#अपघातात
Explore tagged Tumblr posts
Text
गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने अपघातात इंग्लंडचा क्रिकेटपटू जखमी
गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने अपघातात इंग्लंडचा क्रिकेटपटू जखमी
गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने अपघातात इंग्लंडचा क्रिकेटपटू जखमी लंडन – इंग्लंडचा माजी कर्णधार व माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ऍण्ड्य्रू फ्लिंटॉफ ( Andrew Flintoff ) येथे एका कार अपघातात जखमी झाला. त्याला एअर ऍम्ब्युलन्सच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचा खुलासा इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने आपल्या ट्विटर हॅण्डलवर केला आहे. मेस्सीने ‘या’ कारणामुळे…
View On WordPress
0 notes
Text
माजी जि.प. सदस्य रोहडा यांचा कार अपघातात मृत्यू
गोरेगाव, दि.19 : येथील पोलीस स्टेशन अंतर्गत जानाटोला ते भंडगा दरम्यान आज शुक्रवारला सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास झालेल्या कार अपघातात माजी जिल्हा परिषद सदस्य गोंदिया निवासी श्रीचंद रोहडा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. Death in a car accident श्रीचंद रोहडा हे तालुक्यातील कुऱ्हाडी ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच या क्षेत्रातूनच ते जिल्हा परिषदेचे सदस्य बहुजन समाज पक्षाच्यावतीने राहिले. त्यांच्या निधनाने…
View On WordPress
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 15 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
धरती आबा म्हणून ओळखले जाणारे आदिवासी नेते आणि स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आज देशभरात आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरी होत आहे. यानिमित्त मुख्य कार्यक्रम बिहारमधल्या जमुई इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडला. बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती वर्ष सोहळ्याची सुरुवात यावेळी करण्यात आली, तसंच भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मरणार्थ एका नाण्या��ं आणि टपाल तिकिटाचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते झालं. ग्रामीण आणि दुर्गम भागातल्या आदिवासी समुदायांच्या विकासासाठी सहा हजार ६४० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पाचं उद्घाटन आणि पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली.
नवी दिल्लीतल्या बांसेरा उद्यानात भागवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झालं.
****
पहिल्या बोडोलँड महोत्सवाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत उद्घाटन होणार आहे. केवळ बोडोलँड मध्येच नाही तर आसाम, पश्चिम बंगाल, नेपाळ आणि ईशान्येकडील सीमावर्ती भागात राहणाऱ्या स्थानिक बोडो लोकांना एकत्रित करणं हे या महोत्सवाचं उद्दीष्ट आहे. समृद्ध भारतासाठी शांतता आणि एकता अशी या महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना आहे.
****
शिख धर्माचे संस्थापक, पहिले गुरु, गुरु नानक यांची ५५५ वी जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्त नांदेडच्या श्री सचखंड गुरुद्वारासह विविध गुरुद्वाऱ्यांमध्ये भजन, किर्तनासह धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरु नानक यांच्या प्रकाश पर्वानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. गुरु नानकजी यांची प्रेम, विश्वास, सत्य आणि त्यागाची शिकवण सर्वांना नैतिकतेबद्दल मार्गदर्शन करते, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही गुरुनानक जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुरु नानक यांच्या जीवन चरित्रातून समानता, करुणा आणि मानवतेच्या सेवेविषयी प्रेरणा मिळते, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
आज कार्तिकी पौर्णिमा देखील आहे; त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
राज्यात विधानसभा प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. सर्वच पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांचे झंजावाती प्रचार दौरे सुरु आहेत. ठिकठिकाणचे उमेदवार आणि कार्यकर्ते कोपरा सभा, मेळावे, प्रचार फेऱ्या आणि घरोघरी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेत आहेत.
भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज हिंगोली, उमरखेड आणि चंद्रपूर इथं जाहीर सभा घेणार आहेत. शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातल्या बारड इथं, भोकर विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार श्रीजया चव्हाण यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोल�� आज गडचिरोली आणि चंद्रपूर इथं सभेला स��बोधित करणार आहेत.
****
विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
****
लातूर जिल्ह्यातल्या निलंगा विधानसभा मतदारसंघात कालपासून गृह मतदानाला सुरुवात झाली. यावेळी सामान्य निवडणूक निरीक्षक लक्ष्मीकांत प्यारेलाल प्रधान यांनी प्रत्यक्ष भेट देवून या प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी त्यांनी आयटीआय इथल्या सुरक्षा कक्षाला देखील भेट दिली.
दरम्यान, लातूर शहर विधानसभा मतदारसंघाच्या मतदान प्रकियेतले मतदान केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी आणि इतर मतदान अधिकाऱ्यांचं दुसरं प्रशिक्षण काल दयानंद महाविद्यालयात पार पडलं. यावेळी अधिकाऱ्यांना ईव्हीएम हताळणीचं प्रशिक्षण देण्यात आलं.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी- पुसद रस्त्यावर झरा फाटा इथं भाविकांची क्रुझर जीप उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीला धडकून झालेल्या अपघातात १३ भाविक जखमी झाले. औंढा तालुक्यातले राजदरी, पिंपळदरी इथले भाविक वर्धा इथल्या टाकळघाट इथं देवदर्शनासाठी जात असताना आज सकाळी हा अपघात झाला. अपघातातील सात जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यातल्या तिघांना नांदेड आणि चार रुग्णांना हिंगोली इथं उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
****
नांदेड जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर, यांच्या मार्गदर्शनाखाली काल “जागतिक मधुमेह दिन” साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना तज्ञ डॉक्टरांमार्फत मार्गदर्शन करण्यात आलं.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या नळदुर्ग इथं अवैधरित्या गुटखा आणि पान मसाला विक्री करणाऱ्यावर पोलीसांनी कारवाई केली. छापा टाकून केलेल्या या कारवाईत एकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरु असलेल्या टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला चौथा आणि शेवटचा सामना आज जोहान्सबर्ग इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री साडे आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत भारत दोन - एकनं आघाडीवर आहे.
****
0 notes
Text
करमाडजवळ हिट ॲण्ड रनचा थरार; १०० फूट फरफटत नेल्याने एक ठार
करमाड : लघुशंकेसाठी थांबलेल्याकारमधील एका प्रवाशाला कारमधून उतरत असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या हायवाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी (दि. १६) दुपारी १ वाजता नव्याने झालेल्या बीड बायपास उड्डाण पुलाजवळ छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या मार्गावर झाला. सचिन भागतराव पानखडे (३२, रा. राजप्रिंप्री ता. गेवराई, जि. बीड) असे मृताचे नाव आहे. या…
View On WordPress
0 notes
Text
Moshi : कारच्या धडकेत पादचारी व्यक्तीचा मृत्यू
एमपीसी न्यूज – मध्यरात्री कामावरून घरी जात असलेला व्यक्ती रस्ता ओलांडत असताना त्याला भरधाव ( Moshi) कारने धडक दिली. या अपघातात व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि. 4) मध्यरात्री दीड वाजता भारत माता चौक, मोशी येथे घडला. अर्जुन पुरन विश्वकर्मा (वय 32, रा. मोशी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी दीपक पूर्ण विश्वकर्मा (वय 23) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…
0 notes
Text
Jalgaon : बैलपोळा साजरी करण्याचे स्वप्न भंगले, वाटेत तरुणाला मृत्यूने गाठले; कुटुंबावर शोककळा
Jalgaon : बैलपोळ्यानिमित्त बैलांसाठी नवीन सामान घेऊन येत असताना सोळा वर्षीय युवकाचा अपघाती मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर महाराष्ट्र टाइम्स.कॉमबैलपोळा खरेदीसाठी गेलेल्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला जळगाव, निलेश पाटील : बळीराजाचा सण बैलपोळा मोठ्या उत्साहात उत्तर महाराष्ट्रात साजरा करण्यात आला. पण बैलांसाठी नवीन सामान घेण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय युवकाचा सामान घेऊन परत येत असताना अपघाती मृत्यू…
View On WordPress
#accident case of jalgaon#jalgaon boy die in accident#जळगाव#तरुणाचा अपघाती मृत्यू#बैलपोळा#बैलपोळा सण अपघात#बैलपौळा सण
0 notes
Text
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दुर्दैवी घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू...
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दुर्दैवी घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू… अपघातात चार प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती… नागपूरकडून मुबंईकडे जाणाऱ्या ईरटीका कारला डिझेल भरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्याने घडला अपघात... Horrific accident on Samriddhi highway, seven people died on the spot in the unfortunate incident… जालना हद्दीतील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडला…
View On WordPress
0 notes
Text
मुंबई-आग्रा महामार्गावरील आठवा मैलांवर तिन गाड्यांच्या अपघात!
नरेंद्रचार्य संस्थानच्या रुग्णवाहिकेने जखमींना तात्काळ रुग्णालयात हलविले प्रभाकर आवारी,मुकणे (प्रतिनिधी): मुंबई आग्रा महामार्ग वर आज दुपारी ३:३० वा आठवा मैलाजवळ नासिकहुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तीन गाड्यांचा एकमेकांना धडकुन झालेल्या अपघातात तीन जन गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, ईन्होवा क्रं MH.15. HG.6177 त��ेच ओमीनी या गाडीचा नंबर मिळाला नाही तर तीसरी गाडी…
View On WordPress
0 notes
Video
youtube
पाच बहिणींचा एकुलता एक भाऊ अपघातात ठार..
0 notes
Text
कंपनीने ट्रक दुरुस्तीसाठी पाठवलं, पुन्हा परतलेच नाहीत; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू
कंपनीने ट्रक दुरुस्तीसाठी पाठवलं, पुन्हा परतलेच नाहीत; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू
कंपनीने ट्रक दुरुस्तीसाठी पाठवलं, पुन्हा परतलेच नाहीत; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू Dhule News : धुळ्यात मुंबई – आग्रा महामार्गावरील वरखेडी फाट्याजवळ काल रात्री एक भीषण अपघात झाला. यात एका ट्रकने दुसऱ्या ट्रकला धडक दिल्याने हा अपघात झालाय. या भीषण अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. Dhule News : धुळ्यात मुंबई – आग्रा महामार्गावरील वरखेडी फाट्याजवळ काल रात्री एक भीषण अपघात झाला. यात एका…
View On WordPress
0 notes
Text
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जखमी वारकऱ्यांच्या उपचारांचा खर्चही राज्य शासन करणार नागपूर, दि. १२ : नाशिक- पुणे महामार्गावर शिर्डीहून आळंदीला जाणाऱ्या पालखीत कंटेनर शिरल्याने अपघात होऊन पायी चालणाऱ्या चार वारकऱ्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये मदत देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 08 November 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०८ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
भ्रष्टाचार हा एक आजार असून तो मुळापासून उखडून टाकला पाहिजे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. आज नवी दिल्ली इथं केंद्रीय दक्षता आयोगाच्या दक्षता जागरूकता सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती मुर्मू बोलत होत्या. विश्वास हा समाजाचा पाया असून भ्रष्टाचारामुळे समाजातील विश्वास कमी होतो, असंही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या. भ्रष्टाचाराचा सामना करण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण योजनेसारखे उपक्रम शासनातर्फे राबवले जात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
नवी दिल्लीत आज पासून दुसऱ्या सैन्य परंपरा उत्सवाला सुरुवात होत आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा धोरण, परराष्ट्र नीती, लष्कराचा इतिहास आणि वारसा यांचा अभ्यास करणारे शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधक या महोत्सवात सहभागी होणार आहेत. याचबरोबर लष्कराच्या शौर्य गाथा प्रकल्पाचा शुभारंभही यावेळी होणार आहे. शिक्षण आणि पर्यटनाच्या माध्यमातून देशाच्या लष्करी परंपरांचं संवर्धन आणि प्रसार करणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यातल्या प्रचारसंभांना आजपासून सुरुवात झाली. आज पहिली सभा धुळ्यात मालेगाव रोड, महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्राजवळ पांजरापोळ गोशाळा इथं सुरू झाली आहे. त्यानंतर दुपारी नाशिक इथं तपोवन परिसरात मोदी यांची सभा होणार आहे. या सभेच्या निमित्ताने प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, सुरक्षा व्यवस्था चोख आहे. तपोवनासह सुमारे ११ मार्गांवरील वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. महायुतीततल्या घटक पक्षांचे वरिष्ठ नेते या सभांना उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, भाजप��ेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सांग��ी इथं सभा सुरू आहे. त्यानंतर ते सातारा जिल्ह्यात कराड इथं जाहीरसभा घेणार आहेत. शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज धाराशिव जिल्ह्यात तीन प्रचारसभा होणार आहेत. यात परंडा, धाराशिव आणि उमरगा इथले महायुतीचे उमेदवार अनुक्रमे डॉक्टर तानाजी सावंत, अजित पिंगळे आणि ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारासाठी या सभा होत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज परभणी जिल्ह्यात सेलू इथं आणि हिंगोली जिल्ह्यात वसमत इथं प्रचार सभा होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आज लातूर इथं तीन सभा होणार आहेत. लातूर शहर मतदारसंघाचे उमेदवार आमदार अमित देशमुख आणि लातूर ग्रामीण मतदारसंघाचे उमेदवार धीरज देशमुख यांच्या प्रचारार्थ लातूर शहर तसंच निलंगा आणि गंजगोलाई इथं या सभा होणार आहेत.
आचारसंहिता काळात राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर कालपर्यंत एकूण तीन हजार एकशे अठ्ठावीस तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी तीन हजार एकशे बारा तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली. राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ आणि मौल्यवान धातू या स्वरूपात एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेनं आजपासून १६४ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यादृष्टीनं रेल्वेनं ४७६ गाड्यांचं नियोजन केलं आहे. रेल्वे विभागातर्फे आतापर्यंत चार हजार ५२१ रेल्वे गाड्या चालवण्यात आल्या असून ६५ लाख प्रवाशांनी याचा लाभ घेतल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. या महिन्याच्या चार तारखेला एकाच दिवसात तीन कोटींपेक्षा जास्त प्रवाशांनी रेल्वे प्रवास केल्याचंही मंत्रालयानं सांगितलं.
नांदेड बिदर महामार्गावर एकुर्का रोडवर टेम्पो आणि कारच्या भिषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जण ठार झाल्याची घटना काल दुपारी घडली. कारमधील सर्वजण कपड्यांच्या खरेदीसाठी उदगीर इथं जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव टेम्पोने कारला धडक दिली. यात आई, दोन विवाहीत मुली आणि नातीचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
भारताचा उदयोन्मुख बुद्धिबळपटू अर्जून इरिगाईसी यानं फिडे जा��तिक बुद्धिबळ क्रमवारीत दुसरे स्थान पटकावलं आहे. काल चेन्नई ग्रांड मास्टर्स स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीअखेर त्यानंतर अॅलेक्सी सरानावर विजय मिळवला.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान चार टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज डरबन इथं खेळला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेत���त्वात ही मालिका होत आहे. भारतीय वेळेनुसार रात्री साडे आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल.
कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या किरण जॉर्जने आपलं स्थान निश्चित केलं आहे. आज सकाळी उपांत्यपूर्व फेरीत त्याने जपानच्या खेळाडूचा २१-१४, २१-१६ असा पराभव केला. तत्पूर्वी, काल झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीत जॉर्जने तैवानच्या खेळाडूचा पराभव केला.
0 notes
Text
Breaking News -32 years old women dead in accident !
कारेगाव - बाभुळसर रोडवरच्या अपघातात 32 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू ! https://www.shirurvarta.in/?p=11028
#think for yourselves#thinking#tumblr milestone#desi things#writer things#1 year tumblrversary#stranger things#think about it#girly things#male thinspi
0 notes
Text
Pune: पुण्यातील खडकी भागात भीषण अपघात;एकाचा मृत्यू 8 गंभीर जखमी
एमपीसी न्यूज- पुण्यातील खडकी भागात भीषण अपघात (Pune)झाल्याची माहिती समोर आली आहे.आज सकाळी 9 वाजता हा अपघात घडला आहे. बस वरील नियंत्रण सुटल्याने बस चालकाकडून घडला अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. खडकी येथे आज सकाळी एसटी बसने चार चाकीला धडक दिली असून या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 8 जण गंभीर जखमी आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.या अपघातात…
0 notes
Text
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
ट्रक आणि पिकअपचा भीषण अपघात, चौघांचा जागीच अंत; मृतांमध्ये बाप-लेकाचा समावेश बीडच्या मांजरसुंबा नजीक अहमदपूर -अहमदनगर मार्गावर पिकअप व कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात पिकपमधील तिघेजण तर कंटेनरचा चालक जागीच ठार झाला. नितीन घरत, प्रल्हाद घरत, विनोद सानप अशी ठार झालेल्या तिघांची नावे आहेत.
View On WordPress
#Latest Marathi News#Latest News in Marathi#latest news maharashtra#live news marathi#maharashtra news marathi#maharashtra news today#marathi batmya#marathi breaking news#marathi breaking news headlines#Marathi breaking news today#News in Marathi
0 notes