#एन��ीए बास्केटबॉल
Explore tagged Tumblr posts
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र ०३ डिसेंबर २०२२ सकाळी ११.०० वाजता ****
परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या तीन पिकांच्या वाणांना भारतीय संशोधन परिषदेनं मान्यता दिली आहे. तूर बी डी एन २०१३-२ रेणुका, सोयाबीन एम ए यु ७२५ आणि करडई पिकाच्या पी बी एन एस १५४ परभणी सुवर्णा या तीन वाणांचा यात समावेश आहे.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आजपासून राज्य क्रीडा महोत्सवाला सुरवात होत आहे. अॅथलेटिक्स, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी आणि खो-खो या पाच क्रीडा प्रकारात होणाऱ्या या महोत्सवात दोन हजाराहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. या महोत्सवाच्या वातावरण निर्मितीसाठी काढण्यात आलेली तुळजापूर ते औरंगाबाद मशाल रॅली आज औरंगाबाद शहराच्या विविध भागातून मार्गक्रमण करत विद्यापीठ परिसरात दाखल होत आहे. आज दुपारी तीन वाजता या स्पर्धांचं उद्घाटन होत आहे.
****
नांदेड शहरात आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण सभागृहात परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिसंवादामध्ये दिव्यांगांसाठी न्यायालयीन तरतुदी, दिव्यांगत्व निर्मुलनासाठी शीघ्र निदान आणि उपचाराचे महत्त्व या विषयांवर तज्ज्ञांचं मार्गदर्शन होणार आहेत.
****
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत ६ डिसेंबरपर्यंत ‘समता पर्वा’चं आयोजन करण्यात आलं आहे. या अंतर्गत आज लातूर जिल्ह्यात पाच ठिकाणी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचं वाटप करण्यासाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे.
समता पर्व दिनानिमित्त काल नांदेड इथं समाज कल्याण कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील १६ तालुक्यातील अनुसूचित जाती तसंच नवबौध्द घटकांच्या वस्त्यांना भेटी दिल्या.
//*********//
0 notes