#यवतमाळ
Explore tagged Tumblr posts
Text
महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या दिवाळी भव्यतम सोडतीचा निकाल जाहीर - महासंवाद
मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र राज्य लॉटरीची दिवाळी भव्यतम सोडत १२ नोव्हेंबर २०२४ रोजी उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी यांचे कार्यालयात काढण्यात आली. पहिले (सामायिक) बक्षिस रूपये एक कोटी न्यू जय अंबे लॉटरी भंडार, यवतमाळ येथील खरेदीदारास लागले असल्याचे उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी यांनी कळवले आहे. या सोडतीच्या कार्यक्रमासाठी वित्त (लेखा व कोषागारे) विभागाचे सचिव डॉ.…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 November 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
विधानसभा निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर-राहुल गांधी यांची नांदेड इथं प्रचारसभा-प्रशासनाकडून चोख बंदोबस्त
कोणत्याही आरोपीची मालमत्ता नष्ट करून शिक्षा देण्याचा सरकारला अधिकार नाही-सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
कोचिंग संस्थांनी अभ्यासक्रम तसंच विद्यार्थ्यांशी संबंधित खरी माहिती जाहीर करण्याचे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाचे निर्देश
तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ११ धावांनी विजय
आणि
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात काल संध्याकाळी भूकंपाचे सौम्य धक्के
****
विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणेसह सर्वच व्यवस्थेवर प्रशासनाची करडी नजर आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातल्या महायुतीच्या उमेदवारांसाठी चिकलठाणा इथं सभा होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आज नवी मुंबई आणि मुंबईतही सभा होणार आहेत. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज दुपारी नंदूरबार इथं आणि त्यानंतर नांदेडमध्ये प्रचारसभेला संबोधित करतील.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होणार आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर यांच्याही छत्रपती संभाजीनगरसह कन्नड, वैजापूर, गंगापूर इथं प्रचारसभा होणार आहेत.
समाजवादी पार्टीचे औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे उमेदवार डॉ अब्दुल गफार कादरी यांच्या प्रचारार्थ पक्षाचे नेते इकरा हसन, आणि अन्य पदाधिकारी आज शहरात दाखल होत आहेत.
****
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल परभणी जिल्ह्यात जिंतूर इथं महायुतीच्या उमेदवार मे��ना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर नेण्याचं काम फक्त महायुतीचं सरकार करू शकतं, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहा यांनी काल राज्यात जळगाव, तसंच दोंडाईचा इथंही सभा घेतल्या. उद्या ते हिंगोलीत प्रचार सभा घेणार आहेत.
****
शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल पालघर इथे राजेंद्र गावीत यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची काल वाशीम जिल्ह्यात पोहरादेवी इथं प्रचार सभा झाली. यावेळी योगी यांच्या उपस्थितीत पोहरादेवी इथले महंत सुनील महाराज राठोड यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केला.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतले भाजपा - महायुतीचे उमेदवार डॉक्टर संतुकराव हंबर्डे आणि भोकर विधानसभेसाठीच्या उमेदवार श्रीजया चव्हाण यांच्या प्रचारासाठी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल भोकर इथं सभा घेतली, तर भाजप नेते केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी काल लातूर इथं भाजप उमेदवार डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्या प्रच���रार्थ सभा घेतली.
भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड इथं, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी काल बीड इथं प्रचार सभा घेतली.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची काल लातूर इथं प्रचार सभा झाली. शेतकरी आत्महत्येच्या मुद्यावर बोलतांना, भाजपानं मतदारांना दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत, अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी केळापूरचे मविआ उमेदवार जितेंद्र मोघे यांच्या प्रचारासाठी घाटंजी इथे सभा घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, कणकवली आणि मालवण इथं जाहीर सभा घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात राहता तसंच राहुरी विधानसभा मतदारसंघात वांबोरी इथं प्रचार सभा घेतल्या.
****
विधानसभेची निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगानं माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात विशेष मुलाखतींचं प्रसारण होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. काल सकाळी प्रसारित झालेल्यामुलाखतीत राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर पूर्णपणे सुरक्षित असून सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केल्याचं सांगितलं.
‘‘आपल्या देशातली सर्वोच्च न्यायव्यवस्था म्हणजे सर्वोच्च न्यायालय आहे. त्यांच्याकडे ई व्ही एम बद्दल च्या चाळीस केसेस आत्तापर्यंत झालेल्या आणि वेगळ्या वेगळ्या पैलूंवरती त्या केसेस होत्या. सुप्रीम कोर्टाने तांत्रिक तज्ञांच्या मदतीने आणि कायद्याच्या मदतीने या केसेसचा निकाल दिलेला आहे. आणि या चाळीसही केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ई व्ही एम टँपर करता येत नाही. त्याचा वापर योग्य आहे. आणि झालेलं मतदान ते योग्य पद्धतीने दाखवतं. त्यामुळे सर्वोच्च न्याय व्यवस्थेनं प्रशस्तीपत्र दिलेलं आहे. मतदारांनी स्वीकारलेलं आहे. त्याच ई व्ही एम चा वापर आपण महाराष्ट्रामध्ये करणार आहोत.’’
दरम्यान, या सदरात येत्या शनिवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांची, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या वृत्त विभागाचे प्रमुख समरजीत ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित होणार आहे.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज सोलापूर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
हिंगोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी हिंगोली जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरळीत होण्यासाठी पोलीस यंत्रणेनं केलेल्या तयारीची माहिती दिली तसंच मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं, ते म्हणाले…
‘‘लोकशाहीच्या या उत्सवात आपण सर्वांनी सहभागी व्हावं यासाठी प्रशासन तयार असून, आपल्याला बाहेरून चार कंपनीज् आणि मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ मिळालेलं आहे. निष्पक्षपणे मतदान करता यावं यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे. आपल्याला आपला अधिकार निष्पक्षतेने, निर्भयतेने बजावता यावा यासाठी आम्ही सज्ज आहोत. आपण सुद्धा आपल्या अधिकाराचा वापर करावा.’’
****
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती आज बालदिन म्हणून साजरी होत आहे. यानिमित्त पंडित नेहरु यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबतच्या वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात काल सुनावणी झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची छायाचित्रं तसंच चित्रफिती न वापरण्याच्या सूचना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कायकर्त्यांना देण्यात याव्यात, असं न्यायालयानं काल सांगितलं. या प्रकरणी पुढील सुनावणी पुढच्या आठवडयात होणार आहे.
****
कोणत्याही आरोपीची मालमत्ता नष्ट करून शिक्षा देण्याचा अधिकार सरकारला नाही, असा निर्��ाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. सरकारकडून अशा प्रकारे मालमत्ता पाडल्या जाण्याबाबत न्यायालयानं मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. पाडकाम करण्याआधी आरोपीला कारणे दाखवा नोटीस बजवावी, असं न्यायालयानं म्हटलं असून, या नोटीशीवर आरोपीनं पंधरा दिवसांच्या आत किंवा स्थानिक प्रशासनानं घालून दिलेल्या कालमर्यादेत उत्तर देणं अपेक्षित आहे. कायदेशीर प्रक्रियेशिवाय अशी कारवाई केल्यास ती सरकारची मनमानी समजली जाईल, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
सर्व कोचिंग संस्थांनी आपले अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांशी संबंधित खरी माहिती जाहीर केली पाहिजे, असे निर्देश केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं दिले आहेत. कोचिंग संस्थांच्या भ्रामक किंवा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या विरोधात या प्राधिकरणाच्या सचिव निधी खरे यांनी काल नियमावली जारी केली. विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी राष्ट्रीय ग्राहक मदतवाहिनी सुरू केल्यापासून अशा संस्थांकडून विद्यार्थ्यांना एक कोटी रुपयांहून जास्त रक्कम परत मिळाल्याचंही खरे यांनी सांगितलं.
****
दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत काल तिलक वर्माच्या नाबाद शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघानं यजमान संघाचा ११ धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिका संघानं नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी बोलावलं, भारतानं निर्धारित षटकांत सहा बाद २१९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळण्यास उतरलेला यजमान संघ सात गड्यांच्या मोबदल्यात २०८ धावाच करू शकला. नाबाद १०७ धावा करणारा तिलक वर्मा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. मालिकेतला चौथा सामना उद्या होणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातल्या अनेक भागात काल संध्याकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. संध्याकाळी सात वाजून २२ मिनिटांनी कुरुंदा, पांगरा, कवठा, डोणवाडा, आंबा, कोठारी, वर्ताळा आदींसह इतर गावांना लागोपाठ दोन भूकंपाचे सौम्य धक्के बसले. वसमत तालुका प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.
****
निवडणूक आचारसंहिता काळात विधानसभा किंवा विधान परिषदेच्या सदस्यांना स्थानिक विकास निधी नव्याने दिला जाणार नाही, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी दिली. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी एखाद्या कामाचे कार्यादेश देण्यात आले असतील आणि प्रत्यक्ष काम सुरू झालं नसेल, अशा ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काम करण्यात यावं, पण, निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काम सुरू झालं असेल तर ते पुढे सुरू ठेवता येईल, असंही चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केलं.
****
लातूर ग्रामीण मतदारसंघात सोमवारी पार पडल��ल्या गृहमतदानाच्या पहिल्या फेरीत ९४ टक्के मतदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. उदगीर आणि निलंगा विधानसभा मतदारसंघात आज गृह मतदान प्रक्रियेस सुरुवात होणार आहे तर, लातूर शहर आणि औसा विधानसभा मतदारसंघात उद्या, १५ नोव्हेंबरपासून गृह मतदान सुरू होईल.
****
0 notes
Text
0 notes
Text
0 notes
Text
0 notes
Text
पुणे ते यवतमाळ या खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसला सिंदखेड राजा नजीक अपघात…
सकाळी सहाच्या सुमारास घडला अपघात…. अपघातात 18 प्रवासी जखमी, लहान बाळाची प्रकृती चिंताजनक… अपघातातील जखमींना जालन्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे… A private travel bus from Pune to Yavatmal met with an accident near Sindkhed Raja. जालना: पुणे ते यवतमाळ या खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसला सिंदखेड राजा नजीक अपघात झालाय. आज सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली असून यात 18 प्रवासी जखमी…
View On WordPress
0 notes
Video
youtube
यवतमाळ वाशिम मधून संजय देशमुख आघाडीवर..
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/hingoli-yavatmal-washim-chhatrapati-sambhajinagar-lok-sabha-seat-allotment-results-will-be-announced-tonight/
0 notes
Text
यवतमाळात मतदार जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची भव्य मानवी साखळी - महासंवाद
शहरातील १ हजार ५०० विद्यार्थ्यांचा सहभाग; प्रा.एकबोटे यांच्या जनजागृती गिताचे विमोचन यवतमाळ, दि.16 (जिमाका) : मतदार जनजागृतीसाठी यवतमाळ विधानसभा मतदासंघाच्यावतीने विद्यार्थ्यांची भव्य मानवी साखळी तयार करून प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, असा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमात शहरातील एक हजार ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी उत्फूर्तपणे सहभागी झाले होते. यवतमाळचे निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ देशपांडे…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 12 November 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आज राज्यात विविध ठिकाणी प्रचार सभा • स्वीप या मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत राज्यात ठिकठिकाणी चित्ररथ रवाना, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध उपक्रम • कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं मुख्य शासकीय महापूजा, ठिकठिकाणच्या विठ्ठल मंदीरांमध्ये भाविकांची गर्दी आणि • महिला आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत सलामीच्या सामन्यात भारताचा मलेशियावर चार - शून्य असा विजय
भाजपाचे ज्येष्ठ नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज राज्यात चिमुर, सोलापूर आणि पुणे इथं प्रचारसभा होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईतल्या दोन सभांना संबोधित करतील. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी हे चिखली आणि गोंदिया मतदारसंघातल्या काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत.
निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार संजना जाधव, तर वैजापूर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रमेश बोरनारे यांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. वैजापूर इथल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी, लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं आपली ताकद दाखवून दिली असून, विधानसभा निवडणुकीत विक्रमी यश मिळवू, असा विश्वास व्यक्त केला. “लोकसभेत आपण त्यांना त्यांची जागा दाखवली. आपला धनुष्यबाण आणि शिवसेना यांनी लोकसभेत त्यांच्यापेक्षा दोन लाख सात हजार मतं जास्त घेतली. स्ट्राईक रेट आपला वाढला. व्होट शेअर आपला वाढला. आणि म्हणून या विधानसभेमध्ये आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे.’’
त्यानंतर जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी इथं घेतलेल्या प्रचारसभेत शिंदे यांनी, मराठवाडा आणि दुष्काळ हे दोन शब्द आपल्याला वेगळे करायचे असून, विकासाच्या माध्यमातून मराठवाड्याला न्याय द्यायचा असल्याचं सांगितलं. महायुतीच्या द���ासूत्री कार्यक्रमाचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. जालना इथल्या आझाद मैदानावर महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांच्या प्रचारार्थ शिंदे यांची सभा झाली.
निवडणुकीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीने काल पत्रकार परिषद घेण्यात आली. खासदार डॉ. भागवत कराड, औरंगाबाद पूर्व मतदार संघाचे उमेदवार अतुल सावे यांनी महायुतीच्या काळात शहरात झालेल्या विकासात्मक कार्याची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या १४ तारखेला चिकलठाणा इथं सभा होणार असल्याची माहिती कराड यांनी यावेळी दिली. औरंगाबाद मध्यचे महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचारार्थ काल काढण्यात आलेल्या रॅलीत अभिनेते गोविंदा सहभागी झाले होते. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांनी काल वेंदात नगर, कबीर नगर, एकनाथ नगर, हमाल वाडी, राहूल नगर, बाला नगर परिसरात परिवर्तन पदयात्रा काढली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल यवतमाळ जिल्ह्यात वणी मतदारसंघात प्रचारसभा घेतली. जुनी पेन्शन आणि सार्वत्रिक मोफत शिक्षण लागू करण्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. ज्या काही गोष्टी आपण देऊ इच्छित आहोत, जसं महिलांना सुरक्षा म्हणजे प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रमध्ये पोलीस स्टेशन एक वेगळं महिलांसाठी महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस शिपाई असलेलं पोलीस स्टेशन आपण उभारणार आहोत. शेतकऱ्यांचं नुकसान होऊ न देता जे जीवनावश्यक पाच वस्तू आहेत मग त्याच्यामध्ये गहू आला, तांदूळ आला, साखर, तेल, डाळ या जीवनावश्यक वस्तूंचे भाव आपण पुढची पाच वर्ष हे स्थिर ठेऊन दाखवणार. त्याच्यानंतर ज्याप्रमाणे मुलींना मोफत शिक्षण दिलं जातं तसंच मोफत शिक्षण मी माझ्या महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलांना सुद्धा देणार आहे.
धाराशिव इथं तुळजापूर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत महायुती सरकारने राबवलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र ओबीसी सेनेनं शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत संघटने��े अध्यक्ष शरद भोवर यांनी ही माहिती दिली.
केंद्रीय संचार ब्यूरो तर्फे राज्यातल्या १४ जिल्ह्यात कालपासून मतदार जागृती अभियान सुरु करण्यात आलं आहे. मतदारांना खात्रीने मतदान करण्याचं आवाहन करत शहर आणि ग्रामीण भागात दहा दिवस हा प्रचार रथ फिरणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून हा चित्ररथ रवाना करण्यात आला. मतदानाची टक्केवारी ७५ ते ८० टक्क्यापर्यंत वाढवण्यासाठी या चित्ररथाचा उपयोग होईल, असं जिल्हाधिकारी म्हणाले. “आपल्या जिल्हाभरामध्ये मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी या रथाचं आजपासून आपण प्रारंभ करत आहोत. आणि एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी आपल्याला हा कार्यक्रम राबवायचा आहे. आपल्या जिल्ह्यातल्या विशेषतः शहरातल्या मतदानाची टक्केवारी अतिशय चिंताजनक आहे. आणि भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाला ही चिंता वाटली पाहिजे की या पद्धतीने जर मतदानाची टक्केवारी कमी होत गेली तर लोकशाहीला धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.’’ केंद्रीय संचार ब्युरोचे सहायक संचालक माधव जायभाये यांच्यासह जिल्ह्याचे मतदान जनजागृती विषयी आयकॉन असलेले प्रेषित रुद्रवार, अर्चना गायकवाड, श्रेयस यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
नांदेड विधानसभा मतदार संघातल्या गावामध्येही एलईडी व्हॅनद्वारे मतदार जनजागृती करण्यात येणार असून, या व्हॅनचं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, केंद्रीय संचार ब्युरोचे सुमीत डोडल उपस्थित होते. जिल्ह्यात मागील निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी कमी मतदान झालं आहे, त्याठिकाणी या व्हॅनद्वारे मतदार जनजागृती करण्यात येईल, असं जिल्हाधिकारी म्हणाले.
धाराशिव इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं मतदार जनजागृती यात्रेचा काल प्रारंभ झाला. मतदारांना मतदानाचं महत्त्व सांगून मतदान करण्याचं आवाहन या यात्रेतून करण्यात येणार आहे. जिल्ह्यातल्या पाच तालुक्यातल्या ५० गावांमधून जवळपास एक लाख मतदारांपर्यंत ही यात्रा पोहोचणार आहे.
निवडणुकीमध्ये महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी लातूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, स्वीप कक्ष आणि दयानंद महाविद्यालयाच्या वतीने काल घेतलेल्या विशेष कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘तिचा आवाज, तिचं मत आहे मौल्यवान’ ही संकल्पना घेवून आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी महिलांशी संवाद साधला. यावेळी उपस्थितांना मतदार जागृतीची शपथ देण्यात आली.
येत्या २० तारखेला होणार्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने केलं आहे.
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तान�� ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज पुणे जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
कार्तिकी एकादशी आज साजरी होत आहे. पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते करण्यात आली. दरवर्षी शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात येते, मात्र यंदा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने ही महापूजा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली. लातूर जिल्ह्यातले सागरबाई आणि बाबुराव सगर या दाम्पत्याला पूजेचा मान मिळाला. यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपस्थित होते. एकादशीनिमित्त सुमारे दोन लाखावर भाविक पंढरपुरात दाखल झाले आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथं दर्शनासाठी जाणार्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाकडून विविध आगारातून पैठणला जादा बस सोडण्यात येत आहेत. छत्रपती संभाजीनगरनजिक पंढरपूर इथं देखील एकादशीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण विधानसभा मतदारसंघात गृह मतदानाला सुरुवात झाली असून, काल पहिल्या दिवशी ९०० जणांनी मतदान केलं. जिल्ह्यात एकूण २७ हजार ९६४ दिव्यांग आणि ८५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ५७७ जणांनी गृह मतदानासाठी नोंदणी केली आहे. नांदेड लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी गृहमतदानाला काल सुरुवात झाली. हिंगोली जिल्ह्यात वसमत, कळमनुरी आणि हिंगोली मतदारसंघात काल सतराशे कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावला.
लातूर इथं निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं काल जिल्हा परिषद प्रवेशद्वाराजवळ २५ लाख रुपयांची रोकड जप्त केली. निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी नर्हे-विरोळे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. हिंगोली इथंही वाशिम रोडवरील पिपल्स बँक परिसरात दुचाकीवरून बॅगमध्ये साडे चौदा लाख रुपये घेऊन जाणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पकडलं.
महिला आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत काल भारताने सलामीच्या सामन्यात मलेशियाचा चार - शून्य असा पराभव केला. इतर सामन्यांमध्ये चीनने थायंलडचा १५ - शून्य असा पराभव केला, तर दक्षिण कोरिया आणि जपान मधला सामना दोन - दोन असा बरोबरीत सुटला. बिहारमधे नालंदा इथल्या राजगीर इथं ही स्पर्धा होत असून, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते काल या स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन झालं.
0 notes
Text
0 notes
Link
आदिवासी शेतकऱ्यांसाठी विविध अर्थसहाय्य योजना - यवतमाळ - Various Financial Assistance Schemes for Tribal Farmers - Yavatmal.
0 notes
Text
0 notes
Text
चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील 11 युवकांनी बनविली हायड्रोजन कार
https://bharatlive.news/?p=183817 चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील 11 युवकांनी बनविली हायड्रोजन ...
0 notes