piknikdiaries-blog
Piknik Diaries..!!
3 posts
Don't wanna be here? Send us removal request.
piknikdiaries-blog · 7 years ago
Photo
Tumblr media
खडतर वाट.. किल्ले कोरलाई
0 notes
piknikdiaries-blog · 7 years ago
Photo
Tumblr media
0 notes
piknikdiaries-blog · 7 years ago
Text
कोकणकडा एक अविस्मरणीय थरार
कोकणकडा एक अविस्मरणीय थरार : with Prathamesh Parab Satish JadhavSatish Chavan Er Swapnil Gawde Lavesh Tambe Sagar Jadhav Ganesh Harke
सकाळी ६ च्या सुमारास मुंबईहून अहमदनगर च्या दिशेने निघायचं ठरलं आणि नेहमीसारखा उशीर झाला. मी, गणेश आणि प्रथमेश कालीमाता मंदिर भांडुप येथे गाडी ची वाट बघत बसलो होतो. नेहमी सतीश जाधव उशीर करायचा म्हणून बोंबा मारणारे आम्ही स्वतः गाडीसाठी वाट बघत होतो. अखेरीस साडेसहा च��या सुमारास गाडी आली आणि जास्त वेळ ना घालवता आम्ही पुढे निघालो. खाली भांडुप स्टेशन ला आधीच चव्हाण ,जाधव, लवेश आणि गावडे वाट बघत बसले होते. मागच्या अर्ध्या तासापासून त्यांना शेंडी लावत येतो येतो म्हणत होतो.
शेवटी त्यांना तिथून पीकअप केलं आणि नारळ फोडून पिकनिक चा श्री गणेशा केला.
वाटेत मुलुंड वरून सागर (माझा मावस भाऊ) आणि त्याचे दोन मित्र सुशांत आणि महेश सावंत यांना पिकअप केलं. गाडीत थोडीशी अडचण वाटायला लागली होती पण त्याची कल्पना सगळ्यांना आधी पासूनच होती. मग अड्जस्ट करून तिथून जे निघालो ते थेट खर्डी (कसारा च्या थोडं आधी) नाश्ता साठी थांबलो. नेहमी प्रमाणे गावडे चा उपवास होता, पण आम्हा सगळ्यांना नाश्ता करताना त्याच्याही मनात गुदगुदत असावं. नाश्ता करून झाल्यावर ठरवलं कि आता थेट भंडारदरा ला जायचं. उशीर तास एवढा झाला नव्हता पण जास्त पॉईंट्स जास्त असल्या कारणाने कुठेही वेळ वाया घालवायच्या विचारात नव्हतो आम्ही.
मग सुमारे ११ च्या आसपास भंडारदरा धरणाजवळ पोहोचलो. तिथे भंडारदरा धरण आणि त्या लगतच्या जंगलवाटेचा अनुभव घेत घेत आम्ही खाली आर्थर लेक जवळ पोहोचलो. वरून शुभ्र पाण्याचा प्रवाह पाहून त्यात उडी मारायचं मन करत होत. पण पोलिसांनी दक्षता म्हणून सगळीकडे कुंपणं लावलेली पाहून पावलं तिथेच थांबली. तरीही आमचे गावडे साहेब त्यातून मार्ग काढायच्या प्रयत्नात होते आणि काहीसा काढलाही. पुढे जाऊन मग हवे तसे फोटो काढले त्याने एकदाचे. निसर्गाच्या सानिध्यात लपलेला तो परिसर खूप च देखनीय आणि लोभनीय होता. ते सगळं डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवून आम्ही पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झालो.
पुढे जायचं होत रंधा फॉल ला. तिथून जेमतेम ८-१० कि.मी. च्या अंतरावर असलेला हा धबधबा बघायला आम्हाला खूप कसरत करावी लागली. गोल गोल रोड च्या चकरा मारून शेवटी पोहोचलो. तिथेही कसल्या तरी पुलाच काम चालू होत. त्यामुळे थोडी कसरत करावी लागली पण त्या धबधब्यासाठी परिपूर्ण होती. धबधबा तास मोठा आणि खूप खोल. आत जायची परवानगी कुणालाच नव्हती. जवळपास १७० फूट उंचीवरून डोंगरांच्या कुशीतून वाहणार ते धबधब्याचं पांढर शुभ्र पाणी अत्यंत लोभनीय दिसत होत. पाण्यात जाण्याची इच्छा भंडारदरा पासून अधुरी च होती. मग इथेच पूर्ण करायचा निर्धार आम्ही केला. धबधब्याच्या डाव्या बाजूने खडकांवरून पाणी वाहत होत. त्यात च आम्ही आमची इच्छा पूर्ण क���ली. सगळेच नाही उतरलो पाण्यात. मी, प्रथमेश, लवेश, स्वप्निल, जाधव ��णि चव्हाण आम्ही पाण्यात हवी तेवढी मजा केली. छोटंसं ते डबकं आमच्यासाठी स्विमिन्ग पूल च बनलं होत. सकाळपासून पाण्यात जायला तळमळणारे आम्ही त्यात तुटून पडलो. शेवटी पाण्यातून बाहेर यायची वेळ जेव्हा आली तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं कि कुणीच टॉवेल आणला नव्हता फक्त एकाला सोडून. तो होता आमचा लाडका प्रथमेश (लाडका यासाठी कारण तेव्हा एकच पर्याय होता आमच्याकडे). मग काय एकेकाने टॉवेल चा हवा तास वापर करून नीट घडी मारून आमच्या लाडक्या मित्राला सुपूर्त केला. खास करून गावडे ने त्याचा सर्वात जास्त आणि पुरेपूर वापर करून घेतला.
रंधा फॉल झाल्यावर पोटात खूप कावळे ओरडायला लागले होते. मग जेवायचे कुठे हा प्रश्न पडलेला कारण तिथे जवळपास जेवणाची काहीच सोया नव्हती. मग भंडारदरा ला पुन्हा जाण्याखेरीज काहीच पर्याय नव्हता. त्यात पण गोल गोल फिरून जाण्यात काहीच रस नव्हता. म्हणून रस्त्याची विचारपूस करून दुसऱ्या मार्गाने ४ वाजता भंडारदारा गाठलं. तिथे बघतो तर काय सगळी दुकानं बंद. काहीच कळेनासं झालं जसं. मग तिथे खूप चौकशी केल्यावर १-२ दुकान दिसली. त्यात हि जेवण काही नीट नव्हतं. मग थोडासा लाईट नाश्ता करायचं ठरवलं आणि पुढच्या प्रवासाला लागलो. तिथून पुढे जायचं होत अमृतेश्वर मंदिर ला. शंकराचं अप्रतिम निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे मंदिर. आजूबाजूचा परिसर अजून हि डोळ्यासमोर एक सुंदर स्वप्नासारखा उभा राहतो. दिवसाचा शेवटचा पॉईंट राहिला होता आता कोकणकडा. घड्याळात ५ वाजलेले. सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली. ज्या कोकणकड्या ला जायचं होत तो होता डोंगराच्या वर टोकाला. धुक्यामुळे खालून डोंगर तर दिसत च नव्हता. ड्राइवर ला कुणीतरी तिथून जाणाऱ्या लोकांनी सांगितलं कि वर खूप धुके आहे. तरीही आम्ही वर जायचा हट्ट आणि खूप प्रयत्नानंतर तो तयार झाला. वर जाताना एवढं काही धुकं वाटलं नाही. डोंगर चढून एकदम शेवटच्या टोकाला गाडी थांबवली आणि उतरून जे पळत सुटलो ते फक्त त्या नयनरम्य कोकणकड्या साठी .
खरंच अप्रतिम, सुंदर आणि कुणालाही मोहात टाकणारं ते वातावरण. सोबत थंड वाऱ्याची झुळूक आणि धुकं. निसर्गाचा असा अनुभव किमान महाराष्ट्रात तरी मी आजवर घेतला नव्हता. कोकणकड्यावरून दर्शन होत ते महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई च. धुकं जास्त असल्यामुळे स्पष्ट काही दिसलं नाही तरीही जे पाहिलं ते अप्रतिम होत. कळसुबाई सोबत दर्शन होत ते सह्याद्री च्या पर्वतरांगांची आणि त्यात वसलेल्या भंडारदरा धरणाच. असं म्हण���ात कि कोकण पट्टा इथून च चालू होतो म्हणून ह्याला कोकणकडा नाव पडलं. तिथून निघायची इच्छा तर बिलकुल नव्हती पण घड्याळाकडे लक्ष देत तिथून कसाबसा पाय काढला.
परतीचा प्रवास करायचा होता तो नाशिक ला मुक्कामासाठी. येताना चा रस्ता थोडा अवघड वाटला म्हणून दुसऱ्या रस्त्याने जायचं ठरलं पण रस्ता माहित नव्हता. मग गूगल मॅप च्या साहाय्याने रस्ता गाठला. खर तर रस्त्याला च लागलो चांगलच. झालं असं कि येताना चा रस्ता नक्की कुठे बाहेर पडतो हे माहित नव्हतं आणि त्यात खूप जास्त प्रमाणात धुके होते. हळू हळू ड्राइवर ने गाडी चालवायला सुरुवात केली. मी आणि सतीश पुढे बसलेलो. मागे सगळे जवळपास स्वप्नात रंगलेले. गाडी चालवताना पुढेच काहीच दिसत नव्हतं तरीही ड्राइवर त्याच्या अंदाजाने जमेल तशी सुरक्षित चालवत होता . तेवढ्यात अचानक एक वळण असं आलं कि समोर अगदी ५-१० फुटावर रस्ता संपला होता आणि खूप शार्प टर्न होता. माझ्या आणि सतीश च्या तर त्या क्षणी . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . (समजून जा काय झालं असेल ते).
त्यातून त्या भल्या ड्राइवर ने आम्हाला खरंच वाचवलं नाहीतर जवळजवळ गेलोच होतो खाली. डोंगर उतरून खाली तळाला पोहोचल्यावर जीवात जीव आला.
त्यातच संध्याकाळचे ६ वाजले होते. मी आणि सतीश जाधव पुढचा प्लॅन बघत होतो. भंडारदरा सोडून २-३ कि.मी. होत नाही तोवर अजून एक चॅलेंज आमच्या समोर येऊन उभं ठाकलं. ड्राइवर आमच्याकडे पाहून बोलला कि डिझेल संपायला आलय गाडीतल. जास्तीत जास्त १० कि.मी. जाईल गाडी ती पण रिझर्व्ह वर. बस मग आम्ही दोघांनी कपाळाला एकाच वेळी हात ठोकला. भंडारदरा सोडून जास्त वेळ झाला नव्हता आणि अजून नाही म्हटलं तरी १२०-१३० कि.मी. चा प्रवास करून नाशिक गाठायचं होत. आता काय करायचं ? तेवढ्यात माझ्या डोक्यात ट्यूब पेटली आणि मी सागर कडे पाहिलं. त्याला हि समजलं कि मला काय बोलायचय. क्षणाचाही विलंब न घालवता त्याने मान हलवली आणि नकार दिला. विषय डोक्यात आलेला तो सागर च्या सासुरवाडीचा म्हणजे राजूर गावाचा. राजूर तिथून लगबग ५-१० कि.मी. च्या अंतरावर होत. पण साहेब बायको ला न सांगता आलेले पिकनिक ला. त्यात बायको माहेरी गेलेली आणि त्याला बोलावलं होत तिकडे. मग तर काहीही करून तिकडे जाण्याचा प्रश्न च येत नाही. मग काय मोठा लाफ्टर घेत तो पर्यात तिथे च रद्द केला. तेवढ्यात तिथुन जाणाऱ्या २ गावकऱ्यानी आम्हाला गाडी बाहेर उभे पाहिलं आणि आमची विचारपूस केली. त्यांना आम्ही सर्व कथा सांगितली मग जाऊन त्यांनी पर्याय सुचवले. एक त��� तिथून घोटी ला जायचं जे कि होत ४० किमी. कारण तिथे पेट्रोलपम्प ची सोय होती किंवा राजूर पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल भरायचं. पुन्हा आम्ही सगळ��यांनी सागर कडे पाहिलं आणि पुन्हा हसायला लागलो. कारण तो पर्याय आधीच सोडून दिलेला.
घोटी काही गाठण्यासारखी नव्हती आणि राजूर ला जाऊ शकत नव्हतो. नैराश्याने एकमेकांशी बोलत असताना त्या काका नि आम्हाला अजून एक मार्ग सांगितला. तिथून थोड्याच अंतरावर एक माणूस होता जो की ब्लॅक मध्ये डिझेल द्यायचा. मग काय आम्ही लगेच तिकडे धूम ठोकली. पाहिलं त्या माणसाला गाठलं. कशीबशी घोटीत जाई पर्यंत च डिझेल दे म्हणून विनवणी करून त्याच्या कडून डिझेल घेतलं. पैसे जास्त गेले पण त्या समस्येतून बाहेर पडलो. ह्या सगळ्यात १ तास वाया गेला. तिथून निघायला च आम्हाला साडेसात वाजले. मग हळू हळू घोटीत पोहोचलो. घोटीच्या पेट्रोलपम्पावर आम्ही सगळे उतरून त्याला हवं तेवढं डिझेल भरून घेण्याची अपेक्षा व्यक्त केली. त्याने सुद्धा हसत हसत लागेल त्या पेक्षा जास्त च डिझेल भरलं. मग काय तिथून जे निघालो ते थेट रात्री ११ च्या सुमारास नाशिक च्या पंचवटी च हॉटेल गाठलं. हॉटेल च बुकिंग आधीपासून च करून ठेवलं होत म्हणून तेवढं तरी निश्चिन्त होतो. खूप भूक लागलेली होती. म्हणून सगळ्यांनी १५ मिनिटांत फ्रेश होऊन जेवायला जायला हॉटेलखाली जमायचं ठरलं. भूक लागल्यामुळे कुणी लेट नाही केलं आणि लगेच आले. त्यात प्रथमेश ने पुन्हा गोंधळ घातला. त्याच्या अचानक पोटात दुखायला लागलंय. दिवसभराच्या धावपळीमुळे मळमळत पण होत. त्याला झोपवून आम्ही बाकीचे जेवायच्या भटकंतीसाठी गेलो. रात्रीचे ११.३० झालेले. सगळे हॉटेल्स बंद झालेले. नशिबाने एक पंजाबी हॉटेल दिसलं. वेळ न घालवता आम्ही हॉटेलात घुसलो. सुरुवातीलाच बोर्ड वर अनलिमिटेड थाळी चा रेट लावलेला १०० रुपये. ते पाहून अजून आनंद झाला. दिवसभराच्या भुकेनंतर पोटभर जेवण्याची मज्जा च वेगळी असते. जेवता जेवता सतीश ला किमान १० वेळा तरी मी विचारलं असेल कि नक्की हि थाळी १०० रु. ची च असेल ना ?? पण भूक एवढी लागली होती कि ती गोष्ट सोडून आम्ही सगळे मनसोक्त जेवत होतो. जाताना प्रथमेश साठी जूस घेतला कारण त्याने दिवसभर काहीच खाल्ले नव्हते. रात्रीचा तो हॉटेल पर्यंत जाताना चा राऊंड खूप च आल्हाददायी होता. हॉटेल वर पोहोचून सकाळी कितीला उठायचे यावर चर्चा करण्यापेक्षा सगळ्यांना बेड वर जाणे बार वाटलं. मग जे झोपलो ते सकाळी उठायचा काही विचार डोक्यात ना ठेवता.
दुसऱ्या दिवशी नाशिक चे लोकल पॉईंट्स करून आम्ही मुंबई च्या दिशेने कूच केली. अशी अविस्मरणीय पिकनिक मला वाटत आमच्यातल्या एकालाही विसरणं शक्य नसावं. कारण असा थरारक दिवस आयुष्यात रोज च येत नाही पण जेव्हा त्या दिवसाची आठवाण येते तेव्हा त्या आठवणींना उजाळा येतो आणि ��सू पण येत कि आपण हे अनुभवलं आहे. पुन्हा जायची संधी आणि योग्य जुळून आला तर नक्कीच जाऊ आम्ही आणि मला नाही वाटत कुणी नाही बोलेल ह्या साठी…..!!
0 notes