Don't wanna be here? Send us removal request.
Text
Very useful
41. आंतरिक प्रवासासाठी सुसंगत बुद्धिमत्ता
योग म्हणजे आपल्या आतील आणि बाह्य भागांचे मिलन. कर्म योग’, ‘भक्ती योग’, ‘सांख्य योग’, ‘बुद्धी योग’ अशा अनेक मार्गांनी हे साध्य करता येते. एखादी व्यक्ती त्याच्या स्वभावाच्या आधारे त्याला योग्य मार्गांनी योग साधू शकते.
श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, “या समत्वरूप बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म अत्यंत तुच्छ आहे, म्हणून तू समबुद्धीतच रक्षणाचा उपाय शोध म्हणजे बुद्धियोगाचाच आश्रय घे, कारण फळाची इच्छा बाळगणारे अत्यन्त दीन होते” (2.49). त्यापूर्वी श्रीकृष्ण म्हणतो की, “या कर्मयोगात निश्चयात्म बुद्धी एकच असते. परन्तु अस्थिर विचार असणार्या माणसांच्या बुद्धी पुष्कळ फाटे फुटलेल्या असतात” (2.41).
एकदा बुद्धीला सुसंगतता प्राप्त झाली की (जसे भिंग प्रकाशाला केंद्रीकृत करतो) की मग ती कोणत्याही बौद्धिक प्रवासासाठी तयार होते. अंतरात्म्याकडे होणार्या प्रवासासहित कोणत्याही प्रवासात दिशा आणि हालचाल अंतर्भूत असते. प्रवासाचि दिशा अंतरात्म्याकडे असणे याला श्रीकृष्ण बुद्धीयोगाशी जोडतो. सामान्यत: आपण सुंसगत बुद्धिमत्तेचा वापर बाह्य जगातील इच्छा पूर्ण करण्यासाठी करतो, मात्र आपण ती आपल्या आतल्या प्रवासासाठी वापरली पाहिजे.
आपण आपल्या खोलवर रुजलेल्या श्रद्धा, भावना, गृहितकं, विचार, कृती आणि आपण बोलतो ते शब्द अशा सगळ्यांवर प्रश्नचिन्ह उमटवायला लागतो तेव्हा आपण आतल्या प्रवासासाठीच्या सुसंगत बुद्धिमत्तेचा वापर करायला लागतो. ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी विज्ञान जसे प्रश्न विचारते, तशाच प्रकारे प्रश्न विचारून आपण अंतिम सत्य उलगडून घेऊ शकतो.
ज्यांचा हेतू हा कर्मफल प्राप्त करण्याचा असतो ते दुर्दैवीअसतात असे श्रीकृष्ण म्हणतो. कर्मफलामुळे सुखप्राप्ती होते म्हणून आपल्यात अशी वृत्ती निर्माण होते. मात्र, द्वंद्वांनी भरलेल्या जगात काळाच्या ओघात प्रत्येक सुख हे दु:खात रुपांतरित होते आणि त्यातून आपले दु:ख आणखी वाढते.
श्रीकृष्ण कुठेही आपल्याला द्वंद्वांपासून वाचविण्याचे आश्वासन देत नाही मात्र आत्मवान होण्यासाठी त्या द्वंद्वांना पार करून जाण्यास आणि त्यासाठी बुद्धी वापरण्यास तो सांगतो. हे ना समजून घेणे आहे ना करणे आहे, हे फक्त ‘असणे’ आहे.
3 notes
·
View notes
Link
16 notes
·
View notes
Link
6 notes
·
View notes