#वडेट्टीवार
Explore tagged Tumblr posts
mhlivenews · 1 year ago
Text
मनोज जरांगेंच ऐकून निर्णय घ्याल, तर फार मोठं नुकसान होईल; वडेट्टीवारांचा मराठा तरुणांना इशारा
मुंबई: मराठा समाजातील तरुणांनी आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांचे ऐकून निर्णय घेतला तर भविष्यात त्यांचे फार मोठे नुकसान होईल, असा धोक्याचा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला. मराठा तरुणांनी मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्यावर सर्वकाही ठरवू नये. अन्यथा त्यांचं फार मोठं नुकसान होईल. त्यामुळे मराठा तरुणांनी अभ्यास करुन आपल्या भविष्याचा निर्णय घ्यावा, असा सल्ला विजय…
Tumblr media
View On WordPress
0 notes
news-34 · 12 days ago
Text
0 notes
airnews-arngbad · 17 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 November 2024 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक – ०६ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
• विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार. • संविधान केवळ एक पुस्तक नाही, जीवन जगण्याचं माध्यम आणि तत्वज्ञान असल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं प्रतिपादन. • लाडकी बहीण योजनेच्या मासिक रकमेत ६०० रुपयांची वाढ करण्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं जाहीरनाम्यात आश्वासन. • गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पीएम-विद्यालक्ष्मी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि • घड्याळ चिन्ह वाटपाचा विषय सध्या न्यायप्रविष्ट असल्याचं सर्व वर्तमानपत्रातून जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राष्ट्रवादी काँग्रेसला निर्देश.
राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी आघाड्यांचा प्रचार आणखी तीव्र झाला असून दिग्गजांच्या प्रचारसभा होत आहेत. काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आज नागपूर इथं संविधान संमेलनात सहभागी झाले होते. संविधान हे केवळ एक पुस्तक नसून, जीवन जगण्याचं माध्यम आणि तत्वज्ञान आहे, असं त्यांनी यावेळी नमूद केलं. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विकास, प्रगती, अर्थव्यवस्था अशा शब्दांच्या आडून राज्यघटनेवर हल्ला करतात, असा आरोप त्यांनी केला. जाती आधारित जनगणना हा लोकांचा आवाज असून, तो संसदेपर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे, असंही राहुल गांधी म्हणाले. तत्पूर्वी त्यांनी, नागपूर इथल्या दीक्षाभूमीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं. याप्रसंगी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते. राहुल गांधी यांच्या हस्ते विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा मुंबईतल्या वांद्रे कुर्ला संकुल इथं प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेलाही ते संबोधित करतील.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याभोवती अर्बन नक्षलींचा गराडा पडल्यामुळे ते आता काँग्रेस विचारसरणीचे राहिले नसून, अतिडावे बनल्याची टीका, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते आज एका मुलाखतीमध्‍ये बोलत होते. भारतीय संविधानाची प्रत पारंपारिक निळ्या कव्‍हरमध्‍ये असते, मात्र राहुल गांधी भारतीय संविधानाची प्रत लाल रंगाचं कव्‍हर घातलेली का दाखवतात, असा प्रश्नही त्यांनी केला. भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्‍या १८० संघटना विध्‍वंसक कृत्‍यात सहभागी असणाऱ्या होत्‍या, असा आरोपही फडणवीस यांनी केला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मासिक रकमेत ६०० रुपयांची वाढ करून पात्र महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचं आश्वासन, राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात दिलं आहे. या जाहीरनाम्यात अकरा नवीन घोषणा असून त्यामध्ये शेतकरी कर्जमाफी, भात शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर पंचवीस हजार रुपये बोनस, अडीच लाख नोकऱ्या, ग्रामीण भागात ४५ हजार पाणंद रस्त्यांची निर्मिती, या घोषणांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीसाठीचा राज्यव्यापी जाहीरनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज मुंबईत प्रसिद्ध केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतून या मतदारसंघासाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. बारामतीला देशातला सर्वात आदर्श आणि प्रगत तालुका बनवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची आज लातूर जिल्ह्यात रेणापूर इथं प्रचार सभा झाली. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार संतोष नागरगोजे यांच्या प्रचारासाठी ही सभा झाली. राज्याचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्राची सत्ता एकदा आपल्या हातात द्या, असं आवाहन मराठवाड्यातल्या या आपल्या पहिल्या सभेत ठाकरे यांनी केलं.
भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी केल्यानं भाजपनं राज्यभरातल्या आपल्या चाळीस पदाधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. पक्षशिस्त आणि अनुशासन भंग केल्यामुळे ही कारवाई करण्यात येत असल्याचं पक्षानं आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
राज्यात येत्या २० तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन अभिनेते वैभव मांगले यांनी केलं आहे. बाईट - अभिनेते वैभव मांगले
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज यवतमाळ जिल्ह्यातल्या ��िधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारनं पीएम-विद्यालक्ष्मी योजनेला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आर्थिक कमतरतेमुळे बुद्धिमान विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत, या उद्देशानं मंजूर केलेल्या या योजनेत पात्र विद्यार्थ्यांना कोणत्याही तारणाशिवाय कर्ज मिळू शकेल, असं त्यांनी सांगितलं. याशिवाय, भारतीय अन्न महामंडळासाठी वर्ष २०२४-२५ मध्ये दहा हजार सातशे कोटी रुपयांच्या समभाग भांडवलाला मंजुरी दिल्याची माहिती वैष्णव यांनी यावेळी दिली. या निर्णयामुळे महामंडळाची कार्यान्वयन क्षमता वाढेल, असं त्यांनी नमूद केलं.
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. या विजयासोबतच, तीन वेळा निवडणूक लढवून दोन वेळा जिंकण्याचा विक्रम त्यांच्या नावावर जमा झाला आहे. अमेरिकेचं सुवर्णयुग आता सुरू झालं असून, अमेरिकेला पुन्हा महान करण्यासाठी हा विजय झाल्याचं ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना संबोधित करताना सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्याबद्दल डोनाल्ड ट्रंप यांचं अभिनंदन केलं आहे.
घड्याळ चिन्ह वाटपाचा विषय सध्या न्यायप्रविष्ट असल्याचं येत्‍या ३६ तासात सर्व वर्तमानपत्रातून जाहीर करावं, असे निर्देश, सर्वोच्च न्यायालयानं अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांमध्ये घड्याळ या चिन्हांवरुन असलेल्या वादावर आज न्यायालयात सुनावणी झाली. दोन्हीं गटांनी ऐन निवडणुकीच्या काळात आपली ऊर्जा न्यायालयात भांडण्यात खर्च करण्यापेक्षा प्रचारावर भर द्यावा, असा सल्लाही न्यायालयानं यावेळी दिला.
निवडणूक प्रक्रिया राबवताना त्यात कोणत्याही शंकेला वाव राहू नये याची खबरदारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घ्यावी, आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे उपायुक्त हिर्देशकुमार यांनी आज निवडणूक यंत्रणांना दिले. छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती विभागातल्या सगळ्या विधानसभा मतदारसंघांमधल्या निवडणूक पूर्वतयारीबाबत आढावा बैठक आज छत्रपती संभाजीनगर इथं पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी उपस्थित होते. निवडणूक विषयक कामकाजाबाबत प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींना माहिती द्यावी, मतदान केंद्रांवर सर्व सुविधा पुरवाव्यात आणि मतदानाबाबत जनजागृती करावी, असे निर्देशही ��्यांनी यावेळी दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठ न��व्हेंबरच्या, म्हणजे परवाच्या प्रस्तावित धुळे दौऱ्याच्या अनुषंगानं प्रशासनानं आवश्यक ती तयारी सुरू केली आहे. आठ तारखेपर्यंत धुळ्यात नो फ्लाईंग झोन जाहीर करण्यात आला असून, धुळे शहरात वाहतूक मार्गामध्ये तात्पुरता बदल करण्याच्या सूचना पोलिस विभागानं दिल्या आहेत.
नांदेड जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि रुग्ण सेवा मंडळ सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृतीसाठी सेल्फी पॉइंटचं उद्घाटन आज महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते झालं. “मतदाराला प्रोत्साहन म्हणून मतदानाच्या बोटाची शाई दाखवा आणि मोफत डोळे तपासणी करून घ्या” असा उपक्रम आयोजित केला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. आज वाचनालयाच्या वतीने बाह्यरुग्ण विभागात आणि लसीकरण केंद्रात रुग्णाला दिल्या जाणाऱ्या पावती आणि औषधाच्या कागदावर २० नोव्हेंबर २०२४ रोजी मी मतदान करणार तुम्ही पण करा, असा एक शिक्का देण्यात येत आहे.
पंढरपूर इथं होणाऱ्या कार्तिकी यात्रेला भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून तीन विशेष अनारक्षित गाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. या गाड्या आठ ते १५ नोव्हेंबरदरम्यान विविध स्थानकांवरून पंढरपूरकडे जाणार आहेत. यामध्ये लातूर-पंढरपूर विशेष गाडी १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी लातूर स्थानकावरून सकाळी साडे सात वाजता सुटेल आणि पंढरपूरला दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल.
0 notes
deshbandhu · 1 month ago
Text
Maharashtra Mein Mahayuti Sarakaar ko Satta se Baahar Karane ka Samay aa Gaya Hai: MVA
मुंबई। महाराष्ट्र में सत्तारूढ़ महायुति सरकार पर तीखा हमला बोलते हुए विपक्षी महा विकास अघाड़ी (एमवीए) नेताओं ने रविवार को कहा कि महाराष्ट्र संकट में है। इन नेताओं ने एक सभा में यह भी कहा कि राज्य में होने वाले विधानसभा चुनावों में "सरकार को सत्ता से हटाने का समय आ गया है"।
एमवीए के सहयोगी, कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (एनसीपी) के अध्यक्ष शरद पवार और शिवसेना (यूबीटी) के अध्यक्ष उद्धव ठाकरे, विपक्ष के नेता विजय वडेट्टीवार (विधानसभा) और अंबादास दानवे (विधान परिषद) ने एकजुट होकर एकनाथ शिंदे के नेतृत्व वाली सरकार पर निशाना साधा है।
Read More: https://www.deshbandhu.co.in/states/time-has-come-to-oust-the-mahayuti-government-from-power-in-maharashtra-mva-501223-1
0 notes
rightnewshindi · 3 months ago
Text
बुखार पीड़ित बच्चों को नहीं मिला इलाज, मरने पर नहीं दी गई एंबुलेंस; कंधे पर शव ढोते दिखे माता-पिता
Maharashtra News: विधानसभा में विपक्ष के नेता विजय वडेट्टीवार ने हाल ही में एक चौंकाने वाला वीडियो साझा किया है, जिसमें एक अज्ञात दंपत्ति अपने दो मृत बेटों के शवों को कंधों पर उठाकर जंगल के कीचड़ भरे रास्ते से गुजरते हुए दिखाई दे रहे हैं. यह घटना महाराष्ट्र के गढ़चिरौली जिले के अहेरी तालुका की है. वीडियो में दिखाया गया है कि दंपत्ति के दोनों बेटों, जिनकी उम्र 10 साल से कम थी, बुखार से पीड़ित थे.…
0 notes
automaticthinghoagiezine · 3 months ago
Video
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर डागली तोफ..
0 notes
manvadhikarabhivyakti · 3 months ago
Text
बदलापुर कांड पर उद्धव बोले- महाराष्ट्र सरकार दोषियों के साथ खड़ी; वडेट्टीवार और राउत ने भी घेरा
शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे ने बदलापुर हत्या कांड पर महाराष्ट्र सरकार को घेरा। उन्होंने कहा कि महिलाओं के खिलाफ अपराध में शामिल आरोपियों को सजा दिलाने के बदले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की सरकार उनके (आरोपियों) साथ खड़ी है। महिलाओं के खिलाफ अपराध और बदलापुर कांड को लेकर प्रदर्शन के दौरान ठाकरे ने पार्टी के कार्यकर्ताओं को संबोधित किया। उन्होंने कहा कि राज्य में महिलाओं की सुरक्षा सुनिश्चित…
0 notes
pniindia · 5 months ago
Text
Indresh Kumar क्या इस वजह से अपने बयान से पलट गए? इन नेताओं ने कही ये बात
Indresh Kumar जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) के नेता हैं, उनके एक बयान पर सियासी बवाल मच गया है, जो अब थमने का नाम नहीं ले रहा है। आपको बतादें कि इस पुरे मामले में मह��राष्ट्र विधानसभा में विपक्ष के नेता विजय वडेट्टीवार ने अपनी प्रतिक्रिया दी है। दरअसल, विजय वडेट्टीवार ने कहा कि जो Indresh Kumar के दिल में आया, उन्होंने वही कहा। ऐसा हो सकता है कि शायद उन पर दबाव रहा हो, इसलिए अपना बयान उन्होंने वापस ले लिया। लेकिन अहंकार किसमें है ये बात भारत जानता है, अहंकार की भाषा किसने बोली। भगवान राम को लाने और 400 पार की बात किसने कही. भगवान राम ने जहां-जहां पैर रखे हैं, भाजपा वहां-वहां हारी है। यह उनकी करारी हार है।
Tumblr media
0 notes
sureshsgupta · 6 months ago
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
आज महाराष्ट्र विधानसभा के विरोधी पक्ष नेता मा श्री विजय वडेट्टीवार जी के साथ घटकोपर (पूर्व), मुंबई के घटना स्थल का दौरा किया। पेट्रोल पम्प पर लोखंड का ग़ैरक़ानूनी
एडवरटाइजिंग होर्डिंग गिरने से १४ लोगो की जाने गई साथी ही ७० से ज़्यादा लोग ज़ख़्मी हूहे।
पूरे मुंबई में पब्लिक प्लेस, बिल्डिंग के टेरेस और सोसाइटी में कई ग़ैरक़ानूनी तरीक़े के होर्डिंग लगाये गये है। पुणे में भी होर्डिंग गिर चुका है ये बहोत गंभीर मामला है। होर्डिंग कई बिल्डिंग के सोसाइटी में लगाने से उनके खिड़कियाँ को ढक दिया जाता है साथ ही हवा भी नहीं पहोच पाती है।
क्या महानगर पालिका सभी मुंबई के ग़ैरक़ानूनी होर्डिंग को निकालेगी? सभी होर्डिंग की जाँच होगी? डिजिटल होर्डिंग की भी जाँच होगी?
जि��की जान गई है उनके घर वालो को २५ लाख मिलना चाहिए और जो घायल हूहे है उनके घर वालो को ५ लाख। क्यूकी ये सरकार की ज़िम्मेदारी है पूरी क्यूकी बृहन्मुंबई महानगर पालिका के लापरवाही के वेज़से ये घटना घटी है इसलिए मुंबई के महानगर पालिका के कमिश्नर पर मनुष्यवाद का मामला दर्ज होना चाहिए और कंपनी के मालिक के साथ जिसने उनको ज़मीन दी उनके ऊपर मर्डर का मामला दर्ज होना चाहिए।
| #SureshShyamlalGupta |
0 notes
darshanpolicetime1 · 11 months ago
Text
सार्वभौम भारत घडवण्यात तरुणांचे योगदान मोलाचे- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
नागपूर, दि. 15 :  जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, लिंग आणि रंग असा कोणताही भेद न पाळता संविधानाने सर्व अधिकार लोकांना दिले आहेत. त्यामुळे सार्वभौम, धर्मनिरपेक्ष भारत  घडवण्यात तरुणांनी पुढाकार घेऊन याकामी स्वतःला झोकून देऊन काम करावे, असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात ‘संसदीय लोकशाहीत सत्तारूढ आणि विरोधी पक्षांचे स्थान, कर्तव्ये आणि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
सरकारने लावलेली आग, ही सरकारने विझवावी : विजय वडेट्टीवार
https://bharatlive.news/?p=183953 सरकारने लावलेली आग, ही सरकारने विझवावी : विजय वडेट्टीवार
नागपूर; ...
0 notes
news-34 · 13 days ago
Text
0 notes
airnews-arngbad · 21 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 03 November 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०३ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
बहीण भावाच्या नात्यातला स्नेह अधिक वृद्धिंगत करणारा भाऊबीजेचा सण आज सर्वत्र साजरा होत आहे. या दिवशी बहिणीनं भावाला ओवाळण्याचा आणि भावानं बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देण्याचा प्रघात आहे. भाऊबीजेच्या निमित्तानं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. स्नेह, समर्पण आणि भक्तीचं प्रतीक असलेली भाऊबीज सर्वांच्या जीवनात अपरिमित आनंद घेऊन येवो अशी शुभकामना त्यांनी आपल्या सामाजिक प्रसार माध्यमावरील संदेशाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. दरम्यान, बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा सण काल मोठ्या उत्साहात साजरा झाला. विक्रम संवत २०८१ ला कालपासून प्रारंभ झाला. देशाच्या अनेक भागात हा नववर्षाचा प्रारंभ मानला जातो.
चार धाम पैकी केदारनाथ धामचे द्वार हिवाळ्यानिमित्त आज सकाळी विधीपूर्वक बंद करण्यात आले. भाऊबीजेच्या औचित्यानं या मंदिराची विशेष सजावट करण्यात आली आहे. उत्तराखंडमधल्या उत्तरकाशी जिल्ह्यातल्या यमुनोत्री धामचे द्वार आज दुपारी बंद करण्यात येतील. या वर्षी १५ लाखांहून अधिक भाविकांनी केदारनाथ धाम तर सात लाखांहून अधिक भाविकांनी यमुनोत्री धामला भेट दिली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात विजयासाठी भारतासमोर १४७ धावांचं लक्ष्य आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेंव्हा भारताच्या दुसऱ्या डावामध्ये पाच बाद ५७ धावा झाल्या आहेत. न्यूझीलंडचा दुसरा डाव आज सकाळी १७४ धावांवर बाद झाला. न्यूझीलंडनं तीन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत.
भारताचे संविधान हेच सर्वोच्च आहे. मनुस्मृती विरोधात काँग्रेसची लढाई सुरुच आहे. त्यामुळे संविधान वाचवण्यासाठी लढा उभारणे काळाची गरज आहे. हा लढा अधिक बुलंद करण्यासाठी विदर्भातील सामाजिक संस्थानी नागपूर इथे येत्या ६ तारखेला संविधान संमेलन आयोजित करण्यात आलं असून या संमेलनाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित राहणार असल्याची माहिती विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटना कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मान्यवर यात आपले विचार मांडणार आहेत. या कार्यक्रमाला राजकीय स्वरूप नाही. आदर्श आचारसंहितेचं पालन करूनच कार्यक्रम होणार आहे, असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे.
नंदुरबार जिल्ह्यात भरधाव जीपनं दिलेल्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला. काल रात्री उशीरा नंदुरबार ते धानोरा रस्त्यावर लोय पिंपळोद गावाजवळ हा अपघात झाला. रस्त्याच्या कडेला नादुरुस्त दुचाकीजवळ उभ्या असलेल्यांना भरधाव गाडीनं धडक दिली. यात १२ ते ४० वर्ष वयोगटाल्या पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी असून त्याला नंदुरबार इथं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती, आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
आक्षेपार्ह टिप्पणी करणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सावंत यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. महिलांच्या अवमानाबाबत महाविकास आघाडीतील नेत्यांची तोंड का बंद आहेत, असा सवाल करत शिवसेनेच्या मुंबादेवी मतदार संघातील उमेदवार शायना एन.सी यांनी या संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने महिलांबाबत आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी केली आहे.
परभणी जिल्ह्यातील रामपुरी इथं मतदान जनजागृतीपर दिवाळी पहाटचा सुरेल संगीत कार्यक्रम घेण्यात आला. २० नोव्हेंबर रोजी सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावा आणि लोकशाही बळकट करा असा संदेश स्वीप उपक्रमांतर्गत यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांनी मतदान करण्याचा निर्ध���र करून मतदानाची शपथ घेतली.
भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये भारतीय रेल्वेनं ‘स्वच्छ रेल, स्वच्छ भारत’ या संकल्पनेसह आणि प्रवाशांना अधिकाधिक स्वच्छ प्रवासाचा अनुभव मिळणं सुनिश्चित करण्यासाठी विविध व्यापक उपक्रमांसह सातत्यानं प्रमुख सहभाग नोंदवला आहे. गेल्या महिन्यात रेल्वेनं राबवलेल्या स्वच्छता पंधरवडा मोहिमेत देशभरातली ७ हजार २८५ रेल्वे स्थानकं, २ हजार ७५४ रेल्वे गाड्या आणि १८ हजार ३३१ कार्यालयं स्वच्छ करण्यात आल्याची माहिती रेल्वेतर्फे देण्यात आली आहे. पंधरवडा कालावधीत, भारतीय रेल्वेच्या वेगवेगळ्या गटांनी वृक्षारोपण मोहीम, स्वच्छ संवाद, स्वच्छ रेलगाडी, स्वच्छ स्टेशन, स्वच्छ परिसर, स्वच्छ आहार, स्वच्छ प्रसाधन इत्यादी दैनंदिन योजना किंवा उपक्रम हाती घेतले. या वर्षी रेल्वे मार्गावरील स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.
0 notes
nandedlive · 1 year ago
Text
"राज्यात सत्ताबदल होणार हे मी ठासून सांगतो"
Tumblr media
मुंबई | सप्टेंबर महिन्यातच राज्यातील मुख्य खुर्ची बदलणार आहे. राज्यात सत्ताबदल होणार आहे. मी ठासून सांगतो राज्यात बदल होणार आहेच, असा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. सत्तेच्या हव्यासापोटी, सत्तेच्या खुर्चीसाठी वाट्टेल ते महाराष्ट्रात चाललं आहे. राज्यात काहीच अलबेल नाहीये. येणाऱ्या 15 ते 20 दिवसात महाराष्ट्रात मोठे बदल होतील. राज्यातील जनता हे बदल पाहील. राज्यात मुख्य खुर्ची पासून बदलला सुरुवात होईल. मी खात्रीने सांगतो. सप्टेंबरमध्ये पूर्ण सत्ता बदलेल, असं वडेट्टीवार म्हणालेत. तिन्ही पक्षाच्या महत्त्वकांक्षा आहे. प्रत्येकजण जेवढा हात मारता येईल तेवढा हात मारला जात आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येची त्यांना पर्वा नाहीये. राज्य उद्ध्वस्त करण्याचा हा प्रयत्न आहे. सरकार चालवायचं म्हणून चालवलं जात आहे, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली. साधं जेवणासाठी बोलावल्यावरही एक उपमुख्यमंत्री डिनरला जात नाही. याचा अर्थ अलबेल नाहीये. महाराष्ट्रातील जनतेला सत्ताधाऱ्यांचं नाटक आणि तमाशा दिसत आहे. यांनी महाराष्ट्राची पत घालवली आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. महत्त्वाच्या बातम्या- Read the full article
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
राज्य उत्पादन शुल्क विभागातील वर्ग ३ आणि ४ ची ६६७ पदे लवकरच भरणार – मंत्री शंभूराज देसाई
मुंबई, दि. 20 : राज्य उत्पादन शुल्क विभागात येत्या 5 महिन्यांत वर्ग 3 आणि 4 च्या पदांची भरती केली जाणार असून एकूण 667 पदे भरण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि विधानसभा सदस्य विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव, छगन भुजबळ, जयकुमार रावल यांनी याबाबतचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. श्री. देसाई म्हणाले की, राज्य…
Tumblr media
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years ago
Photo
Tumblr media
राज्यात राष्ट्रीय आपत्ती घोषीत करा, विजय वडेट्टीवार यांची मागणी  सांगली जिल्ह्यातील ब्रम्हनाळ गावात आज मदतकार्याची बोट उलटून 9 लोकांचा बळी गेला, याला सरकारच�� नियोजनशून्यता व निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
0 notes