#आई मुलीच्या कथा
Explore tagged Tumblr posts
Text
कडक उन्हात आईला काम करताना पाहून मुलगी अशी सावली देऊ लागली, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल - So Cute
कडक उन्हात आईला काम करताना पाहून मुलगी अशी सावली देऊ लागली, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल – So Cute
आई-मुलीचा हा व्हिडिओ लोकांची मने जिंकतोय, आई-मुलीचा हा व्हिडिओ लोकांची मने जिंकतोय. प्रतिमा क्रेडिट स्रोत: Instagram आई-मुलीचा क्यूट व्हिडीओ: कडक उन्हातही आईला काम करताना पाहून निरागस मुलगी राहवत नाही आणि तिचं दु:ख समजून तिची सेवा करू लागते. आई आणि मुलगी यांच्यातील हा सुंदर क्षण इंटरनेट लोकांची मने जिंकत आहे. मुली म्हणजे वडिलांचा अभिमान आणि आईची सावली असे म्हणतात. कुटुंबातील कोणी आईची सर्वात…
View On WordPress
0 notes
Text
नि:शब्द...
कोविडच्या काळात प्रवास करायचे म्हणजे संकटच. पण काही कारणे असे असतात की टाळता येत नाहीत. मोठ्या मामीचे निधन झाल्याचे कळले आणि अचानक आजोळी भालकीला जायचे ठरले. सध्या ट्रेनला फारशी गर्दी नाही, पण ऐनवेळी ठरल्यामुळे तात्काळ कोट्यातून तिकिट बुक करावे लागले. रात्री साडेआठची ट्रेन होती. अर्धा तास आधी मी आणि मावसभाऊ स्टेशनवर पोहोचलो. जेवण करूनच निघालो होतो. तरी मावसभावाने एक मोठे क्रिम बिस्किटाचे पाकिट स्टेशनवरच्या स्टॉलवरून सोबत असू द्यावे म्हणून विकत घेतले.
काही वेळातच शिर्डी-काकीनाडा ट्रेन आली आणि आम्ही आत जावून बसलो. गर्दी फारशी नव्हती, तरी लोकांची आत चढण्याची चढाओढ सुरू होती. एकदाचे सर्वजण चढले आणि बोगीमध्ये जागेवर सेट होण्यापूर्वीच गाडी सुरू झाली. हा माझा बर्थ आहे, सामान काढा, पुढे सरका, रस्ता द्या असा नेहमीचा गोंधळ सुरू झाला. आम्ही आमच्या कंपार्टमेंटमध्ये गेलो. एक बर्थ मधला आणि एक वरचा होता. मधल्या बर्थवर चादर टाकलेली होती तर वरच्या बर्थवर सामान होते. तिथला माणूस येईपर्यंत आणि लोकांची सुरूवातीची घाई संपेपर्यंत आम्ही साईड बर्थवर बसलो.
‘ये हमारा बर्थ है’ असे म्हणत एकजण टपकलाच.
‘हां, ठिक है. हमारा बर्थ सामने है, वहां किसीका सामान है. वो लोग आयेंगे तो हम वहां जायेंगे. फिकर मत करो. तबतक बैठ जावो.’ असे म्हणून त्याला आमच्या बाजूला बसायला सांगितले.
आमच्या कंपार्टमेंटच्या लोअर बर्थवर एक लहान मुलगी झोपली होती व दुसर्या बर्थवर एक बाई, बहुतेक तिची आई असावी, पांघरून घेवून झोपली होती. तिच्या वरती मधल्या बर्थवर एक लहान मुलगा झोपला होता. बर्थखाली बरेच गाठोडे कोंबले होते. मुलांचे वडील बहुतेक टॉयलेटला गेले होते. ते आल्याशिवाय आमचे बर्थ रिकामे होणार नव्हते. आम्ही वाट पहात बसून राहिलो.
ट्रेनने आता गती पकडली होती. बाहेरच्या लाईट्स संपून अंधाराचे साम्राज्य सुरू झाले होते. तितक्यात त्या मुलांचे वडील आले. पस्तीस छत्तीस वर्षाचा माणूस होता तो. त्याला आम्ही आमचे बर्थ रिकामे करायला सांगितले. अतिशय साधा माणूस दिसत होता. चेहर्यावर कावरे बावरे हावभाव होते.
भीत भीत तो म्हण���ला, ‘लेकरं झोपली आहेत. तुम्ही एकजण बाजूच्या भागात बर्थवर झोपता का? तिथे एक आमचाच बर्थ आहे, म्हणजे मला इथे मुलांजवळ झोपता येईल. इथला वरचा बर्थ मी रिकामा करून देतो.’
‘अरे भाऊ, आम्ही दोघेजण आहोत. एकजण तिकडे अन एकजण इकडे कसे झोपणार?’ मावसभाऊ म्हणाला.
काहीच न बोलता तो बिचारा बर्थवरचे सामान काढू लागला. तितक्यात डावीकडच्या अप्पर बर्थवरचा पॅसेंजर आला. त्याला आम्ही रिक्वेस्ट केली ‘आप अकेले है तो ये बाजूका अप्पर बर्थ लेलो. ये लोग फॅमिली है, हम उपरके दो बर्थपर सो जाते है.’
ट्रेनमध्ये बहुतेक वेळा अॅडजस्टमेंट करणारे पॅसेंजर असतात. अशा अडचणीच्या वेळी ते सहकार्य करतात. काही वेळा मात्र अॅडामेंट लोक असतात. कुणाच्या बापाचं ऐकत नाहीत!
त्या माणसाने बाजूच्या कंपार्टमेंटमध्ये वरचा बर्थ घेतला आणि आम्हाला एकाच ठिकाणी वरचे दोन बर्थ मिळाले. आम्ही बसलेल्या साईड बर्थवरच्या माणसाने सुटकेचा नि:श्वास सोडला.
सामान वरती टाकून आम्ही चढत होतो तितक्यात टिसी आला. त्याला मोबाईलमधले तिकिट दाखवत मी म्हणालो ‘ट्रेन तो खाली है, फिर तात्काल कोटेसे क्युं तिकीट देते है, देडसौ रुपये जादा लगे ना!’
तो म्हणाला ‘ये डिब्बे का छोडो, बाजूका डिब्बा तो पुरा खाली है. एक भरा हुवा और एक खाली डिब्बा ऐसी मजा है पुरे ट्रेन मे.’
‘लोगोंका सोशल डिस्टंसिंग है या डिब्बोंका?’ मावसभाऊ म्हणाला आणि आजुबाजूचे सर्वजण हसले.
‘बाजूका डिब्बा खाली है तो वहां जाकर सोये तो चेलेगा ना?’ आम्ही विचारले.
‘क्युं नही. जाव आरामसे सो जाव’ असे म्हणून टिसी निघून गेला.
टिसी निघून गेल्यावर बाजूच्या बोगीत जाऊन पाहिले. संपूर्ण बोगी रिकामी होती. दोन पोलीस फक्त एका कंपार्टमेंटमध्ये मोबाईल पहात बसले होते. मी लगेच ठरवले की इकडे येवून झोपायचे. कोविडच्या काळात सोशल डिस्टंसिंग पाळायची ही चांगली संधी होती.
परत येवून मावसभावाला तसे सांगितले. आम्ही सामान घेण्यासाठी उठत होतो तितक्यात समोरची मुलगी रडत उठली. तिला बहुतेक बाथरूमला जायचे होते. तिच्या वडलांनी तिचे पांघरून सावकाश काढले. अलगद तिला दोन्ही हातावर झोळीसारखे उचलून घेतले आणि टॉयलेटकडे गेला. त्या छोट्या मुलीच्या अंगावर फक्त चड्डी होती आणि छातीवर मोठे मेडिकल बेल्ट बांधलेले होतेे. बहुतेक फ्रॅक्चर झाले असावे.
आमच्या बाजूला बसलेला माणूस त्याच्या ओळखीच्या लोकांशी गप्पा मारत बाजूच्या कंपार्टमेंटमध्ये बसला होता. पॅसेजमध्ये अजून काही लोक उभे होते त्यामुळे घाई न करता आम्ही तिथेच बसून राहिलो.
��ाही वेळाने समोरचा माणूस मुलीला हातावर घेवून परत आला. आल्हाद तिला बर्थवर झोपवले. बायकोच्या पायाशी वरचा बर्थ लागू नये याची काळजी घेत वाकून बसत त्याने तंबाखू चोळली अन फक्की तोंडात टाकून खाली मान करून बसला.
टाईमपास म्हणून त्याला कुठे चाललात, कुठून आलात वगैरे बोलत सहज मुलीला काय झाले असे विचारले. यावर त्याने जे सांगितले ते ऐकून आमच्या काळजाचा ठोकाच चुकला!
परळीला मजूरकाम करणारा तो एक गरीब माणूस होता. नवरा अन बायको मोलमजूरी करून मुलांना वाढवत होते. मुलगा दहा वर्षाचा अन मुलगी आठ वर्षाची. खाण्यापिण्याची आबाळ होवू नये म्हणून मुलीला त्याने आपल्या बहिणीकडे आंबेजोगाईला ठेवले होते. एक दिवस त्याच्या बहिणीला लक्षात आले की मुलीला नेहमी धाप लागते व लवकर थकवा येतो. कितीही खाल्ले तरी तब्येत सुधारत नाही. म्हणून तिने तिला सरकारी दवाखान्यात दाखवले. सर्व तपासणी करून डॉक्टरांनी सांगितले की मुलीच्या हृदयाला छिद्र आहे आणि लवकरात लवकर ऑपरेशन करावे लागेल!
बहिणीने भावाला कळवले तसा तो घाबरून गेला. घरात खायची मारामार, अन त्यात ऑपरेशनचा खर्च कसा करणार? हा प्रश्न भेडसावू लागला. मुलगा आणि बायकोला घेवून तो ताबडतोब आंबेजोगाईला गेला. डॉक्टरांना परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यांनी त्याला सर्व समजावून सांगितले आणि घाबरायचे कारण नाही, सर्व व्यवस्थित होईल ही खात्री दिली.
पण इथेच त्याचे दुर्भाग्य संपले नव्हते! त्याच्या मुलाला कसलाही त्रास होत नव्हता, पण धाप मात्र नेहमी लागायची. डॉक्टरांना त्याने भीतभीत याबद्दलही सहज सांगितले. त्यांनी मुलाला तपासले तेंव्हा त्यांनाही धक्का बसला! मुलाच्या हृदयालाही छिद्र होते! दोन्ही मुलांच्या हृदयाला छिद्र असण्याची ही दुर्मिळ घटना पाहून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले होते.
डॉक्टर कळवळले आणि दोघांचेही ऑपरेशन तात्काळ करणे आवश्यक आहे असे त्याला सांगितले. त्याच्यासमोर मोठा प्रश्न होता पैशाचा. सरकारी दवाखाना असला तरी औषधपाणी, जेवण हा खर्च लागणार होता. पण गरीब लोकांत समजदारी, आत्मियता आणि एकी खूप असते याचे प्रत्यंतर आले. सर्व नातेवाईक जमले आणि किडुक मिडुक गोळा करून त्याच्याकडे दिले.
त्याचवेळी कुणीतरी सुचवले की शिर्डी देवस्थानाच्या हॉस्पीटलमध्ये अशा प्रकारचे ऑपरेशन होतात. तिथे दवापाणी, दवाखान्याचा खर्च, जेवणखान सर्वकाही फुकटात मिळते. लगेच सर्व तयारी झाली आणि दोन्ही मुलांना घेवून ते मायबाप शिर्डीला गेले. डॉक्टरांनी मुलांना अॅडमिट करून घेतले. कोविडमु��े त्या दोघांना मुक्कामाची परवानगी नव्हती. त्यात अन्नछत्रही बंद होते. म्हणून बसस्टँडच्या बाजूच्या मोकळ्या जागेवर चूल मांडून ते दोघे स्वैपाक करून खात होते आणि ‘मुलांना बरे कर’ अशी साई बाबाला प्रार्थना करत बसस्टँडवरच झोपत होते. ऑपरेशन व्यवस्थित झाले आणि बावीस दिवसानंतर सुट्टी मिळाली, तसे दोन्ही मुलांना घेवून ते परळीला परत निघाले होते!
हे सर्व तो घडाघडा सांगत होता अन आम्ही सुन्न होवून ऐकत होतो. आश्चर्य म्हणजे सांगतांना त्याच्या चेहर्यावर मंद हास्य होते, कुठेही सहानुभूतीचा भाव नव्हता. बिचारा बिगारी काम करणारा माणूस, त्याच्यावर किती मोठे संकट ओढवले होते, तरी त्याने या भयानक संकटाचा हसतमुखाने सामना केला होता आणि दोन्ही मुलांना पुनर्जन्म दिला होता!
त्याची कथा ऐकून जगात किती प्रकारचे दु:ख आहेत आणि आपण मात्र आपल्याच दु:खाला कवटाळत बसतो याचे भान आले. नि:शब्द होवून आम्ही उठलो. नकळत मावसभावाने बॅगमधून क्रिम बिस्किटाचे पाकिट काढले व त्या माणसाकडे देत म्हणाला ‘मुलांना दे खायला’.
बापाच्या हातातले बिस्किटाचे पाकिट पाहून वेदनेने ग्रासलेल्या त्या चिमुरड्या पोरीच्या चेहर्यावर झळकलेले निरागस हास्य पहात जड अंत:करणाने आम्ही बाजूच्या बोगीकडे गेलो...
नितीन म. कंधारकर
औरंगाबाद.
0 notes
Photo
डॉ. लक्ष्मण देशपांडे यांनी लिखित आणि दिग्दर्शित केलेला आणि संदीप पाठक यांच्या ५२ भूमिका असलेली मराठीतील अजरामर एकपात्री नाट्यप्रयोग वऱ्हाड निघालाय लंडनला रविवार दि. १० फेब्रुवारी २०१९, दु. ४:३० वा विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी वऱ्हाड निघालाय लंडनलाची कथा मराठवाड्यातील एका खेडेगावात घडते, काशिनाथ नावाचा मुलगा परदेशात लंडनला शिकायला जातो आणि तेथील ज्युली नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो, त्याचे वडील " बाप्पा " यांना हि बातमी कळते आणि नाटय सुरु होते, वर्हाड मध्ये काशिनाथ ची आई-वडील, काका काकू, मामा-मामी, आजी आजोबा, मावशी, आत्या, चिल्ली पिल्ली लेकरंबाळं,, ज्याला खेड्याच्या भाषेत " बारदान " म्हणतात असे सगळ्या व्यक्तिरेखा आहेत, ह्या मध्ये एक तरतरीत मुलगा आहे त्याच नाव आहे " बबन्या " हा बबन्या नॉन मेट्रिक आहे, असा हा बबन्या लग्न जमवतो आणि सारं वऱ्हाड लंडनला जाते. ही कलाकृती पाहण्यात खूप गंमत आहे. मिळवा नाटकांचे अलर्ट आता तुमच्या मोबाईलवर आजच डाऊनलोड करा All About City App https://allaboutcity.in/index/storedetail/id:1223 #varhadnighalaylondonla #sandippathak #vishnudasbhaveauditorim #marathidrama🎭🎭 #marathiplay #marathinatak #marathinatak🎭 (at Vashi, Navi Mumbai) https://www.instagram.com/p/BtalDdflxwU/?utm_source=ig_tumblr_share&igshid=w0ttggcyfw1f
#varhadnighalaylondonla#sandippathak#vishnudasbhaveauditorim#marathidrama🎭🎭#marathiplay#marathinatak#marathinatak🎭
0 notes