Tumgik
#जालना
mhlivenews · 7 months
Text
जालना लोकसभा कुठल्याही पक्षाच्या पाठबळाविना लढा, प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंना सल्ला
मुंबई : आम्ही मनोज जरांगे पाटील यांना निरोप पाठवला आहे की, त्यांनी हा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून करण्यात काहीही अर्थ नाही. उपोषणातून जागृती करायची होती, ती झालीय. आता आरक्षण मिळवण्याचा भाग आहे असं आम्ही मानतो, म्हणून जरांगे पाटलांनी येत्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना येथून स्वतंत्रपणे लढवले पाहिजे, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई…
Tumblr media
View On WordPress
0 notes
124bha · 11 months
Text
🙏 *सतगुरुदेव जी की जय* 🙏📚 📕📗📕 विशाल पुस्तक सेवा 📗📕📗
दि, 05/11/2023 वार रविवार
आज मालिक की असिम दया और आशिर्वाद से गाव सिगोना तहसील परतूर जि, जालना में पुस्तक सेवा करते हुए पुण्याआत्माऐ ,*बोलो बंदी छोड़ सतगुरु संत रामपाल जी महाराज जी की जय हो*
🙏🙏 सत साहेब जी 🙏🙏
2 notes · View notes
imranjalna · 8 hours
Text
जालना बाजार में उत्पात के बाद व्यापारियों की मांग - जुलूस और रैलियों पर बाजार से गुजरने पर हो  प्रतिबंध
After the uproar in Jalna market, traders demand – processions and rallies should be banned from passing through the market जालना: जालना शहर के मुख्य बाजार में गुरुवार को एक जुलूस के दौरान हुई तोड़फोड़ की घटना ने व्यापारियों में दहशत का माहौल पैदा कर दिया है. कुछ शरारती तत्वों ने दुकानों के सामने खड़े वाहनों को नुकसान पहुँचाया और दो दुकानों में घुसकर तोड़फोड़ की. इस घटना के बाद जालना जिला…
0 notes
airnews-arngbad · 12 hours
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 21.09.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 21 September 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २१ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
पारंपरिक कौशल्य हाच भारताच्या समृद्ध इतिहासाचा आधार-पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन
राज्य सरकारच्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
जालना जिल्ह्यात एसटी बस आणि ट्रकच्या अपघातात सहा प्रवासी ठार-२३ जखमी
नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
आणि
बांगलादेश विरूद्ध पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताला ३०८ धावांची आघाडी
सविस्तर बातम्या
पारंपरिक कौशल्य हाच भारताच्या समृद्ध इतिहासाचा आधार असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त काल वर्धा इथं झालेल्या विशेष कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. या कार्यक्रमासाठी वर्ध्याच्या पवित्र धरतीची निवड केल्याचं सांगत, पंतप्रधानांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचं स्मरण केलं. राज्यपाल सी पी राधाकृष्णन, केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतनराम मांझी, केंद्रीय कौशल्यविकास राज्यमंत्री जय��त चौधरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी विश्वकर्मा योजना ही फक्त सरकारी योजना नसून, विकसित भारतासाठीचा रोडमॅप असल्याचं नमूद केलं. ते म्हणाले...
विश्वकर्मा योजना केवल सरकारी प्रोग्रामभर नही है। ये योजना भारत के हजारो वर्ष पुराने कौशल को विकसित भारत के लिये इस्तमाल करने का एक रोड मॅप है। आप याद करीयें हमें इतिहास में भारत की समृद्धी के कितने ही गौरवशाली अध्याय देखने को मिलते है। इस समृध्दी का बडा आधार क्या था? इसका आधार था हमारा पारंपारिक कौशल।
विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना, ओळखपत्रं आणि प्रमाणपत्रं डिजिटल पद्धतीने पंतप्रधानांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. तसंच या योजनेच्या एक वर्ष पूर्तीनिमित्त विशेष टपाल तिकिटही पंतप्रधानांच्या हस्ते जारी करण्यात आलं. ७५ हजार विश्वकर्म्यांना यावेळी कर्ज मंजूर करण्यात आलं, यापैकी देशभरातून आलेल्या १८ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात कर्जाचे धनादेश पंतप्रधानांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्यातल्या सर्व तंत्रशिक्षण संस्थांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या संविधान मंदिराची प्रतिकृती देऊन पंतप्रधानांचा सत्कार करण्यात आला. अमरावती इथं, पीएम मित्रपार्क या समन्वित वस्त्रोद्योग परिसराची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. एक हजार एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विकसित केला जाणार आहे. या ठिकाणी भरवलेल्या प्रदर्शनात विविध कारागीरांच्या कक्षांना भेट देऊन, त्यांनी घडवलेल्या वस्तूंची पंतप्रधानांनी पाहणी केली. हे प्रदर्शन आज आणि उद्या सर्वांसाठी खुलं आहे.
****
महाराष्ट्र सरकारच्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेचं तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते काल करण्यात आलं. राज्यात एक हजार महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे, यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३३, नांदेड २८, लातूर १९, धाराशिव १८ तर परभणी जिल्ह्यातल्या १४ केंद्रांचा समावेश आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं छत्रपती शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात, नांदेड इथं महात्मा गांधी मिशनचं अभियांत्रिकी महाविद्यालय, परभणी जिल्ह्यात धर्मापुरी इथं ब्लेसिंग कॉलेज ऑफ नर्सिंग, तर धाराशिव इथं बिल गेट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात या कार्यक्रमाचं थेट प्रसारण करण्यात आलं. 
****
तिरुपती इथल्या प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीची भेसळ असल्या प्रकरणी केंद्र सरकारने आंध्रप्रदेश सरकारकडून तत्काळ अहवाल मागवला आहे. या लाडूंसाठी वापरण्यात आलेल्या तुपात प्राण्यांच्या चरबीचे अंश आढळल्याचं, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या प्रयोगशाळेच्या अहवालात म्हटलं आहे.
दरम्यान, तिरुपती तिरुमला देवस्थाननं संबंधित पुरवठादाराचं कंत्राट रद्द केलं असून, त्याला काळ्या यादीत टाकलं आहे.
****
महाराष्ट���र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण महारेराच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी मंत्रालयात मनोज सौनिक यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
****
जालना जिल्ह्यात बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात बसच्या वाहकासह ६ जणांचा मृत्यू झाला. जालना-वडीगोद्री महामार्गावर काल सकाळी ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये बसच्या वाहकासह तीन महिला प्रवासी आणि ट्रकमधील चालक आणि त्याच्या सहायकाचा समावेश आहे. अपघातात बसमधील २३ प्रवासी जखमी झाले. यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
****
नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, युवा नेत्या डॉ. मिनल पाटील खतगावकर यांनी काल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबईत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते आणि माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
****
भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नईत सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल दुसऱ्या दिवशी भारतानं ३०८ धावांची आघाडी घेतली आहे. काल सकाळी भारताचा पहिला डाव ३७६ धावांवर संपुष्टात आला, रविचंद्रन अश्विनने ११३ धावा केल्या.बांगलादेशचा संघही पहिल्या डावात १४९ धावांवर सर्वबाद झाला.
दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा, भारतानं दुसऱ्या डावात २३ षटकांत ३ गडी बाद ८१ धावा केल्या आहेत.
****
धनगर आरक्षण प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या सुधाकर शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी काल यासंदर्भातल्या बैठकीत ही माहिती दिली.सकल धनगर समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे.वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काल त्यांची नियमीत तपासणी केली, परंतू उपचार घेण्यास जरांगे यांनी नकार दिला.
दरम्यान ओबीसी आरक्षण बचावसाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी वडीगोद्री इथे कालपासून आमरण उपोषण सुरू केलं, याच मागणीसाठी विधिज्ञ मंगेश ससाणे आणि सहकाऱ्यांनी १८ सप्टेंबरपासून अंतरवाली सराटी इथेच आमरण उपोषण पुकारलं आहे.
****
स्वच्छता ही सेवा या मोहिमंअंतर्गत नांदेड महानगरपालिकेतर्फे काल रेल्वे स्थानक आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी लोकसहभागातून सुमारे तीन टन कचरा संकलित करण्यात आला. दरम्यान, रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीति सरकार यांच्या हस्ते काल एक पेड माँ के नाम मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आलं.
****
लातूर महानगरपालिकेनं नागरिकांसाठी दंतोपचार सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पुण्याच्या माईर्स इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस अँड रिसर्च आणि महापालिकेचा आरोग्य विभाग यांच्यात यासाठीचा सांमजस्य करार करण्यात आला. येत्या सोमवारपासून महापालिकेच्या चार प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अत्यल्प दरात दंतोपचार सुविधा उपलब्ध असणार आहेत.
****
ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त परभणी जिल्ह्यात काल विविध ठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. ईदच्या दुसऱ्या दिवशी गणेश विसर्जन असल्यामुळे या मिरवणुका काल काढण्यात आल्या. ईदगाह मैदानावर या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.
****
धाराशिव जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकास कामांसाठी २८ कोटी रुपये निधी द्यावा, अशी मागणी, छत्रपती संभाजीनगर विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी केली आहे. या मागणीचं पत्र त्यांनी राज्याच्या क्रीडामंत्र्यांकडे सादर केलं आहे.
****
आगामी विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी हिंगोली जिल्हा प्रशासनानं विविध पथकांची स्थापना केली आहे. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी काल सर्व पथक प्रमुखांची आढावा बैठक घेऊन समन्वयानं काम करण्याचे निर्देश दिले
****
रेल्वे लाईन च्या देखभाल आणि दुरुस्ती च्या कामांमुळे नांदेड ते रायचूर एक्सप्रेस येत्या १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत  तांडूर ते रायचूर दरम्यान अंशतः  रद्द करण्यात आली आहे तर  रायचूर ते नांदेड एक्सप्रेस २ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत रायचूर ते तांडूर दरम्यान अंशतः  रद्द करण्यात आली आहे.
****
0 notes
kawaiimoonpeace · 1 month
Text
#GodMorningSaturday
असली मंत्र Vs नकली मंत्र
श्रीमद्भागवत गीता जी में गीता बोलने वाला प्रभु अध्याय 8 के श्लोक 13 में अपनी भक्ति साधना का ॐ मंत्र और गीता अध्याय 17 श्लोक 23 में पूर्ण परमात्मा की भक्ति के ॐ, तत्, सत् ऐसे तीन सांकेतिक मंत्रों का निर्देश करता है।
जबकि हमारे धर्म गुरुओं द्वारा दिए नाम मंत्र जाप जैसे राधे-राधे, हरे कृष्णा हरे राम, ओम नमः शिवाय आदि का शास्त्रों में प्रमाण न होने के कारण ये नाम जाप व्यर्थ हैं।
श्रीमद्भगवद्गीता तत्त्वविवेचनी हिन्दी टीका
To know more, Subscribe our YouTube Channel
SA News Channel
SA NEWS
सच जो आप जालना चाहते हैं
@SatlokAshramNewsChannel 554K subscribers
Tumblr media
0 notes
marmikmaharashtra · 2 months
Link
https://marmikmaharashtra.com/flying-exhibition-organized-by-jito-ladies-wing/
0 notes
Video
youtube
जालना लोकसभा रावसाहेब दानवे विरुद्ध कल्याण काळे सामना..
0 notes
gajananjogdand45 · 7 months
Link
https://marmikmaharashtra.com/janashatabdi-will-come-up-to-hingoli-the-train-will-run-daily/
0 notes
dainiksamachar · 8 months
Text
महाराष्ट्र: आखिर प्रकाश आंबेडकर की MVA में इंट्री,जानिए कितनी सीटों पर BJP की बढ़ाएंगे मुश्किल?
मुंबई: 2024 लोकसभा चुनावों से पहले महाराष्ट्र में I.N.D.I.A अलायंस का विस्तार हुआ है। संविधान निर्माता बाबा साहब आंबेडकर के पौत्र प्रकाश आंबेडकर राज्य में महाविकास आघाड़ी के साथ मिलकर लोकसभा चुनाव लड़ेंगे। मुंबई में राज्य की 48 लोकसभा सीटों की शेयरिंग के हुई बैठक में वंचित बहुजन आघाडी के प्रमुख प्रकाश आंबेडकर भी शामिल हुए। बैठक से पहले प्रकाश आंबेडकर का फूल देकर स्वागत किया गया। शिवसेना यूबीटी नेता संजय राउत ने प्रकाश आंबेडकर के एमवीए में आने पर खुशी जताई उन्होंने कहा कि संविधान की रक्षा की लड़ाई अब वे मिलकर लड़ेंगे। 14 सीटों पर बाकी है सहमति आंबेडकर के महाविकास आघाड़ी (एमवीए) में शामिल के होने के बाद घटक दलों की संख्या मोटे तौर पर बढ़कर चार हो गई है। इनमें कांग्रेस, शिवसेना (यूबीटी) और एनसीपी (शरद पवार) की पार्टी शामिल है। तीनों पार्टियों के बीच राज्य की 34 सीटों पर सीट शेयरिंग तय हो चुकी है। राज्य की 14 सीटों को लेकर दलों के बीच पेंच फंस रहा था। पिछली बैठक में यह कहा गया था कि अगली बैठक में इन सीटों शेयरिंग तय हो जाएगी। जिस सीटों पर पेंच फंस रहा है उनमें प्रमुख तौर पर वर्धा, रामटेक, भिवंडी, हिंगोली, जालना, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य और शिरडी शामिल हैं। एमवीए में वंचित बहुजन आघाड़ी की इंट्री के बाद दो से तीन सीट प्रकाश आंबेडकर की पार्टी के पास जाने की उम्मीद है।क्या है सीट शेयरिंग का फॉर्मूला? कांग्रेस महाराष्ट्र में 20 से 22 लोकसभा सीटों पर चुनाव लड़ सकती है, जबकि शरद पवार के नेतृत्व वाले राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (NCP) गुट छह से आठ सीटें मिल सकती हैं। उद्धव ठाकरे के नेतृत्व वाली शिवसेना 18 सीटें मिलने की उम्मीद है। ऐसे में वंचित बहुजन अघाड़ी (VBA) नेता प्रकाश अंबेडकर को कांग्रेस अपने खाते से सीटें देगी, जबकि अगर अलायंस में स्वाभिमानी शेतकारी संगठन की इंट्री होती है तो शिवसेना (यूबीटी) ने हातकणंगले लोकसभा छोड़ेगी, हालांकि राज्य में नीतीश कुमार की अगुवाई वाली जनता दल यूनाइटेड ने भी एक सीट की मांग रखी है। कितनी सीटों पर पड़ेगा प्रभाव? 2019 के लोकसभा चुनावों में वंचित बहुजन आघाड़ी ने AIMIM के साथ मिलकर 47 सीटों पर लड़ा था। तब वंचित बहुजन आघाड़ी को एक भी सीट पर जीत नहीं मिली थी। पार्टी को 6.82 फीसदी वोट मिले थे। प्रकाश आंबेडकर की पार्टी को 3,743,560 वोट हासिल हुए थे। औरंगाबाद सीट पर AIMIM को जीत मिली थी। प्रकाश आंबेडकर के एमवीए से जुड़ने के बाद दलित वोटों के साथ मुस्लिम वोटों का फायदा I.N.D.I.A अलायंस को मिल सकता है। 2019 में विधानसभा चुनावों में वंचित बहुजन आघाड़ी राज्य की 10 सीटों पर दूसरे नंबर पर रही थी। पार्टी को राज्य में 24 लाख वोट हासिल हुए थे। वंचित बहुजन आघाड़ी के प्रमुख प्रकाश आंबेडकर अकोला से लड़े थे। वे दूसरे नंबर पर रहे थे। इस सीट पर बीजेपी को जीत हासिल हुई थी। प्रकाश आंबेडकर फिर से अकोला से लड़ सकते हैं। प्रकाश आंबेडकर के एमवीए में आने से करीब आठ लोकसभा सीटों पर इंडिया अलायंस को वोटाें में फायदा हो सकता है। http://dlvr.it/T2CtdZ
0 notes
mhlivenews · 18 days
Text
Marathwada Rain: मराठवाड्यात पावसामुळे ६३ गावे बाधित; दोन दिवसांत पाच जणांचा मृत्यू, पंचनाम्यांचे आदेश
Marathwada Rain Update: पावसामुळे जालना जिल्ह्यातील १५, परभणीतील २६, बीड जिल्ह्यातील १२, लातूर जिल्ह्यातील ९ तर हिंगोली जिल्ह्यातील एक गाव बाधित झाले आहे. तर आतापर्यंत लहान मोठे मिळून ३०० हून अधिक जनावरे दगावले आहेत. महाराष्ट्र टाइम्सmarathwada 5 death rain म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात दोन दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे ६३ गावे बाधित झाली असून, पाच जणांचा मृत्यू झाल्याची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
आम्ही ओबीसींना टार्गेट केले नाही : मनोज जरांगे
https://bharatlive.news/?p=187802 आम्ही ओबीसींना टार्गेट केले नाही : मनोज जरांगे
जालना; पुढारी वृत्तसेवा ...
0 notes
imranjalna · 18 hours
Text
जालना में राज्य स्तरीय कृषि महोत्सव का धूमधाम से उद्घाटन
नई तकनीक को अपनाकर किसानों को समृद्धि हासिल करनी चाहिए * विजय अन्ना बोराडे का प्रतिपादन; जालना में राज्य स्तरीय कृषि महोत्सव का धूमधाम से उद्घाटन State level agriculture festival inaugurated with great pomp in Jalna जालना: कृषि व्यवसाय को बढ़ावा मिले और नई तकनीक को अपनाकर समृद्ध खेती के लिए उपयोग हो, इसलिए कृषि महोत्सव का आयोजन किया जाता है. इस महोत्सव में भाग लेकर किसानों को भविष्य में…
0 notes
airnews-arngbad · 1 day
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 20 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
पारंपरिक कौशल्य हाच भारताच्या समृद्ध इतिहासाचा आधार-पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन
राज्य सरकारच्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
जालना जिल्ह्यात एसटी बस आणि ट्रकच्या अपघातात सहा प्रवासी ठार-२३ जखमी
आणि
बांगलादेश विरूद्ध पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताला ३०८ धावांची आघाडी
****
पारंपरिक कौशल्य हाच भारताच्या समृद्ध इतिहासाचा आधार असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त वर्धा इथं झालेल्या विशेष कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. या कार्यक्रमासाठी वर्ध्याच्या पवित्र धरतीची निवड केल्याचं सांगत, पंतप्रधानांनी राष्ट्रपिता महात्मा गा��धी आणि विनोबा भावे यांचं स्मरण केलं. राज्यपाल सी पी राधाकृष्णन, केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतनराम मांझी, केंद्रीय कौशल्यविकास राज्यमंत्री जयंत चौधरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात विश्वकर्मा योजना ही फक्त सरकारी योजना नसून, विकसित भारतासाठीचा रोडमॅप असल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले –
विश्वकर्मा योजना केवल सरकारी प्रोग्रामभर नही है। ये योजना भारत के हजारो वर्ष पुराने कौशल को विकसित भारत के लिये इस्तमाल करने का एक रोड मॅप है। आप याद करीयें हमें इतिहास में भारत की समृद्धी के कितने ही गौरवशाली अध्याय देखने को मिलते है। इस समृध्दी का बडा आधार क्या था? इसका आधार था हमारा पारंपारिक कौशल।
विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना, ओळखपत्रं आणि प्रमाणपत्रं डिजिटल पद्धतीने पंतप्रधानांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. तसंच या योजनेच्या एक वर्ष पूर्तीनिमित्त विशेष टपाल तिकिटही पंतप्रधानांच्या हस्ते जारी करण्यात आलं. ७५ हजार विश्वकर्म्यांना यावेळी कर्जमंजूर करण्यात आलं, यापैकी देशभरातून आलेल्या १८ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात कर्जाचे धनादेश पंतप्रधानांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर येण्यापूर्वी पंतप्रधानांनी या ठिकाणी उभारलेल्या विविध कारागीरांच्या कक्षांना भेट देऊन, त्यांनी घडवलेल्या वस्तूंची पाहणी केली. राज्यातल्या सर्व तंत्रशिक्षण संस्थांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या संविधान मंदिराची प्रतिकृती देऊन पंतप्रधानांचा सत्कार करण्यात आला. अमरावती, इथं पीएम मित्रपार्क या समन्वित वस्त्रोद्योग परिसराची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. एक हजार एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विकसित केला जाणार आहे.
महाराष्ट्र सरकारच्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेचं तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. राज्यात एक हजार महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे, यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तेहतीस केंद्रांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर इथला मुख्य कार्यक्रम छत्रपती शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या सभागृहात झाला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यात २८ केंद्राचा शुभारंभ झाला. आपले कौशल्य आणखी प्रभावी आणि आधुनिक करण्यासाठी विद्यार्थ्यांनी या केंद्राचा उपयोग करावा, असं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी केलं.
परभणी जिल्ह्यातल्या १४ केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत धर्मापुरी इथल्या ब्लेसींग कॉलेज ऑफ नर्सिंग इथं शुभारंभाच्या थेट प्रक्षेपणाचा कार्यक्रम झाला. धाराशिव जिल्ह्यात १८ केंद्राचा शुभारंभ झाला. बिल गेट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात या कार्यक्रमाचं थेट प्रसारण करण्यात आलं.
****
भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह २४ आणि २५ सप्टेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. शाह यांच्या २४ तारखेला नागपूर, छत्रपती संभाजीनगर इथं आणि २५ तारखेला नाशिक, कोल्हापूर इथं भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद बैठका होणार आहेत.
****
तिरुपती इथल्या प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचा मुद्दा गंभीर असल्याचं केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी हा मुद्दा उपस्थित केला असून प्रसादाच्या लाडूंसाठी तयार करण्यात आलेल्या तुपात प्राण्यांची चरबी आढळल्याची पुष्टी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या प्रयोगशाळेने दिली आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून दोषींना शिक्षा झाली पाहिजे असं जोशी म्हणाले.
****
महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण महारेराच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी मंत्रालयात मनोज सौनिक यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
****
मुंबईतल्या पश्चिम उपनगरात लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज जनसंवाद यात्रा काढली. खासदार शिंदे यांनी मालाड, मागाठाणे, कांदिवली, जोगेश्वरी, दिंडोशी, अंधेरी इथं जनसंवाद बैठक घेऊन नागरिकांशी संवाद साधला.
****
बृहन्‍मुंबई महानगरपालिकेमार्फत धर्मवीर, स्‍वराज्‍यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्‍ता बांधण्‍यात येत आहे. शामलदास गांधी मार्ग उड्डाणपूल ते वरळीपर्यंतच्या या मार्गाचं ९२ टक्‍के काम पूर्ण झालं आहे. उद्या शनिवारपासून हा रस्ता दररोज सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तर, रात्री १२ ते सकाळी ७ या वेळेत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
****
नंदुरबार शहरात काल एका धार्मिक मिरवणुकीदरम्यान दोन गटात झालेल्या वादप्रकरणी ५५ जणांना अटक करण्यात आली आहे. यात चार विधी संघर्ष त्रस्त बालकांचा समावेश आहे. या प्रकरणी फरार ५४ संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.
****
जालना-वडीगोद्री महामार्गावरील मठतांडा गावाजवळ आज सकाळी साडे आठच्या सुमारास एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील वाहकासह तीन महिला प्रवाशी आणि ट्रकमधील चालक, वाहक असे सहाजण जागीच ठार झाले. तर एसटी बसमधील २३ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी १३ जणांवर जालना इथं जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. एसटी बस गेवराईहून जालन्याला जात असताना बीडकडे जाणाऱ्या संत्र्याच्या भरधाव ट्रकने धडक दिल्यानं, हा अपघात झाल्याचं बसच्या चालकानं सांगितलं.
****
नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, युवा नेत्या डॉ. मिनल पाटील खतगावकर यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबईत माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेश सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्वाचं काँग्रेस पक्षात स्वागत केलं.
****
चेन्नईत एम एम चिदंबरम मैदानावर सुरु असलेल्या भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवशी भारतानं ३०८ धावांची आघाडी घेतली आहे. आज सकाळी भारताचा पहिल्या डाव ३७६ धावांवर आटोपला, भारतानं कालच्या ३३९ धावांवरुन आज डाव सुरु केला. अवघ्या ३७ धावातच भारताचे चार फलंदाज तंबूत परतले. रविचंद्रन अश्विनने ११३ धावा केल्या. बांगलादेशचा संघ पहिल्या डावात १४९ धावांवर सर्वबाद झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा, भारतानं दुसऱ्या डावात २३ षटकांत ३ गडी बाद ८१ धावा केल्या आहेत.
****
अहमदनगर इथं माळीवाडा परिसरात स्वच्छता ही सेवा मोहीम राबवण्यात आली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जनजागृती ��ेली. आयुक्त यशवंत डांगे यांनी यावेळी शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छतेशी शपथ दिली, तसंच स्वच्छतेबाबत सूचना दिल्या.
****
स्वच्छता ही सेवा या मोहिमंअंतर्गत नांदेड महानगरपालिकेतर्फे आज रेल्वे स्थानक आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. आयुक्त डॉ.महेशकुमार डोइफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त कारभारी दिवेकर यांनी सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी विविध शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभागी होत तीन टन कचरा उचलला. नांदेड इथं विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीति सरकार यांच्या हस्ते एक पेड माँ के नाम मोहिमेअंतर्गत डी. आर. एम. कार्यालय परिसरात आज वृक्षारोपण करण्यात आलं.
****
ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त परभणी जिल्ह्यात आज विविध ठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. ईदच्या दुसऱ्या दिवशी गणेश विसर्जन असल्यामुळे या मिरवणुका आज काढण्यात आल्या. ईदगाह मैदानावर या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.
****
दसरा आणि दिवाळी निमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता पुणे - करीमनगर - पुणे विशेष गाडीच्या ०८ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. पुणे करीमनगर गाडी पुणे स्थानकावरुन २१ आणि २८ आक्टोबर तसंच ४ आणि ११ नोव्हेंबरला रात्री पावणे अकराला सुटेल. तर परतीच्या प्रवासात २३ आणि ३० ऑक्टोबर तसंच ६ आणि १३ नोव्हेंबरला करीमनगर स्थानकावरुन सकाळी ६ वाजता सुटेल असं दक्षिण मध्य रेल्वेतर्फे कळवण्यात आलं आहे.
****
0 notes
marmikmaharashtra · 2 months
Link
https://marmikmaharashtra.com/organize-free-informative-seminars-on-higher-education-and-career-opportunities-abroad/
0 notes
Video
youtube
जालना मराठा आंदोलन लाठीचार्ज प्रकरणातील जनरल डायर कोण ? #news #indianpol...
0 notes
nashikfast · 11 months
Text
नऊ दिवसांनंतर जरांगेंचे उपोषण मागे; राज्य शासनाला आता दोन महिन्यांचा कालावधी
जालना : राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी मोठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागणार असून यासाठी दोन महिन्यांचा वेळ राज्य शासनाला देण्याच्या अटीवर उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी (दि. २) बेमुदत उपोषण मागे घेतले. निवृत्त न्या. मारुती गायकवाड, सुनील सुक्रे यांनी कायदेशीर बाबींची अडचण निदर्शनास आणून दिल्यानंतर जरांगे यांनी हे उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला.…
View On WordPress
0 notes