणार नाही याची विशेष काळजी महायुती सरकारनं घेतली असल्याचं ते म्हणाले. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थी महिलांशी संवाद साधला.
****
बुलडाणा जिल्ह्यात खामगांव विधानसभा मतदारसंघातल्या दोन हजार ३६५ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल झालं. या योजनेच्या माध्यमातून शंभर टक्के अनुदानावर ड्रीपद्वारे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी उपलब्ध होईल, त्यामुळे या भागावरचा कोरडवाहूचा शिक्का पूर्णपणे पुसला जाईल, असं ते यावेळी म्हणाले.
****
चालू आर्थिक वर्षासाठी सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करण्यात आले असून, त्यांची संख्या आणखी वाढवणार असल्याचं राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आहे. केंद्र शासनाने या आर्थिक वर्षासाठी सोयाबीन करिता प्रति क्विंटल चार हजार ८९२ रुपये इतका हमीभाव घोषित केला आहे. आतापर्यंत सुमारे पाच हजार शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी केली असून, जास्तीत जास्त शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन राज्य शासनानं केलं आहे.
****
देशातल्या नक्षलप्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आज नवी दिल्ली इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, तेलंगणा, ओदिशा आणि मध्य प्रदेश या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह, या राज्यांना विकास निधी प्रदान करण्यात सक्रीय सहभाग असलेले पाच केंद्रीय मंत्री देखील या बैठकीला उपस्थित राहतील.
****
दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाली आहे. साहित्य महामंडळाच्या काल पुण्यात झालेल्या बैठकीत भवाळकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या बैठकीत संमेलनाच्या तारखा निश्चित करणं आणि कार्यक्रमांच्या रूपरेषेबाबतही चर्चा करण्यात आली.
लोकसाहित्याची स्त्रीवादी समीक्षा प्रस्थापित करण्यात डॉ. तारा भवाळकर यांची  महत्वाची भूमिका राहिली आहे. ललित लेखन, अनुवाद, व्याख्याने, आकाशवाणीसाठी लेखन, यासह मराठी विश्वकोश, समाजविज्ञान कोश, मराठी वाङ्मयकोश, आणि  ग्रंथकोश यातल्या अनेक महत्त्वाच्या नोंदी त्यांनी लिहिल्या आहेत.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या:
‘‘अठ्ठ्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी, ज्या निवड समितीने माझी निवड केलीय, त्यांच्याबद्दल मी सुरवातीला कृतज्ञता व्यक्त करते. हा सन्मान हा केवळ माझा नाहीये. मी ज्या अभ्यास क्षेत्रामध्ये काम करत आलेय, त्या लोकसंस्कृती आणि नाटक विशेषतः आणि स्त्री विचार या सर्व प्रकारच्या विचारांचा आणि साहित्याचा सन्मान आहे.’’
****
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत काल छत्रपती संभाजीनगर इथून ८०० जेष्ठ नागरिकांना घेऊन जाणारी जिल्ह्यातली पहिली रेल्वे अयोध्येकडे रवाना झाली. पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर या यात्रेकरुंना निरोप देण्यात आला. जालना, नांदेड आणि बीड जिल्ह्यातूनही लवकरच प्रवासी रवाना होतील, अशी माहिती प्रशासनाच्या वतीनं यावेळी देण्यात आली.
****
लातूर शहरातल्या पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातल्या वसतिगृहात जेवणातून विषबाधा झालेल्या ६० विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असून, त्यांना काल रुग्णालयातून सुटी देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून, अन्नाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. खासदार डॉ. शिवाजी काळगे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर - घुगे यांनीही काल या विद्यार्थिनींची भेट घेतली. या वसतिगृहातल्या मेसचालकाचं कंत्राट रद्द करण्यात आलं आहे.
****
मुंबईत कांदिवली इथं ‘नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स’च्या स्थापनेसाठी महाराष्ट्र सरकार आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्यातल्या महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर काल स्वाक्षरी झाली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी सुधारण्यासाठी कठोर परिश्रम करत असल्याचं गोयल यांनी स���ंगितलं. २०३६ साली होणारी ऑलिम्पिक स्पर्धा भारतातच होईल, तसंच त्या ऑलिम्पिकमध्ये नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रस्तावित सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये खेळाडूंकरता  अत्याधुनिक सुविधा पुरवण्यात येणार आहेत.
****
क्रिकेट
महिलांच्या टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल दुबई इथं झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा सहा खेळाडू राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानी महिला संघाने २० षटकात आठ बाद १०५ धावा केल्या. भारताकडून अरुंधती रेड्डीनं तीन, श्रेयांका पाटीलनं दोन, तर रेणुका सिंग, दीप्ती शर्मा आणि आशा शोभना यांनी प्रत्येकी एक खेळाडू बाद केला. प्रत्यूत्तरादाखल भारतीय महिलांनी १९ व्या षटकात चार खेळाडू गमावत हे लक्ष्य पूर्ण केलं. या स्पर्धेतला भारताचा पुढचा सामना येत्या बुधवारी नऊ तारखेला श्रीलंकेविरुद्ध होणार आहे.
****
पुरुष क्रिकेटमध्ये, तीन टी -ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं बांग्लादेशचा सात गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत बांग्लादेशचा संघ शेवटच्या षटकात १२७ धावांवर सर्वबाद झाला. अर्शदीप सिंह आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. भारताने केवळ ११ षटकं आणि पाच चेंडूत तीन गडी गमावत हे लक्ष्य साध्य केलं. अर्शदीप सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने एक - शून्य अशी आघाडी घेतल असून, मालिकेतला पुढचा सामना परवा बुधवारी दिल्लीत खेळला जाईल.
****
नांदेड जिल्ह्यातल्या नऊ विधानसभा मतदारसंघात निवडणुका घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक कामासाठी २१ हजार ११५ अधिकारी, कर्मचाऱ्यांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाली आहे. विधानसभेसोबत नांदेड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाल्यास त्यासाठीही प्रशासकीय यंत्रणेने पूर्ण सज्जता ठेवली आहे. जिल्ह्यात ९ विधानसभा मतदारसंघासाठी ३ हजार ८८ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. जिल्हा निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी अधिकारी राजकुमार माने ��ांनी ही माहिती दिली.
****
हवामान
येत्या दोन दिवसांत राज्यात सर्वत्र तुरळक जागांवर पाऊस पडण्याची शक्यता असून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 04 October 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०४ ऑक्टोबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.****
मराठी भाषा ही भारताचा अभिमान असून, या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशात मोदी यांनी, हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरव असल्याचं म्हटलं आहे. मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे, अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ही भाषा शिकण्यासाठी असंख्य लोकांना प्रेरणा मिळेल अशी खात्री असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
****
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या या निर्णयाचं स्वागत करताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या मराठी प्रेमी, तसेच साहित्यिक, संशोधकांनी केलेल्या प्रयत्नांचंही कौतुक केलं आहे.
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, सांस्कृतिक वैभव जगभर पोहचेल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानून अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्व मराठी भाषाप्रेमींचे अभिनंदन केलं आहे.
मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
****
नाशिक इथं रेल्वे सुरक्षा बलाचा ४० वा स्थापना दिन कार्यक्रम आज रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत होत आहे. कार्यक्रमाच्या सुरवातीला वैष्णव यांनी रेल्वे सुरक्षा बल परेडचं निरीक्षण केलं.
****
राज्य शासनानं युवकांच्या विकासासाठी कौशल्य विद्यापीठ स्थापन केलं, ही अत्यंत अभिमानाची बाब असून, राज्याच्या कौशल्य विकास विभागानं नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे देशात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, असं केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी म्हटलं आहे. मुंबईच्या एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालयात आय. टी. आय मुंबईचं नामकरण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई असं करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.
****
काँग्रेस नेते आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी आजपासून दोन दिवस कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. कसबा बावडा इथल्या भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार असून, उद्या ते संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार आहेत.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातल्या �� कोटी ९६ लाख ४३ हजार २०७ पात्र महिलांच्या खात्यात तिसऱ्या टप्प्यातली लाभाची रक्कम जमा झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात त्यांनी उर्वरित पात्र महिलांच्या खात्यातही लवकरच रक्कम जमा होईल, असं म्हटलं आहे.
****
राज्यात औद्योगिक विकासासाठी सरकारचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असून, राज्य परदेशी गुंतवणुकीत प्रथ�� क्रमांकावर आहे, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. नाशिक इथं आयोजित उद्यमात सकल समृद्धी- महाराष्ट्राची उद्योग भरारी या कार्यक्रमात ते काल बोलत होते. राज्यात, गेल्या तीन महिन्यांत ७५ हजार कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी, उद्योजकांबरोबर लघू उद्योगांनाही कर्ज पुरवठा करण्याचे निर्देश, बँकांना दिल्याचं सामंत यांनी सांगितलं.
****
जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेशासाठी नामांकनाच्या मूल्यांकन प्रक्रियेचा एक भाग म्हणून युनेस्कोच्या शिष्टमंडळानं काल रायगड किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि राज्य पुरातत्व विभागाचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते. या पथकानं कुशावर्त तलाव, होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर, बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, हत्तीखाना, भवानी मंदिर आणि टकमक टोक, या महत्त्वपूर्ण ठिकाणांसह विविध ऐतिहासिक ठिकाणांना भेट दिली. तसंच किल्ल्याचा इतिहास आणि सद्यस्थितीबद्दल तपशीलवार माहिती घेतली.
****
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी संस्थाचालकांना कल्याणच्या विशेष न्यायालयानं एका गुन्ह्यात जामीन दिला पण दुसऱ्या गुन्ह्यात अटक करण्याचे आदेश दिले. या दुसऱ्या गुन्ह्यासाठी त्यांना आज न्यायालयात सादर केलं जाण्याची शक्यता आहे. अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना कर्जतमधून अटक झालीहोती. या प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेच्या चकमकीतल्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीला गती देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले असून, चौकशीचा अहवाल १८ नोव्हेंबरला सादर करण्यास सांगितलं आहे.
****
लातूर ��िल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र,  आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा संकुल इथं कालसेरेब्रल पाल्सी, बहुविकलांग, दिव्यांग मुलांसोबत चालण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाला नागरिकांचा, दिव्यांग मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
****
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 04 October 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ ऑक्टोबर २०२४ सकाळी ७.१० मि.****
मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा, तीन ऑक्टोबर 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
पंतप्रधान उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, केंद्र आणि राज्याच्या किसान सन्मान निधीचा पुढचा हप्ता होणार वितरीत
पंतप्रधान आंतरवासिता योजनेला सुरुवात, येत्या पाच वर्षात एक कोटी युवकांना अग्रणी कंपन्यांमधे मिळणार प्रशिक्षणाची संधी
शारदीय नवरात्रोत्सवाचा राज्यात उत्साह
आणि
महिला टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत-न्यूझीलंड सामना
****
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषांना देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तीन ऑक्टोबर हा दिवस यापुढे 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णयाचं साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केलं आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी या निर्णयाचं स्वागत करत, या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली. ते म्हणाले...
“उशीरा का होईना मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला, त्याबद्दल भारत सरकारच्या मंत्रिमंडळाचे मी अभिनंदनही करतो आणि आभारही मानतो. हा निर्णय घेतल्यानंतर त्याच्या तत्काळ कार्यवाहीची मराठी समाजाला, महाराष्ट्राला अपेक्षा आहे. तशी कार्यवाही तातडीने व्हावी, अशा प्रकारची मागणी महाराष्ट्रातल्या मराठी समाजाच्या वतीने मी करतो.’’
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळं भाषेच्या समृद्धीसाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जातात. यात केंद्र सरकारकडून दरवर्षी २५० ते ३०० कोटी रुपये अनुदान मिळते. तसंच देशभरातील विद्यापीठांमध्ये मराठी भाषेसाठी विशेष केंद्र उभारुन, मराठी भाषा शिकण्याची व्यवस्था केली जाते.
दरम्यान, राष्ट्रीय खाद्य तेल मिशनला मान्यता, शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी पीएम राष्ट्रीय कृषी विकास योजनेला मंजुरी, रेल्वे कर्मचाऱ्यांना दोन हजार २९ कोटी रुपये बोनस, आदी निर्णयांनाही काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पाच ऑक्टोबरला राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. वाशिम इथं होणाऱ्या एका कार्यक्रमात पी.एम. किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांचे ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीतले अनुक्रमे १८ वा आणि पाचवा हप्ता मोदी यांच्या हस्ते वितरीत करण्यात येणार आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ही महिती दिली.
****
पंतप्रधान आंतरवासिता योजनेला काल प्रायोगिक तत्वावर प्रारंभ झाला. या पथदर्शी प्रकल्पासाठी सरकारने ८०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी पीएम इन्टर्नशीप डॉट एम सी ए डॉट जी ओ व्ही डॉट इन, या पोर्टलवर येत्या १२ ते २५ ऑक्टोबर दरम्यान अर्ज करायचे आहेत. २१ ते २४ वर्ष वयोगटातल्या ��णि पूर्णवेळ नोकरी किंवा पूर्णवेळ शिक्षण न घेणाऱ्यांना योजनेसाठी अर्ज करता येईल. पात्र लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून दरमहा साडेचार हजार रुपये तर नियोक्ता कंपनीकडून दरमहा ५०० रुपये मिळतील. येत्या पाच वर्षात देशातल्या एक कोटी युवकांना ५०० अग्रेसर कंपन्यांमधे आंतरवासिता प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन देणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मुंबई महानगरपालिकेने दादर इथं शिवाजी पार्क मैदानावर येत्या १२ तारखेला दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा दसरा मेळावा वांद्रे कुर्ला संकुलावर होणार आहे.
****
शारदीय नवरात्रोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. राज्यात आदिशक्तीच्या साडे तीन शक्तीपीठांसह देवीच्या सर्वच मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीनं घटस्थापना करण्यात आली. राज्यातल्या महत्त्वाच्या देवी मंदिरांतल्या घटस्थापनेचा आढावा घेणारा हा वृत्तांत...
“नांदेड जिल्ह्यात माहूर इथं रेणुका देवीच्या नवरात्रोत्‍सवाला आज घटस्थापनेनं प्रारंभ झाला. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शेकडो लोकांनी काल पहिल्या माळेला रेणुकामातेचं दर्शन घेतलं. नवरात्रोत्सव कालावधीत भाविकांच्या वाहतुक सेवेसाठी एसटीच्या ११० बस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत, तसंच याठिकाणी तीन आरोग्य पथकंही नियुक्त करण्यात आली आहेत’’
**
“धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथल्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरात मंदिर समितीचे अध्यक्ष तथा धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत घटस्थापना करण्यात आली. त्यापूर्वी घटाची कल्लोळतीर्थापासून मिरवणूक करण्यात आली. यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नऊ दिवस चालणाऱ्या या शारदीय नवरात्र महोत्सवात तुळजाभवानी देवीच्या विविध अलंकार महापूजा मांडण्यात येतात.’’
**
“कोल्हापूर इथं करवीर निवासिनी अंबाबाई देवीची काल श्रीसूक्तवर्णित श्रीमहालक्ष्मी रुपात पूजा बांधण्यात आली. मंदिरात सकाळी अभिषेक पूजा झाल्यानंतर घटस्थापना होताच तोफेची सलामी देण्यात आली.’’
**
“नाशिक जिल्ह्यात वणी इथं सप्तशृंगी देवीची प्रधान आणि जिल्हा सत्र न्या��ाधीश श्रीचंद जगमलानी यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. त्यापूर्वी देवीच्या अलंकाराची भव्य मिरवणूक काढण्यात आली. घटस्थापनेनंतर देवीच्या ��र्शनासाठी भाचिकांनी गडावर मोठी गर्दी केली होती.’’
**
“अंबाजोगाई इथं श्री योगेश्वरी देवीच्या वर्णी पूजेनंतर घटस्थापनेनं नवरात्राला प्रारंभ झाला. बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी आज सकाळी सपत्निक महापूजा केली. १२ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या उत्सवात दररोज भजन, कीर्तन, प्रवचन, आदी उपक्रम राबवले जाणार आहेत.’’
**
“खान्देश कुलस्वामिनी असलेल्या धुळ्याच्या एकविरा देवीची नवरात्राच्या पहिल्या दिवशी खासदार डॉ. शोभा दिनेश बच्छाव यांच्या हस्ते पूजा आरती करण्यात आली, भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.’’
**
“अहमदनगर जिल्ह्यात मोहोटा देवीसह जिल्हाभरातल्या विविध ३६ स्थळांवर भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्याचं दिसून येत आहे.’’
**
“छत्रपती संभाजीनगर इथं कर्णपुरा परिसरात तुळजाभवनी मंदीरात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते तथा मंदिराचे मुख्य पुजारी अंबादास दानवे यांच्या हस्ते आज घटस्थापनेनंतर आरती करण्यात आली. शहर परिसरातून शेकडोच्या संख्येनं भाविक पहाटेपासूनच देवीच्या दर्शनासाठी गर्दी करत असल्याचं दिसून येत आहे.’’
****
हिंगोली इथल्या १७० वर्षाची परंपरा असलेला दसरा मेळाव्याला काल सुरुवात झाली. सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने यानिमित्तानं भरवण्यात आलेल्या औद्योगिक आणि कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते झालं. या दसरा मेळाव्यात विविध सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमाबरोबरच विविध क्रीडा स्पर्धांचंही आयोजन करण्यात आलं आहे.
****
क्रिकेट
महिलांच्या आयसीसी टी-ट्वेंटी विश्व करंडक स्पर्धेत आज भारताचा सामना न्यूझीलंडसोबत होणार आहे. दुबई इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडे सात वाजता सुरु होईल. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज दरम्यान देखील आज सामना होणार आहे.
दरम्यान, शारजा इथं काल या स्पर्धेला सुरुवात झाली. सलामीच्या सामन्यात बांग्लादेशनं स्कॉटलंडचा १६ धावांनी, तर अन्य एका सामन्यात पाकिस्ताननं श्रीलंकेचा ३१ धावांनी पराभव केला.
****
राज्य सरकारनं २०२२-२३ या वर्षासाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार बॅडमिंडनपटू आणि प्रशिक्षक प्रदीप गंधे यांना जाहीर केला आहे. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक आणि जिजामाता पुरस्कार क्रिकेटसाठी दिनेश लाडे, पॅरा शूटींगसाठी सुमा शिरुर, दिव्यांगांच्या ॲक्वेटीक्सकरता राजाराम घाग, धनुर्विद्येसाठी शुभांगी रोकडे, जिम्नॅस्टिकसाठी पवन भोईर आणि कबड्डीसाठी अनिल घाटे यांची निवड झाली आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 03 October 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ ऑक्टोबर २०२४ सकाळी ७.१० मि.****
निरंतर प्रयत्नांमुळेच स्वच्छ भारताचं उद्दीष्ट पूर्ण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
स्वच्छता अभियानाची सांगता, रस्ते, बसस्थानकं, यासह विविध सार्वजनिक ठिकाणी लोकसहभागातून स्वच्छता
छत्रपती संभाजीनगर जिल्ह���यातल्या बाजार सावंगी प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कार
नवव्या आयसीसी महिला टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून शारजा इथं सुरुवात
आणि
शारदीय नवरात्रोत्वाला प्रारंभ, घटस्थापनेची विविध मंदीरांमध्ये तयारी पूर्ण
****
निरंतर प्रयत्नांमुळेच स्वच्छ भारताचं उद्दीष्ट पूर्ण झाल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. स्वच्छता ही सेवा अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त काल नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. स्वच्छ भारत अभियानाला जनआंदोलनाचं स्वरुप आलं असून, यामध्ये सहभाग घेतलेल्या सर्वांचे पंतप्रधानांनी आभार मानले.
आजपासून एक हजार वर्षांनंतर जेव्हा २१ व्या शतकातील भारताविषयी अभ्यास केला जाईल, तेव्हा स्वच्छ भारत अभियानाची आठवण होईल. या शतकात, स्वच्छ भारत हा जगातला सर्वात मोठा आणि लोकांच्या नेतृत्वाखालील लोकांचा संकल्प असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले,
‘‘आज से एक हजार साल बाद भी जब इकसवी सदी के भारत का अध्ययन होगा, तो उसमें स्वच्छ भारत अभियान को जरूर याद किया जायेगा। स्वच्छ भारत इस सदी में दुनिया का सबसे बडा और सबसे सफल जन भागीदारी वाला जन नेतृत्व वाला जन आंदोलन है।’’
यावेळी पंतप्रधानांनी स्वच्छतेशी संबंधित नऊ हजार सहाशे कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचा प्रारंभ केला. यात अमृत प्रकल्प स्वच्छ गंगा राष्ट्रीय अभियान आणि गोबरधन योजनेअंतर्गत १५ बायोगॅस प्रकल्पांचा समावेश आहे.
अमृत-दोन योजनेंतर्गत सातारा पालिकेच्‍या स्वयंचलित पाणीपुरवठा प्रकल्‍पाचं, नळजोडण्‍यांना अद्ययावत मीटर बसवण्‍याच्‍या कामाचं, तसंच लातूर इथल्या हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्र आणि औसा इथल्या शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेचा यात समावेश आहे.
स्वच्छ भारत अभियानामुळे पाच लाख ५४ हजार गावं उघड्यावर शौचापासून मुक्त ठरली आहेत. या अभियानात ११ कोटी ६५ लाख घरगुती शौचालयं बांधण्यात आली. परिणामी अतिसारामुळे होणारे मृत्यू रोखण्यात यश आल्याचं, जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटलं आहे.
****
दरम्यान, देशभरात कालही स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. रस्ते, बसस्थानकं, यासह विविध सार्वजनिक ठिकाणी लोकसहभागातून स्वच्छता करण्यात आली.
राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीच्या सामग्रीमध्ये ८० लाख टन विलगीकृत कचऱ्याचा वापर करण्यात आल्याची माहिती, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी दिली, ते काल नागपूर महापालिकेच्या श्रमदान कार्यक्रमात बोलत होते.
**
छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त ��ी श्रीकांत यांनी अभिवादन केलं. शहरात शहागंज इथल्या गांधी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या वतीनं काल छत्रपती संभाजीनगर इथं सामुहिक सूतकताई करण्यात आली. अडीच हजारांहून अधिक विद्यार्थी, शिक्षक तसंच कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सहभागी होत विविध प्रकारच्या चरख्यांवर सूतकताई केली. या उपक्रमाची नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये झाली आहे.
****
परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात काल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्वच्छतेचे कार्य हे केवळ एक तास किंवा एक दिवसा पुरता न ठेवता कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचं आवाहन कुलगुरू डॉ. इंद्रमणी यांनी यावेळी केलं.
लातूर जिल्हा परिषद परिसरात श्रमदान कार्यक्रम घेण्यात आला. स्वच्छ, सुंदर आणि निरोगी राहण्यासाठी स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी असं प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी  केलं.
नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्‍यातल्या पिंपळगाव येवला इथं जिल्हा प्रशासनातर्फे काल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
****
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातले फरारी आरोपी तसंच संबंधित शाळा संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे या दोघांनाही ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं काल कर्जत परिसरातून अटक केली. या दोघांचाही ताबा राज्य शासनाने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाकडे दिला जाणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुल��ाबाद तालुक्यातल्या बाजार सावंगी या प्राथमिक आरोग्य केंद्राला २०२३-२४ या वर्षासाठीचा प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कार मिळाला आहे. जिल्ह्यातली १२ प्राथमिक आरोग्य केंद्रं तसंच २६ आरोग्यवर्धिनी केंद्रांनाही कायाकल्प पुरस्कार जाहीर झाला आहे. आरोग्य केंद्रातल्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचं, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी कौतुक केलं आहे.
****
नवव्या आयसीसी महिला टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून शारजा इथं सुरुवात होत आहे. भारताचा पहिला सामना उद्या चार तारखेला न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या स्पर्धेत खेळणार आहे.
****
पेरु देशात लिमा इथं सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं चौथ्या दिवशी पाच सुवर्ण पदकांची कमाई केली. पुरुषांच्या ५० मीटर रायफल सांघिक स्पर्धेत शौर्य सैनी, वेदांत आणि परीक्षित सिंग यांच्या संघाने सुवर्ण पदक पटकावलं. सध्या या स्पर्धेत भारत १४ पदकांसह पदकतालिकेत आघाडीवर आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड इथं येत्या सोमवारपासून खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. या स्पर्धेत १० जिल्ह्यातल्या ४०० खेळाडूंचा सहभाग असेल. या स्पर्धा ५७ ते १२५ किलो पुरुष वजनी गटात तर ५७ ते ७७ किलो महिला वजनी गटात खेळवल्या जाणार आहेत.
****
शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात माहूर, धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर, अंबाजोगाई इथं योगेश्वरी तसंच अंबड इथं मत्स्योदरी देवस्थानसह आदिशक्तीच्या सर्वच मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी दिसून येत आहे.
तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेची आज पहाटे मंचकी निद्रा संपून देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. या नवरात्र महोत्सवात विविध अलंकार महापूजा मांडण्यात येणार असून, यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. आज दुपारी बारा वाजता तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष तथा धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना होणार आहे.
माहूर इथं नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. नवरात्रोत्सव कालावधीत ११० बस वाहतूक सेवेसाठी उपलब्ध राहणार असून, तीन आरोग्य पथकंही नियुक्त करण्यात आले आहेत.
अंबाजोगाई इथं आज सकाळी आठ वाजता बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या हस्ते सपत्निक वर्णी देऊन घटस्थापना तसंच योगेश्वरी देवीची महापूजा होणार आहे.
छत्रपती संभाजीनगरात कर्णपुरा इथल्या तुळजाभवानी देवीच्या यात्रेला आजपासून सुरवात झाली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काल या स्थळाची पाहणी करून भाविकांसाठी केलेल्या सुविधा तसंच उपाययोजनांचा आढावा घेतला.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या जल आणि व्यवस्थापन संस्था - वाल्मीतील प्रशिक्षणार्थी अभियंत्यांनी शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्याचं आवाहन, उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी केलं आहे. वाल्मीच्या पंचेचाळीसाव्या स्थापना दिन कार्यक्रमात ते काल बोलत होते. या निमित्तानं वाल्मी परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा इथले शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचं काल पुण्यात निधन झालं, ते ५९ वर्षांचे होते. पाटील यांनी दोन वेळा परंडा विधानसभेचं प्रतिनिधित्व केलं होतं. धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर आज परंडा इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
****
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 03 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व शैक्षणिक संस्थांना मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचं आवाहन केलं आहे. पुण्यात आज सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा २१ वा दीक्षांत समारंभ राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या. मूल्याधारित शिक्षण देणं आणि विद्यार्थ्यांना समाजाची संस्कृती आणि गरजा समजावून सांगणं, हे शैक्षणिक संस्थांचं ध्येय असलं पाहिजे, असं त्या म्हणाल्या. विशेषतः समाजातल्या वंचित घटकांना लक्षात घेऊन आरोग्य सेवा उत्पादनं विकसित करण्याची सूचना देखील त्यांनी केली. या दीक्षांत समारंभात ११ सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांपैकी आठ मुली असल्याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, विद्यापीठाचे कुलपती शां.ब.मुजुमदार यावेळी उपस्थित होते.
****
दरम्यान, आज मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या समारंभाला राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. उद्या चार तारखेला लातूर जिल्ह्यात उदगीर इथं बुद्ध विहाराचं ��ोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी उदगीर नगरी सज्ज झाली आहे. शहरातल्या उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य सभा मंडप उभारण्यात आला आहे. या ठिकाणी ��ुरू असलेल्या तयारीचा राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आढावा घेतला.
****
‘विकसित भारत : सुरक्षित आणि शाश्वत ई-सेवा वितरण’ या विषयावरील दोन दिवसीय ई-गव्हर्नन्स परिषदेला आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरुवात झाली. उपमुख्यमंत��री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. विविध पुस्तिका आणि प्रबंधांचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं.
****
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे.
धुळे विभागातल्या नऊ आगारात कर्मचारी संपात सहभागी झाल्याने प्रवाशांची कोंडी झाली आहे. वाशिम आगारातून सकाळपासून बससेवा पूर्णपणे बंद असल्याने अनेक प्रवासी बस स्थानकावरुन परतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी च्या संपामुळे चाकरमानी, तसंच शाळकरी मुलांची गैरसोय होत आहे. सावंतवाडी डेपो मधून एसटी फेऱ्या पूर्णपणे बंद असून, कणकवली सह अन्य ठिकाणी या बंदचा संमिश्र परिणाम पाहायला मिळत आहे.
गोंदिया जिल्ह्यातही पोळ्याचा पाडवा म्हणजे मारबत उत्सवावर एसटी बंदचा परिणाम दिसून आला. दर वर्षी गोंदिया आगारातून जादा बस सोडल्या जातात, मात्र आज सकाळपासून बस बंद आहेत. भंडारा जिल्ह्यात मात्र बससेवा सुरळीत सुरू आहे. मारबत उत्सवामुळे ठराविक वेळेवर एस टी बसेस सोडल्या जात आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृती समितीच्या सदस्यांसोबत उद्या मुंबईत बैठक बोलावली आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होईल, अशा प्रकारे कोणतीही कृती करू नये, असं आवाहन, राज्य मार्ग परिवहन महामंडळनं केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या सोडेगाव, डोंगरगाव पूल आणि सावरखेडा या ठिकाणी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज पाहणी केली. नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तात्काळ अहवाल सादर करावा, असं सांगून त्यांनी, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दखल घेऊ असं आश्वासन दिलं.
****
जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी, तर मंठा, परतूर तालुक्यात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
दरम्यान, जालना शहराला पाणी पुरवठा करणार्या घाणेवाडी इथल्या संत गाडगेबाबा जलाशयात पाण्याची आवक सुरु आहे. हे जलाशय १२ फूट इतका भरला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आंध्र प्रदेश आणि तेलंग��ा राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे काही रेल्वे गाड्या रद्द, तर काहींच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. आज नांदेड-संबलपूर एक्स्प्रेस, शिर्डी - काकीनाडा एक्स्प्रेस, विशाखापट्टणम - नांदेड तर उद्या काकिनाडा - शिर्डी एक्स्प्रेस आणि नांदेड - विशाखापट्टणम एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. आज नगरसोल-नरसापूर ही गाडी काझीपेट आणि विजयवाडा या स्थानकांवर थांबणार नसल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.
****
आंतरराष्ट्रीय युवा परिषद आणि नांदेड इथल्या पीपल्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या नांदेड इथं एक दिवसीय प्रादेशिक भाषा आंतरराष्ट्रीय युवा परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष, माजी खासदार डॉ.व्यंकटेश काब्दे आणि प्रा.डॉ.अविनाश कदम मार्गदर्शन करणार आहेत. “मराठवाड्यासाठी शाश्वत विकासाची आव्हाने” हा परिषदेचा विषय आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
विधी आणि न्याय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढणं हे सृदृढ आणि बळकट न्यायव्यवस्थेचं द्योतक - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन
राजकोट पुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचं आज मुंबईत आंदोलन
राष्ट्रीय पोषण सप्ताहाला देशभरात सुरुवात
आणि
मराठवाड्यासह विदर्भात आज अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, जलसाठ्यात वाढ
****
विधी आणि न्याय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढणं ही सकारात्मक बाब असून, भारतीय न्याय व्यवस्था अधिक सृदृढ आणि बळकट असल्याचं ते द्योतक आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतीगृहाचं उद्घाटन आज फडणवीस यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील, न्यायमूर्ती रविंद्र घुगे, राज्याचे महा अधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु ए. लक्ष्मीनाथ, खासदार डॉ. भागवत कराड यांच्यासह विधी आणि न्याय क्षेत्रातले विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.
उत्तम न्याय व्यवस्थेमुळे गुंतवणूक प्रक्रिया ही कायदेशीररित्या होण्याचा विश्वास असल्यामुळे आपल्या देशात येण्यास गुंतवणूकदार उत्सूक असतात, त्याचंच फलित म्हणून आपण जगातली सर्वोत्कृष्ट अर्थव्यवस्था होण्याकडे वाटचाल करत असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले. न्यायदानाची प्रक्रिया ही अधिकाधिक तंत्रस्नेही आणि लोकाभिमुख करण्यात आपण योग्यदिशेनं पावले टाकत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण इथं राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडण्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं आज मुंबईत आंदोलन केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांनी हुतात्मा चौकात जमून सरकारचा निषेध केला. तिथून गेटवे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा काढून, या ठिकाणच्या छत्रपती शिवा���ी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आलं.
नांदेडमध्येही विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं.
****
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून, त्यांना पराभव दिसत आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यशामुळे परिस्थिती बदलली असल्याचा दावा त्यांनी केला. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचं आंदोलन पूर्णपणे राजकीय असल्याची टीका केली.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या आंदोलना��ा प्रत्युत्तर म्हणून भाजपानेही आज आंदोलन केलं. नाशिक इथं मुंबई-आग्रा महामार्गावर पाथर्डी फाटा इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या आर्थिक हिताचं रक्षण होऊन त्या आर्थिक उन्नतीसाठी सक्षम होतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी इथं पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसन्मान यात्रा काढण्यात आली, त्यानंतर ते बोलत होते. कोणाच्याही हक्काला आमचा विरोध नाही, आम्ही आरक्षणाचं रक्षण करणारे आहोत, मात्र विरोधकांनी आमच्यावर खोटा आरोप लावत जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप पवार यांनी यावेळी केला.
****
राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते आज देशातल्या ५० युवा नादस्वरम कलाकारांना शिष्यवृत्तीचे धनादेश प्रदान करण्यात आले. मुंबईत झालेल्या नादस्वर उत्सव या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते युवा आणि होतकरू नादस्वरम वादकांना प्रत्येकी एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यावेळी राज्यपालांच्या हस्ते प्रसिद्ध नादस्वर वादक शेषमपट्टी शिवलिंगम यांना श्री षण्मुखानंद नादस्वरम चक्रवर्ती संगीत कला विभूषण जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. इलेक्‍ट्रॉनिक स्वरवाद्यांच्या वाढत्या प्रसारामुळे नादस्वरम हे ध्वनी वाद्य हळुहळू विलुप्त होत आहे. या कलेचं जतन करण्याच्या हेतूनं दरवर्षी ५० नादस्वर कलाकारांना चक्रवर्ती टी एन राजा रथिनम पिल्लई फेलोशिप देण्यात येते.
****
राष्ट्रीय पोषण सप्ताहाला आजपासून देशभरात सुरुवात झाली. महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अन्न आणि पोषण मंडळातर्फे १९८२ पासून दरवर्षी एक ते सात सप्टेंबरदरम्यान हा सप्ताह साजरा केला जातो. पोषण तसंच आरोग्याबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणं हा याचा उद्देश आहे. तसंच विविध वयोगटांच्या पोषणाच्या गरजांबाबतची माहिती नागरिकांना देणं, सरकार आणि स्वयंसेवी संस्थांमार्फत पोषणाबद्दल शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून राबवले जाणारे उपक्रम अधोरेखित करणं यावरही या सप्ताहादरम्यान भर दिला जातो.
पोषण सप्ताहानिमित्त अकोला जिल्ह्यातल्या सर्व अंगणवाडी केंद्रांवर विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्याचा शुभारंभ आज अंगणवाडी केंद्रांवर वृक्षारोपण करून करण्यात आला.
****
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ३९ रुपयांची वाढ झाली आहे. इंडियन ऑईलच्या संकेतस्थळावर ही माहिती देण्यात आली. याआधी गेल्या महिन्यात ८ रुपये ५० पैशांनी एलपीजी गॅसच्या किंमती वाढवण्यात आल्या होत्या, तर जुलैमध्ये गॅस सिलिंडरचे दर ३० रुपयांनी कमी झाले होते.
****
मराठवाड्यासह विदर्भात आज अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे.
परभणी जिल्ह्यात सुरु असलेल्या म��सळधार पावसामुळे ओढे, नाले ओसांडून वाहत आहेत. मुद्गल बंधाऱ्याचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. झिरोफाटा - पूर्णा दरम्यान माटेगाव पुलावरून पाणी आल्याने नांदेड - परभणी मार्ग बंद झाला, तसंच मलासोंना - दैठणा ओढ्यावरील पुलावर पाणी आल्यानं आठ गावांचा संपर्क तुटला आहे. दैठणा गावात अतिवृष्टमुळे घर कोसळलं, तर जिंतूर तालुक्यातले ओढे ओसंडून वाहत असल्याने शेतात पाणी शिरल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गंगाखेड तालुक्यातला मासोळी प्रकल्प पूर्णतः भरल्यानं कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येणार असल्याने आठ गावांना उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हिंगोली जिल्ह्यात आज दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस होत असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यानं कयाधू नदीसह अन्य नदी-नाल्यांना पूर आणि अनेक भागांत घरांमध्ये पाणी शिरलं आहे. सातत्यपूर्ण पावसानं एकंदर जिल्हाभरात जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: हिंगोली शहरातल्या काही व्यापारी पेठांमध्ये पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
बीड शहराला पाणीपुरवठा करण्यासह परिसरात शेतीसिंचनासाठी प्रमुख जलसाठा असलेल्या पाली इथल्या बिंदुसरा जलप्रकल्पाचा तलाव आता पूर्णपणे भरला आहे. आज याठिकाणी शेतकरी आणि स्थानिकांच्या उपस्थितीत आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं.
दरम्यान, बिंदुसरा प्रकल्पाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यानं, नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नांदेडमध्ये काल रात्रीपासून जोरदार पाऊस पडला. यामुळे जिल्ह्यातले विष्णुपुरी आणि मानार हे दोन्ही प्रकल्प पूर्ण भरले आहेत.
जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येत आहेत.
वाशिम जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडत असून, खंडाळा घाट इथं दरड कोसळल्याने सकाळपासून वाशिम - पुसद मार्ग बंद आहे. मानोरा तालुक्यातल्या इंजोरी इथल्या नदीला मोठा पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
यवतमाळ च्या महागाव, उमरखेड, पुसद, दिग्रस तालुक्याला अतिपावसाचा तडाखा बसला असून, शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आहे. तसंच जिल्ह्यातल्या नदी नाल्यांना पूर आला आहे.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत आज बॅडमिंडनमध्ये महिलांच्या एसयू - पाच प्रकारात भारताच्या मनीषा रामदास हीनं उपान्त्य फेरीत धडक मारली आहे. उपान्त्य फेरीत तीचा सामना भारताच्याच टी मुरुगेशन सोबत होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेतलं भारताचं एक पदक निश्चित झालं आहे. पुरुष एकेरीतही एस एल पाच - प्रकारात उपान्त्य फेरीचा सामना भारताच्या सुकांत कदम आणि सुहास यतिराज यांच्यात होणार आहे. या स्पर्धेत भारत एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य पदकांसह २२व्या स्थानावर आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा इथले भाजपचे विधानपरिषदेचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांची राष्ट्रकुल संसदीय मंडळामार्फत “उत्कृष्ट भाषण” या पुरस्कारासाठी, तर मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांची ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे. परवा तीन तारखेला मुंबईत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात आजपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. राज्यात विविध मुद्यांवरून सुरू असलेली आंदोलनं, राजकीय सभा यांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. जमावबंदीचे आदेश १२ सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहेत.
****
राज्यासह देश��रात पडणाऱ्या पावसामुळे काही रेल्वे गाड्या रद्द, तर काही रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. आज लिंगमपल्ली इथून मुंबईकडे येणारी देवगिरी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. परिणामी उद्या मुंबईहून लिंगमपल्लीला येणारी ही गाडी रद्द झाली आहे. तसंच उद्या दोन सप्टेंबरला काकीनाडा पोर्ट - साईनगर शिर्डी ही गाडी, तसंच परवा तीन सप्टेंबरला शिर्डी - काकीनाडा ही गाडी रद्द करण्यात आली आहे.
उद्या नरसापूर इथून सुटणारी नरसापूर- नगरसोल या गाडीचे खम्माम ते काझीपेट दरम्यानचे सर्व थांबे रद्द करण्यात आले असून, ही गाडी विजयवाड्याहून गुंटूर, पागीडीपल्ली मार्गाने सिकंदराबादला जाणार आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या धारूर किल्ल्यातल्या आधी तीन आणि नंतर आता चौथी भिंत पडल्यानं इथल्या इतिहासप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे. पुरातत्त्व विभागाच्या पथकाकडून लवकरच पाहणी करण्यात येणार असून, किल्ल्यातील आवश्यक त्या दुरुस्तीसाठी वरिष्ठ कार्यालयाला प्रस्ताव तात्काळ पाठवला जाईल, अशी माहिती पुरातत्व विभागाचे उपअधीक्षक नितीन चौरे यांनी दिली आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 29 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
आशिया खंडातील सर्वात मोठ्या वाढवण बंदराचं उद्या पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं अनुदान लाभार्थ्यांना पूर्णपणे देण्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचे बँकांना निर्देश
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं २९ सप्टेंबरपासून पुन्हा आमरण उपोषण
आणि
राष्ट्रीय क्रीडा दिन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सर्वत्र साजरा
****
पालघर जिल्ह्यात नियोजित वाढवण बंदराचं उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. हे बंदर महाराष्ट्रासोबत देशाची वेगळी ओळख निर्माण करायला मदत करेल असा विश्वास केंद्रीय बंदर, नौकानयन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी व्यक्त केला आहे. ते आज पालघर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. आशिया खंडातील हे सर्वात मोठं बंदर असेल आणि जगातल्या आघाडीच्या १० बंदरामध्ये याचा समावेश असेल. समुद्रात सुमारे १४०० हेक्टर जागेवर भर टाकला जाणार असून, यात ९ कंटेनर टर्मिनल असतील. याद्वारे वर्षाला ३०० दशलक्ष मेट्रिक टन सामानाची वाहतूक होईल, अशी अपेक्षा आहे. या बंदरामुळे १२ लाख लोकांना प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष रोजगार मिळेल आणि आत्मनिर्भर भारतात हे बंदर एक महत्त्वाची भूमिका बजावेल, असं सोनोवाल यांनी नमूद केलं. इथल्या रोजगारासाठी आवश्यक कौशल्य स्थानिक युवकांना शिकवली जातील, अशी माहिती या विभागाचे सचिव टी. के. रामचंद्रन यांनी दिली.
****
राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दर्जेदार आणि माफक दरात हक्कांची घरं मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी म्हटलं आहे. नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल यांच्यावतीनं आज मुंबईत झालेल्या ‘द रिअल इस्टेट फोरम २०२४’ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. राज्य शासनानं महिलांना गृहखरेदीमध्ये १ टक्के मुद्रांक शुल्क सवलत जाहीर केली आहे. याचा रिअल इस्टेट उद्योगाला अप्रत्यक्षपणे मोठा फायदा होणार असल्याचं सावे यांनी सांगितलं.
****
दिल्लीतील प्रसिद्ध 'मऱ्हाटी' महाराष्ट्र एम्पोरियममध्ये आजपासून महाराष्ट्रातील मूर्तिकारांच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या प्रदर्शन आणि विक्रीला उत्साहात सुरुवात झाली. महाराष्ट्रातील मूर्तिकारांच्या कलेला राजधानीत प्रोत्साहन मिळावं, या उद्देशानं भरवलेल्या या प्रदर्शनाला दिल्लीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे.
****
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे येत्या १ सप्टेंबरला सीडीएस म्हणजेच संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा सकाळी ९ ते ११, दुपारी १२ ते २ आणि ३ ते ५ या वेळेत घेण्यात येणार आहे. तर एनडीएची परीक्षा सकाळी १० ते साडेबारा आणि दुपारी २ ते साडेचार या वेळेत घेतली जाणार असल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे.
****
सिंधुदूर्ग जिल्ह्यात राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत जे घडले ते दुर्दैवी असून, याप्रकरणी दोषींवर कारवाई होणारच, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते आज बीड इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेदरम्यान बोलत होते. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलतांना, लाडकी बहीण योजनेत बीड जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं सांगितलं.
****
राज्यात कणा नसलेलं सरकार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांची हत्या केल्याची घटना काल घडली. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या ट्वीट संदेशात हे मत व्यक्त केलं. या राज्यात महिला आणि मुलींसह, सामान्य नागरिक तर सुरक्षित नव्हताच पण आता राज्यातील शासनाचे अधिकारीही सुरक्षित नसल्याची टीका त्यांनी आपल्या संदेशातून केली आहे. याआधी युपी, बिहारला असे प्रकार घडत असल्याचं, ऐकिवात होतं. मात्र आता महाराष्ट्रातही असे प्रकार पाहून वेदना होत असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात मिळालेली रक्कम, पीक विमा, पीककर्ज यासह कोणत्याही शासकीय योजनेचे अनुदान कपात न करता पूर्णपणे लाभार्थ्यांना देण्याचे निर्देश, ���ाज्याचे पणन मंत्री तसंच छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी बँकांना दिले आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सर्व सरकारी योजनांबाबत आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातील कन्नड, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर आणि वैजापूर या चार तालुक्यात पिकविम्याची रक्कम काही कारणास्तव वितरित झाली नाही, याबाबतच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी पिकविमा कंपनीसाठी कृषी विभागानं पाठपुरावा करावा आणि तात्काळ शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही पालकमंत्री सत्तार यांनी यावेळी दिले.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथल्या विविध उद्यान विकास आणि इतर कामांचं आज पालकमंत्री सत्तार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी २९ सप्टेंबरपासून पुन्हा आमरण उपोषण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ते आज जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं बोलत होते. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेल्या वर्षी २९ ऑगस्ट २०२३ पुकारलेल्या आंदोलनाची वर्षपूर्ती झाल्यानिमित्तानं जरांगे आज गोदापट्ट्यातील १२३ गावांच्या आंदोलक समन्वयकांची आंतरवाली इथं बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी उपोषणाचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान, जरांगे यांच्या या निर्णयाला उपस्थित समाजबांधवांनी विरोध करत, हा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राष्ट्रीय क्रीडा दिन आज विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांना देशभरातून अभिवादन करण्यात आलं. दिल्लीत मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा संकुलात युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी ध्यानचंद यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं.
सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि सांगली हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय क्रीडा दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूंचा सत्कार तसंच प्रोत्साहनात्मक अनुदान प्राप्त शाळांचा यावेळी सत्कार करण्यात आला. मानवी मनोऱ्यांसह काही क्रीडा प्रकारांचं प्रात्यक्षिक ही सादर करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय छात्र सेना-एनसीसीच्या शहरातल्या विद्यार्थ्यांची यावेळी रन फॉर फिटनेस ही दौड घेण्यात आली. अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी यात सहभागी झाले.
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील खेळाडूंनी देश आणि राज्यपातळीवरील विविध खेळात यंदा विद्यापीठाला ३३ पदकं प्राप्त करुन दिली आहेत. या खेळाडूंना पुढील डिसेंबर-जानेवारी महिन्यापासून विद्यापीठातील इंडोयर मल्टीपर्पज हॉलमध्ये जागतिक दर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी ही माहिती दिली. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात कुलगुरु महानवर बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत सर्वोत्कृष्ठ ठरलेल्या संगमेश्वर महाविद्यालयाला पुरणचंद्र पुंजाल फिरता चषक प्रदान केला.
****
मुंबईच्या वांद्रे टर्मिनस पासून मडगावला जाणारी नवी एक्सप्रेस रेल्वेगाडी आजपासून सुरू झाली. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून ही गाडी रवाना केली. या कार्यक्रमाला रेल्वे, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. गणेशोत्सवासाठी विशेष गाडी असावी या स्थानिकांच्या मागणीवरून ही रेल्वे गाडी सुरू करण्यात आली आहे.
****
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमेटी च्या वतीनं आज नागपूर इथं संविधान चौकात “नारी न्याय आंदोलन” करण्यात आलं. महिलांना न्याय देण्याकरिता देशातील अनेक राज्यात “नारी न्याय आंदोलनं” करण्यात येणार असल्याचं महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा यांनी सांगितलं.
****
बदलापूर बाललैंगिक अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगर इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी च्या वतीने क्रांती चौक ते गुलमंडी पर्यंत वाहन फेरी काढण्यात आली. क्रांती चौक झाशी राणी पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीला सुरुवात झाली. सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सदरील रॅलीचा समारोप झाला.
मालवण मधील राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौक परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. पक्षाचे स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
****
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा इथल्या शांताई मंगल कार्यालय उद्यापासून १ सप्टेंबर पर्यंत आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्ये या विषयावर डिजिटल मल्टीमीडिया प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. हे प्रदर्शन सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातूर जिल्हा होमगार्ड सदस्य नोंदणीसाठी बाभळगाव पोलीस मुख्यालयात नुकतीच पथकनिहाय होमगार्ड नोंदणी प्रक्रिया घेण्यात आली. या चाचणीचा अंतरिम निकाल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 27 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
राज्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्साह-गोविंदांचा थरार अनुभवण्यासाठी नागरिकांची गर्दी
राजकोट पुतळा दुर्घटनेचा तपास आणि पुतळा पुनर्स्थापनेसाठी नौदलाचं पथक रवाना
महिला अत्याचार प्रकरणी नराधमांना भर चौकात शिक्षा द्यावी-आमदार पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया
आणि
नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
****
राज्यात आज दहीहंडीचा उत्सव साजरा होत आहे. राज्यभरात सर्वत्र सार्वजनिक मंडळांद्वारे आयोजित दहिहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकं एकावर एक थर रचत आहेत. मुंबई शहर तसंच उपनगरांमध्ये ठिकठिकाणी मानाच्या दहिहंड्या बांधण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहिहंडी उत्सव साजरा होत असल्यामुळे मुंबईत अनेक राजकीय पक्षांनीही भरघोस बक्षीसं ठेवून दहिहंडी उत्सवाचं आयोजन केलं आहे. महिलांची गोविंदा पथकंही या उत्सवात सक्रीय आहेत. हा थरार पाहण्यासाठी नागरिकही मोठ्या संख्येनं गर्दी करत आहेत.
छत्रपती संभाजीनगर इथं कोकणवाडी चौक, गुलमंडी, कॅनॉट प्लेस, टी व्ही सेंटर, गजानन महाराज मंदिर चौक, निराला बाजार या ठिकाणी दहिहंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे आज रात्री दहा वाजेपर्यंत या मार्गावरची वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याचं कारण शोधण्यासाठी आणि पुतळा पुनर्स्थापित करण्यासाठी एक पथक रवाना करण्यात आल्याची माहिती भारतीय नौदलानं एका निवेदनाद्वारे दिली आहे. या संदर्भात राज्य सरकार आणि तज्ज्ञांच्या सहकार्यानं काम सुरू असल्याचं नौदलानं म्हटलं आहे. राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काल कोसळला. त्यापार्श्वभूमीवर नौदलानं आज हे निवेदन जारी केलं आहे.
दरम्यान, हा पुतळा कोसळणं हा अपघात असून त्या जागी १०० फूट उंचीचा पुतळा उभारावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचं, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. केसरकर यांनी राजकोट इथं संबंधित ठिकाणाची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. या ठिकाणी धक्का उभारून सिंधुदुर्गपर्यंत फेरीद्वारे वाहतूक सुरू केली, तर हे स्मारक पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र होऊ शकतं, असंही केसरकर म्हणाले. पुतळा कोसळणं हा एक अपघात आहे आणि त्या दृष्टीनेच सर्वांनी त्याकडे पहावं. या अपघाताची चौकशी शासन करेल, असं आश्वासन केसरकर यांनी दिलं.
****
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळतो ही अत्यंत लाजीरवाणी बाब असून पुतळा कोसळल्या प्रकरणी फक्त ठेकेदार आणि अधिकारी नाही तर राज्य आणि केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज मुंबई इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. छत्रपतींचा पुतळा उभारणीचे काम तज्ञ आणि अनुभवी व्यक्तीला द्यायला हवं होतं, तसंच समुद्रातील खारे पाणी, वाऱ्याचा वेग या सर्व बाबींचा अभ्यास करायला हवा होता, असं नमूद करत, श्रेय घेण्याच्या नादात सरकारने कामाच्या दर्जाकडे लक्ष दिलं नाही, अशी टीका पटोले यांनी केली आहे.
****
रत्नागिरीत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या दोषी व्यक्तीला लवकरात लवकर शोधून काढून कडक कारवाई करण्याचे निर्देश, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. सामंत यांनी आज पीडितेची आणि तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस केली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्याची माहितीही सामंत यांनी पत्रकारांना दिली. प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक अर्थात एसआयटीची स्थापना केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. या पथकात महिला निरीक्षक, दोन महिला उपनिरीक्षक आणि इतर पोलीस कर्मचारी असून, त्यात तांत्रिक-वैज्ञानिक तपासाचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.
****
महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना वेदनादायी असून यातल्या नराधमांना भर चौकात शिक्षा दिली पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी दिली आहे. आज लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील वलांडी इथं आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या जन सन्मान पद यात्रेत त्या माध्यमांशी बोलत होत्या. चुकीच्या नॅरेटिव्हमुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीसह भाजपला फार वाईट परिणाम बघायला मिळाले. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत विजयाच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचं, मुंडे यांनी सांगितलं.
****
नेपाळ बस अपघातातल्या सात जखमींना विमानाने मुंबई इथं आणण्यात आलं असून, त्यांना उपचारासाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी या जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. या जखमींपैकी तिघांवर उद्या शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. तसंच आणखी चार जखमींना उद्या नेपाळहून मुंबईत आणण्यात येणार असून, त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. या सर्व जखमींना सर्वतोपरी मदत करण्यात येत असून, उपमुख्यमंत्री कार्यालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या वैद्यकीय सहायता कक्षामार्फत समन्वय ठेवला जात आहे.
****
दिल्ली मद्य धोरणातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालय आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या कैदेत असलेल्या भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के कविता यांना सर्वोच्च न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. कविता या गेल्या ५ महिन्यांपासून न्यायालयीन कैदेत असून सक्तवसुली संचालनालय आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून कविता यांची चौकशी पूर्ण झाल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
****
नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिव देहावर आज नांदेड जिल्ह्यात नायगाव इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राज्य सरकारमार्फत पुष्पचक्र अर्पण करत चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड महापालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. पोलीस दलातर्फे हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून दिवंगत खासदार चव्हाण यांना अखेरची सलामी देण्यात आली.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे चव्हाण यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून हैदराबाद इथं उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, काल पहाटे त्यांचं निधन झालं. चव्हाण यांच्या निधनाबद्दल समाजाच्या सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त होत आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी, चव्हाण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत, त्यांचं निधन हे काँग्रेस परिवारासाठी कधीही भरून न येणारं नुकसान असल्याचं म्हटलं आहे.
****
प्रत्येक व्यक्तीने पावसाळ्यात वृक्षारोपण करून त्याचं संगोपन केल्यास भविष्यामध्ये पृथ्वीचा समतोल राखला जाऊ शकतो, असं छत��रपती संभाजीनगर इथल्या देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक तेजनकर यांनी म्हटलं आहे. आज देवगिरी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय  सेवा योजना विभागामार्फत एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत पाचशे झाडं लावण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. निसर्गामध्ये होणाऱ्या बदलामुळे अनियमित पाऊस पडत असून, यामुळे तापमानामध्ये दिवसेंदिवस वृद्धी होत असल्याकडे तेजनकर यांनी लक्ष वेधलं.
****
ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे. हा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड ह�� काळाची गरज असल्याचं, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक संजीव सोनवणे यांनी म्हटलं आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने दत्तक घेतलेल्या घनशेत या गावी अश्वमेध सामाजिक संस्थेने दिलेल्या ५१ किलो बियाणातून २० हजार सीडबॉल तयार करण्यात आले. हे सिडबॉल आज विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांच्या श्रमदानाने घनशेत इथल्या जंगलात टाकण्यात आले, त्यावेळी कुलगुरू बोलत होते. जागतिक पातळीवर पर्यावरण संवर्धनाची मोठी गरज निर्माण झाल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
****
महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं येत्या ३ ऑक्टोबरपासून दुबई इथं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, न्यूझिलंड आणि पाकिस्तानचा समावेश गट अ मध्ये आहे, तर दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि स्कॉटलँड यांचा समावेश गट ब मध्ये करण्यात आला आहे. प्रत्येक संघ दोन गट सामने खेळेल, ६ ऑक्टोबरला भारत पाकिस्तान सामना होणार आहे. १७ आणि १८ ऑक्टोबरला विश्वचषकाचे उपांत्य सामने तर २० ऑक्टोबरला अंतिम सामना होणार आहे.
****
पॅरालम्पिक क्रीडा स्पर्धांना उद्यापासून पॅरिस इथं प्रारंभ होत आहे. ८४ खेळाडूंचं भारतीय पथक पॅरिसला दाखल झालं असून, विविध १२ क्रीडा प्रकारांमध्ये हे खेळाडू सहभागी होणार आहेत. टोक्यो पॅरालम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पाच सुवर्णांसह १९ पदकं जिंकली होती.
****
अमेरीकन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा टेनिसपटू सुमित नागल याचं आव्हान संपुष्टात आलं आहे. या स्पर्धेत भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्ना, युकी भांब्री आणि एन श्रीराम बालाजी यांचे दुहेरीतले सामने व्हायचे आहेत.
****
हवामान
येत्या दोन दिवसात, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
जालना शहरासह जिल्ह्यातल्या काही भागात आज काही वेळ पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या दरम्यान, नाशिक जिल्ह्यातल्या पावसाचा जोर कमी झाल्यानं, जिल्ह्यातल्या धरणातून होणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून ४५ हजार ७६९ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडलं जात आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 27.08.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 27 August 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २७ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वा.
****
वैद्यकीय व्यावसायिकांची सुरक्षा तसंच कामाच्या ठिकाणची परिस्थिती याबाबत सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या राष्ट्रीय कृती दलाची पहिली बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. या बैठकीचे अध्यक्ष केंद्र सरकारचे कॅबिनेट सचिव असतील. दलाच्या इतर सदस्यांमध्ये केंद्रीय गृह सचिव, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष, सर्जन, व्हॉईस ॲडमिरल, एम्सचे संचालक आणि न्यूरोलॉजी विभागाचे माजी प्राध्यापक यांचा समावेश आहे. कोलकाता इथल्या आरजीकार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका महिला निवासी डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं, वैद्यकीय व्यावसायिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय कृती दलाची स्थापना केली होती.
****
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. ३० ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. पहिल्या टप्प्यात २४ मतदारसंघात येत्या आठ सप्टेंबरला मतदान होणार आहे.
****
नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी केंद्र सरकरानं नव्या सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामुळे तक्रार निवारण व्यवस्था प्रणाली अधिक सुसूत्र होऊन नागरिकांच्या अधिकारातही वाढ होणार आहे. केंद्र सरकारच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी जी पोर्टल डॉट जीओव्ही डॉट इन या पोर्टलवर नागरिक तक्रार दाखल करु शकतात. ही एकल खिडकी व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व मंत्रालय विभागांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असून, हे अधिकारी या तक्रारींचं वर्गीकरण करतील आणि प्रलंबित खटल्यांच्या निपटाऱ्यावर देखरेख ठेवतील. प्रत्येक मंत्रालयासाठी एक समर्पित तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असून, २१ दिवसात प्रत्येक तक्रारींचं निवारण करणं आणि सर्व विभागांनी तक्रार निवारणाचा वेळोवेळी आढावा घेणं अनिवार्य आहे.
****
छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्यात २५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यापैकी तिघांवर प्रत्येकी आठ लाखाचं, एकावर तीन लाखांचं तर दोन नक्षलवाद्यांवर प्रत्येकी एक लाखांचं बक्षिस होतं. या नक्षलवाद्यांना छत्तीसगढ राज्यसरकारने प्रत्येकी २५ हजा�� रुपयांचा पुनर्वसन निधी दिला आहे.
****
राज्यात आज दहीहंडीचा उत्सव साजरा होत आहे. गोविंदा पथकं आज सर्वाजनिक मंडळांद्वारे आयोजित दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज आहेत.
मुंबई शहर तसंच उपनगरांमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. ठीकठिकाणी मानाच्या दहीहंड्या बांधण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सव साजरा होत असल्यामुळे मुंबईत राजकीय पक्षही यात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. त्यांनीही भरघोस बक्षीसं ठेवून दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं आहे. महिलांची गोविंदा पथकेही या उत्सवात सक्रिय आहेत. मागाठाणे इथं शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सूर्वे यांची दहिहंडी लक्षवेधी ठरणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित राहणार आहेत. मुंबई ठिकाणी दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटी उत्सव सहभागी होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या कोकणवाडी चौक, गुलमंडी, कॅनॉट प्लेस, टी व्ही सेंटर, गजानन महाराज मंदीर चौक, निराला बाजार या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे आज दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत या मर्गावरची वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे.
****
महिला आणि मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत विधानभवन इथं काल बैठक घेण्यात आली. शैक्षणिक संस्थांमधून महिलांच्या सुरक्षिततेबाबत विशेष मोहिमेद्वारे उपाययोजना राबवाव्यात, अशी सूचना गोऱ्हे यांनी यावेळी केली.
****
मुसळधार पावसामुळे गुजरातच्या अनेक भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गांधीनगर इथल्या आप्तकालीन साहाय्य केंद्रात उच्चस्तरीय बैठक घेऊन राज्यातल्या पूरस्थितीचा आढावा घेतला.
राज्यातही अनेक भागात मुसळधार पावसामुळे पाणीपातळीत वाढ झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी, गगनबावडा, आजरा आणि चंदगड तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस होत आहे. सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरली असल्याने, पाण्याचा विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर आल्यानं ४२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
****
नेपाळमध्ये दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघानं आयोजित केलेल्या वीस वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काल भारतीय संघाला बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला. हा सामना १-१ असा बरोबरीत सुटल्यानं बांगलादेशानं पेनल्टी शूटआऊटच्या बळावर ४-३ अशी मात करून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं.
****
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 24.08.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 24 August 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २४ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वा.
****
यवतमाळ इथं आज महिला सशक्तीकरण कार्यक्रमांतर्गंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दुपारी साडेबारा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लाभाचं वितरण करण्यात येणार आहे.
****
बदलापूर इथं पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं आज राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. पुण्यात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन सुरु आहे, या आंदोलनात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले आहेत, तर मुंबईत शिवसेना भवन इथंही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे निेषेध आंदोलनाची तयारी सुरु झाली आहे. 
****
देशातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना शालेय सुरक्षा आणि सुरक्षिततेबाबतच्या मार्गदर्शक सूचनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि पोक्सो कायद्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये मंत्रालयानं 'शालेय सुरक्षा आणि सुरक्षिततेबाबत मार्गदर्शक सूचना' तयार केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांमध्ये शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी स्पष्ट करण्यासोबतच, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक प्रशिक्षण, अहवाल देण्याची प्रक्रिया आणि सहाय्यक तरतुदी नमूद आहेत.
****
मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर इथं येत्या तीन आणि चार सप्टेंबर रोजी आयोजित सत्तावीसाव्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद २०२४ चं उद्घघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेचं यजमानपद यंदा महाराष्ट्राकडे आहे. "विकसित भारतः सुरक्षित आणि शाश्वत ई-सेवा पुरवणे" हा या परिषदेचा विषय आहे. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह या परिषदेचे अध्यक्ष असतील. 
या परिषदेतून सु-प्रशासन आणि ई- गव्हर्नन्ससाठीच्या उत्कृष्ट संकल्पनांचं आदान-प्रदान होणार आहे.
****
नांदेडमध्ये काल रात्री मुसळधार पाऊस झाला, या पावसामुळं शहरातल्या अनेक सखल भागात तसंच काही घरांमध्ये पाणी शिरलं. दरम्यान, नांदेड इथंच कालपासून आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ता  पंडित प्रदीप मिश्रा यांची बारा ज्योतिर्लिंग शिवमहापुराण कथा सुरू झाली आहे. या कथेसाठी टाकण्यात आलेल्या सभामंडपात पावसाचं पाणी शिरल्यानं मुक्कामी असलेल्या हजारो भाविकांची मोठी गैरसोय झाली. त्यामुळं ही कथा भाविकांसाठी दोन दिवस ऑनलाईन पद्धतीनं आयोजित करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातही काल सायंकाळनंतर जोरदार पाऊस झाला.
****
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरु आहे, काल सायंकाळपासून मात्र, संततधार पाऊस सुरु झाला असून रात्री दहानंतर जोरदार पाऊस झाला, तर आज पहाटेपासूनही जोरदार पाऊस सुरू आहे.
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात काल पासून जोरदार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील दक्षिण भागातील नद्या प्रवाहित झाल्या आहेत. यामुळं शेती आणि पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे.
****
जॉर्डनच्या अम्मान इथं सुरु असलेल्या सतरा वर्षाखालील विश्व कुस्ती चँपियनशिप स्पर्धेत भारतीय महिलांनी १८५ गुणांसह सुवर्णपदक पटकावलं आहे. भारताची काजल, सुवर्णपदक मिळवणारी पाचवी महिला पहिलवान ठरली आहे. तिने एकोणसत्तर किलो वजनी गटात युक्रेनच्या एलेक्ज़ेंड्रा रयबक हिला ९-२ अशा फरकानं हरवत हा विजय मिळवला. श्रुतिका पाटीलनं ४६ किलोग्राम वजन गटात रौप्य तर राज बाला आणि मुस्कान हिनं अनुक्रमे ४० आणि ५३ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं.
****
क्रिकेटपटू शिखर धवननं निवृत्ती जाहीर केली आहे. आज सकाळी ट्विटरवर जारी केलेल्या एका ध्वनिचित्रफितीतून त्यानं, आंतरराष्ट्रीय तसंच देशांतर्गत क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. आपल्या सुमारे १४ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत शिखरनं कसोटी, एकदिवसीय आणि टी-ट्वेंटी या तीन प्रकारात मिळून २६९ सामने खेळले, त्यात त्यानं एकूण २४ शतकं आणि ५५ अर्धशतकं झळकावली आहेत. त्याला अर्जुन पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.
****
0 notes