#सगळ्यावर
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
नोटबंदी, 2G घोटाळा सगळ्यावर बोलले! रिक्षावाल्या दादांचं जनरल नॉलेज कमाल!
नोटबंदी, 2G घोटाळा सगळ्यावर बोलले! रिक्षावाल्या दादांचं जनरल नॉलेज कमाल!
नोटबंदी, 2G घोटाळा सगळ्यावर बोलले! रिक्षावाल्या दादांचं जनरल नॉलेज कमाल! एक व्हिडीओ व्हायरल झालाय, राजीव कृष्णा हा इन्स्टाग्राम वापरकर्ता मुंबईत तासभर ट्रॅफिकमध्ये अडकला होता, तेव्हा त्याने आपल्या ऑटो ड्रायव्हरसोबत एक अविस्मरणीय प्रवास केला. राजीव कृष्णा यांनी आपल्या इन्स्टा अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करत लिहिले की, ‘मी मुंबईच्या ट्रॅफिक जॅममध्ये अडकलो होतो. शेवटचे ३ किमीचे अंतर पार करण्यासाठी…
View On WordPress
0 notes
kdforu · 5 years ago
Text
हुंडी
"सुरेखा ए सुरेखा, खूप दिवसात रिक्लायनर सीट वर रेलून सिनेमा नाही चेपलाय. जाऊया का या रविवारी संध्याकाळच्या शो ला? बुक करतो तिकिट्स. तू फ्री आहेस ना?" "हो रे कर, जाऊया. मीनल नाही येणार पण, तिचे वेगळे प्लॅन्स असतात. उगीच तिचे तिकीट काढू नकोस. एक तर तिला बळे बळे न्यायचे महागडे तिकीट काढून आणि चेहेऱ्यावर एरंडेल प्यायल्याचे भाव सोसायचे आपणच". सुरेखातला मुनीम बोललेला! रवी ने मागच्या सहा एक महिन्यात एक सुद्धा सुटी घेतलेली नव्हती. मागचे चार सहा रविवार पण तो इमरजनसी ड्युटी वर होता. त्याच्या सगळ्या कलिग्स च्या मुलांच्या परीक्षा होत्या म्हणून ड्युटीज याच्या गळ्यात पडलेल्या. तसाही रवी दुसऱ्याच्या सुखात स्वतःचे सुख बघणारा. "प्लीज रवी कर ना रे ऍड्जस्ट" म्हणायचा अवकाश की रवी हळवा होई आणि ड्युटी त्याच्या गळ्यात येई. रवी शहरातल्या उत्कृष्ट सेवा देणाऱ्या इस्पितळात सिनियर भूलतज्ञ म्हणून कामाला होता. कामाची वेळ दहा ते सहा पण एकदा का चेंबर मध्ये स्वारी पोचली की पीटर हेन्लेईन घडाळ्याचा शोध करायचे विसरले की काय असा तो कामात गुंतून जाई. रवीला पेशंट्सशी अवांतर गप्पा मारायला जाम आवडे. खरतर त्याचे काम शस्त्रक्रियागृहात भूल देण्याचे पण हा अधिक वेळ आदल्या दिवशी त्यांच्याशी गप्पा मारण्यात घालावी. पेशंट रिलॅक्स झाला की त्याला कमी औषधात बेहतर भूल देता येते अशी त्याची पक्की खात्री. काहीश्या अश्याच विषयावर त्याचा एक शोध प्रबंध एका उच्च दर्जाच्या जर्नल मध्ये प्रसिद्ध झालेला आणि नावाजलेला सुद्धा. "काँग्रॅच्युलेशन्स रवी यू कंपलिटेड टेन किमी इन फिफ्टी एट मिनिट्स. धिस इज युअर न्यू बेस्ट!!" रवीच्या आयफोन वर मॅसेज पॉप अप झाला. त्याच्या घामेजलेल्या चेहऱ्यावर लहानसे स्मित आले. रविवार ची छान सुरुवात झालेली! रवीने घराची बेल वाजवली आणि त्याला हवी तशी ब्लॅक कॉफी चा मग घेऊन सुरेखा ने दार उघडले. घराच्या गॅलरीत रवी पाय लांब करून बसला. पक्ष्यांचा किलबिलाट, हलक्या आवाजात भीमसेन बुवांचा भैरव राग, गार वाऱ्यावर वाळत चाललेला घाम, दीडशे वरून साठीत येणारी हृदयाची गती आणि जिभेवर कॉफी ची चव - ….व्वाsss!... ही रवी ची स्वर्गाची व्याख्या! मीनल तेवढ्यात येऊन त्याला बिलगली. "बाबी लंच ला मॅक-डी ला जायचे का?" मॅक-डी आणि रवीचे हाडाचे वैर! तो नाही म्हणणार हे तिला नक्की माहित असे. मग तिचा नेक्स्ट डायलॉग - "बघ ह .. मी यायला तयार आहे तुझ्या बर���बर, तूच नाही म्हणतोयस. मी जाते आता माझ्या फ्रेंड्स गॅंग बरोबर". तो चिडचिड करण्याचा आव आणि पण आतून त्याला हे सगळे आवडे. "सुरेखा आज मस्त अंडा करी चा बेत करूया. मी करतो सगळे. तू आज जरा तुझ्या 'मी-टाइम' चा आनंद घे". चव कमी अधिक असली तरी ती बोटं चोखून करी चा आनंद घेत असे. अंड्याचा बलक आवडत नसला तरी ती मिटक्या मारून खाई. "रवी तुझ्या हाताला अशी काही चव आहे ना की मला ते कमी मीठ/ अंड्याचा बलक जाणवतच नाही रे". तिची ही एक ओळ त्याचा सगळा थकवा घालवायला पुरेशी असे. स्वतः बनवलेला विडा चघळत त्याने एक झोप काढली. चार चा अलार्म लावला, सिनेमाला जायचे होते ना! पण डोळा लागतो ना लागतो तोच फोन खणाणला. डॉ सरपोतदार कॉलिंग ... हॉस्पिटल सुपरिटेंडेंट. "रविवार दुपारी का कडमडतोय हा" म्हणत त्याने फोन कट केला. परत फोन ची कटकट सुरूच. शेवटी कंटाळून त्याने फोन रिसिव्ह केला. "रवी लगेच हॉस्पिटल ला ये"' इतकेच बोलून सरांनी फोन कट केला. इतके तुटक सर कधीच बोलत नाहीत. नक्की काही तरी गंभीर असेल - रवी ला उमगले. तो तडक हॉस्पिटल ला पोचला. सर घाई घाईत बोलत होते "रवी कुठल्या तरी वेगळ्याच आजाराने पीडित वृद्ध लोक दोन दिवसां पासून हॉस्पिटलच्या ओपीडी ला येतायत. आपले जवळ जवळ सगळ्या फिजिशियनना लागण झाल्याची संभावना आहे. त्यांना आयसोलेशन मध्ये शिफ्ट केलाय. आपल्या दोघांनाच आता गड लढवायचा आहे. फास्ट सेलिना सिस्टर - डॉ रवी ना 'पीपीइ' द्या आणि त्यांची रूम दाखवा". ओपीडी सेक्शन बघून मी हबकलोच. रविवार असून सुद्धा ओपीडी खोकणाऱ्या आणि तापाने फणफणणाऱ्या स्त्री पुरुषांनी भरलेली. सिस्टर सेलिना मला चेंजिंग रूम मध्ये घेऊन गेली. 'पिपीई' चा या आधी मी कधीच वापर केला नव्हता. दरवाज्या मागे लावलेल्या तक्त्या नुसार मी चेंज करायला घेतले. घातलेले कपडे आधी काढून ठेवले. सर्जिकल गाऊन चढवला. रेड टेप चे भारीतले शूज काढून साधे कॅनवास पुश इन घातले. त्यावर एक विशिष्ठ प्रकारच्या प्लास्टिक चे पिशवीसम कव्हर चढवले. अंगावर त्याचाच अंगरखा घातला. हातात डबल ग्लोव्हस, डोक���यावर कापडी आणि त्यावर प्लास्टिक ची टोपी. तोंडावर कापडी मास्क आणि त्यावर ट्रिपल लेअर चा विशिष्ठ मास्क. डोळ्याला चष्मा आणि त्यावर एक पारदर्शक बंद गॉगल. ह्या सगळ्यावर हेल्मेट ला पुढे काच असते ना तशे कव्हर. बेसिन च्या वर लावलेल्या आरश्यात बघितले आणि पटकन हसू आ��े स्वतःचे ध्यान बघून. झिपकी {लेकीचे लाडाचे नाव} च्या खोलीत भिंतीवर टांगलेल्या फोटोतला नील आर्मस्ट्राँग वाटत होतो फुल्टू :). समोरच्याला माझ्या डोळ्यांशिवाय काही दिसत नसणार. मी ओपीडी १ गाठली. १५ x १५ फुटाची खोली. मधोमध एक लाकडी टेबल. त्यावर ठेवलेला एक पांढऱ्या रंगाचा स्टील ट्रे. त्यात एक टॉर्च, टंग-डिप्रेसर, स्पिरिट, सॅनिटायजर, पीसीआर किट - इतकेच सामान. टेबलाच्या दोन्ही बाजूला हात नसलेली एक-एक खुर्ची. कोपऱ्यात कॉम्प्रेसर चालू आहे याची सतत जाणीव करून देणारा एक आवाज करणारा जुना फ्रिज. भिंतीवर राष्ट्र पुरुषांच्या तसबिरी आणि त्याला घातलेले प्लास्टिक च्या फुलांचे हार. उजव्या भिंतीला एक छोटिशी खिडकी ज्याची काचेची कवाडे घट्ट बंद. छतावरचा पंखा एका विशिष्ठ लइत फिरत होता, फ्रिज च्या आवाजाला साथ देत होता जणू. खोलीचा दरवाजा स्प्रिंग ची बिजागरे असलेला, दोन्ही कडून धक्का दिला की उघडणारा. मी खुर्चीत विसावतो ना विसावतो तोच सिस्टर सेलिना बोलल्या - सर पाठवू का पेशंट? मी होकारार्थी मान डोलवली. पहिला रुग्ण - वय - ६१, कोरडा खोकला, ताप १०१, पल्स - ११०, रेस्पिरेटरी रेट - ४०, रक्तदाब, मधुमेह - आहे. घश्यातुन स्वाब घेऊन सॅमपल पाठवले. दुसरा रुग्ण - ताप, खोकला, पल्स, सॅमपल. तिसरा मग चवथा... दहावा... विसावा... बाहेरच्या रुग्णांचा खोकल्याचा आवाज, सिस्टर सेलिना चा - चला नेक्स्ट पेशेंट आणि माझ्या फोन ची रिंग - काहीच थांबेना. सुरेखा जाम वैतागली असणार. मला फोन रिसिइव्ह पण करता येत नव्हता. मला तरी कोठे माहिती होते असे काही तरी पुढे वाढून ठेवलाय ते. असो.. रात्रीचे नऊ कधी वाजले कळलेच नाही. मास्क चे इलॅस्टिक काना मागे काचायला लागलेले. उजव्या पोटरीला आणि पाठीला खाज येत होती पण काही इलाज नव्हता. ब्लैडर इतके भरले होते की ते फुटेल कि काय अशी सारखी भीती वाटत होती. माने भोवती घामाने पोवळ उठल्या सारखे जाणवत होते. हे सगळे विचार मेंदू करत होता. रुग्ण मात्र मी स्पायनल लेवल वर बघत होतो. ताप, खोकला, टेस्ट हेच काय ते करायचे होते. सिस्टर सेलिनाला शेवटी माझी दया का कीव काहीतरी आली. "सर एक ब्रेक घेऊया" ती उद्गारली. मी लगेच उठलो. किती बर वाटले पाय सरळ करून! मी तडक चेनजींग रूम मध्ये गेलो. चिलखत भिरकावले आणि गोड मिट्ट चहा घश्या खाली केला. चहानी मला ��तका आनंद या आधी कधीच दिला नव्हता. चहा ��ंपवून सुरेखा आणि मीनल ला परिस्थीची कल्पना दिली. मला काही दिवस इथेच राहावे लागणार होते, नव्या डॉक्टरांची फळी येईस्तोवर तरी. पलंगावर आडवा झालो ते सकाळी सहालाच जाग आली. सिस्टर सेलिनाने दोनदा नॉक केल्याचे ती म्हणाली पण नंतर तिने नाद सोडला. चहा बिस्किटे खाल्ली, पीपीई चढवला आणि परत १,२,३, ताप, खोकला, टेस्ट ... चालू. काल घश्याला कोरड पडून वैताग आलेला. त्यावर मी आज एक युक्ती शोधली. मॅरेथॉन ला वापरलेली सिप्पीन्ग बॅगेत मी पाणी, मीठ, साखर आणि लिंबू असे मिश्रण भरून घेतले. ती बॅग पीपीई च्या आतून पाठीवर घेतली. त्याचे सिप्पीन्ग एन्ड तोंडात ठेवले. ते पाणी पिताना मी केलेला त्या बॅग च्या उपयोगाने स्वतःचा अभिमान वाटायचा आणि मीच माझी पाठ थोपटून घ्यायचो. काना मागे काचणाऱ्या इलॅस्टिक च्या पट्टीला गॉज चा एक थर दिला, त्यानी खूप सुखावह झाले. इलॅस्टिक च्या खेचण्या मुळे माझे कान जरा बाहेर आल्यागत वाटत होते. थोडा का होईना गांधीजीं सारखा दिसतोय म्हणून कॉलर ताठ झाली! मानेवर, पाठीवर आणि पायावर टालकम पावडर लावल्यानी सारखी घामामुळे येणारी खाज बरीच कमी झाली होती. बाहेर लॉक डाउन झाल्याचे कळाले. काल केलेल्या टेस्ट्स पैकी ९०% पॉसिटीव्ह आल्या होत्या. प्रत्येक दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत होती. आता तर कमी वयाचे रुग्ण पण यायला लागलेले. कॉवीड-१९ किती बळावलाय याची कल्पना मला येत होती. कबुलच करायचे तर मी जाम घाबरलो होतो. घश्यात जरा जरी टोचल्या सारखे झाले किंव्हा डोळ्यांची थोडीका आग झाली तरी मला धस्स व्हायचे. मी लगेच इन्फ्रारेड थर्मोचेक स्वतःच्या कपाळा समोर धरी. '३७' चा आकडा बघून जीव भांड्यात पडे. शाळेत भूगोल माझा जानी दुश्मन. तेव्हा सुद्धा प्रगती पुस्तकावर भूगोलाच्या रकाण्यात '३७' चा आकडा बघून अगदी इतकाच आनंद होत असे. दिवसाचे दहा तास काम करून रात्री कधी झोप लागायची कळायचेच नाही. आज तिसरा दिवस. पहिलाच रुग्ण रशीद. त्याला बघून धक्काच बसला. रशीद पन्नाशीतला एक उत्साही बंदा. कुठल्याश्या आयटी कंपनीत मदतनीस म्हणून कामाला होता. रोज सकाळी फ्रेश जूस घेऊन रस्त्याच्या कडेला एक टेबल घेऊन उभा असे. "सर, आज गाजर डे, आज कारले जूस, आज बीटरूट," कधी मिक्स असे माझ्यासाठीचे दिवस त्यांनीच ठरवलेले. मी पण रन नंतर निमूटपणे तो देईल ते जूस पीत असे. सगळ्यांना तंदुरुस्त रहायला मदत करणारा रशीद आज खोकल्याने बेजार आणि तापाने थरथरत होता. त्याचे वय झाल्यासारखे स्पष्ट वाटत होते. आता माझ्या ओळखीचे लोक पण इथे दिसू लागले या विचारानेच मी घाबरलो, हादरलो. काहीही झाले तरी रुग्णाला हात लावायचा नाही अशी सक्त ताकीद असून सुद्धा माझा हात आपसूक रशीद च्या खांद्यावर विसावला आणि "घाबरू नका बरे व्हाल लवकर" अशे शब्द तोंडी आले. नुसत्या ह्या कृतीने सुद्धा त्याला धीर आल्यासारखे स्पष्ट दिसत होते. माझ्या झाकलेल्या चेहऱ्या मुळे त्यानी मला ओळखले नव्हते. एका अर्थी ते बरेच झाले. आज डे - ९. आता मला रोजच्या दिनक्रमाची सवय झालेली. सकाळी ८ ला उठून ९ पर्यंत ओपीडी गाठायची. रात्री ९ ला अंघोळ करून गादीवर पाठ टेकवायची ती सकाळी ८ पर्यंत. माझ्या ओपीडी च्या खिडकीत एक मनी प्लांट ची कुंडी ठेवलेली. त्यावर सकाळी कोवळ्या उन्हाची तिरीप पडे. त्याने ते रोप जणू आनंदी होई. त्याची पाने टवटवीत आणि डोलताना दिसत. जस जसे उन्ह माथ्यावर येई तसे ते रोपटे अंग चोरल्यागत पाने खाली वाकवे. मग मी जाऊन कुंडी सावलीत घेत असे. थोड्या वेळात पाने परत टवटवीत दिसत. सकाळी आल्यावर तिरपीच्या कक्षेत कुंडी ठेवायची आणि नंतर सावलीत. हा आमच्या दोघांचा - मी आणि ते वेल रोजचा ठरलेला खेळ . गेल्या दहा दिवसात ना रन, ना ते पाय लांब करून बसून कॉफी पिणे, ना भीमसेन, ना तो पक्ष्यांचा किलबिलाट. मी माझ्या झिपकी {माझ्या लेकीला} सगळ्यात जास्त मिस करत होतो. ते तिचे लाडिक बाबी म्हणत उगीच गळ्यात बिलगणे, छोट्या छोट्या गोष्टींसाठी हट्ट करणे, रात्री बळेबळेच मला कॉफी प्यायला लावणे, मॅक-डी चे नाव घेऊन मला उल्लू बनवत मित्रां बरोबर बाहेर जाणे - सगळे सगळे मिस करत होतो. सरपोतदार सरांचा निरोप आला - "उद्या घरी जाऊ शकतोस. रुग्ण संख्या मंदावलीय आणि बाकीचे डॉक्टर्स पण कामावर रुजू झालेत". माझा आनंद गगनात मावेना. मी लगेच घरी फोन करून सुरेखा ला हुकूम सोडला. "उद्या घरी येतोय. मस्त फोडणीचे वरण आणि फडफडीत भात करून ठेव". हॉस्पिटल च्या डब्याचा वीट आला होता. सकाळी लवकर उठून सरपोतदार सरांचा आणि सिस्टर सालिना चा निरोप घेऊन बाहेर पडलो. सकाळच्या उन्हाची तिरीप माझ्या चेहऱ्यावर पडली आणि ते मनी प्लांट का डोलायचे आणि टवटवीत दिसायचे ते कळले. तसाच ५ मिनिटे उभा राहिलो आणि १४ दिवसांची कसर भरून काढली. याच उन्हा पासून बचावा साठी मी डोळ्यावर ग्लेअर्स आणि चेहऱ्यावर सनस्क्रीन लावून पळायला जायचो, तेच ऊन आज ��ला हवेहवेसे वाटत होते. या दोन आठवड्यात मला माझ्या एकट्या बरोबर भरपूर निवांत वेळ मिळाला. शरीर पूर्ण वेळ काम करीत असे. म���ंदू आणि मन मात्र खूप गप्पा मारत अगदी कुठल्याही विषयावर. त्यांची चांगलीच गट्टी जमली होती. याचा एक मोठा फायदा झाला - मी स्वतःला आणखीन नीट ओळखायला लागलो आणि स्वतःवर जास्त प्रेम पण करायला लागलो. मागच्या काही दिवसात मी कमीत कमी हजार च्या वर रुग्ण तपासले असतील. त्यांच्या पैकी कित्येक चेहेरे माझ्या लक्षात आहेत. माझा चेहेरा मात्र त्यांनी कोणीच पहिला नाही - म्हणजे दिसतच नव्हता पीपीई मुळे. तिरुपतीला मी पाहिल्यात हुंड्या ठेवलेल्या - गुप्त दान करायला. ज्याची सेवा केली त्याला पण कळायला नको की कोणी ती केलीय - तीच तर खरी सेवा - गुप्त दान, हुंडीतले!
1 note · View note
loksutra · 2 years ago
Text
ललित मोदींसोबतच्या नात्यावर सुष्मिता सेननं मौन तोडलं
ललित मोदींसोबतच्या नात्यावर सुष्मिता सेननं मौन तोडलं
आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी अभिनेत्रीने गुरुवारी सोशल मीडिया हँडलवर घेतला. सुष्मिता सेन सोबत काही फोटो शेअर केले यासोबतच तो तिला डेट करत असल्याचे सांगण्यात आले. एवढेच नाही तर त्याने सुष्मिता सेनला आपला बेटर हाफही सांगितले. मात्र, ललित मोदींनी असेही सांगितले होते की, मी अद्याप लग्न केलेले नाही, दोघेही एकमेकांना डेट करत आहेत आणि लवकरच लग्न करणार आहेत. या सगळ्यावर सुष्मिता सेनची प्रतिक्रिया एका…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years ago
Text
" कोकण सगळ्यांना आवडते पण "
” कोकण सगळ्यांना आवडते पण “
सत्ताधारी असतील अथवा विरोधक कोकणाला निधी देण्यासाठी नेहमीच हात आखडता घेतात रत्नागिरी: कोकणात अतिवृष्टी, महापूर, वादळ, डोंगर खचणे या नैसर्गिक संकटामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या सगळ्यावर विविध उपाययोजना करण्यासाठी आज हिवाळी अधिवेशनात रत्नागिरी जिल्हयातील आमदार भास्कर जाधव, शेखर निकम, योगेश कदम या आमदारांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आवाज उठवला आहे. कोकण सगळ्यानाच आवडते पण सत्ताधारी असतील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 June 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी ��रंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ जून २०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** देशात पुढच्या ६ ते ८ आठवड्यात कोरोना विषाणू संसर्गाची तिसरी लाट येण्याचा अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांचा इशारा
** आषाढी एकादशीला पंढरपुरला जाणाऱ्या मानाच्या दहा पालख्यांसाठी राज्य परिवहन महामंडळ मोफत बसगाड्या पूरवणार
** पश्चिम महाराष्ट्रातील संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकात चर्चा
आणि
** शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पध्दतीनं साजरा होणार
****
देशात पुढच्या ६ ते ८ आठवड्यात कोरोना विषाणू संसर्गाची तिसरी लाट येण्याचा इशारा अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था म्हणजेच एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे. सध्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरल्याचं दिसत असल्यानं, निर्बंध शिथील झालेले असल्याच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून आपण अधिक सावध राहण्याची गरजही गुलेरिया यांनी व्यक्त केली आहे.
****
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात २ कोटी ८७ लाख कोविड प्रतिबंधात्मक लसींच्या मात्रा उपलब्ध असल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सांगितलं. आतापर्यंत मंत्रालयानं २८ कोटी ५० लाखांहून अधिक मात्रा उपलब्ध करुन दिल्या असल्याची माहितीही मंत्रालयानं दिली आहे.
****
कोविडग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी लागणारा ३२ हजार ४६४ मेट्रीक टन द्रवरुप प्राणवायु आतापर्यंत देशाच्या विविध भागात ऑक्सिजन एक्सप्रेस���्वारे पोहचवला असल्याची माहिती रेल्वेनं दिली आहे. ४४८ गाड्यांद्वारे १५ राज्यांमध्ये प्राणवायू पोहचवण्यात आला आहे.
****
आषाढी एकादशीला पंढरपुरला जाणाऱ्या मानाच्या दहा पालख्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या धावणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. मुंबईत आज ते बोलत होते. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव पाहता यंदाही वारीचा सोहळा साध्या पद्धतीनं करण्याच्या सूचना राज्य शासनानं दिलेल्या आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मानाच्या पालख्या पंढरपूरला घेऊन जाण्याचा मान महामंडळाला मिळाल्याबद्दल परब यांनी समाधान व्यक्त केलं आहे. १९ जुलै रोजी या बस पालख्यांबरोबर पंढरपूरकडे रवाना होतील. त्यासाठी संबंधित संस्थांना त्यांच्या मागणीप्रमाणे विनामूल्य एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पालख्यांचा प्रवास मूळ ठिकाणापासून पंढरपूर येथील वाखरीपर्यंत एसटीच्या बसमधून होणार आहे. त्यानंतर या पालख्या वाखरीपासून पुढे चालत पंढरपूरला जातील. वारकऱ्यांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीकोनातून सर्व बसेस निर्जंतुकीकरण करण्यात येतील. तसंच प्रवासादरम्यान वारकऱ्यांसाठी सॅनिटायझर आणि मास्कही महामंडळाच्यावतीनं उपलब्ध करून देण्यात येईल, असंही परब यांनी सांगितलं.  
****
यंदाच्या पावसाळ्यात पश्चिम महाराष्ट्रातील संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी तसंच कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या पाण्याविषयी दोन्ही राज्यात योग्य समन्वय असावा याकरिता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज कर्नाटकाचे मुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची बंगळूरु इथं भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीदरम्यान येणाऱ्या काळात कृष्णा आणि भीमा नद्यांच्या पूराचं नियंत्रण कशा पध्दतीनं करता येईल आणि त्यात कोणत्या पध्दतीनं दोन्ही राज्यानं समन्वय ठेवता येईल याची चर्चा झाली.
यासंदर्भात माहिती देताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले.  
एकंदर येणारा अलमट्टी धरणातील येवा आणि पुढे जाणारा येवा आणि महाराष्ट्रातील पडणारा पाऊस या सगळ्यावर डायनॉमिकली आपण जर कंट्रोल ठेवला तर मग कुठून किती पाणी सोडायचं आणि कोणत्या धरणात किती लेवल ठेवायची आणि खास करुन अलमट्टीची वर चांगलं नियंत्रण ठेवता येईल अशी चर्चा झाली. मला खात्री आहे की, आलेल्या पावसाळ्यात आणि पुढे देखील या पद्धतीत अधिक सुधारणा होत जाईल. या वर्षीच्या पावसाळ्यातील येणाऱ्या संभाव्य पुराची येईलचं असं नाही, पण जर आलाच पूर तर कर्नाटक आणि महाराष्ट्राचा समन्वय चांगल्या पद्धतीने साधण्यासाठी आजची बैठक उपयोगी ठरेल असा मला विश्वास आहे.
****
राज्यात आज अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. रायगड जिल्ह्यात दुपारी जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील सावित्री, गंधारी, ��ुंडलिका, आंबा, गाडी, उल्हास, पाताळ गंगा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. वडखळ ते अलिबाग मार्गावर पर्यटकांची वाहनं मोठ्या प्रमाणात जमली असून कार्ले खिंडीत पर्यटकांची अँटीजेन चाचणी सुरू आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या पर्यटनाला बंदी आहे, पोलिस मोठ्या प्रमा���ात बंदोबस्त करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड इथ महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने आज महागाई विरोधात घोषणा बाजी करण्यात आली. माजी राज्यमंत्री डी पी सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षानं केंद्र सरकार विरूध्द तीव्र निदर्शन केली. परभणी जिल्ह्यातही जिंतूर इथं कॉंग्रेसच्यावतीनं शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध करत तहसील कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आलं.
****
नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव इथं एक एकर जागेमध्ये तीन हजार वृक्ष लागवडीची मोहीम आजपासून आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. आनंदवन घनवन योजनेतून एकाच जागी विविध प्रकारचे तीन हजार वृक्ष लागवड करून मियावाकी मिशन २०२१ बळकट करण्यासाठीची ही मोहीम आहे.
****
शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पध्दतीनं साजरा होणार असल्याची माहिती शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांनी दिली. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाइन पद्धतीनं राज्यातील जनता आणि शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. वर्धापन दिन, कोरोना लसीकरण, रक्तदान शिबिरं, शैक्षणिक साहित्यांचं वाटप आदी सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा होणार असल्याचं देसाई यांनी सांगितलं.
****
सोलापूर जिल्हा आरोग्य विभागाकडून दिव्यांगांसाठी लसीकरणाची विशेष मोहीम राबवण्यात आली, यामध्ये दोन हजार जणांना लसीच्या मात्रा देण्यात आली असल्याची माहिती लसीकरणाचे समन्वयक डॉ. अनिरुध्द पिंपळे यांनी दिली. शासनाच्या आदेशानुसार दिव्यांग व्यक्तींचे तातडीनं लसीकरण पुर्ण करुन घेण्याचा सूचना होत्या. त्यानुसार ही मोहीम राबवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
मुंबई पोलिसांच्या कुटुंबियांसाठी आयोजित केलेल्या कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण विशेष मोहिमेचा शुभारंभ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आला. या मोहिमेबाबत समाधान व्यक्त करून ठाकरे यांनी या विषाणुच्या उच्चाटनासाठी सर्वांना सरकारी नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं.
****
लातूर शहरात उद्यापासून ३० वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. शहरातील जास्तीत जास्त तरुणांनी या मोहिमेचा लाभ घेत लसीकरण करून घ्यावं असं आवाहन ��हापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले आहे.
****
जालना जिल्ह्यात आज दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या एक हजार १३४ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात ३८ नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६० हजार ९९६ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या २५ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले ५९ हजार ५४६ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर सध्या बाधित असलेल्या ३१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका अद्याप टळलेला नाही त्यामुळे मंगल कार्यालयांना टप्याटप्यानं कार्यक्रमासाठी परवानगी मिळवून देण्यात येईल असं आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिलं आहे. लातूर  जिल्ह्यातील मंगल कार्यालयं पूर्ववत सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी मंगल कार्यालय संघटनेच्या शिष्टमंडळानं आज लातूर इथं देशमुख यांची भेट घेऊन केली, त्यावेळी ते बोलत होते. व्यावसायिकांच्या मागणीचा सहानुभुतीपूर्वक विचार करून मार्गदर्शक सुचनांचं पालन करीत निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले.
****
0 notes
inshortsmarathi · 5 years ago
Text
शाळांमध्ये लैंगिक शिक्षण हा विषय अनिवार्य केला पाहिजे- सोनाक्षी सिन्हा
शाळांमध्ये लैंगिक शिक्षण हा विषय अनिवार्य केला पाहिजे- सोनाक्षी सिन्हा
शाळांमध्ये सेक्स एज्युकेशन अर्थात लैंगिक शिक्षण हा विषय अनिवार्य केला गेला पाहिजे अशी मागणी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने केली आहे. ‘खानदानी शफाखाना’ हा सोनाक्षी सिन्हाचा सिनेमा ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होतो आहे. या सिनेमात सेक्स या विषयाला धरुन कसे गैरसमजच असतात किंवा अनेकदा या विषयावर बोलणं आपण कसं टाळतो. या सगळ्यावर विनोदी अंगाने भाष्य करण्यात आलं आहे.
आपण स्वतःला सुधारणावादी समजतो, पुढारलेले…
View On WordPress
0 notes
aptedhruv21 · 6 years ago
Text
म��ा काय त्याचे..
आपल्याला सतत कशाचे ना कशाचे डोहाळे लागत असतात. हिंदुत्वाचे, राष्ट्रियत्वाचे, सणांचे, New Year आणि Christmasचे, क्रिकेटचे, राजकारणाचे... इथपासून सुरु होऊन... WhatsApp मुळे अगदी सोमवार/गुरुवारपासून संकष्टी चतुर्थीपर्यंत सगळे सगळे डोहाळे लागतात.अशाच एका डोहाळ्याचं आज उद्यापन आहे.
अगदी बरोबर..
गेल्या पंधरवड्यापासून Pregnant असलेल्या देशभक्तीची आज झेंडावंदन झालं की Delivery होईल.. आणि मग आपण नवीन Pregnancy साठी मोकळे होऊ..
आणि यावेळचा प्रजासत्ताक दिन तर अजूनच खास आहे... काही दिवसांपूर्वीच 'उरी' चित्रपटाची फोडणी बसली आहे.. काल लागलेले मणिकर्णिका आणि ठाकरे Supplement म्हणून आहेतच. पण तरी नेमका long weekend चुकलाच.
नाहीतर अगदी मजा आली असती बघा.. 
त्यात भर म्हणून प्रत्येक गोष्टीचा Events करणारे आहेतच. कालच एक Flex बघितला, Come with your School Buddies on this Republic Day and get free beers for entire group. वाचूनच चाट पडलो..
काही दिवसांनी पितृपक्षाचाही Event झाला, तर नवल वाटून घेऊ नका..
मग आता तुम्ही म्हणाल की जे पाजतायत त्यांना Problem नाही... जे पितायत त्यांना Problem नाही.. मग मधल्या मधे माझं नाटक काय आहे! 
तुम्ही जर खरंच बारकाईने लक्ष दिलंत... तर या Attitude मुळे आपल्याला एक रोग जडतोय... स्वातंत्र्यवीर सावरकरांनी खुप आधीच या रोगाचं निदान करुन ठेवलंय.. त्या रोगाचं नाव आहे,
'मला काय त्याचं!'
झेंडावंदन झालं... प्लास्टिकचे झेंडे फडकवले.. दुसऱ्या दिवशी त्याचाच कचरा झाला... पण मला काय त्याचं...
झेंडावंदन झालं... एक गाडी कमी पडली म्हणून ट्रिपल सीट निघालो... चौकात पोलीस शिट्ट्या मारुन थांबवतोय.. पण मला काय त्याचं...
टपरीवर चहा पित उभे आहात... शेजारी एक भाई हवेत धूर सोडत उभा आहे... तिथल्याच एका वयस्कर बाईला त्याचा त्रास होतोय.. पण मला काय त्याचं..
समोरुन पुण्यात नवीन आलेल्या माणसाची रिक्षावाला अडवणूक करतोय... स्टेशन ते शिवाजीनगर १५०₹ सांगतोय... पण मला काय त्याचं...
Friday Night... मस्त दारु पिऊन झिंगतोय... तिकडे आई- बाप मुलगा सरळ- सभ्य आहे या समजुतीत निवांत... पण मला काय त्याचं...
चौकात एक मुलगा रोज येऊन माझ्याच Colleague ची छेड काढतो.. ती बिचारी तोंडाने बोलत नाही, डोळ्यातून बरंच काही सांगून जाते.. पण मला काय त्याचं...
या सगळ्या गोष्टींमध्ये आमची देशभक्ती वांझ होऊन जाते..
आता या सगळ्या गोष्टींचा आणि देशभक्तीचा काय संबंध?
थांबा.. सांगतो...
स्वातंत्र्यापूर्वीची गोष्ट आहे.. सशस्त्र लढ्याला म्हणावं तेवढं यश मिळत नव्हतं.. टिळकांच्या निधनानंतर नेतृत्व हरपलं.. जवळ जवळ सर्व क्रांतीकारक भूमिगत होते.. सावरकर लंडनमध्ये होते... मग एक अभिनव लढा भारतात उभा राहिला... त्यामध्ये फाशी जाण्याची गरज नव्हती... काळ्या पाण्याची भिती नव्हती.. कुटुंबांवर जुलूम होणार नव्हता...
मग नक्की काय करायचं होतं?
काहींनी झाडाला मिठी मारायची होती... काहींनी मीठ उचलायचं होतं... काहींनी विदेशी कापडाची होळी करायची होती... काहींना पोलीस ठाण्यावर मोर्चे काढायचे होते... 
काही मूठभर क्रांतीकारकांनी संपूर्ण त्याग करण्यापेक्षा, बहुतांश जनतेने थोडा थोडा त्याग करायचा होता.. त्यावेळी कोणाच्या डोक्यात हा विचार आला नाही की, मला काय त्याचं! 
आणि आला असता, तर मग काही खरं नव्हतं बरं का...
आपल्या देशभक्तीच्या कल्पनाच निराळ्या असतात मित्रांनो... बाॅर्डर आणि गदरमधले नायक, भगतसिंग आणि अगदी कालच्या उरीमधला विहान शेरगील... ही माणसं आणि त्यांचा त्याग फार अवघड आहे... आपल्यासारख्या सामान्य माणसाला तो सहसा झेपत नाही...
म्हणून मग आम्ही काय करतो, मला काय त्याचं म्हणत गप्प बसतो...
अरे, नो एंट्रीतून आलेल्याला घाल की गाडी आडवी एकदा... चार गोष्टी सुनव त्याला... समजवून सांग... हा तुझाच रस्ता आहे... हा तुझाच देश आहे...
समोरचा माणूस कचरा टाकतोय.. तू बघतोयस... त्याला उलटं बोलायचं धाडस होत नाहीए... मग एकदा स्वतःहून तो कचरा उचलून तर बघ... अरे मित्रा, हा तुझाच कोपरा आहे... हा तुझाच देश आहे...
नारायण पेठेतल्या हाॅटेलात गेलायस... समोरचा माणूस पुणेकर आहे, हे ठाऊक आहे तुला... तरीही हिंदीमधून संवाद साधतोयस... मित्रा घडा घडा मराठीतून बोल की... ही तुझीच भाषा आहे रे.. हा तुझाच देश आहे...
क्रिकेट खेळतोस.. क्रिकेट बघतोस... गर्दीनं स्टेडियम भरुन टाकतोस... तिकडे हाॅकीवाले प्रेक्षकांची वाट बघतात... कधीतरी पाऊल हाॅकीकडेही टाकून बघ... लेका हा तुझाच खेळ आहे.. हा तुझाच देश आहे..
Office मधला colleague रोज एका मुलीकडे बघत बसतो... तिला आवडत नसताना तिच्यामागे फिरत राहतो.. तुला ते जाणवतं ना? मग घे की बाजूला त्याला एकदा... चांगला सज्जड दम भर... कारण दोस्ता, ही तुझीच बहिण आहे...  हा तुझाच देश आहे...
तुच जर का, सगळं सोडून मला काय त्याचं म्हणत बसलास... तर या देशाने बघायचं कोणाकडे?
Sacred Games मधला एक संवाद खुप वेळा आठवतो.. सिस्टम, मुंबई, कचरा या सगळ्यावर बोलताना सरताज म्हणतो,
"ये सिस्टीम.. ये बम्बई.. ये इंडिया..ये सब कौन है? हम ही है ना BC.."
खरंय की नाही? 
प्रजासत्ताकचा अर्थ लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य असा असतो की लोकांनी निवडून दिलेल्या लोकांचे राज्य असा, हे आपण जेवढ्या लवकर समजू.. तेवढ्या लवकर आपण एक Matured Democracy म्हणून उदयाला येऊ...
नाहीतर मग ते अमेरिकेतले गोडवे आहेतच.. तिथे स्वच्छता आहे... न्याय आहे... वगैरे वगैरे..
ही अशी गोष्टी आहे, की जी नष्ट झाली असती तर सावरकरांना आनंदच झाला असता... पण आपण जसजसे प्रगत होतोय तसतसे अजूनच या गोष्टीला बळी पडतोय...
मणिकर्णिका मधल्या एका गाण्याचे बोल खुप सुंदर आहेत..
' मेरी नस नस तार करलो.. और बनाओ एक सितार...
 राग भारत उसपें छेडो... छनछनाओ बार बार..'
किती परमोच्च त्याग आणि देशप्रेम आहे... आपल्या माहित असतं की हे सगळं आपल्या आवाक्याबाहेर आहे... म्हणून मग आपण फेबुवर पोस्ट टाकतो.. इन्स्टावर स्टोरी टाकतो आणि गप्प बसतो...
तुला नाही ना असलं काही जमत... तरीही तू देशभक्त आहेस हे लक्षात ठेव...
सिग्नल पाळ... तू देशभक्त...
मतदान कर... तू देशभक्त..
लाच देऊ नकोस.. तू देशभक्त...
स्त्रियांचा सन्मान कर... तू देशभक्त..
आणि सगळ्यात महत्त्वाचं,
मला काय त्याचं म्हणणं सोड.. म्हणेजच तू देशभक्त..
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
'खेळाचा माझ्या आयुष्यावर परिणाम...' रुचिरासोबतच्या नात्याबाबत रोहितचं मोठं विधान
‘खेळाचा माझ्या आयुष्यावर परिणाम…’ रुचिरासोबतच्या नात्याबाबत रोहितचं मोठं विधान
‘खेळाचा माझ्या आयुष्यावर परिणाम…’ रुचिरासोबतच्या नात्याबाबत रोहितचं मोठं विधान Rohit Shinde Eliminated From BBM4: बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातून रोहित शिंदे घराबाहेर आला आहे. घराबाहेर आल्यानंतर त्याच्या आणि रुचिराच्या नात्याचं काय होणार असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला होता. या सगळ्यावर रोहित शिंदेने ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. Rohit Shinde Eliminated From BBM4: बिग…
View On WordPress
0 notes
webmaharashtra-blog · 7 years ago
Text
GST बद्दलच्या शंका-कुशंका दूर करणार अॅप
GST बद्दलच्या शंका-कुशंका दूर करणार अॅप
मुंबई : सध्या सोशल मीडियावर कुठल्या वस्तू व सेवांवर किती जीएसटी आहे याबद्दल उलटसुलट मेसेज फिरत असून सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टमने या सगळ्यावर मार्ग काढण्यासाठी मोबाइल अॅप लाँच केले आहे.
वापरण्यास हे अॅप अत्यंत सुलभ असून वस्तू आणि सेवांच्या कॅटेगरीमध्ये संपूर्ण यादी बघता येईल व कर व अन्य माहिती मिळवता येईल असे सीबीएसईने म्हटले आहे. तसेच जीएसटी म्हणजे काय, त्याचा प्रवास कसा होता, ड्राफ्ट काय…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Love and light म्हणत अभिनेत्री रिया चक्रवर्तीने शेअर केले खास फोटो
Love and light म्हणत अभिनेत्री रिया चक्रवर्तीने शेअर केले खास फोटो
Love and light म्हणत अभिनेत्री रिया चक्रवर्तीने शेअर केले खास फोटो सोशल मीडियावर सक्रिय असलेल्य अभिनेत्र्यांपैकी रिया चक्रवर्ती होय. मागील दोन वर्षांपासून रिया सुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत राहिली आहे. मात्र या सगळ्यावर नकारात्मक गोष्टीतून रिया आता बाहेर पडत आहे. Go to Source
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
जोडोनिया 'कर'; निवृत्तीनंतरच्या रकमेवरील प्राप्तिकर, जाणून घ्या काय आहे नियमावली
जोडोनिया ‘कर’; निवृत्तीनंतरच्या रकमेवरील प्राप्तिकर, जाणून घ्या काय आहे नियमावली
जोडोनिया ‘कर’; निवृत्तीनंतरच्या रकमेवरील प्राप्तिकर, जाणून घ्या काय आहे नियमावली अनेक वर्षे नोकरी करून निवृत्त झालेल्या व्यक्तीला मोठा निधी उपलब्ध होत असतो. यात भविष्यनिर्वाह निधी, ग्रॅच्युइटी, कॉम्युटेड निवृत्तीवेतनाची रक्कम, साठलेल्या रजेचे पैसे इत्यादीचा समावेश होतो. या सगळ्यावर प्राप्तिकर लागतो का? या विषयीच्या तरतुदी जाणून घेऊ या. अनेक वर्षे नोकरी करून निवृत्त झालेल्या व्यक्तीला मोठा निधी…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
भोंगा प्रकरणात आता ओवेसींची एन्ट्री होणार; जयंत पाटलांचं भाकीत
भोंगा प्रकरणात आता ओवेसींची एन्ट्री होणार; जयंत पाटलांचं भाकीत
भोंगा प्रकरणात आता ओवेसींची एन्ट्री होणार; जयंत पाटलांचं भाकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हनुमान चालीसा पठणावर केलेल्या भाषणानंतर राजकीय वातावरण चिघळ्याचं पाहायला मिळत आहे. राजकीय पक्षांकडून अशा प्रकारे विधानं केल्यामुळे जातीपातीचं राजकारण सध्या सुरू असल्याचं चित्र आहे. या सगळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खळबळजनक भाकीत केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हनुमान…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
मनसेला भाजपसोबत घेणार का? चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं...
मनसेला भाजपसोबत घेणार का? चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं…
मनसेला भाजपसोबत घेणार का? चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं… राज्यात आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राजकीय वातावरण तापलं असताना एकीकडे मनसे आणि भाजप युती करणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. पण या सगळ्यावर चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. राज्यात आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राजकीय वातावरण तापलं असताना एकीकडे मनसे आणि भाजप युती करणार असल्याच्या चर्चांना…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
राज्य सरकारला दणका, मागासवर्ग आयोगाचा अहवाल न्यायालयाने फेटाळला, वडेट्टीवार म्हणतात...
राज्य सरकारला दणका, मागासवर्ग आयोगाचा अहवाल न्यायालयाने फेटाळला, वडेट्टीवार म्हणतात…
राज्य सरकारला दणका, मागासवर्ग आयोगाचा अहवाल न्यायालयाने फेटाळला, वडेट्टीवार म्हणतात… मुंबई : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भातील () राज्य सरकारने सादर केलेला मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. ठाकरे सरकारला मोठा धक्का मानला जातोय. भाजपने तर ठाकरे सरकारला ओबीसी आरक्षणविरोधी म्हटलं आहे. या सगळ्यावर ओबीसी नेते आणि ठाकरे सरकारमधील मंत्री () यांनी प्रतिक्रिया दिली आहे.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 4 years ago
Text
lalit prabhakar facebook live: ...त्यामुळे लग्न कधी करेन हा प्रश्नही अनुत्तरितच राहतो; ललित प्रभाकरनं सांगितलं कारण - lalit prabhakar interview facebook live talks about career and personal life
lalit prabhakar facebook live: …त्यामुळे लग्न कधी करेन हा प्रश्नही अनुत्तरितच राहतो; ललित प्रभाकरनं सांगितलं कारण – lalit prabhakar interview facebook live talks about career and personal life
‘जुळून येती रेशीमगाठी‘ या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता ललित प्रभाकर यानं ‘महाराष्ट्र टाइम्स’ च्या फेसबुक लाइव्हमध्ये वाचकांशी दिलखुलासपणे गप्पा मारल्या. तरुणींमध्ये लोकप्रिय असलेल्या ललितनं त्याचे छंद कोणते, तो हिंदी चित्रपटात कधी दिसणार, त्याचं नाटकावरचं प्रेम या सगळ्यावर मनमोकळेपणानं बातचीत केली. लाइव्हमध्ये गप्पा मारताना खास वाचकांसाठी त्यानं एक हिंदी कविताही सादर केली.…
Tumblr media
View On WordPress
0 notes