#माणसं
Explore tagged Tumblr posts
Text
दुसऱ्यांच्या आनंदावर जळणारी माणसं ही अघोरी आणि विकृत-मेघा घाडगे
दुसऱ्यांच्या आनंदावर जळणारी माणसं ही अघोरी आणि विकृत-मेघा घाडगे
दुसऱ्यांच्या आनंदावर जळणारी माणसं ही अघोरी आणि विकृत-मेघा घाडगे Megha Ghadge आपल्या नृत्यकलेने चाहत्यांना घायाळ करणारी लोकप्रिय अभिनेत्री मेघा घाडगे हिने एक पोस्ट करत दुसऱ्याचं वाईट चिंतनाऱ्या लोकांना टोमणा मारला आहे. तुम्ही कितीही वाईट म्हणालात तरी मी अशीच आहे असं तिने म्हटलं आहे. Megha Ghadge आपल्या नृत्यकलेने चाहत्यांना घायाळ करणारी लोकप्रिय अभिनेत्री मेघा घाडगे हिने एक पोस्ट करत दुसऱ्याचं…
View On WordPress
0 notes
Text
0 notes
Text
देवळाकडे सायकल ठेवली आणि दुर्बिण गळ्यात अडकवून चालायला सुरुवात केली. डोंगराच्या पायथ्याशी जाई पर्यंत अर्धा तास लागला. अंतर जेमतेम 100 ते 150 मीटर असेल पण तितक्यात खूप पक्षी दिसले. एका पिंपळाच्या झाडावर भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते. त्या खाली अजून एक झाड होत त्याला फळ आली होती. त्यावरही starling, bulbul, barbet असे सगळे होते. आजुबाजुला भातशेती होती. थोडी कापलेली, थोडी अजून कापायची बाकी होती.
थोडं पुढे गेल्यावर एका माडावर बाया सुगरणी च्या घरट्यांचे झोके होते. पंधरा दिवसांपूर्वी गेले होते तेव्हा त्यांचं घरटी बनवण्याच काम चालू होतं. आज त्यामानानं जरा कमी बाया पक्षी दिसले.
डोंगर चढायला सुरवात केली तेव्हा कुणगे (भातशेती) संपून जंगल सुरू झालं. पक्षी दिसायचे कमी झाले पण call येत होतेच. ते call पण थोडे बदलले. Beat you, Malabar whistling thrush chi शीळ असे आवाज यायला लागले.
जंगलातले साग वाऱ्यावर आपली पानं झटकत होते. वाऱ्याबरोबर ती तरंगत खाली येत होती. संपूर्ण वाटेवर जाळीच्या सागपानांची चादर घातल्यासारखी दिसत होती.
या डोंगरात वर एक वाडी (वस्ती) आहे. आज तिथे जायचं ठरवून निघालेले. वाटेत त्याच वाडीतून सकाळी कामाला जाणारी किंवा dairy वर दूध नेणारी माणसं cross होत होती. डोंगरावर पूर्ण चढतीचा रस्ता आहे. वर थोड्या अंतरावर two wheeler जाते आणि तिथून पुढे प���न्हा पायवाट. मोठ्या गाडीचा रस्ता नाही.
वर वाडीत पोचले तेव्हा एक माणूस भेटला, त्याने सांगितलं की या वाडीला डोंगरवाडी म्हणतात आणि इथे 20 22 घरं आहेत. प्रत्येक घराच्या सभोवती आपापली भात शेती आहे त्यामुळे घरं एकमेकांच्या फार जवळ नाहीत.
थोडं पुढे एक पत्र्याची शेड दिसली. आधी वाटल स्मशान भूमी असेल. अजून जवळ गेल्यावर शेडच्या आत घंटा दिसल्या. मग वाटल की मंदिरच असेल, स्मशानात कुठे घंटा असतात. तरी मी ति��डे न वळता सरळ गेले पुढे. पुढे आणखी थोडी घरं दिसली. मग वाटलं की असं घरांच्या मधोमध स्मशान नसावं. परत येताना तिथे जाऊन पाहिलं. ते मंदिर नाही पण छोट देवस्थान होत. मग तिथेच थोडा वेळ बसले. आत दोन पाषाण आहेत. एकावर भरपूर जास्वंदीची फुलं आणि दुसऱ्यावर फक्त 2 3 गुलाब वाहिलेले. पाषाणामागून छोटंसं हिरवं गवत डोकावत होत. तो अजूनही निसर्गातला देव आहे याची साक्ष जणू! निसर्गातला देव आणि देवातला निसर्ग! आजूबाजूला लावलेल्या टाइल्स पेक्षा डोळ्यांना हे जास्त सुखावणारं होत.
देवस्थानासमोर तुळस होती आणि त्यापुढे एक चाफ्याच झाड. तुळस सुकलेली पण जिवंत होती. तिच्या सुकलेल्या फांदीवर पण एक जास्वंदीच फुल वाहिलं होतं. हे कोकणातल्या तुळशी पूजेचं typical दृश्य आहे. काही फुलं तुळशी वृंदावनावर आणि एक तुळशीला.
हे सगळं बघता बघता मी सोबत आणलेली उकडलेली रताळी खाल्ली.
तितक्यात वरून एक घार उडत येऊन शेजारच्या झाडावर बसली. तसे 2 3 कावळे मोठ्याने ओरडू लागले आणि 2 pond heron पण ओरडत उडाले.
त्याच झाडाखाली देवाच्या बाजूने एक पाण्याचा छोटा झरा वाहतो. तो cross करून एक आजी वर आल्या. कमरेवर एक घमेले - त्यात डोक्याला आणि कमरेला काम करताना बांधायचे टॉवेल आणि एक कोयती (छोटा गोलाकार कोयता). माझी चौकशी करून ती पुढच्या कुणग्यात (शेतजमीन) गेली. डोक्याला, कमरेला बांधून तिनं भात कापायला सुरुवात केली. तिच्या मागोमाग 5 मिनिटांनी एक आजोबा आले. हातात एक पंचा आणि कोयती. त्यांनीही तिच्या ��ोबत जाऊन भात कापायला सुरुवात केली. थोड्या वेळाने ते दोघं एकाच लयीत काम करतायत अस वाटायला लागलं. थोडं कापून झालं तस आजोबांनी त्याच्या पेंढ्या बांधल्या. एक पेंढी डोक्यावर घेऊन ते तो झरा पुन्हा क्रॉस करून पलीकडे गेले. जाताना झऱ्याकडच्या झाडाच्या फांदीला त्यांचा डोक्यावरचा भात थोडा अडकला. परत येताना ते ती तेवढी अडकलेली फांदी कोयत्याने तोडून आले.
आणि मग एक एक पेंढी घेऊन जात राहिले. नंतर परत डोक्यावरचा भात झाडात अडकला नाही. आजी कापत होतीच. अशा माझ्या समोर जवळ जवळ 10 फेऱ्या त्यांनी मारल्या आणि एक कोपरा भात कापून झालं. आजींच्या सोबतीला एक दोन बगळे आणि drongo होते. तितक्यात मागच्या मोठ्या आंब्याच्या झाडावरून दोन मलबार pied hornbill उडत आले त्यांना थोडा वेळ बघून मी परत निघाले. येताना उतार असल्याने फार वेळ लागला नाही. वाटेत रस्त्यावरच एक खार दिसली. पटकन हातात घेता आली असती इतकी जवळ होती.
वाटेत जंगलात पडलेली 2 3 सागाची पानं मी मला घेतली, त्यावर चित्र काढायच्या ambitious project सोबत.
अशा प्रकारे आजची सुट्टीची सकाळ सफळ संपूर्ण!
2 notes
·
View notes
Text
#1.
मनी डायनॅमिक्स
जास्त खुलासा न करता पैशाबद्दलच्या दहा गोष्टी सांगतो. मान्य अमान्य आपणंच ठरवावं. सर्वश्रृत असलेला पहिला नियम म्हणजे पैसे कमावणं जितकं अवघड तितकं त्याला सांभाळणही कठिण. सगळी सिस्टीम तुमच्या बचतीवर डोळा ठेऊन असते. पैसे आहेत अशी जरा जरी भनक लागली तरी वेगवेगळे हित��िंतक पॅान्झी स्किमा घेऊन मागे लागतात. बॅंकवाले, विमाएजंट, गुंतवणूक दलाल आणि नातेवाईक भुरळ घालायला, नाहीतर अजीजी करायला तयारच असतात. तुम्ही जर बेसावधपणे जवळच्या मित्रांकडे बोलून बसलात तर त्यातल्या कुणी ना कुणी पुढच्या काही दिवसात तुमच्याकडे शब्द टाकून तुम्हाला धर्मसंकटात ढकललंच म्हणून समजा. त्यामुळे वाचवलेले पैसे ही अतिशय वैयक्तिक आणि गोपनीय बाब समजावी.
दोन, पैसा कुणाचा? तर जो वापरेल त्याचा. हे सूत्र जो विसरला त्याचा कार्यक्रम झालाच समजा. आपल्या पैशांवर दुसऱ्याला ��जा मारताना हताशपणे पाहात राहणं याच्यासारखी मनाला होणारी दुसरी वेदना नाही. आपले पैसे परत मिळविण्यासाठी बऱ्याचदा आपणंच याचक होतो. मागताना हात पसरणाऱ्याचं परतफेडीच्यावेळी सगळं बेअरिंग चेंज झालेलं असतं. वैतागून एखादा निर्वाणीचा इशारा दिला तर “देतो की कुठं पळून चाललो आहे का?” ऐकवलं जातं. कधीकधी उसणवारी करणारे सराईत स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून क्रेडीटरला उचकवतात. भांडण झालं की त्याचं काम फत्ते. पुढेच काही दिवस तरी पैसे मागितले जात नाहीत.
तीन, मेहनती माणसाच्या आयुष्याभोवती पैसा फिरावा हा निसर्ग नियम असला तरी प्रत्यक्षात पैशाभोवती आयुष्य़ फिरतं ही वस्तुस्थिती आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे पैसे कमावणं हे कम्पल्सिव्ह गॅंबलिंग सारखं होतं. परिणामस्वरूप पैसा हे यशाच्या आणि सुखाच्या मोजमापांचं एकक बनून जातं.
चार, प्रचलित समाजव्यवस्थेत सगळ्या सेवा कॅाईनबॅाक्स पॅटर्नवर डिझाईन केलेल्या असल्याने शिक्षण, आरोग्य, दैनंदिन गरजां इत्यादींमुळे तयार होणाऱ्या समस्यांसुद्धा पैशाशी निगडीत असतात. बचतीच्या पैशामुळं या समस्या सुटल्या नाहीत तरी किमान सुसह्य होतात.
पाचवा मुद्दा, पैसा निष्क्रिय राहिला तर पेपर, फिरत ठेवला तर परिस. इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलीओ वर “निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टी सारखी धरी” प्रमाणे लक्ष ठेवून जागरूक राहायला लागतं. नजर हटी किमत घटी. गुंतवणूकीत एक्झिट पॅालीसी महत्वाची असते. मुदत संपताच रोखीकरण करून इनव्हेस्टमेंट हॅालीडे घ्यावा. झालेला नफा राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी खर्च करून टाकावा. ॲाटो रिन्युअलला तसा फार अर्थ नसतो. वर म्हटल्याप्रमाणे पैसा कुणाचा तर वापरेल त्याचा.
सहा, कमाईवृद्धीच्या अनुषंगाने खर्च लगेच तयार असतो. एकूण ताळमेळ लावता शिलकीची टक्केवारी कमी उत्पन्नाच्या वेळेइतकीच येते. चांगल्या दिवसांचं आभासी वैशिष्ट्य हे की ते कधी संपणारच नाहीत हा विश्वास. म्हणतात ना की सधनतेकडे जाणारी चढण चढताना माणसं दुखवू नयेत कारण खाली येताना तिच माणसं परत भेटतात. बेंजामिन फ्रॅंक्लीन आपल्या आत्मवृतात क्रेडिटर्सच्या स्वभावाचं फार चांगलं विश्लेषण करतात. जयंताच्या पैशाबाबतच्या कल्पनांची पायाभरणी कॅालेजमध्ये असताना मरीन लाइन्सच्या अमेरिकन लायब्ररीत हे आत्मवृत वाचून झाली.
सात, जगात सर्वांना पुरून उरेल एवढं सगळं आहे. कुणी कुणाशी स्पर्धा करायची गरज नाही. उलट इतरांच्या श्रमाचं योग्य मूल्यमापन करून मोकळ्या हातांनी मोबदला देण्याने आपली प्रगतीच होते. जे मिळतं ते कृतज्ञतेने स्विकारावं असं न्यू थॅाट या तत्वज्ञानात मानलं जातं. या विचारसरणी वर बेतलेली दोन पुस्तके आहेत. वॅलेस डी वॅटल यांचं सायन्स ॲाफ गेटींग रिच (१९१०) आणि अलीकडचं ऱ्होन्डा बायरन यांचं द सिक्रेट.
आठ, गरिबी भूषण म्हणून मिरविण्यात अर्थ नाही. वारसाहक्कानं मिळालेल्या संपत्तीचा सामावेश आपल्या यशाच्या मोजमापात करू नये. पुढच्या पिढीला ती संपत्ती मोडतोड न करता व विल्हेवाट न लावता सुपूर्द करावी. आपल्यापासून सुरूवात होईल अशा वैभवसंपन्न घराण्याची पायाभरणी करण्याची ईर्षा ठेवावी.
नऊ, दौलतीला एस्केप व्हॅलॅासीटी असते. पृथ्वीची कक्षा सोडण्यासाठी अवकाशयानाला जो विशिष्ट वेग घ्यावा लागतो त्याला एस्केप व्हॅलॅासीटी म्हणतात. त्यानंतर गुरूत्वाकर्षण संपते. श्रीमंतीमध्ये वाढ होण्याच्या वेगालासुद्धा एस्केप व्हॅलॅासीटी असते. एकदा का ती गाठली गेली की आणखी कमवायचं आकर्षण संपतं. बऱ्याच गर्भश्रीमंत व्यक्ती एका स्टेजला दानधर्म आणि लोकहिताची कामं करणं सुरू करतात. संपत्ती निर्मितीच्या चक्राचा हा परमोच्च बिंदू असतो. व्यक्तिसापेक्ष असल्याने प्रत्येकासाठी तो वेगवेगळा असतो. लोकोपयोगी कामं आपल्या हातून घडणं हे मानववंशाच्या जनुकीय प्रोग्रॅमचा भाग आहे. अल्ट्रुइझमचं रिसेसिव्ह जीन हेलिक्समध्ये असतंच.
दहा, पैशाचा शोध लागला नव्हता तेंव्हाही आयुष्य चालत होतंच आणि पैसा नष्ट झाला तरीही पुढेही चालूच राहिल. आजकाल फियाट करन्सीच्या पोकळ डोलाऱ्याविरूद्ध चळवळ सुरू झाली आहे. जी. एडवर्ड ग्रिफीन यांचं “द क्रिचर फ्रॅाम जेकील आयलंड” हे पुस्तक अमेरिकन चलनव्यवस्था ही कशी बनवाबनवीची स्कीम आहे हे विशद करतं. ग्रंथालीनं प्रकाशित केलेलं “घातसूत्र” हे दिपक करंजीकर यांचं पुस्तक याच विषयावर ��हे. या चळवळीचं काय म्हणणं आहे हे आपण निदान समजून तरी घ्यायला हवं. नोटबंदी वेळी आपण याची झलक अनुभवली आहे.
- जयंत नाईकनवरे, आय.पी.एस.
2 notes
·
View notes
Text
पांढरा वाघ आणि प्राणी संग्रहालय
काल मी प्रोफेसर देसाईना म्हणालो,”आपण माणसं फारच स्वार्थी आहोत, इतर मुक्या प्राण्यांच्या बाबतीत, त्यांना मानवाने आपल्याला हवी तशी योजना करून, वापरात आणली. भाऊसाहेब, हे माझं म्हणणं तुम्हाला पटतं का?” त्यावर, भाऊसाहेब मला म्हणाले,“सामंत, याबाबतीत अलीकडेच मी एक पुस्तक वा��त होतो. त्यावर विचार केल्यावर माझ्या मनात काय आले ते मी तुम्हाला सांगतो.”“मी कोकणातल्या समुद्रकिनारी आणि खाडीच्या किनारी वाढलो. मी…
0 notes
Text
Bollywood Tadka: Suraj Chavan's Bigg Boss Marathi Journey.
Stay updated with the latest Bollywood Masala and Bollywood Tadka at KalaKruti Media! Explore the buzz surrounding Suraj Chavan's remarkable journey on Bigg Boss Marathi, where he's been winning the hearts of netizens with his impressive gameplay. Visit us noww!!
0 notes
Text
Birthday Wishes For Father
आज मी जो ��ाही आहे तो फक्त माझ्या#आयुष्यात एक खासव्यक्ती मुळेच आहे.आज तुमच्या वाढदिवसानिमित्त माझ्या#शुभेच्छा आणि भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे #शब्दाचं नाही.मी भाग्यवान आहे की तुम्हीमाझे वडील आहात.🎂🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🎂 जन्म पुन्हा कधीच भेटत नाही,माणसं हजारो भेटतात पण,आपल्या वडीलान सारखं कोणीभेटत नाहीवाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा. कोणीतरी विचारले – अशी कोणती जागाआहे जिथे…
0 notes
Text
वाट
प्रत्येक वाट इथलीदुःखाने आहे भरली ।सुख असेच कसे मिळेलकित्तेक माणसं हरली ।इती पासून अंता पर्यंतथेंब थेंब घागर भरली ।क्षण शेवटचा येताच���ोबत तीही सरली ।Sanjay R.
View On WordPress
0 notes
Video
youtube
85 वर्षाची माणसं रस्त्यावर आली शरद कोळी..
0 notes
Text
Post 7
माणसं बदलत नसतात.वय वाढत जातं तसा निरागसता कमी कमी होत जाते!त्यातले मोजकेच निरागसता जपतात!
#vidyamslife
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 10 December 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १० डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
मानवी हक्क जनजागृतीसह पायाभूत सुविधांमध्ये वाढ होण्याची गरज उपराष्ट्रपतींकडून व्यक्त
विकसित भारत-२०४७ साठी उद्या राजभवनात कुलुगुरू परिषदेचं आयोजन
१८ व्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचं नांदेड जिल्ह्यात उमरी इथं उद्घाटन
आणि
भारत-दक्षिण आफ्रिकेदरम्यान टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात
****
मानवी हक्क जनजागृतीसह देशात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची वाढ होण्याची गरज उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्ली इथं आज, मानवाधिकार दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. जागतिक स्तरावर मानवी हक्कांच्या संकल्पनेची घोषणा झाल्याच्या घटनेच्या अमृतमहोत्सवी वर्षाचं औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला. कायद्यात समानता आणि सर्वांना न्याय मिळतो, तिथे मानवी हक्क वाढीस लागतात. असंही उपराष्ट्रपतींनी नमूद केलं.
****
विकसित भारत-२०४७ साठी देशातल्या तरुणांकडून कल्पना जाणून घेण्याच्या मोहिमेस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्यापासून प्रारंभ होत आहे. आज नवी दिल्ली इथं नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीव्हीआर सुब्रह्मण्यम यांनी वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली. यानिमित्तानं सर्व राज्यांच्या राजभवनांमध्ये होणाऱ्या एक दिवसीय कार्यशाळांसाठी सुमारे ७०० विद्यापीठांचे कुलगुरू आणि संस्थांचे प्रमुख एकत्र येणार आहेत, असंही सुब्रह्मण्यम यांनी सांगितलं. विकसित भारतच्या संकल्पनेत विद्यार्थ्यांच्या कल्पनांचा समावेश केला जाणार असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.
****
शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नांसह कांदा, कापूस, सोयाबीन या पिकांसंदर्भात केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्यासोबत सकारात्मक बैठक झाली असून गोयल यांनी शेतकरी हिताचे सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन या बैठकीत दिल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सामाजिक माध्यमावर जाहीर केलेल्या संदेशातून त्यांनी ��ी माहिती दिली.
दरम्यान, कांद्यावर घातलेली निर्यात बंदी उठवण्यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच फेरविचार होऊ शकतो, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार म्हटलं आहे. त्या आज नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होत्या. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना याबाबत फेरविचारासाठी देण्यात आलेल्या पत्रामुळे लवकरच निर्णय होईल असं त्यांनी नमूद केलं.
कांदा निर्यात बंदीनं नाशिक जिल्ह्यातला शेतकरी नाराज असून व्यापाऱ्यांनीही लिलाव बंद करायचं ठरवलं. दरम्यान, व्यापाऱ्यांनी तीन दिवस कांदा लिलाव बंद ठेवला तर, संबंधित व्यापाऱ्यांचे परवाने रद्द केले जातील, असा इशारा सहकार उपनिबंधक फैयाज मुलानी यांनी दिला आहे
****
भारतीय रिजर्व्ह बँकेने सहकारी पतसंस्थांच्या कामकाजाकडे लक्ष द्यावं, अशी मागणी छत्रपती संभाजीनगरचे खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी केली आहे. लोकसभेत शून्य काळात त्यांनी या मुद्याकडे सदनाचं लक्ष वेधलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या आदर्श नागरी पतसंस्थेसह अनेक पतसंस्था ठेवीदारांना जादा व्याज दराचं आमीष दाखवून ठेवी गोळा करतात, आणि त्या परत देण्यास टाळाटाळ करतात, हा मुद्दा सय्यद इम्तियाज यांनी सदनासमोर मांडला. सरकारने या पतसंस्थांना ठेवीदारांचे पैसे सहा महिन्यात परत करण्याचे निर्देश देण्याची मागणी खासदार सय्यद इम्तियाज यांनी केली आहे.
****
भारताच्या हातमाग साडी संस्कृतीस प्रोत्साहनासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे आज मुंबईत ‘वन भारत साडी वॉकेथॉन -चालण्याची स्पर्धा ’ घेण्यात आली. वांद्रे-कुर्ला संकुल इथं पाच हजार महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत यात नारी शक्तीचं दर्शन घडवलं. पैठणी, पोचमल्ली, भागलपुरी, बनारसी, पश्मिना, पटोला, महेश्वरी या आणि देशाच्या विविध राज्यातल्या अनेक प्रसिद्ध साड्यांचं प्रतिनिधीत्व या महिलांच्या पेहरावातून दिसून आलं.
****
नांदेड जिल्ह्यात उमरी इथं आयोजित १८ व्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं. ग्रंथ दिंडीनं संमेलनाची सुरुवात करण्यात आली. साहित्यातून विश्व शांती निर्माण झाली पाहिजे, साहित्यातून माणसं माणसांशी जोडता आली पाहिजेत, अशी अपेक्षा संमेलनाध्यक्ष डॉक्टर पृथ्वीराज तौर यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली.
****
दरम्यान, नांदेड इथं आयोजित एकविसाव्या फुले- शाहू- आंबेडकर- अण्णा भाऊ साठे व्याख्यानमालेचा आज समारोप होत आहे. व्याख्यानमालेच्या आजच्या दुसऱ्या भागात ��्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांचं वादळ-वणव्यात एकच दीपस्तंभ : भारतीय संविधान या विषयावर आज संध्याकाळी व्याख्यान होणार आहे. काल पहिल्या भागात पनवेल इथल्या सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांचं "२०२४ -संविधानाचं राज्य असेल का?" या विषयावर व्याख्यान झालं.
****
विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ घेत वंचित नागरिकांनी शासकीय योजनांसाठी नोंदणी करण्याचं आवाहन खासदार सुधाकर शृंगारे यांनी केलं आहे. लातूर महापालिका क्षेत्रातील सोनानगर इथं आज या यात्रा उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्र सरकारच्या विविध योजनांची उपस्थितांना माहिती देण्यात आली. शहराच्या विविध भागात यात्रेचे नियोजन करण्यात आले असून त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, येत्या २६ जानेवारी पर्यंत लातूर जिल्ह्यात राबविली जाणार आहे.उद्या जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्याच्या आनंदवाडी, सय्येदपूर खुर्द, औसा तालुक्याच्या एरंडी, आलमला, चाकूर तालुक्याच्या अजन्सोंडा,जानवळ, देवणी तालुक्याच्या हंचनाळ, वागदरी, जळकोट तालुक्याच्या मंगरुळ,बोरगांव खुर्द्, लातूर तालुक्यात शिवणी खुर्द, सेलू बद्रुक, निलंगा तालुक्यात मिरगणहळही आणि कलांडी, देवीहल्लाळी यासह बसपूर, रेणापूर तालुक्याच्या कोळगाव, निवाडा, शिरुर अनंतपाळ तालुक्याच्या वांजरखेडा, हिसामाबाद, उदगीर तालुक्यात तिवटग्याळ, हैबतपूर येथं भेट देणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या ४१ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने पशुसंर्वधन विभागामार्फत शहरातील पाळीव प्राण्यांसाठी परवाना वितरण कार्यक्रम आज घेण्यात आला. दुभत्या जनावरांसह श्वान, मांजरी, उंट, घोडा, आदी प्राण्यांसाठीचे परवाने यावेळी वितरित करण्यात आले. शहरातील इतर नागरीकांनी सुध्दा आपल्या पाळीव प्राण्यांचे परवाने घेण्याचं आवाहन मनपाकडून करण्यात आलं.
****
केंद्र सरकारचं दुष्काळ पाहणी पथक येत्या १३ आणि १४ डिसेंबरला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात हे पथक जिल्ह्यातील वाशी, लोहारा आणि धाराशिव तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन पिण्याचं पाणी,पाणी पातळी आणि टंचाई, पिक परिस्थिती, चारा आणि गुरांच्या छावण्या या संदर्भात पाहणी करून केंद्र सरकारला अहवाल सादर करणार आहे. या तीन तालुक्यांची परिस्थिती केंद्र सरकारच्या संबंधीत निकषास पात्र ठरली.
जिल्ह्यातील उर्वरित पाच तालुक्यातही अशीच स्थिती अस��्यानं ते दुष्काळी म्हणून जाहिर करण्यास आमदार राणाजगजितसिंह पाटील सातत्यानं शासनाकडे पाठपुरावा करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड इथं काल समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या एका विद्यार्थ्याचा मृतदेह आज दुपारी घटनेच्या चोवीस तांसांनी सापडला. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या पाच झाली आहे. काल झालेल्या घटनेत एकूण विद्यार्थी समुद्रात बुडाले. यापैकी काल दोघांना वाचवण्यात यश आलं होतं तर चार मुलींचे मृतदेह सापडले होते. पुण्यातल्या खासगी सैनिक अकॅडमीचे हे विद्यार्थी आहेत.
दरम्यान, घटनेतील एका मृत विद्यार्थीनीच्या पालकाच्या फिर्यादीवरुन विद्यार्थीनींना सहलीकरिता नेऊन निष्काळजीपणे - हयगयीत मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पुण्याच्या निगडी इथल्या खाजगी सैनिक अॅकेडमीचे संचालक नितीन माने यांना देवगड पोलीसांनी अटक केली. देवगडच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन. बी. घाडगे यांनी माने यांना पंधरा हजार रुपये सशर्त जामीन मंजूर केला
****
भारत-यजमान दक्षिण आफ्रिकेदरम्यान पुरुषांच्या पहिल्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्याला थोड्यावेळात संध्याकाळी साडेसात वाजता डरबन इथं सुरुवात होईल.
उभय संघात तीन सामन्यांच्या टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेनंतर, तीन एकदिवसीय-त्यानंतर दोन कसोटी सामन्यांची मालिकाही होणार आहे.
****
भारत- इंग्लड महिला टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला तिसरा-शेवटचा सामनाही थोड्याच वेळेत संध्याकाळी सात वाजता मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरु होईल.
मात्र, इंग्लंडनं दोन-शुन्य अशी विजयी आघाडी घेत ही मालिका जिंकली आहे.
****
0 notes
Text
“महाराष्ट्राच्या अस्मितेला कोणी धक्का लावेल, त्याविरोधात आम्ही पेटून उठणारी माणसं”शिंदे गटाच्या आमदाराने कर्नाटकालाच खडसावले
“महाराष्ट्राच्या अस्मितेला कोणी धक्का लावेल, त्याविरोधात आम्ही पेटून उठणारी माणसं”शिंदे गटाच्या आमदाराने कर्नाटकालाच खडसावले
“महाराष्ट्राच्या अस्मितेला कोणी धक्का लावेल, त्याविरोधात आम्ही पेटून उठणारी माणसं”शिंदे गटाच्या आमदाराने कर्नाटकालाच खडसावले मुंबईः मागील महिन्याच्या 24 नोव्हेंबर रोजी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सीमाभागातील काही गावांवर दावा केला. त्यानंतर महाराष्ट्र आमि कर्नाटकातील राजकीय वातावरण प्रचंड ढवळून निघाले. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या गेल्या.महाराष्ट्रातील…
View On WordPress
#अस्मितेला#आजच्या प्रमुख घडामोडी#आमदाराने#आम्ही#उठणारी#कर्नाटकालाच#कोणी#खडसावले#गटाच्या#त्याविरोधात#धक्का#पेटून#बातमी आजची#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#महाराष्ट्राच्या#माणसं”शिंदे#राजकारण#राजकारण लेटेस्ट#लावेल#शासन#सरकार
0 notes
Text
Pradip : काय रे! काय झलं? इतका वैतागलेला का आहेस?
Bandya : अरे, अचानक वाय-फाय बंद झालं.चेक केलं, तर समजलं शेजाऱ्यांनी बिल भरलं नाही.
किती निष्काळजी माणसं आहेत.
🤣🤣🤣😛😛😛🤦♂️🤦♂️🤦♂️😏😏😏
0 notes
Text
Pradip : काय रे! काय झलं? इतका वैतागलेला का आहेस?
Bandya : अरे, अचानक वाय-फाय बंद झालं.चेक केलं, तर समजलं शेजाऱ्यांनी बिल भरलं नाही.
किती निष्काळजी माणसं आहेत.
🤣🤣🤣😛😛😛🤦♂️🤦♂️🤦♂️😏😏😏
0 notes
Text
पर्यावरणाशी सहजीवन
मी प्रोफेसर देसाई यांना म्हणालो,“थंडीच्या ऋतूमध्ये जराशी थंडी वाढली की वातावरणात किती प्रदूषण झालं आहे हे निक्षून लक्षात येतं. तसंच पावसाळ्याच्या वेळी जरा पाऊस जास्त पडला की जिकडेतिकडे पाणी तुंबलं जातं. जास्त करून हे शहरात प्रामुख्याने दिसतं. उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा तापमान प्रचंड वाढलेलं दिसतं.या सर्वाला आपण माणसं कारणीभूत आहोत.भाऊसाहेब, यावर तुमचं काय म्हणणं आहे?” माझ्या प्रश्नाला उत्तर…
0 notes
Text
Birthday Wishes For Girl Friend
हैप्पी बर्थडे तो युतुझा मी, माझी तूमे गोड ब्लेस यु चाल दारूचे ग्लास्सेस भरूवाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ! आयुष्यात हवं ते सारं काही मिळालं तरी या प्राप्तीचा मोहोत्सव करताना हवी असतात… काही आपली माणसं !आपण सगळेच एकमेकांशी इतके जोडले गेलोय कि कोणतंही अंतर आपल्याला एकमेकांपासून दुरावू शकत नाही..आजच्या या वाढदिवसानिमित्त म्हणूनच, आपल्या नात्याचं आणि या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करावसं वाटतंय…Many Many…
0 notes