raavan-world
democrat maharashtra
1 post
Don't wanna be here? Send us removal request.
raavan-world · 5 years ago
Text
अफूच्या गोळीवर कलम ५१ (अ) चा उतारा- Corona v/s Religious Bigatory
अफूच्या गोळीवर कलम ५१ (अ) चा उतारा- Corona v/s Religious Bigatory
लेखक-
पत्रकार ॲड. रावण धाबे,
हिंगोली.
आजच्या ( दिनांक २४ मार्च २०२०) आकडेवारीनुसार जगात 3 लाख 82 हजार 972 रुग्ण आहेत. तर 16 हजार 585 रुग्ण मृत्यू पावले आहेत. या भयानक स्थितीत आशादायक बाब म्हणजे 1 लाख 2 हजार 524 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. दुरुस्त झालेल्या लोकांनी रुग्णालयात टाळ कुटले नाहीत की अल्लाह, गॉड किंवा ईश्वरचा धावा केला नाही. त���यांनी तर डॉक्टरांनाच ईश्वर अल्लाह, परमेश्वर मानून उपचार करून घेतला. ज्यांनी देवावर विश्वास ठेवून वैद्यकीय उपचार टाळले त्यांना त्यांचे फळ मिळलेही असेल. असो..... परंतु आज कोरोनाच्या निमित्ताने विश्वास ईश्वरी शक्तीवर ठेवायचा की विज्ञानावर हा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे.
कोरोना व्हायरसच्या साथीमुळे सर्व जग हैराण झालेले असताना काही धार्मिक कर्मठ आणि अमाचाच धर्म मोठा या तोऱ्यात वावरणारे लोक हा आजार कसा दैवी शाप आहे, याचे दाखले देऊन देवाची प्रार्थना करण्याचे फुकाचे सल्ले देत आहेत. काही जण तर गायीचा मुत आणि शेण खाण्याचे सांगत आहेत. या सल्ल्याने आजार पूर्णतः बरा होत असल्याचा दावा करीत आहेत. या साथीच्या विषाणूचा सामना शास्त्रज्ञ मंडळी मोठ्या धैर्याने करीत आहेत. तसेच सर्वसामान्य जनताही दिलेल्या सूचना आचार संहितेचे पालन करून सरकारला तेवढेच महत्वपूर्ण सहकार्य करीत आहेत. या स्थितीत शास्त्रज्ञ आणि प्रत्यक्ष विज्ञानालाच हे बिनडोक धार्मिक ठेकेदार समाजात अंधश्रद्धा पसरवत सामान्य समाजाला उपचार न करता धार्मिक प्रार्थना, कर्मकांड करण्याचे सांगून आणखी आगीच्या खाईत लोटत आहेत. जगातील कोणतेही धार्मिक पुस्तक, ग्रंथ प्रत्यक्ष कोणत्याच देवाने लिहिलेले नाही. त्यामुळे त्या पुस्तकातील विचारांवर आणि आशयावर बदलत्या काळानुसार विसंबून न राहता केवळ ते पवित्र धार्मिक ग्रंथ आहेत म्हणून त्यावर अंधविश्वास न ठेवता काळानुसार त्यात बदल होणे सुद्धा गरजेचे आहे, असे महात्मा फुले यांनी मत मांडले होते. फुले यांनी चार्वाक, गौतम बुद्ध, संत कबीर, संत तुकाराम, संत रविदास आदी बुद्धिवादी महापुरुषांना अपेक्षित असलेला विज्ञानवादी विचार आपल्या सार्वजनिक सत्यधर्मातून मांडला आहे. परंतु महात्मा फुले यांनी आपल्या धर्माचा कुठेही बिन कामाचा डंका वाजविला नाही. तर त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून आपले सामाजिक कार्य केले होते. मृत्युच्या दारात सापडलेल्या आणि या आजारामुळे पहिलेच भयभीत झालेल्या सामान्य लोकांच्या भीतीचा फायदा उचलण्यासाठी आपलाच धर्म श्रेष्ठ कसा, त्यांच्या सर्वोच्च देवाने, अल्लाहने, गॉडने हजारो वर्षांपूर्वी सर्व समस्यांचे निराकरण कसे केले आहे, हे पटवून दिले जात आहे. वास्तविकत: कोरोनाने जगातील कोणत्याच धर्माच्या व्यक्तीला आतापर्यंत सोडले नाही. सर्व धर्माच्या लोकांचा त्याने बळी ��ेतला आणि कोणत्याही धर्माचा देव, परमेश्वर, अल्लाह किंवा गॉड या नागरिकांच्या मदतीला धावून आला नाही ही वास्तविकता आहे. प्रसिद्ध विचारवंत काल मार्क्स यांनी धर्माला अफूची गोळी म्हटले होते. धर्माच्या अतिरेकी अनुनयामुळे या धर्मवेड्यांना आपली जन्मभूमी, देश सुद्धा दुय्यम वाटत असतो आणि ते धर्मासाठी आपल्याच देश बांधवांवर तुटून पडतात, त्यामुळेच साम्यवादी विचारवंतांनी धर्माला चार हात दूरच ठेवले आहे. स्वतःवर आणि मानवी बुद्धीवर विश्वास न ठेवणारे परंतु, स्वतःवर वेळ आल्यावर मात्र केवळ रासायनिक औषधी घेणारे आणि डॉक्टरांना देव मानणारी बांडगुळ मंडळी मात्र ही अफूची गोळी काही केल्या चघळणे सोडेणात. या गोळीचा उतारा भारतीय राज्यघटनेने दिला आहे. कलम 51A (h) मध्ये (to develop the scientific temper, humanism and the spirit of inquiry and reform) विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन विकसित करणे, मानवता, चिकीत्सकता आणि सुधारणावादी दृष्टिकोन विकसित करण्याचे भारतीय नागरिकांचे कर्तव्य असेल असे नमूद करण्यात आले आहे. आपण अधिकार मागत आहोत, मग कर्तव्याचे काय असा प्रश्न साहजिकच पडला पाहिजे. सरकार पातळीवर कायद्यानेच धार्मिकता ही व्यक्तिगत बाब ठरून त्याचा सार्वजनिक जीवनात कुठेही गैरवाजवी उदोउदो करण्यास प्रतिबंध करणे गरजेचे आहे.
नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यात आपण यशस्वी झालो नसल्यानेच आजघडीला देशात काही संघटनांच्या अतिरेकी धार्मिक कृत्यांमुळे, जाहीर भाषणामुळे इतर धर्मीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. धार्मिक अल्पसंख्यांक समाज विशेषतः मुस्लिम समाजाच्या मनामध्ये कोरोना सारख्या जागतिक आपत्तीच्या काळातही आपले आंदोलन दडपण्यासाठीच कोरोनाची अवास्तव भीती दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोप होत आहे. विविध ठिकाणच्या शाहीनबाग आंदोलनकर्त्यांनी तर कोरोनापेक्षाही महाभयंकर सीएए, एनसीआर, एनपीआर हे विषाणू असल्याचा आरोप करून आंदोलन स्थगित करण्यास नकार दिला होता. नागरिकत्व देणाऱ्या कायद्याला नागरिकता काढून घेणारा कायदा अशी अपप्रसिद्धी केली जात आहे. नागरिकत्व कायद्यातील कलम २ मध्ये झालेली दुरुस्ती भारतीय राज्यघटनेच्या कलम १४ शी विसंगत असल्याने हा कायदा सर्वोच्च न्यायालयात न टिकण्यासाठी कायदेशीर लढाई लढण्यासऐवजी माता, भगिनींना रस्त्यावर ठाण मांडून बसविले जात आहे. हे कशामुळे होत आहे, तर आपण आपल्या धार्मिक मूलभूत हक्क तर बजावतो आहोत, परंतु चिकित्सक (spirit of enquiry) झाले नसल्याने होत आहे. सर्व नागरिकांचे नागरिकत्व कायम असू द्या या मागणीचा जोर कमी आणि बांगलादेश पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशातील मुस्लिमांनाही इतर धर्मीय प्रमाणेच भारतामध्ये नागरिकत्व मिळण्याची समान संधी देण्यात यावी याच मागणीला जास्त रेटण्यात येत असल्याचा आरोप वजा भावना हिंदुत्ववादी संघटना आणि पक्षांमध्ये निर्माण झाली आहे. भारतीय राज्यघटनेने दिलेले कलम २५ मधील धार्मिक स्वातंत्र्य (25. Freedom of conscience and free profession, practice and propagation of religion) आपण बिनधास्त आणि हक्काने वापरीत असतो. Freedom of conscience म्हणजेच विवेकाचे स्वातंत्र्य हे सुद्धा इतर धर्मांची शिकवण आपल्या धर्मापेक्षा विरोधाभासी आहे हे माहिती असूनही आपल्याच धर्माची शिकवण विवेकी असल्याचे दाखवत आणि कसलाही विचार न करता वापरतो. परंतु १० मूलभूत कर्तव्यातील किमान ५ कर्तव्य तरी पूर्णतः पाळतो का, हे कुणी छातीठोकपणे सांगेल का? असे सांगणारे खूप कमी असतील. अशा स्थितीत श्रीराम लागू यांनी देवाला रिटायर करण्याचे हे आवाहन केले होते, ते आवाहन सर्वांनी पूर्णत्वाला नेण्याची गरज आहे.
ता. क.- १० दिवसांपूर्वी अनिल खंदारे या मित्राच्या १३ वर्षीय मुलाचे डेंग्यूच्या आजाराने निधन झाले. मुलगा सुंदर आणि हुशार असल्याने सर्वांच्या मनाला चटका लागला. श्रद्धांजली झाल्यावर मसनवटयातून परत येत असताना, आजेगाव येथील काही जण बोलले. तुम्ही चांगले बोलले साहेब. एवढा चांगला मुलगा, कोणाचे कधी वाईट केले नाही, नुकसान नाही. कोणतेच पाप केले नाही. देवाला काही समजत नाही का हो...... अहो कशाचा देव न काय, काहीच नाही. सर्व आपल्या हातात असत साहेब. चांगला डॉक्टर असता तर मुलगा गेला नसता! हे शब्द ऐकून वाटले, देश बदल रहा है...)
...... लेखक हे मुक्त पत्रकार आणि Democrat MAHARASHTRA या (इंग्रजी-मराठी) ब्लॉगचे लेखक संपादक आहेत.
Tumblr media
1 note · View note