#रोखता
Explore tagged Tumblr posts
Text
“पुस्तकावर बंदी घालाल, पण लेखकाच्या लेखणीवर रोखता येणार नाही!”, ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’वर भुजबळांची प्रतिक्रिया
“पुस्तकावर बंदी घालाल, पण लेखकाच्या लेखणीवर रोखता येणार नाही!”, ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’वर भुजबळांची प्रतिक्रिया
“पुस्तकावर बंदी घालाल, पण लेखकाच्या लेखणीवर रोखता येणार नाही!”, ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’वर भुजबळांची प्रतिक्रिया नाशिक : एखाद्या पुस्तकावर बंदी घालणं तुलनेनं सोपं असतं.पण त्या लेखकाच्या कल्पनाशक्तीवर आणि त्याच्या लेखणीवर कुणी बंदी घालू शकत नाही. कोबाड गांधी यांनी पुस्तकात काय लिहलं आहे, त्यांचा विचार काय आहे? हे कुणी वाचलं आहे का? ज्यांनी पुरस्कार नाकारला त्यांनी पुस्तक वाचले असेल. त्यात सरकार लक्ष…
View On WordPress
#“पुस���तकावर#&8216;फ्रॅक्चर्ड#आजच्या प्रमुख घडामोडी#घालाल#नाही#पण#प्रतिक्रिया#फ्रीडम’वर#बंदी#बातमी आजची#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#भुजबळांची#येणार?#राजकारण#राजकारण लेटेस्ट#रोखता#लेखकाच्या#लेखणीवर#शासन#सरकार
0 notes
Text
नका सोडू साथ कधी जिवलग मित्राची
स्वास्थ्य कसेही असो गुणगुणत रहाजीवनाचे सदैव परिक्षण करीत रहा नका सोडू साथ कधी जिवलग मित्राचीप्रीतीचा दिपक सदैव प्रज्वलित रहा कार्यें कराया येतात अपुल्या अप्रिय समयीमाना उपकार त्यांचे ,ज्ञात करीत रहा जीवन अपुले सदैव ठेवा अशा प्रतिष्टेमधेगगनालाही अधोभागी झुकवीत रहा मन कुण���चे दुखविण्यात कसला फायदासंपर्क सर्वांचा सदैव ठेवीत रहा वेदना सहन करीत प्रसन्नता ठेवादू:खाच्या समयात हसत रहा रोखता येत नाही…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 12 July 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ जुलै २०२३ सकाळी ७.१० मि.
****
· ऑनलाईन गेमिंगवर २८ टक्के जीएसटी तर सिनेमागृहातले खाद्यपदार्थ तसंच कर्करोगाच्या औषधांवरील करात कपात
· विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीवरची स्थगिती सर्वोच्च न्यायालयानं उठवली
· काँग्रेस पक्षाकडून येत्या सप्टेंबर महिन्यात राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात पदयात्रा
· औरंगाबाद जिल्ह्यात पुरुषांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचं प्रमाण वाढवण्याचे प्रशासनाचे निर्देश
· चौतिसाव्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिंपियाडमध्ये सर्वाधिक सुवर्णपदकं जिंकत भारत अव्वल स्थानी
आणि
· बांग्लादेशासोबत सुरू असलेल्या महिला टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेत दुसरा सामना जिंकून भारताची विजयी आघाडी
****
ऑनलाइन गेमिंगसह अनेक वस्तूंवर वस्तु आणि सेवा कर - जीएसटी लावण्याचा निर्णय जीएसटी परिषदेनं घेतला आहे. नवी दिल्ली इथं काल जीएसटी परिषदेची ५० वी बैठक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यात विविध ���स्तुंवरचा कर वाढवण्यात आला आहे. ऑनलाईन खेळ, घोड्याची शर्यत, कॅसिनो यावर २८ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. मत्स्य तेल काढताना मिळणारे द्रव्य, एलडी स्लॅग, कच्चे किंवा तळलेले, वाळवलेले चिप्स तसंच तत्सम पदार्थ, आणि सिनेमागृहांमध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थावरचा जीएसटी १८ टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आला आहे. जरी धाग्यावरील जीएसटी १२ टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आला आहे. कर्करोगाशी लढणारी औषधं, दुर्मीळ आजारांवरील औषधं, यासह खासगी कंपन्यांच्या उपग्रह प्रक्षेपणाच्या सुविधेला जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे.
राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्रात वस्तू आणि सेवा कराशी निगडीत तक्रारींचा जलद निपटारा करण्यासाठी सात अपिलीय न्यायाधीकरण स्थापनेच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं.
****
छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडेतीनशेव्या राज्यभिषेक दिनाच्या निमित्तानं विशेष स्मारक नाणे काढून त्यामध्ये सोन्याचा वापर करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी, मुनगंटीवार यांनी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यभिषेकाच्यावेळी सोन्याचे, चांदीचे आणि तांब्याचे "होन" काढले होते. या होनाची प्रतिकृती असलेलं विशेष नाणं साडे तीनशेव्या राज्यभिषेक दिनाच्या स्मरणार्थ जारी करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. राज्याच्या या प्रस्तावाबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन सीतारामन यांनी दिल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे.
****
विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीवरची स्थगिती सर्वोच्च न्यायालयानं उठवली आहे. या सदस्यांच्या नियुक्तीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेच्या सुनावणीमुळे, ही नियुक्ती दोन वर्षांपासून होत नव्हती. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारनं बारा आमदारांची यादी दिली होती, त्यावर तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. सरकार बदलल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन यादी पाठवली. या प्रकारात राज्यपालांनी घटनेचं उल्लंघन केल्याचा दावा करत, ठाकरे सरकारची यादीच कायम ठेवावी, अशी मागणी करणाऱ्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. त्यातल्या एका याचिकाकर्त्याला याचिका मागे घेण्याची परवानगी न्यायालयानं दिली, तर दुसऱ्या याचिकाकर्त्याला दाद मागायची असल्यास नव्यानं याचिका दाखल करायला सांगितलं आहे.
****
जम्मू काश्मीरमधून कलम तीनशे सत्तर हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या वीसहून अधिक याचिकांवर, काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या याचिकांवर येत्या दोन ऑगस्टपासून नियमित सुनावणी करणार असल्याचं न्यायालयानं सांगितलं.
****
चालू हंगामात भाताचं उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्यामुळे, भारतीय अन्न महामंडळाकडच्या राखीव तांदळाची विक्री, खुल्या बाजारात ई लिलावाद्वारे करण्याचा निर्णय, केंद्र सरकारनं घेतला आहे. यामुळे तांदळाची किरकोळ दरवाढ रोखता येणं शक्य होणार आहे.
****
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते येत्या सप्टेंबर महिन्यात राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात पदयात्रा काढणार असल्याची माहिती, काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल यांनी दिली. ते काल दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप करत, याविरुद्ध काँग्रेस लढा देत राहील, असा इशारा वेणुगोपाल यांनी यावेळी दिला. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानं निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत काँग्रेस नेत्यांनी या बैठकीत चर्चा केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
रिजर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी काल मुंबईत खाजगी आणि सार्वजनिक ��्षेत्रातल्या बँकांच्या कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. या बैठकीच्या उद्घाटन सत्रात बोलतांना, जागतिक स्तरावर होत असलेल्या काही नकारात्मक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय बँकांनी चांगली कामगिरी केल्याचं त्यांनी सांगितलं. सध्याच्या काळात बँकांनी अधिक सतर्क राहिलं पाहिजे, असंही दास म्हणाले.
****
जगात सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आर्टिफिशियल इंटीलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे, या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही तपास कामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कौशल्यानं वापर करावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत राज्यातल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय अर्ध वार्षिक परिषदेचा काल समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. प्रतिकूल परिस्थितीतही पोलिसांना काम करावंच लागेल, मात्र त्याचवेळी सर्वोत्तमही रहावंच लागेल, आणि त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं गरजेचं आहे, असं मत फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
कोल्हापूर इथल्या चित्रनगरीतली विकास कामं वेगानं मार्गी लावून नूतनीकृत चित्रनगरी मे २०२४ पर्यंत चित्रीकरणासाठी खुली करून द्यावी, असे निर्देश, मुनगंटीवार यांनी दिले आहेत. मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या चित्रनगरीतल्या प्रस्तावित विकास कामात बंगला, चाळ, नवीन वाडा, मंदिर, वसतीगृहं, अद्ययावत रेल्वे स्थानक, दोन नवीन बंदिस्त स्टुडियो अशी चित्रीकरण स्थळं, तसंच अंतर्गत रस्ते, वीज तसंच पाणी पुरवठा, मलनि:स्सारण अशा पायाभूत सुविधांचा समावेश आहे. त्याचबरोबर पर्यटानाला चालना देणारे विविध उपक्रम आणि पर्यटन स्थळंही या चित्रनगरीत विकसित करण्यात येणार आहेत.
****
जी-20 च्या डब्ल्यू-20 उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात, शिरगाव इथं येत्या १५ जुलैला, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत, महिलांसाठी प्रशिक्षण आणि परिषद आयोजित केली आहे. ‘महिला विकासांतर्गत-तळागाळातल्या महिलांचं नेतृत्त्व हा त्याचा मुख्य विषय आहे. ‘डिजिटल मार्केटिंग’ संदर्भातल्या कार्यशाळेचं आयोजन ही यावेळी करण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात पुरुषांचं कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचं प्रमाण अत्यल्प असून, ते वाढवण्याचे प्रयत्न करावेत, असे निर्देश औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी दिले आहेत. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त, राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत, उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि आरोग्य संस्थांचा, मीना यांच्या हस्ते काल गौरव करण्यात ��ला, त्यावेळी ते बोलत होते. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेत शल्यचिकित्सक डॉ.विवेक कांबळे यांना प्रथम, डॉ.सतीश साबळे यांना द्वितीय, आणि डॉ.हश्मी यांना तृतीय क्रमांकाचं बक्षीस देऊन यावेळी गौरवण्यात आलं.
जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त उस्मानाबाद इथं गुणगौरव कार्यक्रम झाला. यावेळी कुटुंब नियोजनासंदर्भात जनजागृती करणाऱ्या सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविकेचा प्रथम पुरस्कार रहिमुन्निसा शब्बीर शेख, द्वितीय क्रमांक डीग्री इथल्या दैवता सोनकांबळे, तर तृतीय पुरस्कार अणदूर इथल्या इंदुबाई कबाडे यांना प्रदान करण्यात आला. एकूण १७ प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प अंतर्गत मानचिन्ह आणि प्रामाणपत्र देवून गौरवण्यात आलं.
****
औरंगाबाद इथल्या आदर्श महिला नागरी सहकारी बँकेत कर्ज प्रकरण घोटाळा उघडकीस आला आहे. यासंदर्भात शहरातल्या सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस तपास करत आहेत. बहुतांश कर्जदारांकडून अपूर्ण स्थितीतले कर्ज मागणी अर्ज स्वीकारल्याचं, कर्जदारांच्या व्यवसायाच्या ठिकाणाची पडताळणी न केल्याचं तसंच बहुतांश कर्ज प्रकरणात तारण न ठेवता कर्ज वाटप केल्याचं निदर्शनास आलं आहे. यामध्ये १०८ कर्जदारांचा सहभाग असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
चौतिसाव्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिंपियाड स्पर्धेत सर्वाधिक सुवर्ण पदकं जिंकत, भारतानं प्रथम स्थान मिळवलं आहे. मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्थेच्या विज्ञान ऑलिंपियाडच्या राष्ट्रीय समन्वयकांनी, ही माहिती दिली. भारताच्या चारही विद्यार्थी स्पर्धकांनी या स्पर्धेत सुवर्णपदकं पटकावली आहे. या स्पर्धकांमध्ये जालन्याचा मेघ छाबडा, बेंगलुरुचा ध्रुव अडानी, कोट्याचा इशान पेडणेकर आणि छत्तीसगढ मधल्या रिसालीचा रोहित पांडा यांचा समावेश आहे. या स्पर्धेत शहात्तर देशांमधल्या दोनशे त्र्याण्णव स्पर्धकांनी भाग घेतला होता. भारतासोबतच सिंगापूरनंही या स्पर्धेत चार सुवर्णपदकं मिळवली असून, भारत पदकतालिकेत प्रथम क्रमांकावर आहे.
****
बांग्लादेशासोबत सुरू असलेल्या महिला टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेत दुसरा सामनाही जिंकून भारतानं विजयी आघाडी घेतली आहे. काल ढाक्यात झालेल्या या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकात आठ बाद ९५ धावा केल्या. ९६ धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेला बांग्लादेशाचा संघ ८७ धावातच तंबूत परतला. या मालिकेतला पहिला सामना भारतानं सात गडी राखून जिंकला होता. तिसरा आणि अंतिम सामना उद्या होणार आहे.
****
विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियाचा जोडीदार मॅथ्यू एब्डेन यांनी उपान्त्यपूर्व फेरीत प्रवे�� केला आहे. काल या जोडीने नेदरलँडचा डेविल पेल आणि अमेरिकेचा रीज स्टॅल्डर या जोडीचा सात - पाच, चार - सहा, सात - सहा असा पराभव केला.
****
आयर्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत रिकर्व्ह प्रकारात २१ वर्षांखालच्या गटात जागतिक विजेतेपद मिळवणारा महाराष्ट्राचा खेळाडू पार्थ साळुंके, याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केलं आहे. त्याचं विजेतेपद हे महाराष्ट्रासह देशासाठी अभिमानास्पद असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
****
रायगड जिल्ह्यातल्या लोणेरे इथलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ आणि औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशन विद्यापीठ, यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. याअंतर्गत दोन्ही विद्यापीठामध्ये तांत्रिक आणि शास्त्रीय ज्ञानाची देवाण घेवाण करण्यात येणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय स्पर्धा परीक्षा अभियानाचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असं आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे. या अभियानातून केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या, तसंच सरळ सेवा परिक्षांच्या संदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण पूर्णपणे नि:शुल्क असून, यासाठी कोणतीही प्रवेश परीक्षा नाही. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी नांदेड डॉट स्पर्धा मिशन डॉट कॉम या लिंकवरून अर्ज करावेत, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
दिव्यांगांसाठीच्या यावर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी दिव्यांगजन सशक्तीकरण विभागानं अर्ज मागवले आहेत. यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट अवॉर्ड्स डॉट जीओव्ही डॉट इन या पोर्टलवर केलेले ऑनलाईन अर्जच विचारात घेतले जाणार असून, या पोर्टलवर अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस जुलै ही असल्याचं औरंगाबाद जिल्ह्याच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांनी कळवलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर इथल्या तुळजाभवानी दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात शासन मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येत आहेत. अठरा ते चाळीस वर्षं वयोगटातल्या दिव्यांग, मूकबधीर तसंच मतिमंद व्यक्ती यासाठी प्रवेश घेऊ शकतात. या संस्थेत प्रवेश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची निवास आणि जेवणाची सोय विनामूल्य करण्यात येते. यासाठी इच्छुक असलेल्यांनी येत्या एकतीस तारखेपर्यंत या केंद्राशी संपर्क करावा, असं आवाहन तुळजा भवानी दिव्यांग प्रशिक्षण केंद्राच्या कर्मशाळा अधीक्षकांनी केलं आहे.
****
पूर्णा ते तिरुपती विशेष रेल्वेगाडी काही दिवस अंशत: रद्द करण्यात आली आहे. तिरुपती रेल्वे स्थानकावर काम सुरू असल्यानं, पूर्णा-तिरुपती विशेष गाडी येत्या ���७, २४, ३१ जुलै आणि सात ऑगस्ट या दिवशी रेणीगुंठ्यापर्यंतच धावणार असून, रेणीगुंठा ते तिरुपती दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे. तर, तिरुपती-पूर्णा विशेष गाडी येत्या १८, २५ जुलै तसंच एक आणि आठ ऑगस्टला रेणीगुंठ्याहून सुटणार असून, तिरुपती ते रेणीगुंठा दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे.
****
केंद्र सरकार पुरस्कृत ‘नव साक्षरता कार्यक्रमांतर्गत’ औरंगाबाद जिल्ह्यातल्या, १५ वर्षांहून अधिक वयोगटातल्या निरक्षरांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे. उद्यापासून या सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे.
****
नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत येणारे शैक्षणिक प्रवाह तसेच इतर शिक्षणाच्या संधी याची माहिती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी असं आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य देविदास पाठक यांनी केलं आहे. पाठक यांनी काल लोहारा आणि उमरगा तालुक्यातल्या महाविद्यालयांना सदिच्छा भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.
****
0 notes
Text
ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी कृषिउद्योगांची महत्त्वाची भूमिका - पालकमंत्री चंद्रकांत पाटील - महासंवाद
ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी कृषिउद्योगांची महत्त्वाची भूमिका – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
पुणे दि.१५- शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविल्याशिवाय त्यांना शहराकडे जाण्यापासून रोखता येणार नाही. त्यादृष्टीने प्रयत्न करताना ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी कृषिउद्योगांची महत्वाची भूमिका आहे, असे प्रतिपादन राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था, पुणे येथे आयोजित कृषिउद्योगांच्या मुख्य कार्यकारी…
View On WordPress
0 notes
Text
VIDEO: पोलिसांना हवे असते तर भूकंप रोखता आला असता! त्या व्यक्तीचा आरोप ऐकून तुमची तारांबळ उडेल.
VIDEO: पोलिसांना हवे असते तर भूकंप रोखता आला असता! त्या व्यक्तीचा आरोप ऐकून तुमची तारांबळ उडेल.
हा मजेदार व्हिडिओ यूपी पोलिसात कार्यरत सचिन कौशिकने त्याच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘पोलिसांनी भूकंप थांबवावा…’. अवघ्या 53 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाख 17 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तो माणूस म्हणाला – पोलिसांचे काम भूकंप थांबवणे आहे प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter भूकंप एक नैसर्गिक आपत्ती होय, तुम्हा सर्वांना हे माहित असणे आवश्यक आहे. हे…
View On WordPress
0 notes
Text
वनसंरक्षण व संवर्धन ही काळाची गरज
वनसंरक्षण व संवर्धन ही काळाची गरज
संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगात चारशे वर्षांपूर्वी समाजाला “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” असा संदेश दिला असून यातूनच सर्वांचे हित आहे. सर्वांचे भवितव्य सुधारेल आणि जीवन सुलभही होईल. आपल्यासाठी आणि आपल्या भावी पिढीसाठी प्रत्येकाने एक झाड लावून त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील असायला हवे. यामुळे आपल्या राज्यावर येणारी अनेक नैसर्गिक संकटे रोखता येतील आणि शाश्वत विकासही प्रत्यक्षात साधता…
View On WordPress
0 notes
Text
Mahila Ayog : महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी जनचळवळ उभारू – महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर
#Mahila_Ayog : महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी जनचळवळ उभारू – महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर #Gadchiroli #Mumbai #ChakankarSpeaks #Pune #Maharashtra
Mahila Ayog : गडचिरोली, (जिमाका) दि.10 : शासन, प्रशासन, पोलीस प्रशासन व महिलांच्या विषयासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांच्याकडून महिलांवरील अत्याचार रोखता येतील. यासाठी फक्त जनजागृती व लोकप्रतिनिधींनी जनचळवळ उभी करणे अपेक्षित असल्याचे मत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी गडचिरोली येथे व्यक्त केले.महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने महिलांना त्यांच्या तक्रारीबाबत…
View On WordPress
0 notes
Text
कृषी पद्धतींद्वारे वनस्पतींचे रोग कसे रोखता येतील?
कृषी पद्धतींद्वारे वनस्पतींचे रोग कसे रोखता येतील?
वनस्पती कीटक शेतीमध्ये, रोग आणि कीटकांमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करणे आवश्यक आहे. अनेक सुधारित कृषी पद्धती किंवा कृषी पद्धती आहेत, ज्याचा अवलंब करून पिकाच्या विविध रोगांची संख्या आणि त्यांच्यामुळे होणारे नुकसान कमी करता येते. या क्रियांचा मुख्य हेतू यजमान वनस्पतीची वाढ आणि परिस्थिती सुधारणे आहे, जेणेकरून ते रोगाच्या घटकास प्रतिकूल होईल. एकात्मिक शेती पद्धती वापरून रोगावर प्रभावीपणे…
View On WordPress
0 notes
Text
Mikhail Gorbachev: शीत युद्धाचा शेवट करणाऱ्या मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे निधन
Mikhail Gorbachev: शीत युद्धाचा शेवट करणाऱ्या मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे निधन
Mikhail Gorbachev: शीत युद्धाचा शेवट करणाऱ्या मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे निधन Mikhail Gorbachev: शीत युद्ध रोखण्यात यश आलेल्या मिखाईल गोर्बाचेव्ह यांना सोवियत संघाचे पतन मात्र रोखता आले नाही. Mikhail Gorbachev: शीत युद्ध रोखण्यात यश आलेल्या मिखाईल गोर्बाचेव्ह यांना सोवियत संघाचे पतन मात्र रोखता आले नाही. Go to Source
View On WordPress
#gorbachev:#mikhail#आंतर राष्ट्रीय मराठी बातम्या#आंतरराष्ट्रीय#आंतरराष्ट्रीय बातम्या#करणाऱ्या#गोर्बाचेव्ह#निधन#भारत लाईव्ह मीडिया इंटरनेशनल#मराठी वल्ड न्यूज#मिखाईल#यांचे#युद्धाचा#वैश्विक बातम्या#शीत#शेवट
0 notes
Text
कोकणात जाणाऱ्या प्रत्येकाची आरटीपीसीआर टेस्ट करणं बंधनकारक करा
कोकणात जाणाऱ्या प्रत्येकाची आरटीपीसीआर टेस्ट करणं बंधनकारक करा
खासदार विनायक राऊत यांची मागणी मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी सावध राहावे. सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. तेव्हाच कोरोना रोखता येईल. तसेच या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रत्येकांची आरटीपीसीआर टेस्ट करणं बंधनकारक करावं. यासाठी विशेष मोहिम राबवावी, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. प्रत्येकांची आरटीपीसीआर टेस्ट करणं…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 11 July 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ११ जुलै २०२३ सायंकाळी ६.१०
****
विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीवरची स्थगिती सर्वोच्च न्यायालयानं उठवली.
अयोध्येतल्या नव्या श्री राम मंदिरात येत्या पंधरा ते चोवीस जानेवारी दरम्यान श्रीराममूर्तीची स्थापना.
चौतिसाव्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिंपियाड स्पर्धेत सर्वाधिक सुवर्णपदकं जिंकत भारत अव्वल स्थानी.
आणि
औरंगाबाद जिल्ह्यात पुरुषांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचं प्रमाण वाढवण्याचे प्रशासनाचे निर्देश.
****
महाराष्ट्र विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीवरची स्थगिती सर्वोच्च न्यायालयानं उठवली आहे. या सदस्यांच्या नियुक्तीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेच्या सुनावणीमुळे ही नियुक्ती दोन वर्षांपासून होत नव्हती. न्यायालयाच्या आजच्या या निर्णयामुळे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारनं बारा आमदारांची यादी दिली होती, त्यावर तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. सरकार बदलल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन यादी पाठवली. या प्रकारात राज्यपालांनी घटनेचं उल्लंघन केल्याचा दावा करत, ठाकरे सरकारची यादीच कायम ठेवावी, अशी मागणी करणाऱ्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. त्यातल्या एका याचिकाकर्त्याला याचिका मागे घेण्याची परवानगी न्यायालयानं दिली, तर दुसऱ्या याचिकाकर्त्याला दाद मागायची असल्यास नव्यानं याचिका दाखल करायला सांगितलं.
****
जम्मू काश्मीरमधून कलम तीनशे सत्तर हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या वीसहून जास्त याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या याचिकांवर येत्या दोन ऑगस्टपासून नियमित सुनावणी करणार असल्याचं न्यायालयानं आज सांगितलं. आजच्या सुनावणीआधी एक दिवस, म्हणजे काल, केंद्र सरकारनं यासंदर्भात नव्यानं प्रतिज्ञापत्र दाखल केलं असून, जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दशकांपासून सुरू असलेला दहशतवाद संपवण्यासाठी कलम ३७० हटवणं, हा एकमेव मार्ग होता, असं म्हटलं आहे.
****
अयोध्येतल्या नव्या श्री राम मंदिरात येत्या पंधरा ते चोवीस जानेवारी दरम्यान भगवान श्रीरामांची मूर्ती स्थापन केली जाईल, अशी माहिती श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे महासचिव चंपत रॉय यांनी दिली आहे. मंदिराच्या तळमजल्याचं बांधकाम येत्या ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार असून इतर कामं येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मंदिरात भगवान श्रीरामांची मूर्ती पाच वर्षांच्या बालकाच्या स्वरूपात स्थापन केली जाणार अस���न मंदिराच्या तळमजल्यावर राम दरबार स्थापित केला जाईल, असंही रॉय यांनी सांगितलं. पुढची अनेक शतकं देखभालीची आवश्यकता भासू नये, अशा रीतीनं मंदिराची निर्मिती होत असल्याचं रॉय यांनी सांगितलं.
****
चालू हंगामात भाताचं उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्यामुळे भारतीय अन्न महामंडळाकडच्या राखीव तांदळाची विक्री खुल्या बाजारात ई लिलावाद्वारे करायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक पुरवठा खात्याचे सचिव संजीव चोपडा यांनी ही माहिती दिली आहे. व्यापक जनहिताच्या दृष्टीनं हा निर्णय घेतला असून यामुळे तांदुळाची किरकोळ दरवाढ रोखता येईल, असं ते म्हणाले. सध्या महामंडळाकडे पुरेसा तांदूळ असल्याचं त्यांनी सांगितलं. या निर्णयानुसार, चालू हंगामातला तिसरा ई लिलाव उद्या सुरू होणार आहे.
****
काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते येत्या सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात पदयात्रा काढणार असल्याची माहिती काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल यांनी दिली आहे.ते आज दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांसोबत आज एक बैठक केल्याचं, तसंच या बैठकीला राहुल गांधीही उपस्थित असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप करत, याविरुद्ध काँग्रेस लढा देत राहील, असं प्रतिपादन वेणुगोपाल यांनी यावेळी केलं. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानं निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत काँग्रेस नेत्यांनी आजच्या बैठकीत चर्चा केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
आयर्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत रिकर्व्ह प्रकारात २१ वर्षांखालच्या गटात जागतिक विजेतेपद मिळवणारा महाराष्ट्राचा खेळाडू पार्थ साळुंके याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केलं आहे. त्याचं विजेतेपद हे महाराष्ट्रासह देशासाठी अभिमानास्पद आहे, अशा शब्दात त्याचं अभिनंदन करत मुख्यमंत्र्यांनी पार्थला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
****
चौतिसाव्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिंपियाड स्पर्धेत सर्वाधिक सुवर्णपदकं जिंकत भारतानं प्रथम स्थान मिळवलं आहे. मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्थेच्या विज्ञान ऑलिंपियाडच्या राष्ट्रीय समन्वयकांनी ही माहिती दिली आहे. भारताच्या चारही विद्यार्थी स्पर्धकांनी या स्पर्धेत सुवर्णपदकं पटकावली. या स्पर्धकांमध्ये जालन्याचा मेघ छाबडा, बेंगलुरुचा ध्रुव अडानी, कोट्याचा इशान पेडणेकर आणि रिसालीचा रोहित पांडा यांचा समावेश आहे. संयुक्त अरब अमिरातीत ऐन शहरात तीन जुलैपासून सुरू असलेल्या या स्पर्धेचा आज समारोप झाला. या स्पर्धेत शहात्तर देशांमधल्या दोनशे त्र्याण्णव स्पर्धकांनी भाग घेतला होता. भारतासोबतच सिंगापूरनंही या स्पर्धेत चार सुवर्णपदकं मिळवली असून, भारत पदकतालिकेत प्रथम क्रमांकावर आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात पुरुषांचं कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचं प्रमाण अत्यल्प असून ते वाढवण्याचे प्रयत्न करावेत, असे निर्देश औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी दिले आहेत. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त, राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि आरोग्य संस्थांचा मीना यांच्या हस्ते आज गौरव करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेत शल्यचिकित्सक डॉ.विवेक कांबळे यांना प्रथम डॉ.सतीश साबळे यांना द्वितीय आणि डॉ.हश्मी यांना तृतीय क्रमांकाचं बक्षीस देऊन यावेळी गौरवण्यात आलं. राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रम आणि मासिक पाळीमधील स्वच्छतेविषयक योजना, यासंदर्भात यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली.
****
नांदेड जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय स्पर्धा परीक्षा अभियानाचा लाभ नांदेड जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी घ्यावा, असं आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे. या अभियानातून केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या तसंच सरळ सेवा परिक्षांच्या संदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण पूर्णपणे नि:शुल्क असून यासाठी कोणतीही प्रवेश परिक्षा नाही. या उपक्रमात राज्यातले तज्ज्ञ प्राध्यापक विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं मार्गदर्शन करतील. या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी nanded.spardhamission.com या लिंकवरून अर्ज करावेत, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
दिव्यांगांसाठीच्या यावर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी दिव्यांगजन सशक्तीकरण विभागानं अर्ज मागवले आहेत. यासाठी www.awards.gov.in या पोर्टलवर केलेले ऑनलाईन अर्जच विचारात घेतले जाणार असून, या पोर्टलवर अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस जुलै ही असल्याचं औरंगाबाद जिल्ह्याच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांनी कळवलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर इथल्या तुळजा भवानी दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात शासन मान्यताप्राप्�� अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येत आहेत. अठरा ते चाळीस वर्षं वयोगटातल्या दिव्यांग, मूकबधीर तसंच मतिमंद व्यक्ती यासाठी प्रवेश घेऊ शकतात. या संस्थेत प्रवेश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची निवास आणि जेवणाची सोय विनामूल्य करण्यात येते.
****
0 notes
Text
AIMIM नेते ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीवर पुष्प अर्पण केल्याचा मुद्दा तापला, आता अभिनेत्री रवीना टंडनची पोस्ट आली चर्चेत
AIMIM नेते ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीवर पुष्प अर्पण केल्याचा मुद्दा तापला, आता अभिनेत्री रवीना टंडनची पोस्ट आली चर्चेत
रवीना टंडन अकबरुद्दीन ओवेसी (फाइल फोटो) अभिनेत्री म्हणाली, ‘देशातील प्रत्येकाला त्याने कोणाची पूजा करावी, कोणाची करू नये याचे स्वातंत्र्य आहे. जर प्रत्येकाला हा अधिकार मिळाला असेल तर ते करण्यापासून कोणालाही रोखता येणार नाही. कारण आपण सहनशील लोक आहोत. AIMIM आमदार अकबरुद्दीन ओवेसी (अकबरुद्दीन ओवेसी AIMIM) गुरुवारी महाराष्ट्रातील औरंगाबाद दौऱ्यावर होते. आपल्याच पक्षाचे इम्तियाज जलील आणि वारिस पठाण…
View On WordPress
0 notes
Text
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी जनचळवळ उभारू – महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर - महासंवाद
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी जनचळवळ उभारू – महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर – महासंवाद
गडचिरोलीत पहिल्यांदाच महिला आयोगाकडून जनसुनावणी महाराष्ट्र हा महिलांसाठी सुरक्षित करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज गडचिरोली, (जिमाका) दि.10 : शासन, प्रशासन, पोलीस प्रशासन व महिलांच्या विषयासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांच्याकडून महिलांवरील अत्याचार रोखता येतील. यासाठी फक्त जनजागृती व लोकप्रतिनिधींनी जनचळवळ उभी करणे अपेक्षित असल्याचे मत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली…
View On WordPress
0 notes
Text
prevention of bird flu: बर्ड फ्लू: राज्यात आतापर्यंत एकूण ७२ हजार कोंबड्या केल्या नष्ट - as many as 70 thousand chickens destroyed in the state for prevention of bird flu
prevention of bird flu: बर्ड फ्लू: राज्यात आतापर्यंत एकूण ७२ हजार कोंबड्या केल्या नष्ट – as many as 70 thousand chickens destroyed in the state for prevention of bird flu
हायलाइट्स: ‘बर्ड फ्लू’चा संसर्ग रोखता यावा यासाठी राज्यभरात आतापर्यंत बाधित क्षेत्रातील ७२ हजार कोंबड्या नष्ट करण्यात आल्याची माहिती राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने दिली आहे. नष्ट केलेल्या कोंबडय़ांसाठी शासनाकडून मदत दिली जात असल्याचेही विभागाने सांगितले. ८ जानेवारीपासून आतापर्यंत २०,१९८ विविध पक्ष्यांचा ‘बर्ड फ्लू’मुळे मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे. नागपूर: ‘बर्ड फ्लू’चा…
View On WordPress
0 notes
Text
बिहार मी कृशी आधारीत उद्घोग की सन्भवनाये
बिहार मी कृशी आधारीत उद्घोग की सन्भवनाये
बिहार मी कृशी आधारीत उद्घोग की सन्भवनाये बहुतांश कृषी उत्पादने गावांमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे खेड्यांमध्ये शेतमालावर आधारित उपक्रमाचा विकास सुनिश्चित झाला पाहिजे. कृषी उत्पादनात वाढ होण्याबरोबरच गावातील बेरोजगार ग्रामीण तरुणांना नवीन उद्योग उभारण्यासाठी प्रेरित करणे देखील आवश्यक आहे. अशा प्रयत्नांमुळे बेरोजगार गावक of्यांचे गावोगावी होणारे स्थलांतर रोखता येईल आणि अलगाव व इतर सामाजिक…
View On WordPress
0 notes
Text
प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची मोठी घोषणा; इलेक्ट्रिक वाहनांबाबत 'हा' निर्णय
प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची मोठी घोषणा; इलेक्ट्रिक वाहनांबाबत ‘हा’ निर्णय
प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची मोठी घोषणा; इलेक्ट्रिक वाहनांबाबत ‘हा’ निर्णय मुंबई: पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे होणारे रोखता यावे यासाठी राज्याचे यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील सर्व सरकारी वाहने इलेक्ट्रीक असणार आहेत. येत्या १ एप्रिलपासून हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. (Environment Minister has…
View On WordPress
0 notes