#निर्णयांबद्दल
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
खासगी आयुष्यातील निर्णयांबद्दल सांगताना मलायकाला अश्रू अनावर; म्हणाली, “माझा निर्णय योग्य होता…’
खासगी आयुष्यातील निर्णयांबद्दल सांगताना मलायकाला अश्रू अनावर; म्हणाली, “माझा निर्णय योग्य होता…’
खासगी आयुष्यातील निर्णयांबद्दल सांगताना मलायकाला अश्रू अनावर; म्हणाली, “माझा निर्णय योग्य होता…’ मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही फॅशन आणि स्टाईलची आयकॉन मानली जाते. 49 वर्षांची असूनही मलायकाने स्वतःला खूपच फिट ठेवले आहे. मलायका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते त्यामुळे दिवसेंदिवस तिचे फॅन्स देखील वाढत चालले आहेत. अभिनेत्री नेहमीच आपल्या इंस्टाग्रामवर स्वतःचे बोल्ड आणि मादक फोटो शेअर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 12 November 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १२ नोव्हेंबर २०२० सकाळी ७.१० मि ****
·      उत्पादन आणि निर्यातीत वाढ करण्यासाठी दहा क्षेत्रांना उत्पादन आधारित लाभ लागू करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता.
·      कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रानं घेतलेल्या निर्णयांबद्दल, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडून राज्याची प्रशंसा.
·      पत्रकार अर्णव गोस्वामी तसंच अन्य दोघांना अंतरिम जामीन मंजूर.
·      राज्यात आणखी चार हजार ९०७ तर मराठवाड्यात ४३९ नवीन कोविड बाधितांची रुग्णांची नोंद.
आणि
·      माता पित्यांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातील ३० टक्के वेतन माता पित्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा लातूर जिल्हा परिषदेचा निर्णय.
****
उत्पादन आणि निर्यातीत वाढ करण्यासाठी दहा क्षेत्रांना उत्पादन आधारित लाभ लागू करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या बैठकीनंतर, बातमीदारांना ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत पाच वर्षात जवळपास दोन लाख कोटी रुपये देण्यात येणार आहेत. अडचणीत सापडलेल्या वाहनांचे सुटे भाग आणि वाहन उद्योगाला ५७ हजार कोटी रुपयांचे लाभ देण्यात येणार आहेत. याशिवाय रसायने, औषध निर्मिती, खाद्यपदार्थ निर्मिती, दूरसंचार आणि नेटवर्किंग उत्पादनं, या उद्योगांना केंद्र सरकार मदत करणार आहे. या योजनेनुसार केंद्र सरकार संबंधित उद्योगांना अतिरिक्त उत्पादन करण्यास प्रोत्साहन, तसंच स्वदेशी उत्पादन निर्यात करण्यासाठी परवानगी देणार आहे. यामुळे उत्पादन आणि निर्यातीबरोबरच देशात रोजगाराच्या संधी��ी वाढणार आहेत. भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ - फिक्कीनं या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
****
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रानं घेतलेल्या निर्णयांबद्दल, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी राज्याची प्रशंसा केली आहे. देशातल्या विविध राज्यांनी केलेल्या कोरोना उपाययोजनांचा आढावा काल केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दूरदृष्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून घेतला. कोरोना नियंत्रणासाठी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून चाचण्यांचे दर कमी करणं, एचआरसीटी चाचण्यांच्या दरांवर नियंत्रण, प्लाझ्माच्या दरावर तसंच मास्कच्या दरांवर नियंत्रण, खासगी रुग्णालयातल्या ८० टक्के खाटा राखीव ठेवणं, महात्मा फुले जनआरोग्य योजना सर्व नागरिकांना लागू करणं, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबवणं, यांसारखे चांगले आणि अभिनव निर्णय महाराष्ट्रानं घेतले आहेत, जे अन्य राज्यांसाठी उपयुक्त ठरतील, असं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्��्यांनी महाराष्ट्रासह सात राज्यांचा आढावा घेतला.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर दिवाळीच्या शुभेच्छा देताना सणाचा जरूर आनंद घ्या, पण आरोग्याच्या जबाबदारीचं भान ठेवा असं आवाहन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. आपण स्वत: देखील केवळ सामाजिक संपर्क माध्यमं, ईमेलद्वारे शुभेच्छा स्वीकारणार असून भेटीगाठी न करता अतिशय सुरक्षितपणे, घरच्याघरी हा सण साजरा करणार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं. गेल्या सात- आठ महिन्यांत आपण सर्व धर्मियांचे सण, उत्सव अतिशय सावधपणे आणि नियमांचं पालन करून साजरे केले आहेत. आपण जो संयम पाळला आहे त्याचाच परिणाम म्हणून आपण या महामारीला इतक्या महिन्यांनंतरही रोखून धरण्यात यशस्वी झालो असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
****
आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले पत्रकार अर्णव गोस्वामी तसंच अन्य दोघांना सर्वोच्च न्यायालयानं काल अंतरिम जामीन मंजूर केला. प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. त्यांची जामीन याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर काही तासांतच त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. दरम्यान, अलिबाग इथं न्यायालयीन कोठडीत असताना अर्णब गोस्वामी यांना मोबाईल पुरवणाऱ्या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. हे कर्मचारी कैद्यांना मोबाईल पुरवत असल्याचं समोर आल्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.
****
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं कोरोना विषाणू संसर्गा विषयी जनजागृती मोहीम सुरु केली आहे. औरंगाबादचे विभागीय वन अधिकारी विजय सातपुते यांनी या प्रादुर्भावाला रोखण्या��ाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.  
****
केंद्र सरकारनं डिजिटल आणि सर्व ‘ऑनलाईन’ माध्यमं, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत आणण्याचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये सर्व प्रकारचे ‘ऑनलाईन’ चित्रपट, दृक श्राव्य कार्यक्रम, बातम्या आणि चालू घडामोडींवर आधारीत कार्यक्रमांचा समावेश आहे. सध्या ‘नेटफ्लिक्स’, ‘हॉटस्टार’, ‘प्राईम व्हिडिओ’, यासारख्या वाहिन्या आणि विविध प्रकारचे ‘ऑनलाईन’ वृत्त देणारे `पोर्टल` कार्यरत आहेत. या सर्व वाहिन्या यापूर्वी कोणत्याही कायदा किंवा स्वायत्त संस्थेअंतर्गत येत नव्हत्या.
****
रेमन मॅगसेसे पुरस्कार विजेते ‘पाणीवाले बाबा’ राजेंद्रसिंह राणा यांच्या तरुण भारत संघ संस्थेच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या ‘पर्यावरण संरक्षण सन्मान २०२०’ या पुरस्कारासाठी, राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांची निवड करण्यात आली आहे. येत्या २५ तारखेला राजस्थानातल्या भीकमपुरा इथल्या तरुण आश्रमात पाशा पटेल यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. हा पुरस्कार घोषित झाल्यानंतर आपलं मनोगत व्यक्त करताना पाशा पटेल म्हणाले –
मला पर्यावरण संरक्षणाचा पुरस्कार प्राप्त झाला, त्याच्या मागची एकच गोष्ट आहे की, पृथ्वीवरची झाडांची संख्या कमी झालेली आहे, ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. गेल्या दोन-तीन वर्षापासून या क्षेत्रामधे मी प्रचंड वाहून घेतलेलं आहे. मी टीश्यूकल्चर लॅब काढली, फक्त बांबुची लागवड करण्यासाठी. आणि गोदावरी आणि मांजरा या दोन नद्यांच्या खोऱ्यामधे बावीसशे पंचवीस किलोमीटर लांबी आहे. या नद्यांच्या कडेला आणि शेतकऱ्यांच्या बांधावर आणि शेतकऱ्याच्या शेतामधे मला बांबुची लागवड करून पर्यावरण रक्षणाचं काम करायचं आहे. या कामामधे मी झपाटल्यामुळे मला हा पुरस्कार मिळालेला आहे.
****
अंबाजोगाई इथल्या मानवलोक संस्थेचे कार्यवाह तथा सामाजिक कार्यकर्ते अनिकेत लोहिया यांना भारत सरकारच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या ‘जल योद्धा’ या राष्ट्रीय पुरस्कारानं काल सन्मानित करण्यात आलं. पश्चिम विभागातल्या जल संधारणाच्या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला. दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमात जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते अनिकेत लोहिया यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
****
अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना शासनाची कोणतीही मदत पोहचली नसल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उद्या शुक्रवारी चुन भाकर आंदोलन करणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्र���ांत पाटील आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ��ोणार्या या आंदोलनात भाजप आणि किसान मोर्चा, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे देतील, चुन भाकर खातील आणि तहसीलदार तसंच जिल्हाधिकारी यांनाही चुन भाकर खायला देतील. शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई आणि कर्जमाफी द्यावी, किसान क्रेडीट कार्डची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी, रासायनिक खते तसंच बियाणांचा रास्त दरात पुरवठा करावा यांसह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन असणार आहे.
****
दिवाळीच्या सणाला आजपासून वसुबारसेनं सुरुवात होत आहे. यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी गोधनाची पूजा केली जाते.
****
राज्यात काल आणखी चार हजार ९०७ कोविड बाधितांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या सतरा लाख ३१ हजार ८३३ झाली आहे. काल १२५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत ४५ हजार ५६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल नऊ हजार १६४ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत पंधरा लाख ९७ हजार २५५ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या ८८ हजार ७० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  
रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९२ पूर्णांक २३ शतांश टक्के तर मृत्यू दर दोन पूर्णांक ६३ शतांश टक्के असल्याची माहितीही आरोग्य विभागानं दिली आहे.
****
मराठवाड्यात काल आठ कोविडबाधितांचा मृत्यू झाला, तर नव्या ४३९ रुग्णांची नोंद झाली.
बीड जिल्ह्यात चार रुग्णांचा मृत्यू झाला, तर आणखी ११९ रुग्ण आढळून आले. औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात नव्या १२६, जालना ५८, उस्मानाबाद ३०, तर नांदेड जिल्ह्यात नव्या २८ रुग्णांची भर पडली. लातूर जिल्ह्यात ६४, परभणी जिल्ह्यात १८, तर हिंगोली जिल्ह्यात काल केवळ दोन नव्या रुग्णांची नोंद झाली.
****
मुंबईत काल आणखी एक हजार ६९ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर २२ जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात ५७३ नवे रुग्ण, तर १६ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात ४४१ रुग्ण आढळले, तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला. अहमदनगर जिल्ह्यात २४३, सोलापूर २०२, सातारा २०१, गोंदिया १०५, गडचिरोली आणि पालघर जिल्ह्यात प्रत्येकी ५८, यवतमाळ ५३, बुलडाणा ४९, सांगली ४१, जळगाव ३७, वाशिम ३३, धुळे २५, नंदुरबार २२, रत्नागिरी १२, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्या ११ रुग्णांची नोंद झाली.
****
माता-पित्यांचा सांभाळ न करणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वेतनातील ३० टक्के वेतन माता पित्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय लातूर जिल्हा परिषदेनं घेतला आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभे��� काल हा निर्णय घेण्यात आला.
****
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवड���ुकीत काल १४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शिरीष बोराळकर, वंचित बहुजन आघाडीचे नागोराव पांचाळ, रिपब्लिकन सेनेचे अतुल कांबळे, प्रहार जनशक्तीचे सचिन ढवळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तसंच ईश्वर मुंडे, संजय तायडे, सिद्धेश्वर मुंडे, कृष्णा डोईफोडे, विलास जगदाळे, रोहीत बोरकर, आशिष देशमुख, दिलीप घुगे, रमेश पोकळे, रमेश कदम यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले. आतापर्यंत एकूण २५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
****
कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी मास्क वापरणं, वारंवार हात धुणं आणि एकमेकांत सुरक्षित अंतर राखण्याचं आवाहन लातूरच्या विवेकानंद रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक राधेश्याम कुलकर्णी यांनी केलं आहे.
****
राज्यात सध्या पक्षी सप्ताह साजरा केला जात असून या निमित्त औरंगाबाद जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात येत असल्याची माहिती विभागीय वन अधिकारी विजय सातपुते यांनी दिली. याअंतर्गत जायकवाडी पक्षी अभयारण्याचा अभ्यास केला असता, इथं एकूण १९० प्रकारच्या पक्षी प्रजाती आढळून आल्या आहेत. त्यामध्ये ११० प्रजाती या पाणपक्षी आणि ८० प्रजाती या झुडुपांवरील असल्याचं त्यांनी सांगितलं. यात १२० स्थानिक पक्षी आहेत तर ७० पक्षी हे उत्तर भारत, तिबेट, युरोप, नेपाळ, चीन, रशिया आणि सायबेरीया इथले असल्याची माहितीही, त्यांनी दिली.
****
हिंगोली जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. विविध उपाय योजना राबवून जिल्ह्यात या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात जिल्हा प्रशासनाला यश आलं आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर –
हिंगोली जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तब्बल ९६ पूर्णांक ५२ टक्के एवढे आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर केवळ एक पूर्णांक सहा टक्के आहे. जिल्ह्यात बाधीत रुग्णांची संख्या गेल्या आठवडाभरापासून १०० पेक्षा कमी झाली आहे. आज तर केवळ दोनच रुग्ण जिल्ह्यात आढळले असून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या केवळ ८५ झाली आहे. विविध उपाययोजना राबवून जिल्ह्यात कोरोना रोगावर नियंत्रण मिळवण्यात जिल्हा प्रशासनाला यश मिळाले आहे. अनेक भागांमधे कोरोनाचे रुग्ण आढळले नसल्याने नागरिकांनीही आता सुटकेचा श्वास सोडला आहे.
आकाशवाणी बातम्यांसाठी, रमेश कदम, हिंगोली.
****
नांदेड जिल्हा परिषदेतल्या सर्व संवर्गातल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशीच सर्व लाभ देण्यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठी जिल्हा परिषदेत पेन्शन कक्षाची स्वतंत्र स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुच्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे. राज्य शासकीय निमशासकीय ��णि जिल्हा परिषद वाहन चालक कर्मचारी संघटनेच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांचं निवेदन काल मुख्य कार्यकारी अधिका��्यांना देण्यात आलं, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
****
लातूर जिल्ह्यात दिवाळी उत्सवानिमित्त जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. यावर्षीची दिवाळी साध्या घरगुती स्वरुपात साध्या पद्धतीनं साजरी करत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं, फटाके फोडण्याचं टाळून दिव्यांची आरास करुन उत्सव साजरा करावा, या उत्सवा दरम्यान सार्वजनिक उपक्रमांचं आयोजन केल्यास त्याचं ऑनलाईन सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे प्रसारण करावं असं या संदर्भातल्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 6 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date - 1 August 2018 Time - 18.00 to 18.05 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १ ऑगस्ट २०१८ सायंकाळी ��.०० ****
अनुसूचित जातीजमातींच्या हिताच्या दृष्टीनं सरकार विधेयक आणणार असल्याची माहिती, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज दिली. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आजच्या निर्णयांबद्दल पत्रकारांना ते माहिती देत होते. देशात तेरा नवीन केंद्रीय विद्यालयं उघडणार असल्याचं, तसंच ‘स्वच्छ भारत योजने’साठी वाढीव आर्थिक तरतूद करणार असल्याचंही प्रसाद यांनी यावेळी सांगितलं.
****
चालू आर्थिक वर्षातलं तिसरं द्वैमासिक पतधोरण आज जाहीर करताना भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात वाढ केल्यानं आता हा दर सहा पूर्णांक पाच दशांश टक्के इतका झाला आहे. परिणामी रिव्हर्स रेपो दर आता सहा पूर्णांक पंचवीस शतांश टक्के इतका झाला आहे. या आर्थिक वर्षात सकल घरगुती उत्पादनाचा वृद्धी दर सात पूर्णांक चार दशांश टक्के तर महागाईचा दर चार पूर्णांक आठ दशांश टक्के राहण्याचा आपला अंदाज बँकेनं कायम ठेवला आहे. बँकेच्या पतधोरण समितीची पुढची बैठक येत्या तीन ते पाच ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.
****
राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिकेच्या मुद्यावरून विरोधी पक्षांनी केलेल्या गोंधळामुळे आज राज्यसभेचं काम दुपारनंतर दिवसभरासाठी स्थगित करावं लागलं. पंतप्रधानांनी या मुद्यावर उत्तर द्यावं, अशी मागणी करणाऱ्या घोषणा देत तृणमूल काँग्रेस पक्षाचे सदस्य हौद्यात उतरल्यानंतर सभापती एम.व्यंकय्या नायडू यांनी कामकाज स्थगित केलं. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसनं संसदेत लोकशाहीची हत्या केली असून, आम्ही विरोधी पक्षांच्या या वागण्याची निंदा करतो, असं केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. राज्यसभेचं कामकाज स्थगित करावं लागल्याच्या पार्श्वभूमीवर ते वार्ताहरांशी बोलत होते. विरोधी पक्ष या मुद्यावर सदनात चर्चा होऊ देत नसून, घुसखोरांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप जावडेकर यांनी यावेळी केला.
****
मराठा आरक्षणासंदर्भातल्या कायदेशीर बाबींची पूर्तता न करता घाईनं आरक्षणाचा निर्णय घेणं म्हणजे दीर्घकालीन न्यायालयीन लढ्याला सामोरं जाणं, असा अर्थ असून, सरकार अशा पद्धतीनं आंदोलकांना फसवू इच्छित नाही, असं राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज स्पष्ट केलं. ते मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत होते. सरकार याब���बतीत प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याचं आंदोलकांच्या लक्षात यायला हवं, आणि या प्रयत्नांमध्ये, आंदोलन सुरू ठेवून अडथळे आणू नयेत, असंही मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी आज मराठा क्रांती मोर्��ाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत ‘जेल भरो’ आंदोलन केलं. या आंदोलनामुळे मुंबईतल्या रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला नसल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं. राज्याचे कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या लातूर इथल्या निवासस्थानासमोरही आंदोलकांनी निदर्शनं केली. सोलापूर इथं या आंदोलकांनी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. पुणे जिल्ह्यात जुन्नर, शिरूर आणि खेड तालुक्यांमध्ये निषेध मोर्चे काढण्यात आले. हिंगोली जिल्ह्यामध्ये सापटगाव इथं सकल मराठा समाजाच्यावतीनं बैलगाडी मोर्चा काढण्यात आला, तर भानखेडा, कवठापाटी, खैरखेडा इथं राज्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
मराठा आरक्षणाबाबत कोणत्याही पक्षानं आतापर्यंत काहीही कार्यवाही न केल्यानं मराठा समाजानं स्वतंत्र राजकीय पक्ष काढावा, असं मत शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज जालना इथं आंदोलकांशी चर्चा करतांना व्यक्त केलं.
****
राज्यातल्या आरोग्य सुविधांचा आढावा घ्यावा आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांकडे असलेल्या औषध खरेदीच्या मर्यादा वाढवाव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मंत्रालयात आरोग्य विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्यांनी हे निर्णय घेतले. ग्रामीण आणि दुर्गम भागातल्या आरोग्य केंद्रांमध्ये पावसाळ्याच्या काळात औषधांची कमतरता भासू नये यासाठी, तसंच जिल्ह्यांमध्ये असलेल्या आरोग्य सुविधांचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीनं हे निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर, लोहा, नांदेड आणि नायगाव तालुक्यांसह अन्य काही भागात, तसंच हिंगोली शहर आणि परिसरात आज दुपारी मुसळधार पाऊस झाला. या पावसानं खरीप पिकांना जीवदान मिळालं आहे. काल संध्याकाळी अर्धापूर आणि नांदेड तालुक्यात पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज हवामानखात्यानं वर्तवला आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 7 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 14 March 2018 Time 6.50 AM to 7.00 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १४  मार्च २०१८ सकाळी ६.५० मि.
 विविध शासकीय सेवांना आधार क्रमांकाशी जोडण्याला मुदतवाढ  भारतीय स्टेट बॅंकेच्या किमान शिलकीसाठीच्या दंडात ७० टक्के कपात  अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा अधिक कठोर करण्याचे सरकारचे संकेत आणि  औरंगाबाद इथल्या कचरा व्यवस्थापनासाठी आराखडा करून, आवश्यक निधी देणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा **** विविध शासकीय सेवांना आधार क्रमांकाशी जोडण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. विविध सेवांचं आधार क्रमांकाशी संलंग्नीकरण करण्याची मुदत ३१ मार्चला संपत होती, ही मुदत आता यासंदर्भात घटनापीठाचा पुढचा निर्णय येईपर्यंत न्यायालयानं वाढवली आहे. बँक खाते तसंच मोबाईल सेवांच्या आधार संलग्नीकरणालाही ही मुदतवाढ लागू असेल. फक्त थेट लाभ हस्तांतरण योजनांसाठी आधार क्रमांक आवश्यक असल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहे. दरम्यान, बँकेत नवीन खातं उघडण्यासाठी तसंच पारपत्रासाठी आधार क्रमांक बंधनकारक असेल, असं आधार प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे. **** भारतीय स्टेट बॅंकेनं बचत खात्यात मिनिमम बॅलन्स - किमान शिलक न ठेवण्यासाठीच्या दंडात ७० टक्के कपातीचा निर्णय घेतला आहे. याबाबत बँकेनं काल पत्रक जारी केलं, त्यानुसार महानगरं आणि मोठ्या शहरात ५० रुपयांऐवजी दरमहा फक्त १५ रुपये दंड आणि वस्तू आणि सेवा कर आकारला जाईल, तर लहान शहरांमध्ये दरमहा ४० रुपयांऐवजी १२ रुपये दंड आणि वस्तू सेवा कर आकारला जाणार आहे. येत्या एक एप्रिलपासून या नवीन नियमाची अंमलबजावणी होणार आहे. दरम्यान, भारतीय रिजर्व्ह बँकेनं, व्यापारामध्ये आयातीसाठी, लेटर ऑफ अंडरटेकिंग आणि लेटर ऑफ कम्फर्ट यांचा वापर ताबडतोब बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. पंजाब नॅशनल बँकेत, याच पत्रांच्या माध्यमातून सुमारे १३ हजार कोटी रुपयांचा घोटाऴा समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. **** छत्तीसगढमधल्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दल - सीआरपीएफच्या पथकावर केलेल्या हल्ल्यात नऊ जवान हुतात्मा झाले. सुकमा जिल्ह्यातल्या किश्ताराम भागातल्या जवळपास शंभर नक्षलवाद्यांनी पोलिसांचं वाहन भुसुरुंगाचा स्फोट करून उडवून देत, अंधाधुंद गोळीबार केल्याचं वृत्त आहे. **** भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी सरकार नऊ कोटी ४५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानपरिषदेत सांगितलं. याप्रकरणी दाखल असलेले गुन्हे मागे घेतले जाणार आहेत, मात्र गंभीर खटल्यांबाबत सरकारची समिती निर्णय घेईल, आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून नोकरीच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत सांगितलं. विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. राज्यात २००१ ते २००९ पर्यंत कृषी कर्ज थकीत असलेल्या खातेदारांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत लाभ देण्यात येईल, तसंच २०१६ आणि २०१७ मधल्या थकीत खातेदारांचा आढावा घेण्यात येऊन त्यांना दिलासा देण्यासाठी योग्य ती योजना तयार करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत केली. भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांबद्दल त्यांनी यावेळी माहिती दिली. **** अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा अधिक कठोर करण्याचे संकेत अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यां��ी काल विधानसभेत दिले. अन्नात भेसळ करणं हा अजामीनपात्र गुन्हा ठरवला जाईल, आणि त्यासाठी शिक्षेची तरतूद सहा महिन्यांवरून तीन वर्ष वाढवण्यात येणार असल्याचं बापट यांनी सांगितलं. दुधातली भेसळ रोखण्यासाठी कायद्यात बदल करण्यासंदर्भातल्या लक्षवेधीला ते उत्तर देत होते. सदस्य अमित साटम यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. **** राज्यातल्या अल्पसंख्याक तसंच मागासवर्गीय समाजातल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी शून्य किमान शिलकीवर बँक खाती उघडण्याच्या सूचना सगळ्या बँकांना देणार असल्याचं, अल्पसंख्याक आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधानपरिषदेत सांगितलं. वैद्यकीय, तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक समाजातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तसंच शिष्यवृत्तीचा कोटा वाढवून देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. ***** औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय - घाटीत आवश्यक यंत्रसामुग्री तसंच इमारत बांधकामासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असं वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी काल विधानपरिषदेत सांगितलं. घाटी मधली रिक्त पदं भरून, रुग्णालयाला निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात आमदार सतीश चव्हाण यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. **** वैजापूर आणि गंगापूर तालुक्याच्या वाट्याला मिळणारं हक्काचं पाणी नाशिकसाठी बिगर सिंचनाकरता आरक्षित केल्याचा मुद्दाही चव्हाण यांनी परिषदेत उपस्थित केला. बिगर सिंचन आरक्षणाची समप्रमाणात विभागणीची कार्यवाही, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या, कार्यकारी संचालकांकडून करण्यात येत असल्याचं जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितलं. **** औरंगाबाद इथला कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरविकास विभागाच्या सचिवांनी औरंगाबादला भेट देऊन पाहणी केली असून, या संदर्भात आराखडा तयार केला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. राज्य शासनाकडून यासाठी आवश्यक तेवढा निधी दिला जाणार असल्याचं ते म्हणाले. यासंदर्भात काल विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. मिटमिटा परिसरात कचरा टाकण्यास विरोध करणाऱ्या नागरिकांवर अन्याय पध्दतीनं गुन्हे दाखल झाल्याचा आरोप करत, विरोधकांनी, पोलिस आयुक्तांच्या बदलीची मागणी केली. यासंदर्भात वस्तुस्थिती जाणून सविस्तर निवेदन देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. दरम्यान, कचरा व्यवस्थापनासाठी औरंगाबादच्या नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी केलं आहे. काल शहरात कचरा वर्गीकरण प्रक्रियेची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. नागरिकांनी ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, असं ते म्हणाले. **** लातूर महापालिकेनं अम��त योजने अंतर्गत शहरातले हरित पट्टे विकसित करण्यासाठी केल��ले करार आणि दिलेले आदेश बेकायदेशीर असून, ते रद्द करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते मल्लीकार्जुन भाईकट्टी यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. यासंदर्भात जबाबदार अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांविरुध्द कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. **** महात्मा ज्योतीबा फुले यांचे विचार समजून घेणं सद्यस्थितीत आवश्यक असल्याचं, डॉ.प्रतिभा पाटील यांनी म्हटलं आहे. काल औरंगाबाद इथं दिल्लीच्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक राष्ट्रीय समिती आणि औरंगाबादच्या लक्ष्मी निर्मल प्रतिष्ठान यांच्या वतीनं काल औरंगाबाद इथं छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले जयंती महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांचा यावेळी विशेष नागरी सत्कार करण्यात आला. **** आरक्षणाचं वर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग आरक्षण संघर्ष समितीच्यावतीनं काल नांदेड जिल्हाकाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. अनुसूचित जाती वर्गीकरणाचा ठराव मंजूर करण्यासह इतर मागण्यांचं निवेदन यावेळी प्रशासनाला देण्यात आलं. **** डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातर्फे आयोजित त्रेचाळीसाव्या नाट्यमहोत्सावाला आजपासून सुरुवात आहे. २८ मार्चपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात १५ नाटकं सादर केली जाणार आहेत. **** निदाहास चषक टी-ट्वेंटी तिरंगी क्रिकेट मालिकेतला पाचवा सामना आज भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. कोलंबो इथं संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल, मालिकेत चार गुणांसह भारत, गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर आहे. *****
0 notes
airnews-arngbad · 7 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 13 March 2018 Time 17.25 to 17.30 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १३ मार्च २०१८ सायंकाळी ५.२५ मि. ****
सरकारच्या विविध सेवांना आधार क्रमांकाशी जोडण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं सुनावला आहे. विविध सेवा आधार क्रमांकाशी संलंग्नित करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च होती. फक्त थेट लाभ हस्तांतरणासाठी आधार आवश्यक असून, आधारच्या वैधतेबद्दल न्यायालय अंतिम निर्णय देईपर्यंत मुदत वाढवण्यात आल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. **** भारतीय स्टेट बॅंकेनं बचत खात्यात मिनिमम बॅलन्स - किमान शिलकीपेक्षा कमी रकमेसाठीचा दंड कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेनं आज जारी केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली. मेट्रो आणि मोठ्या शहरात कमी शिलकेवर ५० रुपयांऐवजी आता दरमहा फक्त १५ रुपये दंड आणि वस्तू आणि सेवा कर-जीएसटी, तर लहान शहरांमध्ये ४० रुपयांऐवजी १२ रुपये दंड आणि जीएसटी आकारला जाणार आहे. येत्या एक एप्रिलपासून या नवीन नियमाची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयामुळे देशभरातल्या २५ कोटी ग्राहकांना फायदा होणार आहे. **** छत्तीसगढमधल्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दल - सीआरपीएफच्या वाहनावर हल्ला केला. यात नऊ जवान हुतात्मा झाल्याचं वृत्��� आहे. सुकमा जिल्ह्यातल्या किश्ताराम भागातल्या जवळपास शंभर नक्षलवाद्यांनी हा हल्ला केल्याचं वृत्त आहे. **** राज्यात २००१ ते २००९ पर्यंत कृषी कर्ज थकीत असलेल्या खातेदारांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत लाभ देण्यात येईल, तसंच २०१६ आणि २०१७ मधले जे थकीत खातेदार आहेत, त्यांचा आढावा घेण्यात येऊन त्यांना दिलासा देण्यासाठी योग्य ती योजना तयार करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. भारतीय किसान सभेच्या मुंबईतील मोर्चाबाबत निवेदन देताना ते बोलत होते. किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत काल झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांबद्दल त्यांनी माहिती दिली. **** भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी सरकार नऊ कोटी ४५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. याप्रकरणी दाखल गुन्हे मागे घेणार असून, गंभीर खटल्यांबाबत सरकारची समिती निर्णय घेईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. **** औरंगाबादच्या कचरा प्रश्नावरही आज विधानसभेत चर्चा झाली. मिटमिटा परिसरात कचरा टाकण्यास विरोध करणाऱ्या नागरिकांवर अन्याय पध्दतीनं गुन्हे दाखल झाल्याचा आरोप करत, विरोधकांनी, पोलिस आयुक्तांच्या बदलीची मागणी केली. यासंदर्भात वस्तुस्थिती जाणून सविस्तर निवेदन देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. **** दुधात भेसळीसाठी शिक्षेची तरतूद सहा महिन्यांवरून तीन वर्ष वाढवणारा कायदा करण्यात येणार असल्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी आज विधानसभेत केली. दुधातली भेसळ रोखण्यासाठी कायद्यात बदल करण्यासंदर्भातल्या लक्षवेधीला ते उत्तर देत होते. **** राज्यातल्या अल्पसंख्याक तसंच मागासवर्गीय समाजातल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी शून्य किमान शिलकीवर बँक खाती उघडण्याच्या सूचना सगळ्या बँकांना देणार असल्याचं, अल्पसंख्याक आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधानपरिषदेत सांगितलं. वैद्यकीय, तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक समाजातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तसंच शिष्यवृत्तीचा कोटा वाढवून देण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. **** औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय - घाटीत आवश्यक यंत्रसामुग्री तसंच इमारत बांधकामासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असं वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. घाटी मध्ये रिक्त पदे भरून निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात आमदार सतीश चव्हाण यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. **** वैजापूर आणि गंगापूर तालुक्याच्या वाट्याला मिळणारं हक्काचं पाणी नाशिकसाठी बिगर सिंचनाकरता आरक्षित केल्याचा मुद्दाही चव्हाण यांनी परिषदेत उपस्थित केला. बिगर सिंचन आरक्षणाची समप्रमाणात विभागणीची कार्यवाही, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या, कार्यकारी संचालकांकडून करण्यात येत असल्याचं जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितलं. **** मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात कायम न्यायमूर्ती म्हणून, न्यायमूर्ती संगीतराव पाटील आणि न्यायमूर्ती के के सोनवणे यांनी आज शपथ घेतली. वरिष्ठ न्यायमूर्ती आर एम बोर्��े यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. **** शिक्षणाचं खाजगीकरण रोखावं, कमी पटसंख्येच्या शाळा बंद करु नयेत, प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत असावं, यासह अन्य मागण्यांसाठी शिक्षण हक्क बचाव कृती समितीच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यात आज सर्व शाळांसमोर शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली. ****
0 notes