#भांडणात
Explore tagged Tumblr posts
Text
नालंदा : 2 बायकांच्या भांडणात फसला नवरा
https://bharatlive.news/?p=103173 नालंदा : 2 बायकांच्या भांडणात फसला नवरा
बिहारच्या शरीफ सदर रुग्णालयात ...
0 notes
Text
' नवराबायकोच्या भांडणात तू पडू नको ' , राहुरीत झाला एक खून
नगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यात एक खळबळजनक अशी घटना डिग्रस इथे समोर आलेली असून बायकोच्या डोक्यात गज मारून एका व्यक्तीने पत्नीचा खून केलेला आहे. सदर प्रकरणात पोलिसांनी आरोपी याला तात्काळ बेड्या ठोकलेल्या आहेत. रविवारी 28 तारखेला ही घटना घडलेली होती. उपलब्ध माहितीनुसार, अनिता सुरेश पवार ( वय 34 ) असे मयत महिला यांचे नाव असून याप्रकरणी आरोपी सुरेश भानुदास पवार ( वय 40 ) याला अटक करण्यात आलेली आहे.…
View On WordPress
#अहमदनगर बातम्या अपडेट#गुन्हेगारीच्या बातम्या#नगर बातमी#नगर बातमी अपडेट#राहुरीत झाला एक खून#व्हायरल बातम्या
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 April 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ एप्रिल २०२३ दुपारी १.०० वा.
****
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आज सलग चौदाव्या दिवशी बाधित झालं. लोकसभेत कामकाज सुरु होताच काँग्रेस, तृणमुल काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघमसह इतर विरोधी पक्षांनी, अदानी प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी करत, घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. अध्यक्षांनी शांत राहण्याचं आवाहन करुनही हा गदारोळ सुरुच राहील्यानं, लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.
राज्यसभेतही आज कामकाज सुरु झाल्यावर, अदानी समुहाच्या मुद्यावरुन विरोधकांनी गदारोळ करण्यास सुरुवात केली. तर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी, राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. या गदारोळामुळे काही वेळातच सभापती जगदीप धनखड यांनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं.
***
दरम्यान, काँग्रेस पक्ष राजकीय हेतुने संसदेच्या कामकाजात अडथळा आणत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी केला आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. खासदारकी रद्द होणं, हे याआधीही घडलं असून, राहुल गांधी न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. काँग्रेस लोकशाहीच्या नावाखाली स्वत:च्या स्वार्थासाठी हा लढा देत असल्याची टीका शिंदे यांनी केली.
***
ज्या वेगाने देशभरात अमृत सरोवर बा��धले जात आहेत, ते अमृत काळासाठी केंद्र सरकारच्या संकल्पांमध्ये नवीन ऊर्जा भरणारे असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या अमृत सरोवर योजनेसंबंधी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी केलेल्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी, मिशन अमृत सरोवरचं कौतुक केलं. ४० हजाराहून अधिक अमृत सरोवर राष्ट्राला समर्पित करण्यात आले असून, यावर्षी १५ ऑगस्ट पर्यंत ५० हजार अमृत सरोवर बांधण्याचं उद्दीष्ट असल्याचं ट्विट शेखावत यांनी केलं होतं.
***
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज दुसऱ्या टप्प्याचे पद्म पुरस्कार प्रदान करणार आहेत. संध्याकाळी राष्ट्रपती भवनात होणाऱ्या या समारंभात तीन पद्मविभूषण, चार पद्मभूषण आणि ४७ पद्मश्री सन्मान दिले जाणार आहेत.
***
स्टँड अप इंडिया योजनेचा सहावा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. याअंतर्गत आतापर्यंत देशभरातल्या एक लाख ८० हजार ६३६ खात्यांना ४० हजार ७१० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. महिला, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती श्रेणींमध्ये उद्योजकतेला चालना देणं, हा या योजनेचा उद्देश आहे. देशातल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसंच महिलावर्ग यांच्यातल्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी स्टँड - अप इंडिया योजना हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.
देशातले उद्योजक, त्यांचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांचं जीवनमान सुधारण्यासाठी स्टँड - अप इंडिया योजना महत्वपूर्ण भुमिका बजावत असल्याचं, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी म्हटलं आहे.
***
केरळ मधल्या कोझिकोडी रेल्वे जळीतकांड प्रकरणीतल्या मुख्य आरोपीला रत्नागिरीतून अटक करण्यात आली आहे. शाहरुख सैफ असं या आरोपीचं नाव असून, केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकानं संयुक्त कारवाईत रत्नागिरी रेल्वे स्थानकावर त्याला पकडलं. परवा तीन एप्रिलला दोन प्रवाशांमध्ये आपापसात झालेल्या भांडणात शाहरुख सैफ यानं दुसऱ्या प्रवाशावर थेट पेट्रोल टाकून आग लावली होती, यात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला.
***
नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यात झालेल्या अपघातातल्या मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या अपघातातल्या जखमींवर शासकीय रुग्णालयात आवश्यक उपचार करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. गेल्या आठवड्यात मुदखेड तालुक्यात मुगट-इंजळी रस्त्यावर रिक्षा आणि ट्रकमध्ये झालेल्या या अपघाता पाच जणांचा मृत्यू झाला होता.
****
देशात काल चार हजार ४३५ कोविड बाधित रुग्णांची नोंद झाली, ११ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दोन हजार ५०८ रुग्ण बरे झाले. देशात सध्या २३ हजार ९१ रुग्णांवर उपचार सुरु असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.
***
हनुमान जयंतीचा उत्सव उद्या साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथं भद्रा मारोतीच्या दर्शनाला पायी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. या भाविकांच्या सुविधेसाठी छत्रपती संभाजीनगर ते खुलताबाद मार्गावरची ��ाहतुक आज सायंकाळपासून अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरकडून धुळे, देवगाव रंगारीकडे जाणारी जड वाहनं नगरनाका - एएस क्लब - माळीवाडा- वेरुळ - कसाबखेडा मार्गे जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीनं देण्यात आली आहे.
//**********//
0 notes
Text
चल दोघे स्मशानात जाऊ
तुझी जात, माझा धर्म विसरून
निवांत चितेला जळताना पाहू
चल दोघे स्मशानात जाऊ......
विचारू जळणाऱ्या चितेला
तुझी जात कोणती
तुझा धर्म कोणता
बघू चिता बोलते का?
आणि जर नाहीच बोलली,
तर आपण चर्चेत दंग राहू
चल दोघे स्मशानात जाऊ......
मी ऐकल्यात आजीच्या तोंडून कथा आणि
आजकाल तर न्यूज मध्ये पण पाहतो
प्रेत उठले, बोलत सुटले
वगैरे, वगैरे
तुला राग आला का बरं
सॉरी सॉरी चल
तू. गाय, गीता, गोळवलकर किंवा गोडसे सुद्धा सांग
मी. बुद्ध, फुले,शाहू, शिवाजी महाराज, बाबासाहेब अण्णाभाऊ भाऊ सांगतो
बघ पटतंय का?
चल दोघे स्मशानात जाऊ......
तू. मला मनुस्मृती सांग
मी. तुला त्या साऊ, ज्योतीचा चा इतिहास सांगतो
तू मला भारत मातेची व्याख्या सांग
मी. तुला रांड.....
अरे रांड बोललो सॉरी
सो कॉल्ड उभे राहतील,
रांड कसं बोला बोंबलायला
पण ऐक ना
तिकडे सगळे ह्या पेक्षा घाण नावाने बोलतात
घिनाल, रखेल, वेश्या, वगैरे वगैरे, सीता ,गीता, सुद्धा
बरं सोड परत विषयांतर झालं
पण ऐक ना
त्या रेडलाईट वस्त्यात नागडी, उघडी, उताणी
पडलेल्या भारत मातेची कहाणी मी तुला सांगतो
बघ पटतंय का?
चल दोघे स्मशानात जाऊ......
तू. मला अर्जुनाची कथा सांग
मी. तुला त्या एकलव्याची व्यथा सांगतो
तू. मला रामायण, महाभारत सांग
मी. तुला सम्राट अशोकाच कलिंग युद्ध सांगतो
तू. मला गोब्राम्हण प्रतिपालक हिंदू हृदय सम्राट याची व्याख्या सांग
मी. तुला शिवरायांचं 18 पगड जातीच स्वराज्य सांगतो
बघ पटतंय का?
चल दोघे स्मशानात जाऊ......
दोघे भांडत जाऊ
तू छोटा मी मोठा
बोंबलत राहू
बघू आता तरी चिता उठते का?
अर्रे....... चिडू नकोस विषय लय गंभीर झाला होता
म्हणून जरा मस्ती केल....
हा....तू मला भिडे, एकबोटे सांग
मी. तुला शंभू राजे ,भीमकोरेगाव सांगतो
तू. मला RSS सांग
मी. तुला बाबासाहेब सांगतो
तू. तुझा हिंदुस्थान माझ्या समोर मांड
मी. तुला इंडियाची व��याख्या सांगतो
बघ पटतंय का?
चल दोघे स्मशानात जाऊ......
शेवटी आमच्या भांडणात
चिता जाळून धुळीस मिळाली
अंधार दूर सारुन
नवी पहाट उदयास आली
दोघांनाही इथेच शेवटी यायच आहे
हसत हसत ,बोलत बोलत
दोघांनी नवीन सुरुवात केली
चल दोघे स्मशानात जाऊ
तुझी जात, माझा धर्म विसरून
निवांत चितेला जळताना पाहू
चल दोघे स्मशानात जाऊ......
-वैभव वैद्य....
0 notes
Text
मैत्री सुख
ग्रामीण भागातील राहणीमानाचा गोडवा काही वेगळाच असतो आणि ते सुख आत्मसात करायला भेटलं स्वतःला भाग्यवान समजतो पाचवी सहावी ची गोष्ट आहे आम्ही बालमित्र दिवसभर सोबत असायचो सकाळची शाळा त्यानंतर दिवसभर खेळणे असा दिनक्रम असायचा आमचे मित्र म्हणजे सर्व नमुने कोणी अभ्यासात हुशार तर कोणी भांडणात हुशार कोणी खेळात हुशार तर कोणी मस्ती करण्यात हुशार अशी आमची खेळीमेडीची सर्कस बाल वयातील मित्र जीवाला जीव देणारे होते हे मात्र नक्कीच आणि ते आताही आहेत कोणी मित्रांमध्ये गरीब होतं तर कोणी श्रीमंत कोणी नोकरी वाल्याची मुलं तर कोणी शिक्षकाची यामध्ये सर्वात वेगळा मित्र होता तो श्रीमंत घरचा आणि मारवाडी मुलगा तो नेहमी पहायचा आपल्या मित्रांकडे कोणतीही वस्तू घ्यायला पैसे नसतात आणी आपल्या मित्रा ची हौस पुर्ण होत नाही म्हणून यावर आपण काय करू शकतो म्हणून त्यांनी एक ��क्कल लढवली घरातून पैशांची पुटली घेऊन आला त्यावेळी आमची आमचे शिक्षक यांचे कडे शिकवणी असायची त्यादिवशी शिकवणी सुरू होण्याअगोदर तो मारवाडी मित्र आम्हाला सांगू लागला माझ्याकडे पैसे आहेत ते आपण सर्व मिळून वाटून घ्या आपल्याला जे जे पाहिजे ते सर्व त्या पैशातून तुम्ही खरेदी करा म्हणजे आपले सर्व काम होईल पुस्तक, पाटी, दप्तर, पेन, पेन्सिल,सिनेमा जे वाटेल ते खरेदी करा आमचे मित्रांनी सांगितल्यावर आम्ही त्याला म्हटले की तू एवढे पैसे कुठून आणले घरून चोरून तर आणले नाहीस ना हे पैसे तर तो म्हणाला माझे बचत केलेले आहेत परंतु आम्हाला ती गोष्ट खोटी वाटली आणि सर्व मित्र मिळून ते पैसे घेण्यास आम्ही सर्व मित्रांनी नकार दिला पावसाळ्याचा तो वेळ होता गांजर गवत मोठ्या प्रमाणात असायचं आमच्या मित्राने आम्हाला म्हटलं तुम्ही जर हे पैसे घेत नसाल तर मी हे पैसे फेकून देईल तुम्ही हे पैसे मुकाट्याने घ्या परंतु आम्ही त्याला नकार दिला आणि त्याने म्हटल्याप्रमाणे केले पैशाचं चुंबड त्याने खोललं 50 पैसे 1चे चे कलदार होते त्याने सर्व पैसे गांजर गवतामध्ये फेकले आम्हाला विश्वास सुद्धा बसला नाही तो असे करेल परंतु घनदाट असलेल्या त्या गांजर गवतामध्ये त्याने पैसे फेकल्या बरोबर आम्ही सर्व मित्र ते शोधण्यासाठी तुटून पडलो, कारण आम्हला माहित होते ते पैसे त्यानी आमच्या साठी आणले होते आणि ते चोरीचे तर नसतील ना ही शंका घेणे ही चुकीचे होते म्हणून आम्ही सर्व मित्र मिळून ते गांजर गवतातील पैसे शोधून काढले ज्यांना जेवढे मिळाले तेवढे त्याचे, ही गोष्ट आमच्या सरांच्या कडे पोहचली सरांचा स्वभाव कडक होता काय झाले कोणीच सांगण्यास तयार नाही, परंतु आमच्या मित्राने झालेला प्रकार सांगितला मारवाडी मित्राच्या घरी चौकशी झाली की चोरी वगैरे काहीही केली नव्हती परंतु माझ्या सर्व मित्रांना सर्व सुख सुविधा भेटाव्या म्हणून त्याने स्वतःला भेटलेल्या खर्चाच्या पैशातून मित्रां चे सुख शोधले होते हाच प्रामाणिक उद्देश त्याचा होता अशा मैत्रीला सलाम.
-गोपाल मुकुंदे
1 note
·
View note
Text
भांडणात मध्यस्ती महिलेला अश्लील शिवीगाळ , गोठ्यात महिला येताच म्हणाला की..
भांडणात मध्यस्ती महिलेला अश्लील शिवीगाळ , गोठ्यात महिला येताच म्हणाला की..
काही विकृत मानसिकतेच्या लोकांना समोर महिला आहे याचेही भान भांडण करताना राहत नाही आणि त्यातून आक्षेपार्ह कृत्ये देखील केली जातात तसेच घाण घाण भाषेत शिवीगाळ देखील केली जाते. असाच एक संतापजनक प्रकार नगर जिल्ह्यात राहुरी येथे समोर आलेला असून भांडण सोडवण्यासाठी म्हणून आलेल्या महिलेला चक्क जातिवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी इथे अकरा तारखेला ही…

Kuno National Park: कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांच्या आपसी भांडणात मादी चित्ताचा मृत्यू
https://bharatlive.news/?p=98761 Kuno National Park: कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांच्या आपसी भांडणात मादी चित्ताचा ...
0 notes
Text
भांडणात मध्यस्ती महिलेला अश्लील शिवीगाळ , गोठ्यात महिला येताच म्हणाला की..
भांडणात मध्यस्ती महिलेला अश्लील शिवीगाळ , गोठ्यात महिला येताच म्हणाला की..
काही विकृत मानसिकतेच्या लोकांना समोर महिला आहे याचेही भान भांडण करताना राहत नाही आणि त्यातून आक्षेपार्ह कृत्ये देखील केली जातात तसेच घाण घाण भाषेत शिवीगाळ देखील केली जाते. असाच एक संतापजनक प्रकार नगर जिल्ह्यात राहुरी येथे समोर आलेला असून भांडण सोडवण्यासाठी म्हणून आलेल्या महिलेला चक्क जातिवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी इथे अकरा तारखेला ही…
View On WordPress
0 notes
Text
ज्यांच्यासोबत अनैतिक संबंधांचा दावा तोच भांडणात पडला अन..
ज्यांच्यासोबत अनैतिक संबंधांचा दावा तोच भांडणात पडला अन..
महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना सातारा जिल्ह्यात समोर आलेली असून अनैतिक संबंधाच्या संशयावरून सुरू झालेल्या भांडणातून कुशा चंदर जाधव ( मूळ वय 45 मूळ राहणार रायगड सध्या राहणार पळशी तालुका मान जिल्हा सातारा ) याचा डोक्यात कुदळ घालून खून करण्यात आलेला आहे. शनिवारी दुपारी ही घटना उघडकीला आलेली आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी बाळू गणपत जाधव ( वय पंचेचाळीस राहणार पुणे ) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केलेला असून…
View On WordPress
0 notes
Text
भांडणात सासू मध्ये पडली म्हणून चक्क सासूवरही.., पुण्यातील प्रकार
भांडणात सासू मध्ये पडली म्हणून चक्क सासूवरही.., पुण्यातील प्रकार
पुणे शहरात आणि परिसरात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत आहे अशीच एक घटना पिंपरी येथे उघडकीला आली असून चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीसोबत सासूवर देखील सत्तूरने वार केले. प्रकरणी एक जनाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चिंचवड येथील वाल्हेकरवाडी परिसरात सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली आहे. उपलब्ध माहितीनुसार, रूपाली सुभाष गायकवाड आणि मंगल दळवी अशी…
View On WordPress
0 notes
Text
फटाके फोडण्याच्या वादातुन 21 वर्षीय युवकाचा मृत्यु
फटाके फोडण्याच्या वादातुन 21 वर्षीय युवकाचा मृत्यु
२४ ऑक्टोबर रोजी नटवर पारिक कम्पाउंट मध्ये म्हाडा कॅालनीत १५ वी बिल्डिंगच्या कोपऱ्यात ३ अल्पवयीन मुल�� काचेच्या बॉटल मध्ये फटाके उडवत होते. (मयत व्यक्ती )सुनील उर्फ शंकर चंद्रशेखर नायडु ( वय २१ ) याने त्यांना काचेच्या बॉटलमध्ये फटाके उडवु नका असे सांगितले. परंतु त्याचा राग लहान मुलांना आला. आणि त्यांच्यात शाब्दिक वादावादी सुरु झाली.शाब्दिक वाद सुरु असताना हाणामारी सुरु झाली. भांडणात अचानक लहान…