#ईद-उल-फित्र
Explore tagged Tumblr posts
Text
Watch "ईद-उल-फित्र पर जानें अल्लाह की सच्ची इबादत क्या है ? | SA News | Special Video" on YouTube.
youtube
2 notes
·
View notes
Text
Check out this post… "ईद उल-फित्र: खुशियों का त्योहार Id Festival ".
0 notes
Text
Check out this post… "ईद उल-फित्र: खुशियों का त्योहार Id Festival ".
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 12 April 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ एप्रिल २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना आज जारी होणार; उस्मानाबाद आणि लातूरसह राज्यातल्या अकरा मतदारसंघांचा समावेश
पहिल्या तसंच दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून प्रचाराला वेग
मराठवाड्याच्या बहुतांश भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस; परभणीत वीज पडून दोन ठार
आणि
ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद सर्वत्र उत्साहात साजरी; ईदमिलन कार्यक्रमांना प्रारंभ
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना आज जारी होणार आहे. या टप्प्यात १० राज्यांमधल्या ९४ मतदार संघांचा समावेश आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातल्या उस्मानाबाद, लातूर, रायगड, बारामती, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या अकरा मतदारसंघांचा समावेश आहे.
या मतदारसंघात आजपासून १९ एप्रिलपर्यंत अर्ज भरता येतील. २० एप्रिलला अर्जांची छाननी होईल, २२ एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून ७ मे रोज��� मतदान होणार आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात काल नामनिर्देशनपत्राच्या अनुषंगाने प्रात्यक्षिक सादरीकरण करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी उपस्थित होते.
****
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचाराला आता वेग आला आ��े. राज्यभरात सर्वच पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा होत आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची महाराष्ट्रातली पहिली सभा काल भाजपा उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी नांदेड जिल्ह्यात नरसी इथं झाली. राज्यातले शेतकरी, युवा, महिला या सगळ्यांचा विकास फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात, असं शहा यावेळी म्हणाले. राज्यातल्या विकासकामांचा त्यांनी आढावा घेतला. हिंगोली इथले महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते अभिनेता गोविंदा यांनी प्रचार फेरी काढली.
बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी पूर्व विदर्भातल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नागपुरात सभा घेतली, यावेळी त्यांनी काँग्रेस तसंच भाजपवर टीका केली.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली इथं उमेदवार अशोक नेते यांच्या समर्थनासाठी सभा घेतली. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यवतमाळच्या वणी इथं चंद्रपूर-आर्णी मतदारसंघाचे उमेदवार राजेश बेले यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. दरम्यान वंचित बहुजन आघाडीने काल दहा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली.
****
कोणताही राजकीय पक्ष, निवडणूक उमेदवार, इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्तींनी मतदानाच्या एक दिवस आधी आणि मतदानाच्या दिवशी राजकीय जाहिरातींचं राज्य आणि जिल्हास्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणीकरण समितीकडून प्रमाणीकरण करुन घेणं बंधनकारक आहे. पूर्व प्रमाणित केल्याशिवाय कोणतीही जाहिरात मुद्रित माध्यमांमध्ये प्रकाशित करु नये, असे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत.
****
मतदानासाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जातात, या पुराव्यांमध्ये आधार कार्ड, बँक पासबुक, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, आपापल्या आस्थापनेचं छायाचित्रसह ओळखपत्र, पारपत्र, आदी पुराव्यांचा समावेश आहे. याशिवाय सर्व मतदारांना मतदानाच्या किमान पाच दिवस आधी माहितीच्या चिठ्ठ्यांचं निवडणूक कार्यालयाकडून वितरण केलं जातं. मतदारांनी मतदानासाठी जाताना, छायाचित्रासह ओळखपत्र आणि माहितीची चिठ्ठी सोबत ठेवण्याचं आवाहन, निवडणूक अधिकारी कार्यालयानं केलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण वर्धा लोकसभा मतदार संघाचा आढावा ऐकणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल.
****
मरा��वाड्यात काल बहुतांश भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. पर��णी जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यात इळेगाव इथले बाबू शेळके आणि सोनपेठ तालुक्यात हरिबाई सुरनर यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला तर वीज पडल्यानं एक बैल आणि एक शेळी देखील दगावल्याचं वृत्त आहे.
जालना जिल्ह्यात जालन्यासह, बदनापूर आणि भोकरदन तालुक्यात बहुतांश भागात काल सायंकाळी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. भोकरदन तालुक्यात सिपोरा बाजार, लिंगेवाडी, दावतपूर भागात गारांचा पाऊस झाल्यानं, फळबागांना फटका बसला तर काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडाले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड, कन्नड, सोयगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली, यात उन्हाळी मिरची तसंच काढणीला आलेल्या ज्वारी, बाजरी, मका पीक आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं. कन्नड तालुक्यात जामडी इथं आणि सोयगाव तालुक्यात निमखेडी इथं वीज कोसळून दोन गायी दगावल्याचं वृत्त आहे.
लातूर जिल्ह्यात काल दुपारी दोन तास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. बीड जिल्ह्यात काल दुपारनंतर गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. सुमारे दोन तास चाललेल्या या पावसामुळे धारुर तालुक्यातल्या लेढी नदीला पूर आला.
हिंगोली जिल्ह्यात हिंगोली तसंच कळमनुरी तालुक्यात काल वादळी वाऱ्यासह गारपीट झाली.
धाराशिव शहर आणि परिसरातही काल संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा आंबा पिकं तसंच ज्वारी, हरभरा काढणीवर परिणाम झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, हवामान विभागाने राज्यात आजपासून तीन दिवसांकरता पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या काळात ताशी ५० किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहतील, तसंच तुरळक ठिकाणी विजांच्या कडकटासह वादळी पाऊस पडेल, अशी शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे.
****
ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद काल सर्वत्र उत्साहात साजरी झाली. छत्रपती संभाजीनगर शहरात छावणी इथल्या ईदगाह मैदानासह ठिकठिकाणच्या मशिदींमध्ये नमाज अदा करण्यात आली.
परभणी शहरात जिंतूर रोड परिसरातल्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आलं.
बीड शहरात दोन ईदगाह आणि १३ मशिदींमध्ये सामुदायिक नमाज पठण करण्यात आलं. यावेळी विश्वशांती तसंच जिल्ह्यातली दुष्काळी स्थिती निवारणासाठी प्रार्थना करण्यात आली.
हिंगोलीतही ईद-उल-फित्र निमित्त मुस्लिम बांधवांनी सामुहिक नमाज पठण करून उत्साहात रमजान ईद साजरी केली. जालना शहरातल्या जुना जालन्यातल्या कदीम ईदगाह आणि नवीन जालन्यातल्या सदर बाजार ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज अदा करण्यात आली.
लातूर, नांदेड, धाराशिवसह मराठवाड्यात सर्वत्र रमजान ईद उत्साहात साजरी झाली, सामुहिक नमाज पठणानंतर सर्वांनी परस्परांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईदमिलन कार्यक्रमांनाही कालपासून प्रारंभ झाल्याचं दिसून येत आहे.
****
थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना ��र्वत्र अभिवादन करण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर शहरात औरंगपुरा परिसरातल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाच्यावतीनं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं.
जालना शहरासह जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. परभणी शहरात जिल्हा परिषद परिसरातल्या महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागरीकांनी गर्दी केली होती. याठिकाणी लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासंबंधी सेल्फी पॉईंट उभारण्यात आले होते.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी विधानसभा मतदारसंघातल्या दिव्यांग, ८५ वर्षावरच्या आणि अत्यावशक सेवेतल्या २६४ मतदारांच्या मतदानासाठी विशेष सोय करण्यात येणार आहे. १४ आणि १५ एप्रिल रोजी हे पथक संबधित मतदारांच्या घरी जाऊऩ त्यांचं मतदान करून घेणार आहे.
****
���ोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बीड मतदार संघातल्या मतदान यंत्रांचं काल विधानसभा निहाय वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. वखार महामंडळाच्या गोदामामध्ये जिल्हादंडाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया सुरू आहे.
****
छत्रपती संभाजी नगर इथं दत्ताजी भाले स्मृती समितीच्या वतीने उभारलेल्या 'समर्पण' या वास्तूचं लोकार्पण काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते झालं.
सातारा परिसरात एक एकर भूखंडावर उभारलेल्या या वास्तूत संघाच्या संपर्क कार्यालयासह गरजू विद्यार्थ्यांना निवास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, स्वयंरोजगार, ग्रामविकास, सेंद्रिय शेती प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, योगाभ्यास आदी प्रशिक्षण तसंच मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.
****
लातूर - बीड महामार्गावर रेणापूर तालुक्यात कोळगाव तांडा इथं कारच्या भीषण अपघातात पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. लातूर इथलं कनाडे कुटुंब देवदर्शन करुन परतत असताना काल पहाटे हा अपघात झाला. जखमींना लातूर इथल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं काल दोन तरुणांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. सातारा परिसरात काल सायंकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पोहण्यासाठी विहिरीत उतरलेल्या चार तरुणांपैकी एक जण बुडत असतांना, त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुसऱ्याचाही बुडून मृत्यू झाला. सचिन काळे आणि वैभव मोरे अशी या दोघांची नावं आहेत.
****
0 notes
Text
शाहरूख खानले मन्नतकाे बाहिर उभिएर दिए इदकाे शुभकामना
मुम्बइ, २९ चैत । अप्रिल ११ मा विश्वभर इद मनाइयो । इस्लामिक क्यालेन्डरका अनुसार रमजानपछि शवालको पहिलो दिन इद अल फित्र मनाइन्छ। इद उल फित्रको अवसरमा मिठा परिकार र सेरा बनाउने चलन छ । यस दिन मानिसहरूले एकअर्कालाई अँगालो हालेर ईदको शुभकामना दिन्छन्। यस दिन मानिसहरूले एकअर्कालाई सहयोग पनि दिन्छन्। यस ईदमा शाहरुख खानले पनि आफ्ना फ्यानहरुलाई ईद दिएका थिए । हरेक पटक जस्तै यस पटक पनि बलिउडका बादशाह…
View On WordPress
0 notes
Text
जालना में नमाज ए ईद उलफित्र कब और कहां When and where is Namaz e Eid ul Fitr in Jalna 2024
जालना: जालना जिले और शहर में नमाज ए ईद उल फित्र का टाइम टेबल इस प्रकार है. ईदगाह कदीम, जालना – सुबह ९:३० बजे ईदगाह सदर बाजार – सुबह ९:३० बजे ईदगाह रहमानिया, गांधीनगर – सुबह ९:३० बजे ईदगाह फैजुल उलूम, चंदनझिरा – सुबह ८:३० बजे मस्जिद दरगाह हजरत जानुल्लाह शाह – सुबह ९:०० बजे दरगाह मस्जिद राजाबाग, शेर सवार – सुबह ८:३० बजे अब्बासिया मस्जिद, सदर बाजार, पहली जमात – सुबह ८:०० बजे अब्बासिया…
View On WordPress
0 notes
Text
ईद-उल-फित्र पर जानें अल्लाह की सच्ची इबादत क्या है ? | SA News | Special...
youtube
0 notes
Text
0 notes
Text
Watch "ईद-उल-फित्र पर जानें अल्लाह की सच्ची इबादत क्या है ? | SA News | Special Video" on YouTube
youtube
0 notes
Text
Watch "ईद-उल-फित्र पर जानें अल्लाह की सच्ची इबादत क्या है ? | SA News | Special Video" on YouTube
youtube
0 notes
Text
Check out this post… "ईद उल-फित्र: खुशियों का त्योहार Id Festival ".
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 11 April 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ११ एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना उद्या जारी होणार
निवडणुकीच्या प्रचाराला वेग, दिग्गज नेत्यांच्या ठिकठिकाणी प्रचारसभा
ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद सर्वत्र उत्साहात साजरी
थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन
आणि
बीड जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना उद्या जारी होणार आहे. या टप्प्यात १० राज्यांमधल्या ९४ मतदार संघांचा समावेश आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातल्या उस्मानाबाद, लातूर, रायगड, बारामती, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी - सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या दहा मतदारसंघांचा समावेश आहे. उमेदवारांना १९ एप्रिल पर्यंत अर्ज दाखल करता येणार असून, २२ एप्रिल पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. या टप्प्यासाठी सात मे रोजी मतदान होणार आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने चांगलाच वेग घेतला असून, प्रमुख राजकीय पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांचे देशव्यापी दौरे होत आहेत. पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडमधे हृषिकेश इथं प्रचारसभा घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली इथं उमेदवार अशोक नेते यांच्या समर्थनासाठी सभा घेतली.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यवतमाळच्या वणी इथं चंद्रपूर-आर्णी मतदारसंघाचे उमेदवार राजेश बेले यांच्यासाठी प्रचारसभा घेतली.
दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातल्या गडचांदूर इथली प्रकाश आंबेडकर यांची आजची प्रचार सभा रद्द करण्यात आली.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची महाराष्ट्रातली पहिली सभा आज भाजपा उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी नांदेड जिल्ह्यात नरसी इथं होणार आहे. बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती उत्तर नागपूरमधल्या इंदोरा इथं आज जाहीर सभा घेतील. बसपातर्फे नागपूरमधून योगेश लांजेवार आणि रामटेकमधून संदीप मेश्राम निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
कॉंग्रेस पक्षाचे नेते राहूल गांधी यांनी राजस्थानच्या अनुपगड इथं प्रचारसभा घेतली.
****
काँग्रेस पक्षाचे धुळे जिल्हाध्यक्ष शामकांत सने�� यांनी आज आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं माजी मंत्री शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली. कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी धुळे लोकसभा मतदार संघातल्या निष्ठावंत कार्यकर्त्यास डावलून बाहेरचा उमेदवार दिला, उमेदव���र बदलून द्यावा, अन्यथा धुळे जिल्ह्यातले कॉंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते विरोधाची भूमिका घेतील, असा इशारा सनेर यांनी दिला.
****
कोणताही राजकीय पक्ष, निवडणूक उमेदवार, इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्तींनी मतदानाच्या एक दिवस आधी आणि मतदानाच्या दिवशी राजकीय जाहिरात राज्य आणि जिल्हास्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून प्रमाणित करुन घेणं बंधनकारक आहे. पूर्व प्रमाणित केल्याशिवाय कोणतीही जाहिरात मुद्रीत माध्यमांमध्ये प्रकाशित करु नये, असे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत.
****
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातल्या ४८ मतदारसंघातल्या सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार संख्येच्या बाबतीत राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर आहे, तर नंदुरबार, गोंदिया, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. अहमदनगर, सोलापूर, जळगाव, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या पाच जिल्ह्यांमध्ये ३० लाखांहून अधिक मतदार आहेत, तर बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, रायगड, मुंबई शहर, बीड, सातारा, सांगली आणि पालघर या दहा जिल्ह्यांमध्ये २० लाखांहून अधिक मतदार आहेत.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'लोकनिर्णय महाराष्ट्राचा' हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण अमरावती लोकसभा मतदार संघाचा आढावा ऐकणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल.
****
ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद आज सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरारत छावणी इथल्या ईदगाह मैदानासह ठिकठिकाणच्या मशिदींमध्ये नमाज अदा करण्यात आली. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे उमेदवार खासदार इम्तियाज जलील यांनी एकमेकांना भेटून ईदच्या शुभेच्छा दिल्या.
परभणी शहरात जिंतूर रोड परिसरातल्या ईदगाह मैदानावर रमजान ईदची सामूहिक नमाज पठण करण्यात आली. महायुतीचे उमेदवार महादेव जानकर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्यासह इतर उमेदवारांनी मुस्लिम बांधवांच्या भेटी घेऊन ईद निमित्त शुभेच्छा दिल्या.
बीड शहरात दोन ईदगाह आणि १३ मशिदींमध्ये सामुदायिक नमाज पठण करण्यात आलं. यावेळी विश्वशांती तसंच जिल्ह्यातली दुष्काळी स्थिती निवारणासाठी प्रार्थना करण्यात आली. बीड शहरात छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर यंदा पहिल्यांदाच ईद बाजार भरवला गेला.
हिंगोलीतही ईद-उल-फित्र निमित्त मुस्लिम बांधवांनी सामुहिक नमाज पठण करून उत्साहात रमजान ईद साजरी केली.
जालना शहरासह जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात येत आहे. यानिमित्त मुस्लिम समाजबांधवांनी जुना जालन्यातल्या कदीम ईदगाह आणि नवीन जालन्यातल्या सदर बाजार ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज अदा केली. भोकरदन इथं मुस्लीम समाजबांधवांनी सामुहिक नमाज अदा केल्यानंतर भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या.
नाशिकमध्ये ईद निमित्ताने नमाज पठण आणि मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली. ईदगाह मैदानावर मतदान करण्याचं आवाहन करण्यासंबंधी फलक लावण्यात आले होते. मतदान हा आपला हक्क आहे, आपल्या देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने अवश्य मतदान करावं, असं आवाहन यावेळी करण्यात आलं.
****
थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना आदरांजली वाहिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथल्या त्यांच्या निवासस्थानी फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
छत्रपती संभाजीनगर शहरात औरंगपुरा परिसरातल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. शहरातल्या महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने आज समता समाज भूषण पुरस्कार गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. शहरातल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातल्या मान्यवरांनी अभिवादन केलं.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाच्यावतीनं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं.
जालना शहरासह जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात येत आहे. यानिमित्त महापालिकेसमोरील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास आमदार कैलास गोरंट्याल यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. पक्ष, संघटनांसह, शाळा महाविद्यालयांमध्येही महात्मा ज्योतीबा फुले यांना अभिवादन करण्यात आलं.
परभणी शहरात जिल्हा परिषद परिसरातल्या महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. याठिकाणी लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासंबंधी सेल्फी पॉईंट उभारण्यात आले होते.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी विधानसभा मतदारसंघातल्या दिव्यांग, ८५ वर्षावरच्या आणि आत्यावशक सेवेतल्या २६४ मतदारांच्या मतदानासाठी विशेष सोय करण्यात येणार आहे. १४ आणि १५ एप्रिल रोजी हे पथक संबंधित मतदारांच्या घरी जाऊऩ त्यांचं मतदार घेणार असल्याचं सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी सांगितलं.
****
लातूर - बीड महामार्गावर रेणापूर तालुक्यात कोळगाव तांडा इथं कारच्या भीषण अपघातात पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. लातूर इथलं कनाडे कुटुंब देवदर्शन करुन परतत असताना आज पहाटे हा अपघात झाला. जखमींना लातूर इथल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
जालना महानगरपालिकेचा लिपीक उत्तम लाडाने याला ३० हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली.
****
राज्यात आज सर्वाधिक ४० पूर्णांक पाच अंश सेल्सियस तापमान बीड इथं नोंदवलं गेलं. छत्रपती संभाजीनगर इथं ३८ पूर्णांक सहा, परभणी ३८ पूर्णांक तीन, तर लातूर इथं ३७ पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
दरम्यान, बीड जिल्ह्यात नामलगाव फाटा, वडवणी तसंच किल्ले धारुर तालुक्यातल्या धुनकवडसह इतर गावांमध्ये आज दुपारनंतर गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. सुमारे दोन तास चाललेल्या या पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, फळबागांचंही मोठं नुकसान झालं आहे.
परभणी जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही ढगाळ वातावरण असून सोसाट्याचा वारा आहे.
गंगाखेड तालुक्यात इळेगाव इथले बाबू शेळके यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.
****
हवामान विभागाने महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात येत्या तीन दिवसांकरता पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि मध्य महाराष्ट्रात या काळात ताशी ५० किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहतील, तसंच तुरळक ठिकाणी विजांच्या कडकटासह वादळी पाऊस पडेल, अशी शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे.
****
0 notes
Text
आज सेयर कारोबार नहुने, बैंक–वित्तीय संस्था पनि बन्द
काठमाडौ, २९ चैत। नेपाल सरकारले स्लाम धर्मावलम्बीहरुको पर्व ईद उल फित्र (ईद) को अवसरमा सार्वजनिक विदा दिएकाले सेयर बजार आज बन्द हुने भएको छ । सेयर बजारसँगै बैंक–वित्तीय संस्था र सार्वजनिक कार्यालय पनि बन्द हुनेछन् । अब बजार २०८१ वैशाख २ गते बिहान ११ बजे मात्रै खुल्नेछ । यसअघि २०८० को अन्तिम कारोबारको दिन बुधबार बजार १०.७१ अंकले घटेर २०२५.३० अंकमा बन्द भएको थियो । उक्त दिन ३ अर्ब ४८ करोड…
View On WordPress
0 notes
Text
0 notes
Text
0 notes
Text
0 notes