Tumgik
#टीव्ही!
loksutra · 2 years
Text
Grampanchayat Yojana yadi : आपल्या गावातील ग्रामपंचायत मध्ये चालू असलेले योजनेची संपूर्ण यादी पहा एका क्लिकवर
Grampanchayat Yojana yadi नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचा आपल्या वेबसाईटवर मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आलेली आहे कारण या पोस्टमध्ये आपण तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायत मधील सरकारच्या विविध योजना चालू आहे त्या बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत त्यामुळे तुम्ही या पोस्टला संपूर्ण वाचावी जेणेकरून तुम्हाला या बद्दल संपूर्ण माहिती मिळेल. सर्व गावातील ग्रामपंचायत यादी येथे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
घरातच घ्या थिएटरसारखी मजा, अर्ध्या किंमतीत खरेदी करा ६५ इंचाचा मोठा स्मार्ट टीव्ही
घरातच घ्या थिएटरसारखी मजा, अर्ध्या किंमतीत खरेदी करा ६५ इंचाचा मोठा स्मार्ट टीव्ही
घरातच घ्या थिएटरसारखी मजा, अर्ध्या किंमतीत खरेदी करा ६५ इंचाचा मोठा स्मार्ट टीव्ही Iffalcon 65 inch smart tv : तुम्हाला जर थिएटरसारखा अनुभव घरीच घ्यायचा असेल तर घरात मोठा स्मार्ट टीव्ही हवा आहे. तुम्हाला ६५ इंचाचा स्मार्ट टीव्ही स्वस्त किंमतीत मिळू शकतो. या टीव्हीवर एकूण किती डिस्काउंट मिळू शकतो, जाणून घ्या डिटेल्स. Iffalcon 65 inch smart tv : तुम्हाला जर थिएटरसारखा अनुभव घरीच घ्यायचा असेल तर…
View On WordPress
0 notes
chaitanyakulkarni98 · 28 days
Text
चित्रपटांविषयी
Tumblr media
आपल्या आयुष्यात घडणाऱ्या कोणत्याही महत्वाच्या प्रसंगी जर विचारपूर्वक आणि सजगपणे जर आपण आपली कृती,हावभाव ,वर्तन बघितलं तर सहज लक्षात येतं की आपल्यावर चित्रपट या माध्यमाचा किती जास्त प्रभाव पडलेला आहे.प्यार का इजहार किंवा लग्नप्रसंगी वाजणारी गाणी, त्यावर केलं जाणारं नृत्य वगैरे सर्व आठवावं!! बऱ्याचदा आपल्या हालचाली आणि हावभावांवरून तो कोणत्या चित्रपटांवरून प्रभावीत झालेला आहे हे सहज सांगता येऊ शकतं! सध्या चित्रपटांवर समाजातील घटनांचा प्रभाव पडतो की चित्रपटांचा प्रभाव पडून समाजमन तयार होतं हे सांगणं अवघड आहे. बहुधा दोन्ही होत असावं.
साधारणपणे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून जसे चित्रपट निर्मितीचे तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित होत गेले तसे तसे चित्रपट या माध्यमाने मानवी मनाची पकड घेतलेली आहे आणि मनोरंजनाचे साधन म्हणून आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान पटकावले आहे.त्याआधीच्या काळात लोककला सोडल्या तर पुस्तकं ही ज्ञानोपासनेचं माध्यम असण्याबरोबरच मनोरंजनाचं देखील सहज उपलब्ध असलेलं माध्यम असावीत.
या दोन माध्यमांमध्ये एक समान दुवा आहे.जर तुम्हाला वाचनाची आवड असेल तर तुम्ही हे अनुभवलं असेल की जसजसे तुम्ही वाचक म्हणून उन्नत होत जाता तसं तसं तुम्हाला आधी जे वाचलं असेल त्यापेक्षा काहीतरी अधिक चांगलं, तुमच्या मनाचा, बुद्धीचा पैस रूंदावणारं, बुद्धीला आव्हान देणारं,जाणीवा समृद्ध करणारं,आत्मोन्नतीकडे नेणारं काहीतरी हवं असतं मग मनोरंजन हे एवढंच कारण त्यामागे राहत नाही.
मराठी मध्ये तुम्ही वाचनाची सुरुवात भलेही फास्टर फेणे, बोकया सातबंडे नी केली असली तरीही मग पुढे पु .लं. देशपांडे, व. पु . काळे, गो. नी . दांडेकर ,व्यंकटेश माडगूळकर इ. वाचत तुम्ही भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर,जी ए कुलकर्णी,जयवंत दळवी,नरहर कुरूंदकर, दुर्गा भागवत वगैरे लेखकांची पुस्तकं वाचू लागता. इंग्रजीमध्ये सुरवात चेतन भगत वगैरेच्या पुस्तकाने केली असली तरीही त्यापुढे जाऊन मग इतर लेखक जसे की खुशवंत सिंग, किरण नगरकर, जे के रोलिंग,डॅन ब्राऊन इत्यादी आणि मग अगाथा ख्रिस्ती, मार्क ट्वेन, शेक्सपियर, हेमिंग्वे पासून ते काफ्का, कामू इत्यादी लेखकांकडे वळता.चित्रपटांचं सुध्दा असंच काहीसं आहे. किंवा असायला हवं.
मनोरंजन या शब्दाचा एक फारच उद्बोधक अर्थ माझ्या अलीकडेच वाचनात आला. एक म्हणजे जो प्रचलित अर्थ आहे तो की ज्यामुळे मनाचं रंजन होतं अर्थात विरंगुळा मिळतो, पण यात रंजन हा शब्द दोन अर्थांनी वापरता येतो. रक्तरंजित या शब्दात जे "रंजित" हे रंजन या शब्दाचे एक रूप आहे त्याचा अर्थ डाग असा आहे.
आपलं चित्रपट बघण्यामागे सर्वात मुख्य कारण म्हणजे आपल्याला रोजच्या कामामधून विरंगुळा म्हणून काहीतरी मनोरंजन हवं असतं पण मला मात्र तेवढ्याच कारणासाठी चित्रपट बघावा असं काही वाटत नाही.पण तेवढ्याच एका कारणासाठी आपल्याकडे अनेक जण चित्रपट बघतात आणि त्यामुळे देमार बाष्कळ बॉलीवुड, हॉलिवुड किंवा टॉलीवुड चित्रपट तयार होतात आणि होतच राहतात.
मग आपण मनोरंजनाच्या नावाखाली जी काही सामग्री बघतो त्यातून मनावर डाग पडणार नाहीत याची काळजी देखील घ्यायला हवी. बॉलीवुड, हॉलीवुड ,टॉलीवुड मधल्या मुख्य प्रवाहातल्या तद्दन मसाला चित्रपटांबद्दल दुसऱ्या अर्थाने मनोरंजन हा शब्द लागू पडतो असं बऱ्याचदा वाटतं !
माझी चित्रपट पाहण्याची सुरुवात दूरदर्शनवर शनिवारी लागणाऱ्या, ज्याला सुपरहिट मराठी चित्रपट म्हटलं जायचं ते अशोक सराफ,लक्ष्मीकांत बेर्डे ,सचिन पिळगावकर, महेश कोठारे इत्यादींचे चित्रपट पाहण्यापासून झाली. मग केव्हातरी शुक्रवारी रात्री लागणारे हिंदी चित्रपट पाहायला लागलो त्यामध्ये सलमान,शाहरुख,आमिर वगैरेंचे चित्रपट लागायचे, रविवारी दुपारी जुने हिंदी चित्रपट लागायचे त्यात दिलीपकुमार, देव आनंद, राज कपूर, राजेंद्र कुमार, अमिताभ आदींचे चित्रपट लागायचे. पण एकूण चित्रपट बघण्यासाठी तेव्हा साधनंच कमी होती. फक्त टीव्ही हे एकच माध्यम,त्यातसुध्दा केवळ दूरदर्शन हे एकच चॅनल, कारण तेव्हा अभ्यास होणार नाही म्हणून आमच्याकडे केबल फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीत लावली जायची. मग त्या उन्हाळ्याच्या सुट्टीचं वर्णन काय सांगावं !
Tumblr media
मग उन्हाळयात डोरेमॉन, शिन-चॅन,बेन-टेन अशा वेगवेगळ्या कार्टून्स पासून ते स्टार उत्सवला लागणारं बी आर चोप्रा यांचं महाभारत, रामानंद सागर यांचं श्रीकृष्ण, रामायण किंवा शक्तिमान, सोनी वरच्या सी आय डी पासून मग अमिताभ, सलमान, शाहरुख च्या एक्शन चित्रपटांपर्यंत सगळं काही बघून काढलं जायचं आणि वर्षभराचा अनुशेष भरून काढला जायचा. त्यावेळी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत असल्यामुळे इंग्रजी चित्रपट काही फारसे बघितले जायचे नाहीत किंवा बघितले तरी ते हिंदी डब असायचे आणि बरेचसे सुपरहीरोचे तद्दन मारझोडयुक्त चित्रपट असायचे.
नंतर सातवी-आठवीत "अभ्यासघर" नावाच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून काढलेल्या विक्रम वाळींबे सरांच्या क्लासला जाऊ लागलो तिथे चांगल्या इंग्रजी चित्रपटांची ओळख झाली. तिथे सरांनी आम्हाला इंडियाना जोन्स, व्हर्टिकल लिमिट, टू ब्रदर्स, थ्री हंड्रेड, रॅटाटोईल, मादागास्कर, द कराटे किड असे अनेक उत्तम चित्रपट दाखवले. तिथे चांगल्या इंग्रजी चित्रपटांबद्दल र��ची निर्माण झाली.
Tumblr media
याच सुमारास मग घरी डीव्हीडी आणि कंप्यूटर आल्यावर सीडीज आणून जॅकी चॅनचे वेगवेगळ्या कुंगफू स्टाईलवरचे रिवेंज या थीमवर बेतलेले अनेक चित्रपट बघितले. यातच एकदा एका आत्तेभावाने नववीच्या की दहावीच्या उन्हाळयाच्या सुट्टीत जवळपास २०-२५ वेगवेगळे इंग्रजी चित्रपट असलेला एक पेनड्राइव आणून दिला. त्यामध्ये इन्सेप्शन, बॅटमॅन ट्रीलॉजी, टायटॅनिक, प्लॅनेट ऑफ एप्स वगैरे भन्नाट चित्रपट होते. त्यातले तेव्हा किती समजले हा भाग जाऊ दे पण बघायला मजा आली, एकूणच हे पाश्चात्य चित्रपट म्हणजे काहीतरी वेगळं प्रकरण आहे एवढं फक्त कळत होतं.
पुढे इंजिनीअरिंगला गेल्यावर नवीन स्मार्टफोन हातात आला होता आणि नुकतंच अंबानींनी मोफत इंटरनेट जाहीर केलं होतं. अशा दोन्ही गोष्टी बरोबर पथ्यावर पडल्यामुळे, एखादा खजिनाच सापडल्यासारखं झालं ! तरीसुद्धा तेव्हा ओटीटी माध्यम फारसं प्रचलित नसल्यामुळे मोफत असलेलं टॉरेंट हाच एक पर्याय उपलब्ध होता. त्याचं तंत्र एकदा अवगत झाल्यावर मग मात्र भरमसाठ वेब सीरिज आणि इंग्रजी चित्रपट डाउनलोड करून पाहण्याचा एक कार्यक्रम सुरू झाला. म्हणजे त्या वेळी दिवसाला किमान एक चित्रपट, किंवा मग वेब सीरीजचे ४-५ एपिसोड बघितल्याशिवाय दिवस संपत नसे. सुरुवातीच्या काळात तिथे सुद्धा डब्ड चित्रपट बघितले पण हळूहळू सबटायटल्स वाचून चित्रपट बघण्याची सवय झाली.
Tumblr media
तिथे सुद्धा सुरुवात झाली ती एक्शन, क्राइम, सुपरहीरो वगैरे प्रकारातले चित्रपट बघण्यापासून. त्यात मग Marvel, DC चे अनेक चित्रपट,Mad Max Fury Road, Harry Potter, Lord of the Rings, Hobbit यांसारख्या चित्रपट शृंखला, Flash, Arrow वगैरे सीरिज हे सगळं झपाटल्यासारखं बघून काढलं. पण ते सगळे ३-४ महिन्यातच सफाचट झालं. मग जरा गूगल केल्यानंतर IMDb टॉप २५० चित्रपटांची नावं बघितल्यावर लक्षात आलं की आपण तर अजून या चित्रपट क्षेत्राच्या महासागरात किनाऱ्यावरच आहोत, काहीच बघितलं नाही,अजून पूर्ण डुबकी मारली नाही. तेव्हा कोणत्या निकषांवर सीरीज,चित्रपट बघावेत असं काही ठरलं नव्हतं. मग एक ठरलं की IMDb वर ज्यांचं रेटिंग ७ च्या वर असेल किंवा Rotten Tomatoes चं रेटिंग जर ८५% च्या वर असेल तर त्यात मग Genre साठी कोणतं अनमान न करता सीरीज,चित्रपट बघायचे.
Tumblr media
इंजिनीरिंगच्या त्या ४ वर्षांच्या काळात अनेकदा रात्र रात्र जागून अक्षरशः झपाटल्यासारखे १५०-२०० चित्रपट आणि २० -२२ सीरीज बघितल्या. त्यात लक्षणीय म्हणाव्या अशा या :
Breaking Bad
Game of Thrones
House of Cards
Mindhunter
Fleabag
Dark
Friends
The Big Bang Theory
Young Sheldon
The Marvelous Mrs. Maisel
Narcos
आणि हे जे काही आदल्या दिवशी बघितलं असेल त्यावर मग दुसऱ्या दिवशी वर्गात गरमागरम चर्चा व्हायची. आता मागे वळून त्या दिवसांकडे बघितलं की माझी मलाच शंका येते की मी नक्की इंजिनीरिंग कॉलेजला गेलो होतो की फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये !!सुरुवातीच्या काळात नावाजलेल्या अभिनेत्यांचे चित्रपट बघण्याकडे कल होता. पण हळूहळू एक लक्षात आलं की दिग्दर्शक जर चांगला असेल तर चित्रपट चांगला असण्याची शक्यता जास्त ! त्यातूनच मग हॉलीवुडच्या चांगल्या दिग्दर्शकांची नावं शोधून त्यांचे चित्रपट बघण्याचा सपाटा लावला . त्यात अर्थातच मग
Steven Spielberg
Christopher Nolan
Quentin Tarantino
David Fincher
George Lucas
Martin Scorsese
Alfred Hitchcock
Stanley Kubrick
Ridley Scott
Clint Eastwood
Roman Polanski
Francis Ford Coppola
Ron Howard
charlie Chaplin
या आणि अशा नावाजलेल्या दिग्दर्शकांचे बऱ्यापैकी सगळे चित्रपट बघून काढले. त्यानंतर मग साहजिकच मोर्चा वळला Academy Awards अर्थात Oscar मिळालेले किंवा त्यासाठी नामांकन मिळालेले चित्रपट, Cannes Film Festival Awards मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट यांच्याकडे. त्यामुळे पुढे दिलेल्या विषयांवरील अनेक चित्रपट बघितले गेले.
पहिले व दुसरे विश्वयुद्ध
वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महान लोकांचे बायोपिक्स
धर्म-तत्वज्ञान -पौराणिक गोष्टी
खेळ
पत्रकरिता
अनेक उत्तमोत्तम कालातीत कादंबऱ्यांची चित्रपटात केलेली रूपांतरे,
पीरियड ड्रामाज
मूलभूत मानवी प्रवृत्तींचे व भावभावनांचे दर्शन
गुन्हेगारी प्रवृत्तींचे वास्तववादी दर्शन
लैंगिकता
कोर्टरूम ड्रामाज
प्रेमाचं वेगवेगळ्या स्थल-कालातले आणि वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरचे दर्शन
माणसाच्या मनात विशिष्ट परिस्थितीत चालणारे वेगवेगळ्या विचारांचे आणि भावनांचे द्वंद्व.
विज्ञान कथा
या इतक्या वैविध्यपूर्ण विषयांवर बनलेले आशयसंपन्न चित्रपट बघितल्यानंतर आता भाषेचं आणि विषयाचं बंधन राहिलं नव्हतं.फक्त चित्रपटाचं दिग्दर्शन,संगीत, अभिनय,कथा,संवाद चांगले असायला हवेत.आता ऑस्कर जिंकलेले, नामांकन मिळालेले, त्याचबरोबर ज्याला World cinema म्हणतात ते, म्हणजे खऱ्या अर्थाने वैश्विक मानवी मूल्यांवर भाष्य करणारे असे चित्रपट बघण्यात मजा येऊ लागली. यातून मग विविध भाषांमधले चित्रपट बघितले:
फ्रेंच चित्रपट (French New Wave मधले चित्रपट , Ingmar Bergman वगैरेंचे चित्रपट)
Tumblr media
ईटालियन चित्रपट(Vittorio De Sica, Federico Fellini, Giuseppe Tornatore इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
Tumblr media
जपानी चित्रपट (Akira Kurosawa या महान दिग्दर्शकाचे चित्रपट)
Tumblr media
इराणी चित्रपट (Asghar Farhadi, Abbas Kiarostami,Majid Majdi, Jafar Panahi इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
Tumblr media
कोरियन चित्रपट(Bong Joon-ho,Park Chan-wook इ. दिग्दर्शकांचे)
Tumblr media
चिनी चित्रपट (Wong Kor Wai,Zhang Yimou,Huo Jianqi इ. दिग्दर्शकांचे)
Tumblr media
बंगाली चित्रपट (Satyajit Ray,Ritwik Ghatak, Mrunal Sen, Tapan Sinha,Rituparna Ghosh इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
Tumblr media
मल्याळम चित्रपट (G Arvindan, Adoor Gopalkrishnan इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
Tumblr media Tumblr media
तामिळ चित्रपट (Maniratnam, Kamal Haasan,Vetrimaaran, S shankar इ. दिग्दर्शकांचे )
Tumblr media Tumblr media
हिन्दी चित्रपट(विशेषत: समांतर चित्रपटांमध्ये गणले जाणारे श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, सुधीर मिश्रा, दीबाकर बॅनर्जी इ. दिग्दर्शकांचे,(नसीरउद्दीन शाह,ओंम पुरी,अमरिश पुरी,स्मिता पाटील,शबाना आझमी इ अभिनेत्यांनी काम केलेले) चित्रपट.
Tumblr media Tumblr media
मराठी चित्रपट (सुमित्रा भावे -सुनील सुकथनकर ,जब्बार पटेल ,उमेश कुलकर्णी )
Tumblr media Tumblr media
अशा विविध भाषांमधील विविध विषयांवर बनलेले चित्रपट बघितले. त्यातून हे लक्षात आलं की चित्रपट जेवढा स्थानिक आणि मुळात, तिथल्या मातीत रुजलेला असेल तेवढा तो वैश्विक होतो.
प्रत्येक चांगला चित्रपट हा चांगल्या पुस्तकाप्रमाणे तुम्हाला काहीतरी देऊन जातो, तुम्हाला भावनिक दृष्ट्या ,जाणिवेच्या, नेणिवेच्या पातळीवर अधिक समृद्ध करतो. प्रत्येक चित्रपट बघताना तुम्ही स्वतः त्यातल्या अनेक पात्रांशी समरस होऊन जाता आणि त्यांचं आयुष्य जगत असता,अनुभवसमृद्ध होत असता.चांगल्या पुस्तकांप्रमाणेच, चांगल्या चित्रपटांमुळे सुद्धा एकाच आयुष्यात अनेक आयुष्यं सखोलतेने- सजगतेने जगण्याची,अनुभव घेण्याची संधी मिळते.
खरं तर एखादं पुस्तक आणि त्याचं चांगलं चित्रीय रूपांतर यात वेळेच्या अभावी निवड करायची झाली तर चित्रपटाची निवड सोयीस्कर ठरते. त्या पुस्तकातला सगळा आशय २-३ तासांमध्ये दिग्दर्शक आपल्यापर्यंत पोहोचवतो. आणि तो अधिक प्रभावी ठरतो कारण घडणाऱ्या गोष्टीच्या दिसणाऱ्या चित्रासोबत उत्तम संवादफेक,चांगला अभिनय, पार्श्वभूमीला चांगल्या संगीताची जोड असते त्यामुळे कथेचा आशय अधिक जिवंतपणे, समर्पकपणे आणि समर्थपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो.
वीर सावरकरांनी सुद्धा सिनेमाला २० व्या शतकाची सुंदर देणगी आणि एक महान कला असं एके ठिकाणी म्हटलं आहे त्यामागे हेच कारण आहे.
यात फक्त तोटा असा होतो की जी कथा आपण पडद्यावर बघतो ती दिग्दर्शकाच्या नजरेतून बघतो त्यामुळे आपल्या कल्पनाशक्तीला थोडी कमी चालना मिळते आणि पात्रांच्या मनात चाललेले विचार पडद्यावर दाखवण्यास मर्यादा असतात.
हे सगळं बघत असतानाच चांगल्या सिनेमा बद्दल अधिक माहिती देणारी, उत्तम चित्रपट कोणता, तो कसा बघावा याची दृष्टी देणारी ही काही चांगली मराठी पुस्तकं माझ्या वाचनात आली:
लाईमलाइट (अच्युत गोडबोले- नीलांबरी जोशी)
पडद्यावरचे विश्वभान(संजय भास्कर जोशी)
सिनेमा पराडिसो ( नंदू मूलमुले)
नॉट गॉन विथ द विंड (विश्वास पाटील).
तसे�� persistence.of.cinema, inthemood.forcinema,jump.cut.to यासारखी उत्तम recommendations देणारी Instagram पेजेस देखील आहेत. ChalchitraTalks नावाच्या Podcast मधून देखील उत्तम recommendations मिळतात.
त्याशिवाय कोणताही चित्रपट बघितल्यानंतर त्यावर
Roger Ebert
Senses of Cinema
सारख्या वेगवेगळ्या समीक्षकांची समीक्षा वाचण्याची सवय लागली. त्यामुळे चित्रपटाचा आपल्याला लागलाय तो आणि तेवढाच अर्थ आहे की आणखीही काही अर्थ आहे हे समजू लागले.
या सगळ्यात जसजसे आपण अधिकाधिक आणि दर्जेदार चित्रपट पाहू लागतो तसतसे काहीतरी अधिक नाविन्यपूर्ण, समृद्ध करणारं आपल्याला हवं असतं. मग सरळसोट चित्रपटांकडून जटिल विषय हाताळणाऱ्या, वेगवेगळ्या स्तरांवर मानवी भावभावना हाताळणाऱ्या, ज्यांचे एकापेक्षा अधिक अर्थ लागू शकतात अशा चित्रपटांकडे आपण जाऊ लागतो. पण त्याचा अर्थ असा नव्हे की मग साधे सरळ चित्रपट बघणे बंद करावे. त्याचा अर्थ एवढाच की जाणकार प्रेक्षक म्हणून आपली इयत्ता वाढलेली आहे.
जेव्हा आपण वेगवेगळ्या भाषांमधले,प्रांतांमधले,देशांमधले, वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट पाहतो तेव्हा आपण एक प्रकारे वैश्विक नागरिक बनतो. त्या देशांमधली संस्कृति,तिथले आचार विचार, वागण्या बोलण्याची पद्धत, तिथलं खानपान हे सगळे अप्रत्यक्षपणे अनुभवल्यामुळे आपल्या विचारात, वागण्यात खुलेपणा येतो.एवढ्या सगळ्या भावभावना अनुभवल्यानंतर शेवटी माणूस प्रेमाचा भुकेला आहे ही मौल्यवान गोष्ट,हे सत्य इतक्या विविध रुपांतून, घटनांमधून आपल्या समोर येतं, मनावर ठसतं.याहून अधिक माणसाला काय हवं !!
~ चैतन्य कुलकर्णी
10 notes · View notes
siddharthdthservice · 20 days
Text
Tumblr media
मिळवा फ्री टाटा प्ले कनेक्शन धमाका ऑफरमध्ये ₹2702 भरा तुमच्या टाटा प्ले अकाउंटमध्ये ₹3000 परत मिळवा.
धमाका 3K ऑफरमधून, टाटा प्ले साठी जे नवीन कस्टमर ₹2702 भरतील त्यांच्या टाटा प्ले अकाउंटमध्ये ₹3000 क्रेडिट केले जातील.आणि त्यांना कोणताही अतिरिक्त खर्च न करता एक टाटा प्ले HD कनेक्शन
देखील मिळेल | ही ऑफर भारतभरातील नवीन कस्टमसाठी लागू आहे.अधिक तपशीलासाठी कृपया आम्हाला -9823472226 ह्या नंबर वर कॉल करू शकता.
टाटाप्ले सह अंतिम मनोरंजन अनुभव अनलॉक करा!
टाटा प्ले एचडी कनेक्शन ऑफरसह तुमचे आवडते चॅनेल
आणि कार्यक्रम निवडण्याच्या स्वातंत्र्याचा आनंद घ्या.
आता, नॉन-स्टॉप मनोरंजनासाठी सज्ज व्हा कारण आम्ही तुमच्यासाठी एक आश्चर्यकारक डील आणत आहोत: तुम्ही फक्त पे करा 2702 ₹ आणि मिळवा 3000 ₹ रिचार्ज बॅलन्स आणि त्यासोबत मिळवा टाटा प्ले एचडी कनेक्शन मोफत.
3000₹ बॅलन्स मधून तुमचा आवडीचा पॅकेज निवडा आणि 3000₹ बॅलन्स वापरा आणि जोपर्यंत 3000₹ बॅलन्स संपत नाही तोपर्यंत रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही.
ही ऑफर मर्यादित काळासाठी कोणतीही तडजोड न करता सर्वोत्तम मनोरंजनाचा आनंद घेण्याची तुमची संधी आहे. फक्त पे करा 2702₹ आणि मिळवा 3000₹ तुमच्या टाटा प्ले अकाउंट मध्ये सोबत मिळवा Tata Play HD कनेक्शन अगदी मोफत हा अविश्वसनीय करार चुकवू नका! त्वरा करा आणि
तुमचा मनोरंजन गेम पूर्णपणे नवीन स्तरावर
नेण्यासाठी आजच ऑफरचा लाभ घ्या! या विलक्षण ऑफरसह, तुम्हाला केवळ Tata Play HD Connection मिळत नाही तर तुमचे पसंतीचे चॅनेल निवडण्यासाठी आणि अखंड मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठी 3000 रुपये शिल्लक देखील मिळत आहे. आमची रिचार्ज प्रक्रिया त्रासमुक्त आहे आणि एकदा तुम्ही रिचार्ज केल्यानंतर, तुमच्या आवडीनुसार तुमचे मनोरंजन पॅकेज कस्टमाइझ करण्याची लवचिकता तुमच्याकडे असेल.
( उदाहरणार्थ : 269₹ पॅकेज. तयार केलं तर 11 महिने 15 दिवस किंवा 335₹ पॅकेज. तयार केलं तर 9 महिने चालेल..)
👉फायदे:-
👉कस्टमर ला मिळणार 3000/- रिचार्ज बॅलन्स
👉नविन HD कनेक्शन सोबत फ्री इन्स्टॉलेशन
👉पॅकेज / चॅनल मनाप्रमाणे निवडण्याची संधी
👉रिचार्ज Pause करण्याची सुविधा
👉 जेव्हा वाटेल तेव्हा चॅनल टाकू शकता किंवा काढू
शकता.
👉Tata Play कंपनी per day चार्ज करते
👉सोबत 2 मोबाईल वर कनेक्शन फ्री..
👉 रिचार्ज करण्यास विलंब झाल्यास कोणत्याही प्रकारचे चार्जेस नाही.
👉1 वर्षाची ऑनसाइट वॉरंटी
👉फ्री इंस्टॉलेशन अंड डिलिव्हरी
👉 त्याच दिवशी डिलिव्हरी
👉 युनिव्हर्सल रिमोट. HDMI केबल. या उत्पादनामध्ये डिश समाविष्ट केली जाईल.
👉डॉल्बी डिजिटल सराउंड साउंड
👉५× तीव्र प्रतिमा
👉१६.९ गुणोत्तर
👉१०८०i रिझोल्यूशन
👉मोफत इन्स्टॉलेशन-१० मीटर केबल फ्री नंतर १२ प्रति मीटर शुल्क आकारले जाईल.
👉२४×७ सेवा आणि सर्विस
👉कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध.
👉टीप :-हे कनेक्शन संपूर्ण भारतात उपलब्ध आहे
टाटा प्ले डीटीएच तुम्हाला एक खास अनुभव देईल, जो तुम्हाला इतर कोठेही मिळणार नाही. सर्व नवीनतम तंत्रज्ञान प्रदान करणार्‍या सर्वोत्तम DTH कनेक्शनसह तुमचे सर्व आवडते शो आणि चित्रपट तुमच्या घरच्या आरामात पहा. आता संपूर्ण कुटुंब एकत्र बसून क्रिकेट सामन्यांपासून ते डेली सोपपर्यंत टीव्ही पाहू शकते, प्रत्येकासाठी काहीतरी आहे. नव्याने लॉन्च केलेल्या कॉम्बो पॅकसह, तुम्हाला एकाच वेळी Netflix + 25 OTT aap + टीव्ही चॅनेलमध्ये प्रवेश मिळेल. म्हणूनच आपण आता म्हणतो, "एंटरटेनमेंट आणखीनच झिंगालाला..
टाटा प्ले बद्दल:👇
टाटा प्ले हे एकाच टाटा प्ले सबस्क्रिप्शनसह Pay TV आणि OTT सेवा प्रदान करणारे भारतातील अग्रगण्य सामग्री वितरण प्लॅटफॉर्म आहे. प्लॅटफॉर्मवर सध्या 600 हून अधिक चॅनेल आणि सेवा (HD, SD, परस्परसंवादी सेवा आणि मूव्ही शोकेस) आणि 25 प्रीमियम मनोरंजन Aap आहेत, ज्यामध्ये Netflix अलीकडेच मिक्समध्ये जोडले गेले आहे. याव्यतिरिक्त, टाटा प्ले भारतीय बाजारपेठेसाठी सानुकूलित केलेल्या सेवा ऑफर करते. टाटा प्ले विदेशी कहानियां, टाटा प्ले रोमान्स, टाटा प्ले क्लासिक टीव्ही, टाटा प्ले कॉमेडी, टाटा प्ले म्युझिक, टाटा प्ले फिटनेस, टाटा प्ले डान्स स्टुडिओ आणि बरेच काही.
टाटा प्लेच्या विस्तृत ऑफर आणि योजनांसह तुमचा टीव्ही पाहण्याची क्षमता वाढवण्यासाठी सज्ज व्हा, तुम्ही सर्वोत्तम टेलिव्हिजन प्रोग्रामिंगचा अनुभव घेऊ शकता. गुणवत्ता आणि स्पर्धात्मक किंमतीबद्दलची आमची वचनबद्धता तुम्हाला तुमच्या मनोरंजन गुंतवणुकीसाठी अपवादात्मक मूल्य मिळेल याची खात्री देते. तुम्ही तुमचा टाटा प्ले DTH कनेक्शन घेण्यासाठी तयार आहात का? पुढील स्तरावर अनुभव घेऊन? टाटा प्ले टीव्ही आमच्या सर्वसमावेशक टाटा प्ले पॅकेजेससह मनोरंजनाच्या संधी उपलब्ध करून देते
टाटा प्ले DTH मनोरंजनाचे जग येथे आहे. ताज्या नवीन टाटा प्ले ऑफर आणि योजनांसाठी आम्ही तुमचा विश्वासार्ह स्रोत आहोत ज्यामुळे तुम्हाला अप्रतिम किमतीत टॉप नॉच प्रोग्रामिंगमध्ये प्रवेश मिळेल. Tata Play विविध सेवा प्राधान्ये देत चॅनेल आणि शोची विस्तृत श्रेणी एक्सप्लोर करा. Tata Play वर, आम्ही तुमच्या टीव्ही पाहण्याच्या अनुभवाला गुणवत्ता आणि मूल्य देण्यासाठी वचनबद्ध आहोत टाटा प्लेसह आमची पॅकेजेसची विस्तृत श्रेणी तुम्हाला तुमच्या मनोरंजनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम सबस्क्रिप्शन मिळेल याची खात्री करते.
#siddharthdthservice
#tataplaychristmasoffer
#tataplaychristmasspecialoffer2024
#tataplaychristmaspecialoffer
#tataplaychristmasnewyearspecialoffer
#tataplaynewyearoffer
#tataplay
#tataplaynewconnectionoffer
#tataplaydhamaakaoffer
#tataplay3000cashbackoffer
#tataplayhd
#tataplay3000offer
#tataplaynewconnectinoffer
0 notes
spookyneckthingbakery · 2 months
Text
Tumblr media
��ृष्टि_रचना_की_जानकारी
साधना टीव्ही पर श्याम 7:30 बजे
दृष्टि पड़े सो फना है, धर अम्बर कैलाश।
कृत्रिम बाजी झूठ है, सुरति समोवो श्वांस।।
शिव जी का घर कैलाश पर्वत पर है। वह कैलाश पर्वत भी नष्ट होगा। यह सब कृत्रिम संसार सब झूठ है। परमात्मा की भक्ति करो अपना कल्याण करवाओ।
0 notes
newsmakersinfo · 4 months
Text
स्क्रीन च्या वापराने डोळ्याच्या या समस्येत वाढ
मोबाइल, आयपॅड, लॅपटॉप, कम्प्युटर व टीव्ही अशा विविध उपकरणांच्या ‘स्क्रीन’चा दिवस-रात्र डोळ्यांवर मारा होत असून, त्यामुळे डोळ्यांच्या कोरडेपणाची (ड्राय आय) समस्या ४० टक्क्यांवर येऊन ठेपली आहे. ही समस्या १५  ते ४० या वयोगटात सर्वाधिक दिसून येत आहे. डोळ्यांच्या कोरडेपणाच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नये. पालकांनी स्वतः सह आपल्या मुलांचाही ‘स्क्रीन टाइम’ कसा कमीत कमी राहील, याला प्राधान्य दिले पाहिजे.-…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 07 May 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज मतदान होत आहे. या टप्प्यात दहा राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या ९३ मतदारसंघांचा समावेश आहे. मराठवाड्यातल्या लातूर, आणि उस्मानाबादसह राज्यातल्या ११ मतदारसंघांमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत १८ पूर्णांक १८ टक्के मतदान झालं.
लातूरमध्ये २० पूर्णांक ७४, उस्मानाबाद १७ पूर्णांक शून्य सहा, सांगली १६ पूर्णांक ६१, बारामती १४ पूर्णांक ६४, कोल्हापूर २३ पूर्णांक ७७, हातकणंगले २० पूर्णांक ७४, सोलापूर १५ पूर्णांक ६९, माढा १५ पूर्णांक ११, सातारा १८ पूर्णांक ९४, रायगड १७ पूर्णांक १८, तर रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत २१ पूर्णांक १९ टक्के मतदान झालं. 
****
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात सर्वत्र शांततेत मतदान सुरू आहे. तुळजापूर तालुक्यात नळदुर्ग इथल्या बूथ क्रमांक ३५८ वर मतदान यंत्रातील दोषामुळे मतदान २० मिनिटं उशिरा सुरू झालं. तर धाराशिव शहरात भीम नगर भागातल्या बूथ क्रमांक ३५७ वरील व्हीव्हीपॅट मशीन पंधरा ते वीस मिनिटं बंद पडल्यामुळे मतदान थांबवण्यात आलं होतं. धाराशिव शहरातल्या सरस्वती हायस्कूल मध्ये सखी महिला केंद्र असून, याठिकाणी सर्व महिला कर्मचाऱ्यांनी फेटे बांधून आणि लाल रंगाचा पोशाख परिधान करून उपस्थिती नोंदवली आहे.
या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील, माजी मंत्री पद्मसिंह पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मतदान केलं.
****
लातूर लोकसभा मतदारसंघातही शांततेत मतदान सुरु आहे. आमदार अमित देशमुख यांच्यासह कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावला. राज्याचे क्रिडा मंत्री संजय बनसोडे, भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर, महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे, महाविकास आघाडीचे उमेदवार शिवाजी काळगे यांनी देखील मतदान केलं. नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज लातूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान केलं. कंधार तालुक्यातील चिखली या त्यांच्या मूळगावी त्यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला.
****
कोल्हापूर जिल्ह्यात मतदारांना आकर्षित करण्यासाठी मतदान केंद्राबाहेर रांगोळी, आकर्षक मंडप उभारणी, पिण्याच्या पाण्याची सोय अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यातल्या वडगाव इथं पाच वाड्यातल्या आदिवासी महिला आणि पुरुषांनी स्वातंत्र्य मिळाल्यापासून पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला.
दरम्यान, पेण तालुक्यात बाळगंगा प्रकल्पग्रस्तांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे दहा मतदार केंद्रांवर सकाळी साडे अकरा वजोपर्यंत शुकशुकाट होता. जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आपल्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत या नागरीकांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या प्रचारानं आता वेग घेतला आहे. या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांमध्ये, येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज राज्यात दोन सभा होणार आहे. दुपारी अहमदनगरचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील, आणि शिर्डीचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे, यांच्यासाठी अहमदनगर इथं, त्यानंतर बीड लोकसभा मतदार संघातल्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी, पंतप्रधानांचा रोड शो आणि अंबाजोगाई इथं प्रचारसभा होणार आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांच्या प्रचारार्थ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज वाळूज इथं सभा होणार आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरातल्या लेबर कॉलनी, गणेश कॉलनी, स्वामी विवेकानंद नगर आणि टीव्ही सेंटर परिसरामध्ये पोलिसांनी आज संचालन केलं.
****
पालघरचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं.
****
कांद्याची निर्यात बंदी उठवल्यानंतर आजपासून कांदा खरेदी होत आहे. ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ या दोन्ही खरेदी यंत्रणांच्या माध्यमातून ५ लाख टन कांद्याचा बफर साठा केला जाईल.
दरम्यान, केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी संपूर्णपणे उठवून विनाअट कांदा निर्यातीसाठी प्रोत्साहन द्यावं, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेचे केंद्रीय सहसचिव डॉक्टर अजित नवले यांनी काल पुण्यात केली.
****
नांदेड इथून सुटणारी नांदेड -अमृतसर सचखंड एक्सप्रेस आज दुपारी तीन वाजता सुटणार आहे. तसंच ही गाडी येत्या १० मे पर्यंत पर्यायी मार्गानं धावणार असून, १० मे रोजी सुटणारी नांदेड जम्मू तावी एक्सप्रेसही याच पर्यायी मार्गाने धावणार असल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.
****
0 notes
pradip-madgaonkar · 5 months
Text
एका मैत्रिणीनं Hi पाठवलं.
Pradip ne पण रीप्लाय दिला
Hi म्हणून..
तिनं विचारलं, “काय चालू आहे?”
Pradip ne तिला सांगितलं,
“दोन ट्यूबलाईट, एक फॅन,
एक टीव्ही, एक मोबाइल
अणि तू!”
डायरेक्ट ब्लॉक केलं ना राव!
0 notes
bandya-mama · 5 months
Text
एका मैत्रिणीनं Hi पाठवलं.
Bandya ne पण रीप्लाय दिला
Hi म्हणून..
तिनं विचारलं, “काय चालू आहे?”
Bandya ne तिला सांगितलं,
“दोन ट्यूबलाईट, एक फॅन,
एक टीव्ही, एक मोबाइल
अणि तू!”
डायरेक्ट ब्लॉक केलं ना राव!
0 notes
adhiraj09 · 6 months
Video
youtube
जास्त टीव्ही चॅनेल अन् बिल कमी करायचंय मग हे करा
0 notes
loksutra · 2 years
Text
Pune – Nashik Ativrushti GR: 67611.47 कोटींचा निधी मंजूर, या जिल्ह्यासाठी 300 कोटी, असे होणार वाटप, पहा जिल्हानिहाय निधी..
Pune – Nashik Ativrushti GR: 67611.47 कोटींचा निधी मंजूर, या जिल्ह्यासाठी 300 कोटी, असे होणार वाटप, पहा जिल्हानिहाय निधी..
2022 मध्ये अतिवृष्टी, सततचा पाऊस, पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. बरेच जिल्हे बाधित झाले होते त्यामुळे जिल्ह्यांना नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आलेलं होतं. यासाठी आतापर्यंत साधारणपणे 5 हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची तरतूद करण्यात आली होती. काही रक्कम वितरित करण्यात आली होती. परंतु अद्यापही देखील आपण जर पाहिलं तर बरेचसे जिल्हे होते की, त्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील लोकांचं म्हणणं काय, टीव्ही 9 मराठीचा ग्राउंड रिपोर्ट
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील लोकांचं म्हणणं काय, टीव्ही 9 मराठीचा ग्राउंड रिपोर्ट
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील लोकांचं म्हणणं काय, टीव्ही 9 मराठीचा ग्राउंड रिपोर्ट सोलापूर : महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर भीमा नदी आहे. कर्नाटकच्या सीमेवरील गावांना मोफत वीज पुरविली जाते. पाणीपट्टी घेतली जात नाही. महाराष्ट्राच्या सीमेवर अक्कलकोट तालुक्यातील कुडल हे गाव आहे. कुडलचे सरपंच म्हणाले, महाराष्ट्र मोठं राज्य आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहेत. पण, कर्नाटक राज्यानं बेळगावात सुखसोयी…
View On WordPress
0 notes
manju84 · 8 months
Text
🌅 #God_Morning_Monday 🌅
🙏 #KabirisGod 🙏
#हमारीभीसुनो_बुद्धिमानहिंदुओं
#SantRampalJiMaharaj
हिंदू बांधवांनो सावधान
आमचे उद्दिष्ट :- खरे ज्ञान कथन करून जगातील मानवांना सनातन बनवणे कारण पूर्वीचा एकच सनातन धर्म होता असे भूतकाळात दिसून येते. तत्वज्ञानाअभावी आपण धर्मात विभागले गेले जे जगात अशांततेचे कारण बनले आहे.
ते एकमेकांचे कट्टर शत्रू बनले आहेत.
सर्वांचा स्वामी एकच आहे ही गोष्ट जगातील मानव कोणत्याही विरोधाशिवाय मान्य करतात.
पण तो कोण आहे?
ते कसे आहे,
म्हणजे ते साकार किंवा निराकार आहे?
मानवी रूपात की अन्य रूपात?
हे प्रश्नचिन्ह ❓ अजूनही आहे.
आता संत रामपालजी महाराजांनी हे प्रश्नचिन्ह (❓)
पूर्णपणे काढून टाकले आहे.
संत रामपाल जी महाराज अनमोल सत्संग साधन टीव्ही चॅनल ७.३० पहा
1 note · View note
mhlivenews · 8 months
Text
'त्या' बैठकीला नार्वेकर उपस्थित होते, आता विसर पडलेला दिसतोय; सावंतांनी थेट फोटोच दाखवला
कुणाल गवाणकर यांच्याविषयी कुणाल गवाणकर सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये…
Tumblr media
View On WordPress
0 notes
jagdamb · 9 months
Text
'दर्पण' या पहिल्या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून देशात मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पत्रकार. मराठी पत्रकारितेची पायाभरणी करणारे
#दर्पणकार_आचार्य_बाळशास्त्री_जांभेकर
यांच्या #जयंती निमित्त शतश: प्रणाम..
सर्व पत्रकार बांधवाना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा !
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#पत्रकार_दिन #बातम्या #वृत्तपत्र #टीव्ही #PatrakarDin #newpepar #vritapatra #news #Darpankar #Acharya #BaalshastriJambhekar
Tumblr media
0 notes
eliks9 · 9 months
Text
تلویزیون شهری
معرفی تلویزیون شهری | ارتقای تجربه شهری و اطلاع‌رسانی هوشمند
Tumblr media
Urban TV | I-Urban TV | التلفزيون الحضري | Televise i taulaga | Urbano TV ukax mä jach’a uñacht’äwiwa | Телевизиони шахр | Khawpui TV | अर्बन टीव्ही | TV ya ditoropong
0 notes