Text
धाऊनिया दिवस रात। देई सर्वांस पोषण।
धरणी अक्षय रांजण। ती गुरु माझा।।
नित्य तोषवी चराचर। न कशाचे त्या अप्रुप।
सकलांत जल एकरूप। ते गुरु माझा।।
घेई पोटी सकलांस । बांधी कुणा न बंधन।
मुक्त अाकाशी सर्वजण । ते गुरु माझा।।
अग्नि प्रदिप्त पोटाशी। देई सकलांस जीवन।
रवि अनादि प्रकाशमान। तो गुरु माझा।।
राखी न स्वतःशी काही। वाही निष्काम निरंतर।
वारा न दे कुणा अंतर। तो गुरु माझा।।
दावी मार्ग अनादि सकला। ती महाभूते निराकार।
��ूपे घेतसी सगुण साकार। ती गुरु माझा।।
- रोहन
1 note
·
View note
Text
नाम जेव्हा मुखी। येई तव रामा।
भय-भिती छाया। लोपतसे।।
नाम जेव्हा मुखी। येते तव श्याम।
राग लोभ काम। शांत करी।।
नाम तुझे मुखी। येई धूम्रवर्णा।
हरि दैत्या सार्या। अंतरिच्या।।
नाम तुझे मुखी। येता पांडुरंगा।
वात्सल्याचा गाभा। लाभतसे।।
नाम तुझे आई। गूंजता ह्रदयी।
सर्व दर्शने मनी। प्राप्त होती।।
-रोहन
1 note
·
View note
Text
येत्या जन्मी पक्षी। करि मला देवा।
वैराग्याने खोपा। सोडे सहजी।।
येत्या जन्मी देवा। कर वृक्ष वल्ली।
स्थिर कर्मयोगी। दुजा नाही।।
वाघरू होईन। आनंदाने देवा।
पोटासाठी हिंसा। धर्मची तो।।
नर जन्मी देवा। दिली मज बुद्धी।
परि मनी भिंगरी। बांधिली गा।।
नर जन्म दिधला। उपकार देवा।
घेईन केशवा। नाम तुझे।।
-रोहन
1 note
·
View note
Text
आभाळ मोकळे होण्यासाठी
चिंब ओला पाऊस बरसावा
अथवा,
सोसाट्याचा वारा वाहावा
पडणारा पाऊस देतो
हिरव्या अंकुराची आशा
पण वारा उधळितो आसमंत सारा
अन् उन्मळून जाई मनीचा गाभारा
असे वादळ येण्यापूर्वीच,
हळुवार फुंकर घालावी नभांना
अन् भिजावे चिंब आंतरबाह्य
एका नव्या अंकुरासाठी,
एका नव्या आशेसाठी
कधी कधी जरूर,
असाही पाऊस बरसावा
-रोहन
1 note
·
View note
Text
सत्य प्रत्येकाचे तेच आहे
फरक आहे तो दृष्टीकोनाचा
बदल हेच फक्त सत्य आहे
भगवंतांनी संधी दोहोंनाही दिली
कुणाला सभेत तर कुणास रणांगणी
बदल स्विकारले ते पां��व तरले
न स्विकारलेले कौरव संपले
डार्विनने हेच सत्य सांगितले
बदल स्विकारण्याचे,
अनुकूलनाचे.....
-रोहन
0 notes
Text
मी करतो बंधमुक्त माझ्या भावनांना
निचरा होण्यासाठी,
आकाश निरभ्र होण्यासाठी
बरं वाटतं तेवढंच
पण भावनांची तगमग राहते सुरूच
मनाच्या बंधातून, शब्दांच्या बद्धतेत
अन् मग,
निरभ्रता आकाशाची फार काळ नाही टिकत
पुन्हा दाटून येती ढग माझ्याच कवितेचे
अन् बरसती पुन्हा भावना...फिरूनी
मनाला पूर येईपर्यंत
हे निसर्गचक्र...नव्हते शिकविले अभ्यासक्रमात
-रोहन
0 notes
Text
मी लिहिले चार शब्द जे भावले माझ्या मनी
शाप द्या वा थाप द्या त्या भावनांचा मी ऋणी
मी सुखाचा ही ऋणी अन् मी दु:खाचा ही ऋणी
तेच धन मग मिरवितो मी चार शब्दांचा धनी
धन्यवाद हे ईश्र्वरा तू कूस माझी उजविली
भावना प्रसवून झालो पुरूष जन्मी माऊली
थोर हे उपकार देवा लाज मजला तू दिली
हाव मजला थोरली पण बुद्धी नाही चोरिली
काय वय ह्या लेखणीचे, काय आमुची मगदुरी
खेळ-खेळा वयात वदले, श्री माऊली ज्ञानेश्वरी
-रोहन
1 note
·
View note
Text
मन म्हणते पळ पळ
दाबून टाक जुनी कळ
थांबून करतोस माझा छळ
चल सरळ, तिथे वळ
दुसरी इच्छा कर जवळ
मन म्हणते पळ पळ
मन म्हणते पळ पळ
नवी इच्छा नवे फळ
तिथे सारे जग नितळ
तिथेही पायीं सळसळ
तिथेही फळावर गरळ
मन म्हणते पळ पळ
मन म्हणते पळ पळ
जहरी दंश पुन्हा कळ
वर्मी फटका अदृश्य वळ
जीर्ण श्वासास अश्रूंची खळ
गात्र म्हणते छळ छळ
मन म्हणते पळ पळ
विवेक म्हणे थोडं थांब
घे थोडा तू विराम
अशाच एका इच्छेपोटी
हरली सीता, शोधिती राम
माझ्या मना थोडं थांब
-रोहन
0 notes
Text
आयुष्यात काय पाहिजे??
टिकण्यापुरते खायला
एक छप्पर लपायला
लाजेपुरते नेसायला
आणि........कदाचित....
एखादी तार जोडलेली
मनाचे रंग वाटायला
पण मग होतात हेवेदावे
रंगाची ���िळकत तोलायला
तुझी सप्तरंगी, माझी करडीच
लागते ज्याला-त्याला वाटायला
मग जो-तो करतो सुरू
मुलामे मुखवटे लावायला
त्यासाठी पण होते स्पर्धा
दहा दिशा, दहा तोंडे
जो-तो लागे पळायला
ताणल्या जाताच तारा
लागती हिसके बसायला
तार तोडण्यापूर्वी नक्की
विचार एकच प्रश्न स्वतःला
की...
आयुष्यात काय पाहिजे??
- रोहन
0 notes
Text
दोन शब्दांतील अवकाशाचे अर्थ शोधीत आहे
दोन वाक्यात दडलेले गर्भित वाक्य शोधीत आहे
मी दररोज हे जगण्याचे पुस्तक वाचताना
मागील पानांवरती पुढचा मार्ग शोधीत आहे
भूत, हा क्षण, भविष्य सारे या पुस्तकी तोललेले
मी माझ्याच लेखणीने ते पारडे तोलीत आहे
पान पलटता अखेरचे, पहिला भाग मिटवताना
संचिताचे ��ू मी दुसऱ्या भागी ओढीत आहे
मीच लेखक-पथिक-वाचक माझ्याच पुस्तकाचा
या प्रवासवर्णनासाठी पूर्णविराम शोधीत आहे
- रोहन
0 notes
Text
कवितेला पण असते का स्वतःचे असे भावविश्व
की केवळ कवीच्या भावविश्वातच रममाण होते ती
पण भासते प्रत्येक वेळी वेगळीच आवर्तनागणिक
दिसतात तिचेही अनेक कंगोरे मनुष्य स्वभावाप्रमाणे
खरेच तिच्यात असतात का इतके अर्थ दडलेले
खरेच वसली आहे का चराचरात अनेक रूपात
की इथेपण तिच्यात जो तों शोधतोय स्वतःलाच
आणि देतोय तिलासुद्धा नश्वर मनुष्य जन्म
जसा निर्गुणाला फक्त मनुष्य रूपात बांध��्या प्रमाणे
ते काहीही असो,
आपण किमान एकाशी तरी भावरूप होणे गरजेचे
मग गवसेल ज्याचे त्याला स्वतःचेच पुष्पक विमान
- रोहन.
0 notes
Text
ग्रीश्म जाळे जरी अन शिशिर गोठवीत आहे;
तुझी याद येता वसंत पालवीत आहे
तुझे स्वप्न उराशी मी कवटाळूनी बसतो;
तुला मिठीत घेण्या ते खुणवीत आहे
किती श्वास झाले मी न मोजदाद केली;
तुझा गंध हरेक श्वास फुलवीत आहे
न माळतो कुणीही रक्त-जास्वंद मोगऱ्याशी;
परि हात माझा तुझ्यात गुम्फवीत आहे
हाच खेळ चाले केवळ माझिया मनाचा;
तुझे अस्तित्व सदैव भासवीत आहे
तू नाहीस मृगजळ जरी जाणतो मी;
हीं तुझी ओढ़ अनंत चालवीत आहे
तुझी वाट बघता मी दररोज येथे;
काल्पनीक चातकाला जगवीत आहे
तू येशील का मजपाशी घ्यायला तो;
तुझा रेशमी रुमाल बोलवीत आहे
--रोहन.
1 note
·
View note
Text
दुःख कधी मी झाकले नाही, ना कुरवाळले त्यास कधी
पण सोडता मज सोडवत नाही, जगण्याचा हव्यास कधी
पंचेद्रियांनी भोगतात काही, सहजी अत्तरांचे ताटवे
अखेरचा घेतला मी न जाणें, तो सुवासिक श्वास कधी
पायीं लोळण घेत होती, खरीच सुखांची रास तिथे
पाय वळून वदले नसती, खरे मृगजळी आभास कधी
मी तरीही हसतो उसने, सोशीत प्राक्तनाचे भोग हे
अवसेच्या चंद्रास का सुटला, पौर्णिमेचा ध्यास कधी
क्षणिक सुख लाभले सर्वां, या गझलेच्या मैफिली
कुठे उमटले हळुवार उमाळे, कुठेतरी उच्छवास कधी
- रोहन
0 notes
Text
कळीचे व्हावे फूल,
मन अधीर माझे
पण जाईल मज शैशव,
भय कळी मनाचे
कळी फुलता, तारुण्य येता,
मन फुले माझे तयासावे
पण फुलास चिंता राही,
आज यौवन तर उद्या कसे
खरेच हे पुष्प मनीचे गुज,
की माझ्या मनीचे खेळ असे
ते जाते पसरून आनंद दरवळ
मी शुभ्रमेघास कृष्णकिनार लावतसे
मज दिसतो केवळ स्वमनीचाच आरिसा,
जो अंतरीचा पुष्पदरवळ झाकतसे
- रोहन
0 notes