#महापुरुषांचा
Explore tagged Tumblr posts
Text
महापुरुषांचा अवमान सहन न उदयनराजे तडकाफडकी राजीनामाही देतील; सुषमा अंधारेंचा टोमणा
महापुरुषांचा अवमान सहन न उदयनराजे तडकाफडकी राजीनामाही देतील; सुषमा अंधारेंचा टोमणा
महापुरुषांचा अवमान सहन न उदयनराजे तडकाफडकी राजीनामाही देतील; सुषमा अंधारेंचा टोमणा पुणे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. यामध्ये शिवसेना नेत्या सुषमा अंधारे व भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले सहभागी झाले होते. परंतु, उदयनराजेंनी कोणतेही भाष्य न केल्याने सुषमा अंधारे यांनी टोमणा मारला आहे. उदयनराजे वेळ प्रसंगी भाजपचा राजीनामाही देतील,…
View On WordPress
0 notes
Text
संत गाडगेबाबा हे संत मालिकेतील ‘शिरोमणी‘ म्हणून ओळखले जातात. अशा या थोर कीर्तनकार, संत, समाजसुधारक आणि स्वच्छतेच्या पूजाऱ्याची आज पुण्यतिथी. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे. आज स्मृतिदिनी त्यांना अभिवादन !
#gadgebaba #santgadgebaba #gadgemaharaj #santgadgemaharaj #स्वच्छता_दुत #गाडगे_महाराज #india #babasahebambedkar #shahumaharaj
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#Jagdamb
#Vyavsaywala
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 December 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० डिसेंबर २०२२ सायंकाळी ६.१०
****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 December 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० डिसेंबर २०२२ सायंकाळी ६.१०
****
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा समारोप; विधानसभेत ८४ तास १० मिनिटं कामकाज.
आपल्या शांततेला विरोधकांनी हतबलता समजू नये - मुख्यमंत्र्यांचा इशारा.
महापुरुषांच्या अवमानना प्रकरणाकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा विरोधकांचा आरोप.
पंतप्रधानांच्या मातोश्री हिराबा यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार.
आणि
तुळजाभवानी देवीच्या मंदिरात शाकंभरी नवरात्रोत्सवाला आज घटस्थापनेनं सुरुवात.
****
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज समारोप झाला. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सदनात याबाबत अधिकृत घोषणा केली. या अधिवेशन काळात विधानसभेत दहा बैठका झाल्या. यात एकूण ८४ तास १० मिनिटं कामकाज झालं. १२ विधेयकं आणि दोन शासकीय ठराव मंजूर झाले, २९३ अन्वये तीन सूचनांवर तर ३६ तारांकित प्रश्नांवर चर्चा झाल्याचं नार्वेकर यांनी सांगितलं.
****
आपल्या शांततेला विरोधकांनी हतबलता समजू नये, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिला आहे. ते आज हिवाळी अधिवेशनाचा समारोप करताना अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देत होते. सरकारला आज सहा महिने पूर्ण झाल्याचा उल्लेख करत, या सहा महिन्यांत सरकारनं घेतलेल्या विविध लोकोपयोगी निर्णयांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. पेट्रोलची दरकपात, शेतकऱ्यांच्या मदतीत दुप्पट वाढ, ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास, नागरिकांना शंभर रुपयात दिवाळी शिधा, यासह दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं त्यांनी नमूद केलं.
पूर्वी सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांवर तातडीनं सूडबुद्धीची कारवाई केली जात असे, असा आरोप करत, मुख्यमंत्र्यांनी कंगना रानावत, नवनीत राणा, अर्णब गोस्वामी यांच्यावरच्या कारवाईची आठवण करून दिली. महापुरुषांच्या अवमानना प्रकरणी विरोधक दिशाभूल करत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. विरोधी पक्षांकडूनच महापुरुषांचा अवमान केला जात असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी उदाहरणं देऊन केला. भ्रष्टाचाराचे सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले. ते म्हणाले –
भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे आरोप आमच्यावर करता? का अण्णा हजारेंची मागणी लोकायुक्ताची तुम्ही मान्य केली नाही? अरे आम्ही केली ना? आणि मुख्यमंत्र्यांसह मंत्रीमंडळ त्या लोकायुक्ताच्या चौकशीमध्ये आणण्याचं धाडस आमच्या सरकारने दाखवलं. एकच मी सांगतो की बिनबुडाचे आरोप, कुठलाही आधार नाही, पुरावे नाही, अशा प्रकारचे आरोप, तुम्ही करू नका. कारण माझा स्वभाव टीका करण्याचा नाही म्हणून मी शांत आहे. परंतू शांत म्हणजे माझी हतबलता समजू नका. मै खामोश हूं क्यों की मै सब जानता हूं। बात निकलेगी तो बहोत दूर तलक जायेगी।
****
महापुरुषांच्या अवमानना प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आपल्या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. विधानसभेचं कामकाज संपल्यानंतर झाल्यावर ते माध्यमांशी बोलत होते. अंतिम आठवडा प्रस्तावात विरोधकांनी मांडलेल्या मुद्यांवर मुख्यमंत्र्यांनी समाधानकारक उत्तर दिलेलं नाही, असं पवार यांनी म्हटलं आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवानिमित्ताने लोकसहभागातून कार्यक्रम घ्यावेत, अशी महाविकास आघाडीची भूमिका आहे. शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत हा संग्राम पोहोचवावा, असं अजित पवार यांनी सांगितलं.
दरम्यान, विधीमंडळ अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानभवनाच्या आवारात सरकार आणि ��ाज्यपालांविरोधात घोषणाबाजी केली.
****
शालेय शिक्षण पोषण आहारातलं ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंतचं प्रलंबित अनुदान सरकारनं त्वरित द्यावं, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात केली. शालेय पोषण आहाराचं एप्रिल ते सप्टेंबर २०२२ पर्यंतचं सत्तर टक्के अनुदान वितरित झालं आहे, मात्र ऑक्टोबरपासून पुढचं अनुदान अजून मिळालेलं नाही, अशी माहिती देत, हे अनुदान कधी देणार असा प्रश्न दानवे यांनी केला. यावर, संबंधित कंत्राटदारांना ऑनलाईन अर्ज भरण्यास अडचण येत असल्यामुळे अनुदानाला विलंब झाला, आता ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करण्याची परवानगी दिली असून, प्रलंबित अनुदान लवकरच वितरित होईल, असं उत्तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलं.
****
अनेक कंपन्या त्यांच्याकडे काम करत असलेल्या कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देत नसल्याच्या तक्रारींची दखल राज्य शासनानं घेतली असून आवश्यक ती कार्यवाही करण्यासंदर्भात जानेवारी महिन्यात बैठक घेणार असल्याची माहिती कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य गीता जैन यांनी मांडलेल्या लक्ष्यवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याप्रकरणी चार अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे, तरीही याप्रकरणी फेरचौकशी करण्यात येईल आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल अशी माहिती रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य कैलास पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. या प्रकरणात अपहार झालेल्या एक कोटी बारा लाख रुपयांपैकी पंचाहत्तर लाख सत्तर हजार रुपये संबंधितांकडून वसूल करण्यात आले असून उर्वरित रक्कमही वसूल करणार असल्याचं भुमरे यांनी सांगितलं.
****
बनावट खत विक्री करणाऱ्यांवर धाक बसावा यासाठी जिल्हास्तरावर भरारी पथक नियुक्त करून बी-बियाणे आणि खतांची गोदामं तपासण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात येतील आणि बनावट खत विक्री करणाऱ्या दुकानांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना आजच दिल्या जातील, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत दिली. बुलडाणा शहरात दुकानदाराकडून अनावश्यक खत घेण्याची सक्ती शेतकऱ्यांवर झाल्याच्या प्रकरणी सदस्य संजय गायकवाड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा मोदी यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी गांधीनगर इथं अत्यंत साधेपणानं अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आईंच्या पार्थिव देहाला मुखाग्नी दिला. मोदी कुटुंबातले स��स्य, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल आणि इतर नातेवाईक अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित होते. हिराबा यांचं आज पहाटे अहमदाबाद इथं निधन झालं, त्यांनी गेल्या १८ जूनला शंभराव्या वर्षात पदार्पण केलं होतं. जपान, रशिया, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका यासह देशोदेशींच्या राष्ट्रप्रमुखांनी पंतप्रधानांना शोकसंदेश पाठवून संवेदना प्रकट केली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हिराबा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. हिराबा यांचं संघर्षपूर्ण जीवन म्हणजे भारतीय आदर्शांचं प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलं. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, यांनीही हिराबा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेतले विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी हिराबा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. विधानसभा तसंच विधान परिषदेतही हिराबा यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव पारित करण्यात आला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मभूषण अण्णा हजारे यांनीही हिराबा यांच्या निधनाबद्दल शोक भावना व्यक्त केल्या.
****
तुळजाभवानी देवीच्या मंदिरात शाकंभरी नवरात्रोत्सवाला आज घटस्थापनेनं सुरुवात झाली. सात दिवसांची मंचकी निद्रा संपवून आज देवी सिंहासनावर विराजमान झाली, त्यानंतर मंदिर परिसरात विधीवत घटस्थापना करण्यात आली. पौष महिन्यातल्या अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या शाकंभरी नवरात्र महोत्सव काळात देवीच्या विविध अलंकार पूजा मांडण्यात येणार असून, दररोज रात्री छबिना, मिरवणूक असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. शाकंभरी नवरात्रोत्सवातलं प्रमुख आकर्षण असलेली जलकुंभ यात्रा ३ जानेवारीला होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद इथं होणाऱ्या जी-20 प्रतिनिधींच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, औरंगाबाद ते अजिंठा रस्त्याचं काम जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याची सूचना जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.
****
0 notes
Video
youtube
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या चंद्रकांत पाटील,कोषारी यांचा जाहीर निषेध..
0 notes
Text
नव्या पिढीने महापुरुषांचा इतिहास वाचावा - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
नव्या पिढीने महापुरुषांचा इतिहास वाचावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि 8 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांचा इतिहास नव्या पिढीने वाचण्याची गरज व्यक्त करुन देशभरात डॉ. आंबेडकर यांनी स्थापित केलेल्या विविध संस्था जीवित ठेवून त्या टिकविण्याची जबाबदारी प्रत्येक शासनाची आहे. राज्यातील महापुरुषांचा इतिहास लाभलेल्या संस्था टिकविण्यासाठी राज्य सरकारही संस्थांना सहकार्य करेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. मुंबई…
View On WordPress
0 notes
Text
नव्या पिढीने महापुरुषांचा इतिहास वाचावा - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
नव्या पिढीने महापुरुषांचा इतिहास वाचावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि 8 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांचा इतिहास नव्या पिढीने वाचण्याची गरज व्यक्त करुन देशभरात डॉ. आंबेडकर यांनी स्थापित केलेल्या विविध संस्था जीवित ठेवून त्या टिकविण्याची जबाबदारी प्रत्येक शासनाची आहे. राज्यातील महापुरुषांचा इतिहास लाभलेल्या संस्था टिकविण्यासाठी राज्य सरकारही संस्थांना सहकार्य करेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. मुंबई…
View On WordPress
0 notes
Text
#❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
*🔸संत गाडगे महाराज.🔸*
*---------------------------------------------*
*🔸संकलन: वणीभुषण न्युजपेपर्स व चॅनल्स गृप
*----------------------- अॅड.डॉ.राजेंद्र गुंडलवार संपादक वणीभुषण, ----------------------*
*जन्म: २३ फेब्रुवारी १८७६;जन्म कोतेगाव (शेंडगाव); मृत्यू: २० डिसेंबर १९५६ अमरावती. हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे.*
*संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव - झिंगराजी राणोजी जाणोरकर तर आईचे नाव - सखुबाई झिंगराजी जणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे गाडगेबाबा हे संता मधील सुधारक आणि सुधारकां मधील संत होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी प��ंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. गाडगेबाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळा होती.*
*गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देव���ात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली.*
*माणसात देव शोधणार्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्या हातात मडके असा त्यांचा वेश असे.*
*समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा(प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत.*
*गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते ना��्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.*
*बालपण.*
*गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे.त्यांचे वडिल झिंगराजी हे परीट होते. आई सखूबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते. डेबूजी लहान असतांनाच त्यांचे वडिल दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले. त्यामुळे डेबूजींचे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले.*
*सामाजिक सुधारणा.*
*१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकर्यांना शिकविला. दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच ��ोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले.*
*त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली. . महाराष्ट्रातील संत परंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत. लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावती जवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले.*
*'गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणार्या, कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणार्या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे. अमरावती विद्यापीठाला गाडगे बाबांचे नाव देऊन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नामकरण करण्यात आलेले आहे.*
*संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश.*
*भुकेलेल्यांना = अन्न.*
*तहानलेल्यांना = पाणी.* *उघड्यानागड्यांना = वस्त्र.*
*गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत.*
*बेघरांना = आसरा.*
*अंध, पंगू रोगी यांना = औषधोपचार.*
*बेकारांना = रोजगार.*
*पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना = अभय.*
*गरीब तरुण-तरुणींचे = लग्न.*
*दुःखी व निराशांना = हिंमत.* *गोरगरिबांना = शिक्षण.*
*हाच आजचा रोकडा धर्म आहे ! हीच खरी भक्ती व देवपूजा आहे !!*
*संक्षिप्त चरित्र.*
*गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आपले लोकशिक्षणाचे कार्य ऋणमोचन (विदर्भ) या गावापासून सुरू केले. ऋणमोचन येथे त्यांनी 'लक्ष्मीनारायणाचे' मंदिर बांधले. १९०८ मध्ये पूर्णा नदीवर घाट बांधून घेतला. १९२५- मुर्तिजापूर येथे गोरक्षण कार्य केले आणि धर्मशाळा व विद्यालय बांधले. १९१७- पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाला बांधली. "मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही" असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले. फेब्रुवारी ८, इ.स. १९५२ रोजी 'श्री गाडगेबाबा मिशन' स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या. गाडगे महाराज गोधडे महाराज म्हणून ओळखले जात होते. १९३२ - ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले. गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला. "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते. त्यांचे जीवनावर देवकीनंदन गोपाला हा चित्रपटही निघाला आहे. यातील "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गीत मन्ना डे यांनी गायले.*
*आचार्य अत्रे गाडगेबाबांबद्दल म्हणतात, 'सिंहाला पाहावे वनात, हत्त��ला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात.' १९३१ वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली. १९५४- गाडगेबाबांनी मुंबईत जे.जे. हॉस्पिटलच्या रोग्यांच्या नातेवाइकांना उतरण्यासाठी हॉस्पिटलजवळ धर्मशाळा बांधली. गाडगेबाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख, व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती. डॉ आंबेडकर त्यांना गुरुस्थानी मानत असत. २० डिसेंबर १९५६ रोजी पेढी नदीच्या काठावर वलगाव (अमरावती) येथे मृत्यू. गाडगेनगर, अमरावती येथे स्मारक आहे. . गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते.*
*गाडगेबाबा आणि बाबासाहेब. आंबेडकर.*
*१४ जुलै १९४१ ला गाडगेबाबांची प्रकृती ठीक नव्हती. महानंदसामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत आलेल्या डॉ. आंबेडकरांना गाडगे बाबांची खबर दिली. बाबासाहेब तेव्हा भारताचे कायदेमंत्री होते. आणि त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला रवाना व्हायचे होते. बाबांचा निरोप मिळताच त्यांनी सर्व कामे बाजूला ठेवली. २ घोंगड्या विकत घेऊन ते महानंद सामीसह रुग्णालयात गेले. कोणाकडून काही न घेणार्या बाबांनी बाबासाहेबांकडून २ घोंगड्या स्वीकारल्या. पण म्हणाले "डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकीर. तुमचे एक मिनिट महत्त्वाचे आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे." तेव्हा बाबासाहेब म्हणाले "बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे." या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू होते. कारण असा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते.*
*गाडगेबाबांचे विचार.*
*एकदा गाडगेबाबा रस्त्याने जात असताना समोर एक व्यक्ती दगडाची पूजा करत असताना त्यांना दिसली. त्याने दगडावर हार चढविला. दुधाने अंघोळ घातली. इतक्यात एक कुत्रा आला आणि मागील पाय वर करून त्या दगडावर मूत्र विसर्जन करू लागला. ती व्यक्ती चिडली. त्याला कुत्र्याचा फार राग आला. तो कुत्र्याला मारण्यासाठी हातात दगड घेऊन धावू लागला. तेव्हा गाडगेबाबा म्हणाले, " बिचार्या गरीब मुक्या जनावरांना त्रास का देता ? त्याला हे कुठं माहीत आहे की, माणसांचा देव दगड असतो म्हणून ?" पंढरपुरात एकदा टिळकाचे भाषण होते. तेवढ्यात बाबा समोरून येत होते. सगळ्यांच्या माना वळल्या. श्रोत्यांच्या मनातले ओळखून टिळकांनी बाबांना स्टेजवर आणले आणि दोन शब्द बोलायला सांगितले. टिळकांचे अथणीला झालेले भाषण बाबांना ठाऊक होते. स्टेजवर येताच बाबांनी टिळकांच्या ब्राह्मण पंथाला शब्दांनी झाडायला सुरुवात केली. बाबा म्हणाले "टिळक महाराज मी चुकलो. आम्ही हयातभर तुमची कापडं धुतली, इस्त्री केली. तवा आम्ही कसे मार्गदर्शन करू? महाराज काय बी करा पण आम्हालाबी ब्राह्मण करा."*
*संत व सुधारक या दोन्हीही वृत्ती गाडगे महाराजांत होत्या. तुकारामांप्रमाणे ठणकावून् सत्य सांगण्याचे धैर्य बाबांमध्ये होते. जनसंपर्क होता. समाजाचा अर्धा भाग जो स्त्रिया व अतिशूद्र या सर्वांना व सुशिक्षित समाजथरातील जे येतील अशा स्त्रीपुरुषांना एकत्र बसवून, म्हणजे भेदाभेद, स्पृश्यास्पृश्यता संपूर्ण बाजूस घालवून हरिभक्तीचा रस चाखण्यास सर्व वर्गातील, सर्व थरातील बायाबापडी, श्रीमंत व गरीब वगैरे सर्व एकत्र होत. बाबांची कीर्तने एकल्यानंतर तुकाराम व जोतीबाची शिकवण लोकांप्रत वाहात आहे, असे दिसते.* ******** अॅड.डॉ.राजेंद्र गुंडलवार, विधी कंसल्टंसी, मुंबई..
*स्त्रोत: विकिपीडिया.*
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
1 note
·
View note
Text
महापुरुषांचा फक्त संपत्तीचा वारसा चालवून स्वतःपुरता विचारणारे अनेकजण आहेत. पण असेही काही दुर्मिळ लोक आहेत ज्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या महान संतांचा विचारांचा वारसा झोपडीत राहून ही समर्थपणे चालवला.. समाजप्रबोधनकार सत्यपाल महा���ाज यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
0 notes
Text
Sushma Andhare : भाजपकडून महापुरुषांचा अपमान! निषेध म्हणून सुषमा अंधारे यांनी घेतला मोठा निर्णय
Sushma Andhare : भाजपकडून महापुरुषांचा अपमान! निषेध म्हणून सुषमा अंधारे यांनी घेतला मोठा निर्णय
Sushma Andhare : भाजपकडून महापुरुषांचा अपमान! निषेध म्हणून सुषमा अंधारे यांनी घेतला मोठा निर्णय Sushma Andhare Resignation : महाराष्ट्रातील महापुरुषांचा भाजपच्या नेत्यांकडून सातत्यानं अपमान केला जात असल्याच्या निषेधार्थ शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मोठं पाऊल उचललं आहे. Sushma Andhare Resignation : महाराष्ट्रातील महापुरुषांचा भाजपच्या नेत्यांकडून सातत्यानं अपमान केला जात असल्याच्या…
View On WordPress
#andhare#sushma#अंधारे#अपडेट न्यूज#अपमान?#आजची बातमी#आताची बातमी#ऑनलाईन बातम्या#घेतला#ठळक बातम्या#ताज्या घडामोडी#निर्णय#निषेध#न्यूज फ्लॅश#बातम्या#भाजपकडून#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी बातम्या#मराठी समाचार#महापुरुषांचा#महाराष्ट्र#मोठा#म्हणून#यांनी#लेटेस्ट बातमी#सुषमा
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 December 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ डिसेंबर २०२२ सायंकाळी ६.१०
****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 December 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ डिसेंबर २०२२ सायंकाळी ६.१०
****
सीमा भागातली मराठी भाषिक गावं महाराष्ट्रात समावि��्ट करण्यासाठी कायदेशीर लढा देण्याचा निर्धार करणारा ठराव विधीमंडळात एकमताने मंजूर.
पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यात कोणावरही अन्याय होणार नाही-मुख्यमंत्र्यांची ग्वाही.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनाला आणखी स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार.
आणि
जल जीवन मिशन मोहिमेअंतर्गत औरंगाबाद परिक्षेत्रातल्या पस्तीस गावांसाठीच्या वॉटर ग्रीड योजनेला मान्यता.
****
कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागातल्या आठशे पासष्ट मराठी भाषिक गावांची इंचन् इंच जागा महाराष्ट्राचीच आहे, आणि सीमा भागातल्या मराठी भाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार खंबीरपणे सर्व ताकदीनिशी उभं आहे, असा ठराव आज विधानसभेत आणि त्या पाठोपाठ विधान परिषदेत एकमतानं मंजूर करण्यात आला. बेळगाव, बिदर, धारवाड, निपाणी, भालकी आणि कारवार या शहरांसह आठशे पासष्ट मराठी भाषिक गावं महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी कायदेशीर लढा देण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी हा ठराव मांडताना व्यक्त केला. कर्नाटकच्या मराठीविरोधी भूमिका आणि वर्तनाचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. ते म्हणाले –
बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर या शहरांसह ८६५ गावांतील मराठी भाषिक जनतेसोबत महाराष्ट्र शासन खंबीरपणे निर्धाराने व संपूर्ण ताकदीनिशी उभा आहे. याबाबत केंद्र शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन महाराष्ट्र राज्याच्या न्याय्य मागण्यांसाठी व मराठी भाषिक खेडे, घटक, भौगोलिक सलगता, मराठी भाषिक लोकांची सापेक्ष बहुसंख्यता व महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठीची तेथील लोकेच्छा या तत्वानुसार महाराष्ट्राला साथ देण्यासाठी केंद्र शासनाला देखील विनंती करणे असा ठराव ही विधानसभा आज निर्धारपूर्वक एक मताने पारित करीत आहे.
****
दोन्ही सभागृहात हा ठराव पारित झ��ल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमा भागातल्या मराठी नागरिकांसाठी घेतलेल्या काही निर्णयांची घोषणा केली. या आठशे पासष्ट गावांचा मुख्यमंत्री सहायता देणगी योजनेत समावेश केला असून, तिथे महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाला देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. सीमा भागात मराठी भाषिकांसाठी कार्य करणाऱ्या मराठी संस्थांना राज्य मराठी विकास संस्थेमार्फत अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या उपक्रमासाठी, २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरता एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक, व्यापारी, वारकऱ्यांना विश्वासात घेऊनच पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा तयार करणार असून, याबाबत कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत दि��ी. सदस्य अमोल मिटकरी यांनी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा मार्गिकेबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती, तेव्हा उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपुरात येणाऱ्या लाखो भाविकांना आणि स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यादृष्टीनं प्रस्तावित तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत नव्यानं कामं समाविष्ट करण्यात आली आहेत, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान, आमदार अमोल मिटकरी यांनी ही लक्षवेधी सूचना मांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी यावर कडाडून आक्षेप घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिटकरी यांचं हे विधान निंदाजनक असल्याचं नमूद केलं. उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी मिटकरी यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त करत, त्यांना तारतम्य बाळगण्याची सूचना केली तसंच ते वक्तव्य कामकाजातून काढून टाकण्याची सूचना केली. त्यावर मिटकरी यांनी या विधानाबाबत सदनात दिलगिरी व्यक्त केली.
****
आपल्या पक्षनेत्यांची तुलना महापुरुषांशी करणं, हा महापुरुषांचा अवमान होत नाही का, असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिदेत विचारला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महापुरुषांचा अवमान प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर फडणवीस बोलत होते. देवदेवता, संत महात्मे तसंच महापुरुषांबाबत विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून होणारी वक्तव्य फडणवीस यांनी सदनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर दोन्ही बाजूच्या सदस्यांनी गदारोळ सुरू केल्यामुळे उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं.
****
राज्यातल्या गौण खनिज पट्ट्यातून अनधिकृत उत्खनन करण्याला आळा घालता यावा, यासाठी सरकार नवीन धोरण आणत असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली. विधान परिषद सदस्य राम शिंदे यांनी यासंदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना विखे पाटील बोलत होते. येत्या पंधरा जानेवारीपर्यंत हे धोरण आणलं जाणार असून, यातून, अनधिकृत खनन रोखण्यासाठी ड्रोन कॅमेरे, सीसीटीव्ही या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत प्रसिद्ध केलेल्या, सरळसेवा भरतीच्या एकूण चारशे तीस जाहिरातींसाठी दिव्यांग आरक्षणानुसार भरती प्रक्रिया राबवली जाईल, असं मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितलं. उमेदवारांच्या वयोमर्यादेत वाढ करण्याचा विचार करता येणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
****
अनुसूचित जाती - जमाती तसंच ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती मि��ाली पाहिजे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात आज विधान भवनावर इशारा मोर्चा काढण्यात आला. समता प्रतिष्ठान मधील घोटाळ्याची सखोल चौकशी करावी यासह अनेक मागण्याही या इशारा मोर्चात करण्यात आल्या.
****
देशभरात गेल्या चोवीस तासात एकूण एकशे सत्तावन्न नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली आहे. देशात सध्या कोविडचे तीन हजार चारशे एकवीसहून अधिक सक्रीय रुग्ण आहेत. गेल्या चोवीस तासात एकोणपन्नास हजारांहून जास्त लोकांची कोविड चाचणी करण्यात आल्याची, तसंच देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत दोनशे वीस कोटींहून अधिक लसमात्रा देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. २२ कोटी २३ लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे. आज सकाळपासून देशभरात सुमारे ३३ हजारांहून जास्त नागरिकांचं लसीकरण झालं.
****
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनाला आणखी स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या सुटीकालीन पीठानं नकार दिला आहे. भ्रष्टाचार प्रकरणी अटकेत असलेल्या देशमुख यांच्या जामिनाला स्थगिती देण्याची मागणी केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयनं या पीठाकडे केली होती, ती आज न्यायालयानं फेटाळून लावली. आता सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी काही सुनावणी झाली नाही तर देशमुख यांची उद्या कारागृहातून जामिनावर मुक्तता होऊ शकते.
****
जल जीवन मिशन मोहिमेअंतर्गत औरंगाबाद परिक्षेत्रातल्या पस्तीस गावांसाठीच्या सुमारे एकशे चौतीस कोटी रुपये मूल्याच्या वॉटर ग्रीड अर्थात नळ पाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या संदर्भातला शासन निर्णय जारी झाला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर औरंगाबाद तालुक्यातल्या पिसादेवी, झाल्टा, गांधेली, गेवराई तांडा, तीसगाव, दौलताबाद, शरणापूर, केसापुरी, जटवाडा यासह पस्तीस गावांना नळानं पाणी पुरवठा करता येणार आहे.
****
जालना शहरातल्या नथुमल वासुदेव या कापड विक्रीच्या दुकानातील एक कोटी ७० लाख रुपये चोरणाऱ्या चार संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. या चौघांकडून एक कोटी ६९ लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. दुकानात काम करणाऱ्या एका नोकरानेच रात्री दुकान बंद करण्याच्या वेळी, दुकानातच थांबून तीन साथीदारांच्या मदतीनं ही चोरी केल्याचं तपासात समोर आलं आहे.
****
औरंगाबाद शहरात मध्यवर्ती उस्मानपुरा भागात आज पेट्रोल वाहतूक करणाऱ्या वाहनाला आग लागल्याची घटना घडली. पाच हजार लिटर डिझेल घेऊन जाणाऱ्या या वाहनानं उस्मानपुऱ्यातल्या भारत पेट्रोल पंपानजिक पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन विभागा��्या पद्मपुरा आणि सिडको केंद्रांच्या तीन गाड्या घटनास्थळी पोचल्या आणि अग्नीशमन दलाच्या जवानांनी जिवाची बाजी लावत आगीवर नियंत्रण मिळवलं.
****
देशाचे पहिले कृषीमंत्री आणि विदर्भाचे शिक्षण शिल्पकार डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर इथल्या रामगिरी या शासकीय निवासस्थानात आज त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केलं.
****
0 notes
Video
youtube
Star Pravah मी होणार सुपरस्टार फेम शुभम सातपुते । शिवशक्ती महापुरुषांचा ...
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 December 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ डिसेंबर २०२२ सायंकाळी ६.१०
****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 December 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ डिसेंबर २०२२ सायंकाळी ६.१०
****
वस्तू आणि सेवा कर पालनात होणाऱ्या अनियमितांना अपराधिक श्रेणीतून वगळण्याचा जीएसटी परिषदेचा निर्णय.
महाविकास आघाडीचा मुंबईत महामोर्चा तर भाजपचं राज्यभरात माफी मागा आंदोलन.
हिंगोली इथं अत���क्रमण काढण्याची नोटीस बजावणाऱ्या पथकावर नागरिकांची दगडफेक.
आणि
पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात बांगलादेशच्या चौथ्या दिवसअखेर सहा बाद २७२ धावा.
****
वस्तू आणि सेवा कर - जीएसटी पालनात होणाऱ्या अनियमितांना अपराधिक श्रेणीतून वगळण्याचा निर्णय जीएसटी परिषदेनं घेतला आहे. जीएसटी परिषदेची ४८ वी बैठक आज दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीनंतर सीतारामन यांनी ही माहिती दिली. पेट्रोलमध्ये मिसळल्या जाणाऱ्या इथेनॉलवरचा जीएसटी आता १८ टक्क्यांवरून पाच टक्के करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यामुळे जैव इंधनाच्या वापराला चालना मिळेल तसंच कच्च्या तेलावरचं अवलंबित्व कमी होईल, असं सीतारामन यांनी म्हटलं आहे. डाळींच्या फोलपटांवरच्या भुसा करमुक्त करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. या फोलपटांवर आतापर्यंत पाच टक्के जीएसटी आकारला जात होता.
****
आधुनिक युगात सांख्यिकीची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. दिल्लीत राष्ट्रपती भवनात भारतीय सांख्यिकी सेवेच्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांनी आज राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या. योग्य सांख्यिकीय विश्लेषणाशिवाय धोरणांची आखणी आणि प्रभावी अंमलबजावणी करणं शक्य होत नसल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. देशाची विकासाच्या दिशेनं अधिक वेगानं वाटचाल होण्यासाठी सांख्यिकी अधिकाऱ्यांच्या मोठ्या योगदानाची आवश्यकता असून अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे आपली कर्तव्ये पार पाडावीत असं आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केलं.
****
सरकार प्रत्येक स्तरावरच्या प्रक्रिया पारदर्शक आणि मजबूत बनवण्यासाठी अथक प्रयत्न करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या सुशासन सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी दिलेल्या शुभेच्छापर संदेशात पंतप्रधानांनी, येत्या २५ वर्षाच्या अमृतकाळात गौरवशाली आणि स्वावलंबी भारत निर्माण करण्याचा संकल्प जनतेनं केला असल्याचं म्हटलं आहे. या महिन्याच्या १९ ते २५ तारखेपर्यंत दुसरा सुशासन सप्ताह साजरा होणार आहे. शासनाचा प्रभाव वाढावा यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विविध धोरणात्मक हस्तक्षेपांद्वारे सरकार नागरिकांचं डिजिटल सक्षमीकरण आणि संस्थांच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेनं जोरदार वाटचाल करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
महागाई, बेरोजगारी, पळवलेले उद्योगधंदे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसंच भाजपच्या अन्य नेत्यांकडून महापुरुषांचा होत असलेला अवमान आदी मुद्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत महामोर्चा काढण्यात आला. ��ाष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखा��ी काढण्यात आलेल्या या महामोर्चात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शेकाप नेते जयंत पाटील, यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माजी मंत्री छगन भुजबळ यांनी तयार केलेल्या महापुरुषांच्या चित्ररथांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
****
महाविकास आघाडीला मुंबईत मैदानभर माणसंही गोळा करता आली नाहीत, हिंदू दैवतांचा अपमान, संतांची कुचेष्टा करणाऱ्या महाविकास आघाडीला मोर्चे काढण्याचा अधिकारही नाही, अशी टीका प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या मोर्चावर टीका केली. शिवसेनेच्या नेतेमंडळींकडून संतमहंत तसंच हिंदू दैवतांविरोधात होणाऱ्या विधानांच्या विरोधात भाजपच्या वतीनं आज राज्यभरात माफी मागा आंदोलन करण्यात आलं. राज्यात सुमारे सहाशेहून अधिक ठिकाणी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केल्याची माहिती उपाध्ये यांनी दिली.
महाविकास आघाडीचा आजचा मोर्चा हा राज्यपालांच्या विरोधात नसून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार चांगलं काम करत असल्यानं, भीतीपोटी काढलेला मोर्चा असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
****
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या पुढाकाराने येत्या २६ डिसेंबरला विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर शेतकरी शेतमजुरांचा पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा येत्या मंगळवारी २० तारखेला यवतमाळ जिल्ह्यात वणी इथून नागपूरकडे प्रयाण करेल. वरोरा, नांदुरी, बरबटी, बुटीबोरी मार्गे २५ तारखेला हा मोर्चा नागपुरात दीक्षाभूमीवर मुक्कामी पोहोचणार असून, २६ डिसेंबरला विधीमंडळावर धडकणार आहे. किसान सभेचे सरचिटणीस राजन क्षीरसागर यांनी ही माहिती दिली. राज्यातल्या २८ जिल्ह्यातले शेतकरी शेतमजूर या मोर्चात सहभागी होणार आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयक पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी न्युयॉर्क इथं अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज राज्यात ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली. जालना तसंच औरंगाबाद इथं भाजप पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी भुट्टो यांच्या प्रतिकात्मक प्रतिमांचं दहन करून निषेध व्यक्त केला.
****
हिंगोली इथं आज अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना देण्यासाठी गेलेल्या नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर आणि ��ोलिस कर्मचाऱ्यांवर अतिक्रमणधारकांनी दगडफेक केली. यात एक कर्मचारी जखमी झाला असून ऑटो आणि पोलिस गाडीचे नुकसान झालं आहे. दरम्यान, काल जलेश्वर तलाव परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली होती, मात्र उद्या असलेल्या ग्रामपंचायत मतदानाच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम थांबवून उर्वरित मोहिम येत्या सोमवारी राबवण्यात येणार होती. त्यासाठीच्या सूचना देण्यासाठी हे पथक गेलं असतांना हल्ला झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवसअखेर बांगलादेशनं सहा बाद २७२ धावा केल्या. या सामन्यात विजयासाठी भारतानं उद्या बांगलादेशचे चार गडी बाद करणं आवश्यक आहे, तर बांगलादेशला विजयासाठी २४१ धावांची आवश्यकता आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या २६६ पैकी बिनविरोध झालेल्या १३ ग्रामपंचायती वगळता २५३ ग्रामपंचातींसाठी उद्या मतदान होणार आहे. एकूण ८२९ केंद्रांवर मतदान होणार असून यासाठीची आवश्यक तयारी निवडणूक विभागानं पुर्ण केली आहे. दरम्यान, परवा मतमोजणीनंतर निवडणूक निकाल घोषित करण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी शर्मिष्ठा भोसले यांनी दिली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उद्या होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून २० डिसेंबरपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. या कालावधीत सकाळी सहा वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतली वाहनं, अत्यावश्यक सेवेतले अधिकारी तसंच कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, अंत्ययात्रा याकरता हे आदेश लागू राहणार नाहीत, असं अपर जिल्हादंडाधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे.
****
नाविन्यपूर्ण उद्योगांना केंद्र तसंच राज्य सरकार भरीव आर्थिक सहकार्य करत असून याचा लाभ घेण्याचं आवाहन बजाज इन्क्युबेशन सेंटरचे संचालक डॉ.सचिन देशमुख यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अटल इन्क्युबूशन सेंटर - बामू फाऊंडेशन यांच्या वतीने ‘स्ट्रेन्थनिंग ऑफ स्टार्टअप इकोसिस्टीम अॅण्ड बिझनेस मॉडेलिंग’ या विषयावर झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. आतापर्यंत ४३ स्टार्टअपना केंद्राच्या वतीने आर्थिक सहकार्य करण्यात आले असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, नाविन्यपूर्ण उद्योग संकल्पनांना मूर्त स्वरूप देवून उद्योजकता वाढीस चालना देण्यासाठी अटल इन्कुबेशन सेंटरची स्थापना करण्यात आली आहे.
****
महात्मा गांधी अभिमत विद्यापीठाच्या महागामी गुरूकुलाच्या यंदाच्या ऑरा औरंगाबाद या महोत्सवाचा उद्या समारोप होत आहे. या महोत्सवांतर्गत गेल्या महिन्यात १९ नोव्हेंबरला औरंगाबाद लेणीत पहिला कार्यक्रम सादर झाला. त्यानंतर देवगिरी किल्ला, सोनेरी महल, बिबी का मकबरा आदी ठिकाणी झालेल्या सांगितिक कार्यक्रमांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समारोप सोहळ्यात उद्या रविवारी सायंकाळी भोकरदन तालुक्यात अन्वा इथल्या मंदिरात महागामीच्या शिष्यांचं ओडिसी नृत्य आणि निरंजन भालेराव यांचं बासरी सादरीकरण होणार आहे.
****
0 notes
Text
भाजपचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम “बेगडी’ – सुषमा अंधारे
भाजपचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम “बेगडी’ – सुषमा अंधारे
भाजपचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम “बेगडी’ – सुषमा अंधारे पुणे – शाई फेकण्यापेक्षा ती शाई साठवून महापुरुषांचा अवमान करणारी विचारधारा मतदानातून पराभूत करू, असे आवाहन शिवसेनाच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले. तसेच भविष्यात महापुरुषांचा अवमान झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही अंधारे यांनी दिला. भगतसिंग कोश्यारी यांना आपण राज्यपाल असल्याचा विसर पडला असून ते…
View On WordPress
0 notes
Text
उदयनराजे ‘राजे’ आहेत असं म्हणत सुषमा अंधारे यांची टोलेबाजी…भिरकन राजीनामा फेकतील असं सुषमा अंधारे का म्हणाल्या…
उदयनराजे ‘राजे’ आहेत असं म्हणत सुषमा अंधारे यांची टोलेबाजी…भिरकन राजीनामा फेकतील असं सुषमा अंधारे का म्हणाल्या…
उदयनराजे ‘राजे’ आहेत असं म्हणत सुषमा अंधारे यांची टोलेबाजी…भिरकन राजीनामा फेकतील असं सुषमा अंधारे का म्हणाल्या… पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी आज पुण्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. याबंदमध्ये विविध नेत्यांनी बंदच्या भाषणात फटकेबाजी केली. पण यावेळी ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी केलेली फटकेबाजी चर्चेचा विषय ठरत आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी…
View On WordPress
#‘असं’#अंधारे#आजच्या प्रमुख घडामोडी#आहेत#उदयनराजे#का#टोलेबाजी…भिरकन#फेकतील#बातमी आजची#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#म्हणत#म्हणाल्या….#यांची#राजकारण#राजकारण लेटेस्ट#राजीनामा#राजे#शासन#सरकार#सुषमा
0 notes
Text
देवेंद्र फडणवीस यांच्या मनात छत्रपती शिवराय आणि डॉ. आंबेडकरांबद्दल आकस, नाही तर ते… सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
देवेंद्र फडणवीस यांच्या मनात छत्रपती शिवराय आणि डॉ. आंबेडकरांबद्दल आकस, नाही तर ते… सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
देवेंद्र फडणवीस यांच्या मनात छत्रपती शिवराय आणि डॉ. आंबेडकरांबद्दल आकस, नाही तर ते… सुषमा अंधारे काय म्हणाल्या? पुणेः भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल प्रचंड आकस आहे. त्यांच्याच अधिपत्याखाली एका-एका राजकारण्याकडून महापुरुषांचा ठरवून अपमान केला जातोय. अशी घणाघाती…
View On WordPress
#“..तर#अंधारे#आकस#आजच्या प्रमुख घडामोडी#आणि#आंबेडकरांबद्दल#काय?#छत्रपती#डॉ.#ते#देवेंद्र#नाही#फडणवीस#बातमी आजची#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मनात#म्हणाल्या….#यांच्या#राजकारण#राजकारण लेटेस्ट#शासन#शिवराय#सरकार#सुषमा
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 13 December 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १३ डिसेंबर २०२२ सकाळी ७.१० मि. ****
जी -२० च्या विकास कार्य गटाची आजपासून मुंबईत पहिली बैठक
महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी अहमदाबादमध्ये भेट
महापुरुषांबद्दल कथित अवमानकारक वक्तव्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची महापुरुषांबद्दल अनावधानाने केलेल्या विधानाबद्दल पुन्हा एकदा माफी
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या जामीनाला १० दिवसांसाठी स्थगिती
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगापुढे आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी
आणि
महाराष्ट्र फाउंडेशनचा ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांना साहित्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर, भूमिहिनांच्या हक्कासाठी केलेल्या कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते शांताराम पंदेरे यांना विशेष पुरस्कार
****
जी -२० च्या भारताच्या अध्यक्षतेखालील विकास कार्य गट- डेव्हलमेंट वर्किंग ग्रुपची पहिली बैठक आजपासून मुंबईत होणार आहे. या बैठकी��ाठी मुंबईत दाखल झालेल्या सर्व देशी-विदेशी पाहुण्यांचं महाराष्ट्रीयन पद्धतीनं स्वागत झालं. त्यांच्या स्वागताचे फलक संपूर्ण मुंबईत जागोजागी झळकले आहेत. गेल्या दशकामध्ये आलेल्या आर्थिक संकटानंतर जी २० मध्ये डेव्हलमेंट वर्किंग ग्रुप स्थापन झाला. २०३० पर्यंत शाश्वत विकासाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ठरवलेली लक्ष्य गाठण्याच्या दृष्टीने हा समुह कार्यरत आहे.
याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी
‘‘मुंबईत सुरू होणाऱ्या तीन दिवसीय बैठकीच्या पहिल्या दिवशी आज २ महत्त्वपूर्ण सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. यात २०३० पर्यंत शाश्वत विकासाचं उद्दिष्ट साध्य करताना त्यात जी २० ची भूमिका आणि डेटा यावर एक चर्चासत्र होईल. दुसऱ्या सत्रात जीवनशैलीतील बदलातून हरित विकास साध्य करण्यासाठीच्या प्रयत्नांवर चर्चा होईल. इंटरनेट ऑफ थिंग्ज, बिग डेटा, आर्टिफिशियल इंटिलिजन्स यासारख्या विषयांवरही आजच्या सत्रात मार्गदर्शन केलं जाईल. या बैठकीसाठी मुंबईत आलेल्या पाहुण्यांना महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, हस्तकला आणि नृत्य यांचाही अनुभव घेता येईल. गेट वे ऑफ इंडिया आणि कान्हेरी लेण्यासारख्या ऐतिहासिक स्थानांना भेटी देऊन या पाहुण्यांना देशाचा समृद्ध इतिहास जाणून घेण्याचीही संधी मिळेल.’’
आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून जीवन भावसार
****
महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची काल अहमदाबाद विमानतळावर भेट झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये सीमावादावर चर्चा झाल्याचं वृत्त आहे. दोन्ही बाजूंनी प्रक्षोभक विधानं न करण्याची काळजी घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.
****
महापुरुषांबद्दल केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून आपली भुमिका स्पष्ट केली. महापुरुषांचा अनादर करण्याचा विचार आपल्या स्वप्नातही येणार नाही, मात्र आपल्या भाषणातला काही भाग सोयिस्कररित्या समाजापुढे मांडून त्याचं राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं, राज्यपालांनी या पत्रात म्हटलं आहे.
****
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील महापुरुषांबद्दल अनावधानाने झालेल्या विधानाबद्दल काल पुन्हा एकदा माफी मागितली. याबाबत एक संदेश जारी करून त्यांनी, महापुरुषांविषयी बोलताना आपल्याकडून बोली भाषेतले शब्द अनवधानाने निघाले, यात कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता, असं स्पष्ट केल���. शाई फेक झाल्यानंतर घडलेल्या घटनांबाबत आपली कोणाबद्दलही तक्रार नाही, या मुद्द्यावरून महाराष्ट्र अशांत होऊ नये असं वाटतं, त्यामुळे आता हा वाद थांबवावा असं आवाहन पाटील यांनी केलं.
****
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सत्ताधारी मंत्र्यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या विरोधात काल बीड शहरात बंद पाळण्यात आला. शिवप्रेमींनी शहरातून याविरोधात रॅली काढली. यावेळी जिल्हाधिकार्यांमार्फत सरकारला निवेदन देण्यात आलं.
****
निर्भया निधीतून खरेदी केलेली वाहनं महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातच मंत्र्यांच्या ताफ्यात दिली गेली, असं भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सांगितलं. त्या काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या. महाविकास आघाडी सरकारने निर्भया निधीतून २२० वाहनं खरेदी केली होती, यातली १२१ वाहनं फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबईतल्या ९४ पोलीस ठाण्यांना देण्यात आली, तर ९९ वाहनं मे २०२२ मध्ये राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागांना देण्यात आली. खासदार सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षा ताफ्यातही याच निधीतून खरेदी केलेली वाहनं होती, असंही वाघ यांनी सांगितलं. ही सर्व वाहनं पुन्हा निर्भया पथकात दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून आठवडाभरात ती पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
****
शिंदे-फडणवीस सरकारनं चार महिन्यातच राज्याचा नावलौकिक रसातळाला मिळवला असल्याची टीका, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. राज्यात महापुरुषांचा अपमान सातत्याने केला जात असूनही कारवाई होत नसल्याचं ते म्हणाले. महापुरुषांच्या अपमानासह राज्यातल्या विविध समस्यांप्रश्नी महाविकास आघाडी येत्या १७ तारखेला मुंबईत महामोर्चा काढून सत्ताधाऱ्यांना जाब विचारणार असल्याचं पटोले यांनी सांगितलं. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन अनेक वर्षांच्या कालखंडानंतर होत आहे. हे अधिवेशन किमान तीन आठवड्यांचं असावं अशी काँग्रेसची मागणी असल्याचं ते म्हणाले.
****
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे, मात्र आपल्या या निर्णयाला न्यायालयानं पुढच्या १० दिवसांसाठी स्थगिती दिली आहे. देशमुख यांच्या विरोधात भ्रष्टाचार विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल असून, या प्रकरणी न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या समोर गेल्या आठवड्यात सुनावणी झाली होती. त्यानंतर न्यायालयानं देशमुख यांना काल जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या या निर्णयाला केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढचे १० दिवस देशमुख यांची कोठडी कायम राहणार आहे.
****
उद्योगातील कुशल मनुष्यबळासाठी नवीन अभ्यासक्रमांची गरज असल्याचं मत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं आहे. जर्मनीचे वाणिज्यदूत अचिम फॅबिग यांनी काल मुंबईत केसरकर यांची सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. जर्मनीसह जगातल्या ���िविध देशातले उद्योगसमूह महाराष्ट्रात गुंतवणूक करत आहेत. या उद्योगांना लागणारी कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागानं त्या दृष्टीनं पाऊलं उचलावीत, असं केसरकर यांनी सांगितलं.
****
रुग्णालयांशी संलग्न औषध दुकानांतून औषध खरेदी करणं बंधनकारक नसल्याचा निर्वाळा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी याबाबतचं पत्र नुकतंच जारी केलं. रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना हा निर्णय दिलासादायक ठरणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांनी काल शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप आणि मित्रपक्ष शासित राज्यांचे मुख्यमंत्री या शपथग्रहण सोहळ्याला उपस्थित होते. पटेल यांचा मुख्यमंत्रिपदाचा हा सलग दुसरा कार्यकाळ आहे.
****
शिवसेना पक्षाबाबत आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत काल केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी झाली. दोन्ही बाजुंच्या प्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घेत आयोगानं ही सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलली आहे.
****
मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने काल यासंदर्भात अधिसूचना जारी केली.
****
अरुणाचल प्रदेशात तवांग भागात भारत आणि चिनी सैन्यात चकमक झाल्याचं वृत्त आहे. नऊ डिसेंबरला झालेल्या या चकमकीत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले आहेत. मात्र चकमकीनंतर दोन्ही कडचं सैन्य माघारी परतल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
अमेरिकेतल्या महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा साहित्य जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार निवड समितीने काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. साहित्याच्या क्षेत्रात एकूण सहा, सामाजिक कार्याच्या क्षेत्रात चार आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार, असे एकूण अकरा पुरस्कार यंदा दिले जाणार आहेत. भूमिहिनांच्या हक्कासाठी केलेल्या कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते शांताराम पंदेरे यांना विशेष पुरस्कार तर शरद बावस्कर यांच्या भुरा या कादंबरीला पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २८ जानेवारी रोजी पुण्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
****
माजी केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त काल त्यांना अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांनी ट्विट संदेशातून मुंडे यांना आदरांजली वाहिली. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी परळी नजिक गोपीनाथ गड इथं मुंडे यांच्या ��माधीवर आदरांजली अर्पण केली.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काल त्यांना सर्व स्तरातून शुभेच्छा देण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
****
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात केंद्र सरकारच्या योजना हेतुपुरस्सर अडवल्या जात होत्या, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ते काल हिंगोलीत बोलत होते. राज्यात शिंदे - फडणवीस सरकारचं काम उत्कृष्ट पद्धतीने सुरु असून, पुढील तीन वर्षात शेतकर्यांना दिवसाही वीज मिळेल, असा विश्वास बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.
****
औरंगाबादमध्ये होणार्या अकराव्या अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार प्रकाश त्रिभूवन यांची निवड करण्यात आली आहे. नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मधुसूदन गायकवाड यांनी काल पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. ११ आणि १२ फेब्रुवारीला शहरातल्या तापडिया नाट्यमंदीरात हे संमेलन होणार आहे.
****
विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करावीत, असं आवाहन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी केलं आहे. सोलापूर इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या १८ व्या दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते. विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण केलं तर पुढं जाण्याचा मार्ग प्रशस्त होऊ शकतो असंही ते यावेळी म्हणाले. विद्यापिठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्र-कुलगुरू डॉ. राजेश गादेवार यावेळी उपस्थित होते.यावेळी ५० संशोधक विद्यार्थ्यांना पीएच. डी पदवी तर ५७ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात आलं. विविध विद्याशाखांच्या एकूण १७ हजार ११९ विद्यार्थ्���ांना पदवी बहाल करत असल्याचं कुलगुरूंनी घोषित केलं.
****
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्र अभ्यासक्रमाच्या परीक्षेला आजपासून प्रारंभ होत आहे. विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी ही माहिती दिली. राज्यातल्या एकूण १७१ केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी सुमारे ४६ हजार पेक्षा अधिक विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. ३० डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या परीक्षेचं वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
****
अन्न पदार्थ निर्मिती व्यवसायात कार्यरत असलेले हॉटेल, रेस्टाँरट, आणि इतर उद्योगांकडून पात्रतेचे निकष पूर्ण होत आहेत किंवा नाही, याची तपासणी करण्याचे निर्देश औरंगाबादचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले आहेत. जिल्हास्तरीय सुरक्षित अन्न ��णि पौष्टिक आहार सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. नागरिकांना पौष्टिक आणि सुरक्षित अन्न पदार्थ उपलब्ध व्हावेत याची खबरदारी अन्न औषध प्रशासन विभागानं घ्यावी, भेसळयुक्त अन्नपदार्थ निर्मितीवर कारवाई करुन प्रतिबंध करावा, असं पाण्डेय यांनी सांगितलं. शालेय स्तरावर ‘चला पौष्टिक आहार घेऊया’ या उपक्रमाअंतर्गत समिती स्थापन करण्याची सूचना त्यांनी केली. याअंतर्गत विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार देण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन तसंच शालेय शिक्षण विभागाने एकत्रित उपक्रम राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी दिले.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात दोन टप्प्यात गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा समन्वय समितीच्या काल झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी ही माहिती दिली. १५ ते २५ डिसेंबर २०२२ हा पहिला टप्पा, तर १५ ते २५ जानेवारी २०२३ असा दुसरा टप्पा असेल. या दरम्यान नऊ महिने ते पाच वर्ष वयोगटातल्या बालकांचं प्राधान्यानं लसीकरण करण्यात येणार आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या हुतात्मा सैनिकांच्या वीरमाता, पत्नी, पिता किंवा माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्याला जिल्हा महसूल तसंच पोलीस प्रशासनाचं प्राधान्य असेल, अशी ग्वाही, जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिली. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा प्रारंभ केल्यानंतर त्या काल बोलत होत्या. सर्वसामान्य नागरिकांना हुतात्म्यांचा इतिहास माहीत व्हावा, यासाठी हुतात्मा स्मारकासाठी पान्हेरा या गावी जागेची पाहणी केली असून, त्याठिकाणचं काम लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं. दहावी आणि बारावी परीक्षेत ९० टक्यांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांना रोख दहा हजार रुपये आणि प्रशस्तीपत्र तसंच वीरपत्नीला जमिनीचा सातबारा वाटप गोयल यांच्या हस्ते काल करण्यात आलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात लासूर स्टेशन इथं आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते काल शवविच्छेदन गृहाचं भूमिपूजन करण्यात आलं. आमदार बंब यांच्या निधीतून या शवविच्छेदन गृहासाठी सात लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
****
औरंगाबाद शहरात काल तुरळक पाऊस झाला. ढगाळ वातावरणामुळे शहरात थंडीचा कडाका काही प्रमाणात कमी झाला आहे. येत्या दोन दिवसांत कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.
****
0 notes