#बघतो
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
पत्नीची हत्या केल्याने तुरुंगवास! 3 वर्षांनी जेलबाहेर येऊन बघतो तर ती जिवंतय, असं कसं?
पत्नीची हत्या केल्याने तुरुंगवास! 3 वर्षांनी जेलबाहेर येऊन बघतो तर ती जिवंतय, असं कसं?
पत्नीची हत्या केल्याने तुरुंगवास! 3 वर्षांनी जेलबाहेर येऊन बघतो तर ती जिवंतय, असं कसं? राजस्थान : पत्नीच्या हत्याप्रकरणी 3 वर्ष पती जेलमध्ये राहिला. नंतर जामिनावर बाहेर आला. जेलबाहेर आल्यानंतर पत्नी चक्क जिवंत असल्याचं निदर्शनास आल्यानं तो हादरुनच गेला. फक्त पतीच नव्हे तर पोलीस आणि इतरही सगळे चक्रावून गेले. ही घटना राजस्थानच्या दौसामध्ये उघडकीस आली आहे. एका महिलेच्या हत्येप्रकरणी सात…
View On WordPress
0 notes
chaitanyakulkarni98 · 3 months ago
Text
चित्रपटांविषयी
Tumblr media
आपल्या आयुष्यात घडणाऱ्या कोणत्याही महत्वाच्या प्रसंगी जर विचारपूर्वक आणि सजगपणे जर आपण आपली कृती,हावभाव ,वर्तन बघितलं तर सहज लक्षात येतं की आपल्यावर चित्रपट या माध्यमाचा किती जास्त प्रभाव पडलेला आहे.प्यार का इजहार किंवा लग्नप्रसंगी वाजणारी गाणी, त्यावर केलं जाणारं नृत्य वगैरे सर्व आठवावं!! बऱ्याचदा आपल्या हालचाली आणि हावभावांवरून तो कोणत्या चित्रपटांवरून प्रभावीत झालेला आहे हे सहज सांगता येऊ शकतं! सध्या चित्रपटांवर समाजातील घटनांचा प्रभाव पडतो की चित्रपटांचा प्रभाव पडून समाजमन तयार होतं हे सांगणं अवघड आहे. बहुधा दोन्ही होत असावं.
साधारणपणे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून जसे चित्रपट निर्मितीचे तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित होत गेले तसे तसे चित्रपट या माध्यमाने मानवी मनाची पकड घेतलेली आहे आणि मनोरंजनाचे साधन म्हणून आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान पटकावले आहे.त्याआधीच्या काळात लोककला सोडल्या तर पुस्तकं ही ज्ञानोपासनेचं माध्यम असण्याबरोबरच मनोरंजनाचं देखील सहज उपलब्ध असलेलं माध्यम असावीत.
या दोन माध्यमांमध्ये एक समान दुवा आहे.जर तुम्हाला वाचनाची आवड असेल तर तुम्ही हे अनुभवलं असेल की जसजसे तुम्ही वाचक म्हणून उन्नत होत जाता तसं तसं तुम्हाला आधी जे वाचलं असेल त्यापेक्षा काहीतरी अधिक चांगलं, तुमच्या मनाचा, बुद्धीचा पैस रूंदावणारं, बुद्धीला आव्हान देणारं,जाणीवा समृद्ध करणारं,आत्मोन्नतीकडे नेणारं काहीतरी हवं असतं मग मनोरंजन हे एवढंच कारण त्यामागे राहत नाही.
मराठी मध्ये तुम्ही वाचनाची सुरुवात भलेही फास्टर फेणे, बोकया सातबंडे नी केली असली तरीही मग पुढे पु .लं. देशपांडे, व. पु . काळे, गो. नी . दांडेकर ,व्यंकटेश माडगूळकर इ. वाचत तुम्ही भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर,जी ए कुलकर्णी,जयवंत दळवी,नरहर कुरूंदकर, दुर्गा भागवत वगैरे लेखकांची पुस्तकं वाचू लागता. इंग्रजीमध्ये सुरवात चेतन भगत वगैरेच्या पुस्तकाने केली असली तरीही त्यापुढे जाऊन मग इतर लेखक जसे की खुशवंत सिंग, किरण नगरकर, जे के रोलिंग,डॅन ब्राऊन इत्यादी आणि मग अगाथा ख्रिस्ती, मार्क ट्वेन, शेक्सपियर, हेमिंग्वे पासून ते काफ्का, कामू इत्यादी लेखकांकडे वळता.चित्रपटांचं सुध्दा असंच काहीसं आहे. किंवा असायला हवं.
मनोरंजन या शब्दाचा एक फारच उद्बोधक अर्थ माझ्या अलीकडेच वाचनात आला. एक म्हणजे जो प्रचलित अर्थ आहे तो की ज्यामुळे मनाचं रंजन होतं अर्थात विरंगुळा मिळतो, पण यात रंजन हा शब्द दोन अर्थांनी वापरता येतो. रक्तरंजित या शब्दात जे "रंजित" हे रंजन या शब्दाचे एक रूप आहे त्याचा अर्थ डाग असा ��हे.
आपलं चित्रपट बघण्यामागे सर्वात मुख्य कारण म्हणजे आपल्याला रोजच्या कामामधून विरंगुळा म्हणून काहीतरी मनोरंजन हवं असतं पण मला मात्र तेवढ्याच कारणासाठी चित्रपट बघावा असं काही वाटत नाही.पण तेवढ्याच एका कारणासाठी आपल्याकडे अनेक जण चित्रपट बघतात आणि त्यामुळे देमार बाष्कळ बॉलीवुड, हॉलिवुड किंवा टॉलीवुड चित्रपट तयार होतात आणि होतच राहतात.
मग आपण मनोरंजनाच्या नावाखाली जी काही सामग्री बघतो त्यातून मनावर डाग पडणार नाहीत याची काळजी देखील घ्यायला हवी. बॉलीवुड, हॉलीवुड ,टॉलीवुड मधल्या मुख्य प्रवाहातल्या तद्दन मसाला चित्रपटांबद्दल दुसऱ्या अर्थाने मनोरंजन हा शब्द लागू पडतो असं बऱ्याचदा वा��तं !
माझी चित्रपट पाहण्याची सुरुवात दूरदर्शनवर शनिवारी लागणाऱ्या, ज्याला सुपरहिट मराठी चित्रपट म्हटलं जायचं ते अशोक सराफ,लक्ष्मीकांत बेर्डे ,सचिन पिळगावकर, महेश कोठारे इत्यादींचे चित्रपट पाहण्यापासून झाली. मग केव्हातरी शुक्रवारी रात्री लागणारे हिंदी चित्रपट पाहायला लागलो त्यामध्ये सलमान,शाहरुख,आमिर वगैरेंचे चित्रपट लागायचे, रविवारी दुपारी जुने हिंदी चित्रपट लागायचे त्यात दिलीपकुमार, देव आनंद, राज कपूर, राजेंद्र कुमार, अमिताभ आदींचे चित्रपट लागायचे. पण एकूण चित्रपट बघण्यासाठी तेव्हा साधनंच कमी होती. फक्त टीव्ही हे एकच माध्यम,त्यातसुध्दा केवळ दूरदर्शन हे एकच चॅनल, कारण तेव्हा अभ्यास होणार नाही म्हणून आमच्याकडे केबल फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीत लावली जायची. मग त्या उन्हाळ्याच्या सुट्टीचं वर्णन काय सांगावं !
Tumblr media
मग उन्हाळयात डोरेमॉन, शिन-चॅन,बेन-टेन अशा वेगवेगळ्या कार्टून्स पासून ते स्टार उत्सवला लागणारं बी आर चोप्रा यांचं महाभारत, रामानंद सागर यांचं श्रीकृष्ण, रामायण किंवा शक्तिमान, सोनी वरच्या सी आय डी पासून मग अमिताभ, सलमान, शाहरुख च्या एक्शन चित्रपटांपर्यंत सगळं काही बघून काढलं जायचं आणि वर्षभराचा अनुशेष भरून काढला जायचा. त्यावेळी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत असल्यामुळे इंग्रजी चित्रपट काही फारसे बघितले जायचे नाहीत किंवा बघितले तरी ते हिंदी डब असायचे आणि बरेचसे सुपरहीरोचे तद्दन मारझोडयुक्त चित्रपट असायचे.
नंतर सातवी-आठवीत "अभ्यासघर" नावाच्या ��िद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून काढलेल्या विक्रम वाळींबे सरांच्या क्लासला जाऊ लागलो तिथे चांगल्या इंग्रजी चित्रपटांची ओळख झाली. तिथे सरांनी आम्हाला इंडियाना जोन्स, व्हर्टिकल लिमिट, टू ब्रदर्स, थ्री हंड्रेड, रॅटाटोईल, मादागास्कर, द कराटे किड असे अनेक उत्तम चित्रपट दाखवले. तिथे चांगल्या इंग्रजी चित्रपटांबद्दल रुची निर्माण झाली.
Tumblr media
याच सुमारास मग घरी डीव्हीडी आणि कंप्यूटर आल्यावर सीडीज आणून जॅकी चॅनचे वेगवेगळ्या कुंगफू स्टाईलवरचे रिवेंज या थीमवर बेतलेले अनेक चित्रपट बघितले. यातच एकदा एका आत्तेभावाने नववीच्या की दहावीच्या उन्हाळयाच्या सुट्टीत जवळपास २०-२५ वेगवेगळे इंग्रजी चित्रपट असलेला एक पेनड्राइव आणून दिला. त्यामध्ये इन्सेप्शन, बॅटमॅन ट्रीलॉजी, टायटॅनिक, प्लॅनेट ऑफ एप्स वगैरे भन्नाट चित्रपट होते. त्यातले तेव्हा किती समजले हा भाग जाऊ दे पण बघायला मजा आली, एकूणच हे पाश्चात्य चित्रपट म्हणजे काहीतरी वेगळं प्रकरण आहे एवढं फक्त कळत होतं.
पुढे इंजिनीअरिंगला गेल्यावर नवीन स्मार्टफोन हातात आला होता आणि नुकतंच अंबानींनी मोफत इंटरनेट जाहीर केलं होतं. अशा दोन्ही गोष्टी बरोबर पथ्यावर पडल्यामुळे, एखादा खजिनाच सापडल्यासारखं झालं ! तरीसुद्धा तेव्हा ओटीटी माध्यम फारसं प्रचलित नसल्यामुळे मोफत असलेलं टॉरेंट हाच एक पर्याय उपलब्ध होता. त्याचं तंत्र एकदा अवगत झाल्यावर मग मात्र ��रमसाठ वेब सीरिज आणि इंग्रजी चित्रपट डाउनलोड करून पाहण्याचा एक कार्यक्रम सुरू झाला. म्हणजे त्या वेळी दिवसाला किमान एक चित्रपट, किंवा मग वेब सीरीजचे ४-५ एपिसोड बघितल्याशिवाय दिवस संपत नसे. सुरुवातीच्या काळात तिथे सुद्धा डब्ड चित्रपट बघितले पण हळूहळू सबटायटल्स वाचून चित्रपट बघण्याची सवय झाली.
Tumblr media
तिथे सुद्धा सुरुवात झाली ती एक्शन, क्राइम, सुपरहीरो वगैरे प्रकारातले चित्रपट बघण्यापासून. त्यात मग Marvel, DC चे अनेक चित्रपट,Mad Max Fury Road, Harry Potter, Lord of the Rings, Hobbit यांसारख्या चित्रपट शृंखला, Flash, Arrow वगैरे सीरिज हे सगळं झपाटल्यासारखं बघून काढलं. पण ते सगळे ३-४ महिन्यातच सफाचट झालं. मग जरा गूगल केल्यानंतर IMDb टॉप २५० चित्रपटांची नावं बघितल्यावर लक्षात आलं की आपण तर अजून या चित्रपट क्षेत्राच्या महासागरात किनाऱ्यावरच आहोत, काहीच बघितलं नाही,अजून पूर्ण डुबकी मारली नाही. तेव्हा कोणत्या निकषांवर सीरीज,चित्रपट बघावेत असं काही ठरलं नव्हतं. मग एक ठरलं की IMDb वर ज्यांचं रेटिंग ७ च्या वर असेल किंवा Rotten Tomatoes चं रेटिंग जर ८५% च्या वर असेल तर त्यात मग Genre साठी कोणतं अनमान न करता सीरीज,चित्रपट बघायचे.
Tumblr media
इंजिनीरिंगच्या त्या ४ वर्षांच्या काळात अनेकदा रात्र रात्र जागून अक्षरशः झपाटल्यासारखे १५०-२०० चित्रपट आणि २० -२२ सीरीज बघितल्या. त्यात लक्षणीय म्हणाव्या अशा या :
Breaking Bad
Game of Thrones
House of Cards
Mindhunter
Fleabag
Dark
Friends
The Big Bang Theory
Young Sheldon
The Marvelous Mrs. Maisel
Narcos
आणि हे जे काही आदल्या दिवशी बघितलं असेल त्यावर मग दुसऱ्या दिवशी वर्गात गरमागरम चर्चा व्हायची. आता मागे वळून त्या दिवसांकडे बघितलं की माझी मलाच शंका येते की मी नक्की इंजिनीरिंग कॉलेजला गेलो होतो की फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये !!सुरुवातीच्या काळात नावाजलेल्या अभिनेत्यांचे चित्रपट बघण्याकडे कल होता. पण हळूहळू एक लक्षात आलं की दिग्दर्शक जर चांगला असेल तर चित्रपट चांगला असण्याची शक्यता जास्त ! त्यातूनच मग हॉलीवुडच्या चांगल्या दिग्दर्शकांची नावं शोधून त्यांचे चित्रपट बघण्याचा सपाटा लावला . त्यात अर्थातच मग
Steven Spielberg
Christopher Nolan
Quentin Tarantino
David Fincher
George Lucas
Martin Scorsese
Alfred Hitchcock
Stanley Kubrick
Ridley Scott
Clint Eastwood
Roman Polanski
Francis Ford Coppola
Ron Howard
charlie Chaplin
या आणि अशा नावाजलेल्या दिग्दर्शकांचे बऱ्यापैकी सगळे चित्रपट बघून काढले. त्यानंतर मग साहजिकच मोर्चा वळला Academy Awards अर्थात Oscar मिळालेले किंवा त्यासाठी नामांकन मिळालेले चित्रपट, Cannes Film Festival Awards मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट यांच्याकडे. त्यामुळे पुढे दिलेल्या विषयांवरील अनेक चित्रपट बघितले गेले.
पहिले व दुसरे विश्वयुद्ध
वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महान लोकांचे बायोपिक्स
धर्म-तत्वज्ञान -पौराणिक गोष्टी
खेळ
पत्रकरिता
अनेक उत्तमोत्तम कालातीत कादंबऱ्यांची चित्रपटात केलेली रूपांतरे,
पीरियड ड्रामाज
मूलभूत मानवी प्रवृत्तींचे व भावभावनांचे दर्शन
गुन्हेगारी प्रवृत्तींचे वास्तववादी दर्शन
लैंगिकता
कोर्टरूम ड्रामाज
प्रेमाचं वेगवेगळ्या स्थल-कालातले आणि वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरचे दर्शन
माणसाच्या मनात विशिष्ट परिस्थितीत चालणारे वेगवेगळ्या विचारांचे आणि भावनांचे द्वंद्व.
विज्ञान कथा
या इतक्या वैविध्यपूर्ण विषयांवर बनलेले आशयसंपन्न चित्रपट बघितल्यानंतर आता भाषेचं आणि विषयाचं बंधन राहिलं नव्हतं.फक्त चित्रपटाचं दिग्दर्शन,संगीत, अभिनय,कथा,संवाद चांगले असायला हवेत.आता ऑस्कर जिंकलेले, नामांकन मिळालेले, त्याचबरोबर ज्याला World cinema म्हणतात ते, म्हणजे खऱ्या अर्थाने वैश्विक मानवी मूल्यांवर भाष्य करणारे असे चित्रपट बघण्यात मजा येऊ लागली. यातून मग विविध भाषांमधले चित्रपट बघितले:
फ्रेंच चित्रपट (French New Wave मधले चित्रपट , Ingmar Bergman वगैरेंचे चित्रपट)
Tumblr media
ईटालियन चित्रपट(Vittorio De Sica, Federico Fellini, Giuseppe Tornatore इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
Tumblr media
जपानी चित्रपट (Akira Kurosawa या महान दिग्दर्शकाचे चित्रपट)
Tumblr media
इराणी चित्रपट (Asghar Farhadi, Abbas Kiarostami,Majid Majdi, Jafar Panahi इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
Tumblr media
कोरियन चित्रपट(Bong Joon-ho,Park Chan-wook इ. दिग्दर्शकांचे)
Tumblr media
चिनी चित्रपट (Wong Kor Wai,Zhang Yimou,Huo Jianqi इ. दिग्दर्शकांचे)
Tumblr media
बंगाली चित्रपट (Satyajit Ray,Ritwik Ghatak, Mrunal Sen, Tapan Sinha,Rituparna Ghosh इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
Tumblr media
मल्याळम चित्रपट (G Arvindan, Adoor Gopalkrishnan इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
Tumblr media Tumblr media
तामिळ चित्रपट (Maniratnam, Kamal Haasan,Vetrimaaran, S shankar इ. दिग्दर्शकांचे )
Tumblr media Tumblr media
हिन्दी चित्रपट(विशेषत: समांतर चित्रपटांमध्ये गणले जाणारे श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, सुधीर मिश्रा, दीबाकर बॅनर्जी इ. दिग्दर्शकांचे,(नसीरउद्दीन शाह,ओंम पुरी,अमरिश पुरी,स्मिता पाटील,शबाना आझमी इ अभिनेत्यांनी काम केलेले) चित्रपट.
Tumblr media Tumblr media
मराठी चित्रपट (सुमित्रा भावे -सुनील सुकथनकर ,जब्बार पटेल ,उमेश कुलकर्णी )
Tumblr media Tumblr media
अशा विविध भाषांमधील विविध विषयांवर बनलेले चित्रपट बघितले. त्यातून हे लक्षात आलं की चित्रपट जेवढा स्थानिक आणि मुळात, तिथल्या मातीत रुजलेला असेल तेवढा तो वैश्विक होतो.
प्रत्येक चांगला चित्रपट हा चांगल्या पुस्तकाप्रमाणे तुम्हाला काहीतरी देऊन जातो, तुम्हाला भावनिक दृष्ट्या ,जाणिवेच्या, नेणिवेच्या पातळीवर अधिक समृद्ध करतो. प्रत्येक चित्रपट बघताना तुम्ही स्वतः त्यातल्या अनेक पात्रांशी समरस होऊन जाता आणि त्यांचं आयुष्य जगत असता,अनुभवसमृद्ध होत असता.चांगल्या पुस्तकांप्रमाणेच, चांगल्या चित्रपटांमुळे सुद्धा एकाच आयुष्यात अनेक आयुष्यं सखोलतेने- सजगतेने जगण्याची,अनुभव घेण्याची संधी मिळते.
खरं तर एखादं पुस्तक आणि त्याचं चांगलं चित्रीय रूपांतर यात वेळेच्या अभावी निवड करायची झाली तर चित्रपटाची निवड सोयीस्कर ठरते. त्या पुस्तकातला सगळा आशय २-३ तासांमध्ये दिग्दर्शक आपल्यापर्यंत पोहोचवतो. आणि तो अधिक प्रभावी ठरतो कारण घडणाऱ्या गोष्टीच्या दिसणाऱ्या चित्रासोबत उत्तम संवादफेक,चांगला अभिनय, पार्श्वभूमीला चांगल्या संगीताची जोड असते त्यामुळे कथेचा आशय अधिक जिवंतपणे, समर्पकपणे आणि समर्थपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो.
वीर सावरकरांनी सुद्धा सिनेमाला २० व्या शतकाची सुंदर देणगी आणि एक महान कला असं एके ठिकाणी म्हटलं आहे त्यामागे हेच कारण आहे.
यात फक्त तोटा असा होतो की जी कथा आपण पडद्यावर बघतो ती दिग्दर्शकाच्या नजरेतून बघतो त्यामुळे आपल्या कल्पनाशक्तीला थोडी कमी चालना मिळते आणि पात्रांच्या मनात चाललेले विचार पडद्यावर दाखवण्यास मर्यादा असतात.
हे सगळं बघत असतानाच चांगल्या सिनेमा बद्दल अधिक माहिती देणारी, उत्तम चित्रपट कोणता, तो कसा बघावा याची दृष्टी देणारी ही काही चांगली मराठी पुस्तकं माझ्या वाचनात आली:
लाईमलाइट (अच्युत गोडबोले- नीलांबरी जोशी)
पडद्यावरचे विश्वभान(संजय भास्कर ज���शी)
सिनेमा पराडिसो ( नंदू मूलमुले)
नॉट गॉन विथ द विंड (विश्वास पाटील).
तसेच persistence.of.cinema, inthemood.forcinema,jump.cut.to यासारखी उत्तम recommendations देणारी Instagram पेजेस देखील आहेत. ChalchitraTalks नावाच्या Podcast मधून देखील उत्तम recommendations मिळतात.
त्याशिवाय कोणताही चित्रपट बघितल्यानंतर त्यावर
Roger Ebert
Senses of Cinema
सारख्या वेगवेगळ्या समीक्षकांची समीक्षा वाचण्याची सवय लागली. त्यामुळे चित्रपटाचा आपल्याला लागलाय तो आणि तेवढाच अर्थ आहे की आणखीही काही अर्थ आहे हे समजू लागले.
या सगळ्यात जसजसे आपण अधिकाधिक आणि दर्जेदार चित्रपट पाहू लागतो तसतसे काहीतरी अधिक नाविन्यपूर्ण, समृद्ध करणारं आपल्याला हवं असतं. मग सरळसोट चित्रपटांकडून जटिल विषय हाताळणाऱ्या, वेगवेगळ्या स्तरांवर मानवी भावभावना हाताळणाऱ्या, ज्यांचे एकापेक्षा अधिक अर्थ लागू शकतात अशा चित्रपटांकडे आपण जाऊ लागतो. पण त्याचा अर्थ असा नव्हे की मग साधे सरळ चित्रपट बघणे बंद करावे. त्याचा अर्थ एवढाच की जाणकार प्रेक्षक म्हणून आपली इयत्ता वाढलेली आहे.
जेव्हा आपण वेगवेगळ्या भाषांमधले,प्रांतांमधले,देशांमधले, वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट पाहतो तेव्हा आपण एक प्रकारे वैश्विक नागरिक बनतो. त्या देशांमधली संस्कृति,तिथले आचार विचार, वागण्या बोलण्याची पद्धत, तिथलं खानपान हे सगळे अप्रत्यक्षपणे अनुभवल्यामुळे आपल्या विचारात, वागण्यात खुलेपणा येतो.एवढ्या सगळ्या भावभावना अनुभवल्यानंतर शेवटी माणूस प्रेमाचा भुकेला आहे ही मौल्यवान गोष्ट,हे सत्य इतक्या विविध रुपांतून, घटनांमधून आपल्या समोर येतं, मनावर ठसतं.याहून अधिक माणसाला काय हवं !!
~ चैतन्य कुलकर्णी
11 notes · View notes
sanjay-ronghe-things · 3 months ago
Text
परिकथा
पंख लावून पाठीशीदूर जावे आकाशी ।दूर दूर ते आभाळकरावे गूज ढगांशी । धरावा फेर थोडाचांदोबाच्या उशाशी ।उचलून चार चांदण्याद्याव्या नेऊन सूर्याशी । परिकथांची ही दुनियाघेतो वाचून जराशी ।स्वप्न बघतो रात्रभरसंबंध कुठला कशाशी ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
sultansawansagar · 3 months ago
Text
https://youtube.com/playlist?list=PL1C0jk9lbJO265dhLnF_5E8yNquaiAfHo&si=w1OuqpsuvFyDS0eX
जय विज्ञान च्या संपूर्ण कविता पाहण्यासाठी वरील लिंक👆 वर क्लिक करा👍
नमस्कार मंडळी🙏🏻
*जय विज्ञान!*🔥🚀💥
हा विज्ञान कवितांचा सचित्र, ज्ञानरंजक, अभिनव असा संग्रह मी शालेय जीवनात असतांना व विषेश म्हणजे विद्यार्थ्यांसाठी लिहीलेला आहे...यांतील जवळपास सर्व�� कविता महाराष्ट्रातील नामवंत वर्तमान पत्रे, मुलांचे मासिके तसेच दिवाळी‌ अंकातून‌ पूर्व प्रकाशित झालेल्या आहेत...हा संग्रह मी *भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम* साहेब यांना ही (२००५) मधे ज्या काळी ते राष्ट्रपति होते व त्यांच्या वाढदिवसा निमित्त लिहीलेली कविता जी दै लोकमत च्या संपादकीय पानावर प्रकाशित झाली होती ते काव्य फ्रेम करुन व जय विज्ञान हा संग्रह मी त्यांना संसद भवन येथे सप्रेम भेट म्हणून पाठवीला होता...तब्बल दोन दशके लोटली आहेत...झपाटल्याप्रमाणे मी लिखाण करायचो व‌ तड़क औरंगाबाद मधल्या तमाम वर्तमान पत्रांच्या कार्यालयांत धडकायचो... मुलांसाठी मी त्याकाळीच भरमसाठ लिखाण करुन ठेवले आहे...माझे दोन‌ कथासंग्रह *कथासागर* व *कथासंस्कार* तसेच तीन कादंबर्या *मनातिल भूते*, *भित्यापाठी ब्रम्हराक्षस*, *उडत्या तबकड्या व मंगळावरील मित्र* त्याचप्रमाणे दोन‌कविता संग्रह *च्युईंगम*, व *जय विज्ञान* असे एकुण सात पुस्तके प्रकाशित आहेत हे सर्व साहित्य मी सरस्वती भुवन महाविद्यालय बारावित होतो त्यापूर्वीचे आहे, आता लिखाण करण्यासाठी तसा वेळ मिळत नाही सदरील पुस्तके सध्या गुगल प्ले स्टोअर व‌ अमॅझान किंडलवर हि वा���ण्यासाठी उपलब्ध आहेत. दोन पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे अनुदान मिळालेले आहे.
आजकाल मुले पुस्तकांपासून दूरावत चालली आहेत किंवा कळत नकळत आपण त्यांना करत आहोत, आपणही मुलांच्या हातात छान छान संस्कारक्षम पुस्तके देण्याऐवजी त्यांच्या हाती फोन देऊन मोकळे होतो, असो.
मित्रांनो, म्हणून बर्याच वर्षापासून मुलांसाठी जय विज्ञान मधील कविता मोबाइल वरच व्हिडिओ स्वरूपात आणावे असे सल्ले माझ्या अनेक मित्रांनी मला दिले...व शेवटि मी हि ते मनावर घेतले आणी मागील दोन‌ महिन्यांपासून जय विज्ञान मधील विज्ञान कवितांची मालिका मी माझ्या यु ट्यूब चॅनलवर पब्लिश करत आहे... माझ्यापुढे सर्वात मोठा यक्ष प्रश्न होता व्हिडिओ एडिटिंग चा ! परंतु कुठलाही कोर्स न करता मला जसं जमेल तसं मुलांना समजेल अशा साध्या सोप्या भाषेत लिहिलेल्या या कविता मी एडिटिंग करुन अपलोड़ करत आहे...यांत जवळपास दीडशे कविता आहेत व जवळपास अर्ध्या ��विता सध्या अपलोड झालेल्या आहेत... मित्रांनो, कसलाहि कोर्स न करता मोबाइल वरच माहिती घेउन व्हिडिओ एडिटिंग, एनीमेशन करणे काही कविता मुलांना आवडतील अशा कार्टून स्वरूपात डिजाइन करणे खुपच किचकट आहे व यांत तास न तास द्यावे लागतात...आपण दोन पाच मिनिटांची व्हिडिओ बघतो परंतु त्यासाठी किती मेहनत घ्यावि लागते व‌ वेळ द्यावा लागतो हे मला आता कळत आहे, असो...तर‌ अशाच प्रकारे आपले प्रेम व सहकार्य मिळत राहिले तर...नक्कीच पुढील काही महिन्यात जय विज्ञान पूर्ण पणे अपलोड होईल... त्याचप्रमाणे आजचे ॲडव्हान्स विज्ञान ही म्हणजे जय विज्ञान भाग दोन व विद्यार्थ्यांसाठी कथा गोष्टीही व्हिडिओ स्वरूपात आणण्याचे विचार आहे त्यासाठी नक्कीच मला उर्जा मिळेल...सोबत चॅनलवरील *जय विज्ञान* ची संपूर्ण प्लेलिस्ट लिंक पाठवत आहे ती आपल्या संपर्कातील तमाम छोट्या सवंगड्यांना, विद्यार्थ्यांना आवर्जून पाठवा, आपला दोन शब्दात अभिप्राय हि नक्कीच नमूद करा आपल्या प्रतिक्रिया, सुचनांचे स्वागतच आहे त्या मला मार्गदर्शक व प्रेरकच ठरतील, धन्यवाद मंडळी जय हिंद! जय विज्ञान!!
- आपलाच
*-मास्टर सुल्तान‌ उर्फ कवी : सावनसागर*
औरंगाबाद, महाराष्ट्र 📲9326007786, 9545007786
1 note · View note
gitaacharaninmarathi · 3 months ago
Text
38. क्रिया आणि प्रतिक्रिया 
श्रीकृष्ण म्हणतात की आपल्याला कर्म करण्याचा अधिकार आहे, परंतु कर्मफलांवर आपला काहीही अधिकार नाही. याचा अर्थ असा नाही की आपण अकर्माकडे आकर्षिले जातो, ज्याचा अर्थ कोणतीही कृती न करने किंवा परिस्थितीला केवळ प्रतिक्रिया देणे असा आहे.
जरी श्रीकृष्ण अकर्म हा शब्द वापरतात ज्याचा शाब्दिक अर्थ निष्क्रियता असा होतो, परंतु संदर्भ दर्शवितो की ते प्रतिक्रिया दर्शवते. श्लोक 2.47 जागरूकता आणि करुणेबद्दल बोलतो; जागरूकता ही अशी आहे की ज्यामध्ये कृती आणि परिणाम वेगळे असतात आणि इतरांबद्दल आणि स्वतःबद्दल करुणाची भावना असते.
श्रीकृष्ण म्हणतात की कर्म केल्याशिवाय आपले जगणे अशक्य आहे कारण भौतिक शरीराच्या देखभालीसाठी खाणे इत्यादी कर्मांची आवश्यकता आहे (3.8). सत्व, तमो आणि रजो हे गुण आपल्याला सतत कृतीकडे घेऊन जातात (3.5). त्यामुळे कारवाई न होण्यास क्वचितच जागा आहे.
बातम्या बघत किंवा वाचत असताना आपण आपल्या वागण्याकडे लक्ष दिले तर असे लक्षात येते की जेव्हा आपण आपली धर्म, जात, राष्ट्रीयत्व, विचारसरणी अशा सामायिक मिथके आणि विश्वासांबद्दल वाचतो, ऐकतो किंवा बघतो तेव्हा ही कर्मे ज्या प्रतिक्रिया निर्माण करतात त्यांची आपल्याला जाणीव होते.
कौटुंबिक आणि कामाच्या ठिकाणी आपल्या परस्परसंवादातही असेच आहे, जिथे बहुतेकदा ती प्रतिक्रिया असते, जी शब्द आणि कृतींच्या संदर्भात निर्णय/विभाजित मनातून येते. परिस्थिती आणि लोकांवरील अशा प्रकारची प्रतिक्रिया, आपल्या जीवनातील आनंद हिरावून घेते कारण आपण जागरूकता आणि करुणेने प्रेरित निस्वार्थ कृतीची संधी गमावतो. जागरूक असलेली बुद्धिमत्ता इतरांचा दृष्टीकोन अधिक चांगल्या प्रकार��� समजून घेण्यास सक्षम असेल आणि नंतर सहानुभूतीने वागू शकेल.  
श्रीकृष्ण सांगतात की इतरांच्या कर्माला प्रतिसाद म्हणून आपल्यात निर्माण होणाऱ्या अकर्माची जाणीव ठेवली पाहिजे. तसेच श्रीकृष्ण आपल्याला अशा कृती न करण्याचा सल्ला देतात ज्यामुळे इतरांमध्ये प्रतिक्रिया निर्माण होईल. याचा सराव करून आपण परिपक्वता, अखंडता आणि आनंदाच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचू शकतो.
0 notes
bandya-mama · 7 months ago
Text
शिक्षक : मुलांनो चला वह्या काढा. पेन हाती घ्या आणि ‘मी अब्जाधिश झालो तर’ या विषयावर निबंध लिहा.
सर्व मुले शांतपणे लिहायला लागतात, पण Bandya तसाच बसला असतो.
शिक्षक : काय झाले Bandya तुला ? असा का बसला आहेस? चल लिहायला सुरुवात कर.
Bandya : नाही सर, मी माझ्या सहाय्यकाची वाट बघतो आहे.
😅😅😅😀😀😀🤣🤣🤣😂😂😂
0 notes
pradip-madgaonkar · 7 months ago
Text
शिक्षक : मुलांनो चला वह्या काढा. पेन हाती घ्या आणि ‘मी अब्जाधिश झालो तर’ या विषयावर निबंध लिहा.
सर्व मुले शांतपणे लिहायला लागतात, पण Pradip तसाच बसला असतो.
शिक्षक : काय झाले Pradip तुला ? असा का बसला आहेस? चल लिहायला सुरुवात कर.
Pradip : नाही सर, मी माझ्या सहाय्यकाची वाट बघतो आहे.
😅😅😅😀😀😀🤣🤣🤣😂😂😂
0 notes
automaticthinghoagiezine · 11 months ago
Video
youtube
मनोज जरांगे मुंबईला येताना ट्रॅक्टर कसे अडवता तेच बघतो.. #mumbai #ManojJ...
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
हत्तीच्या Fanclub मध्ये वाढ! बापरे…हत्ती इतके हुशार असतात? भारी व्हिडीओ
हत्तीच्या Fanclub मध्ये वाढ! बापरे…हत्ती इतके हुशार असतात? भारी व्हिडीओ
हत्तीच्या Fanclub मध्ये वाढ! बापरे…हत्ती इतके हुशार असतात? भारी व्हिडीओ हत्तीच्या सामर्थ्यापुढे ‘जंगलाचा राजा’ सिंह सुद्धा काहीच नाही. फक्त ताकद नाही… हत्ती खूप हुशार असतात. ही व्हायरल क्लिप त्याचाच पुरावा आहे. वास्तविक, हत्ती एक लोखंडाचं कुंपण पार करत असत���. त्याआधी हत्ती चेक करतो की या कुंपणात करंट आहे का. एक एका तारेवर तो पाय ठेवून बघतो. जसं त्याला कळतं की या कुंपणावर करंट आहे तसा तो हत्ती…
View On WordPress
0 notes
sanjay-ronghe-things · 3 months ago
Text
आकाशगंगा
दूर बघतो मी गगगनातवाहते तिथून आकाशगंगा ।ढगांच्या मागे चंद्र तारेसृष्टीचा हा अवतार श्रीरंगा । गुलाब मोगरा फुलतो जेव्हाचारी दिशेला असतो दरवळ ।येतो वारा कुठून कसा तोसळसळ करतो वड पिंपळ । मुंगी माकोडे किट किती हेसारेच आपुल्या कामात मग्न ।माणूस इथला स्वार्थी किती तोधरेस करतो का असा भग्न ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
swati2shah · 3 years ago
Text
Happy Birthday to You Dear Amitabh ji Stay healthy and always happy. Love u forever. One and only golden moment of my life with you
एक सिनेमा आला होता, नाव डॉन. हेलन गाणे गाऊन त्याला अडकवते आणि त्याच्या पिस्तुलातल्या गोळ्या ��ाढून घेते. यावेळी मुद्रा-अभिनयात या माणसाने जे काही करून दाखवले आहे ते गझब आहे. खूनशी आणि कोणतीही दयामाया न दाखवणारा डॉन त्याने एकही डेसिबल आवाज न वाढवता रंगवला आहे. त्या हिरव्या रंगाच्या शर्टात त्याने अनेकींच्या हृदयाचे ठोके चुकवले आहेत.
एक सिनेमा आला होता, नाव जंजीर. पोलीस स्टेशन मध्ये फाईल बघत बसलेला इन्स्पेक्टर आणि हजर झालेला शेर खान. खुर्चीला पडलेली लाथ आणि मघ येणारा डायलॉग. प्राण साहेबांसारखा उत्तुंग मोठा अभिनेता आणि याची जेमतेम सुरवात. परत एकदा कोणताही आक्रस्ताळेपणा न करता त्याने पंचला पंच मॅच केला आहे.
सिनेमा आला होता दिवार, खुर्चीवर आपले लांबच लांब पाय ठेवून बसलेला तो, तोंडात बिडी, खाकी पॅन्ट आणि तो जगप्रसिद्ध निळा शर्ट. पीटरची गॅंग त्याच्याकडे दात ओठ खावून बघते आहे आणि म्हणतात न, झुंड में तो सुअर आते है, शेर अकेला आता है. इथे चार पाच लोकांना लोळवतांना तो कुठेही कमी वाटत नाही. दिवार हा सिनेमा फक्त आणि फक्त त्याचा आहे. बाकीचे सगळे फक्त तोंडी लावायला.
नमक हराम मध्ये राजेशला परत न्यायला आलेला तो. लांब लांब ढांगा टाकत तो वस्तीत येतो आणि संपूर्ण वस्तीला आव्हान देतो. राजेश खन्ना परतायला नकार देतो आणि मग जुगलबंदी. प्रीमियर संपल्यावर राजेश खन्ना म्हणाला होता और एक सुपरस्टार आ गया.
हे काही सिन्स आहेत साल २००० च्या आधीचे पण बच्चन मला त्याच्या सेकंड इनिंगमध्ये पण तितकाच आवडतो. त्याला पैशाची गरज होती आणि बुजुर्गच्या भूमिकेसाठी बॉलीवूडला देखणा आणि सशक्त अभिनेत्याची. किती दिवस ओम पुरी सारखे चेहरे बघणार. मृत्यूदाता, लाल बादशाह, अजूबा आणि असे अनेक तद्दन भिकारडे चित्रपट त्याचे करून झाले होते. डोक्यावर एबीसीएलच भलेमोठे कर्ज होते. वय ५८ झाले होते. या वयात आपण रिटायरमेंट प्लान्सवर जमा झालेला बोनस बघतो. तो मात्र आपली संपूर्ण मायनस झालेली बॅलन्स शिट बदलायला निघाला होता. दिवाळ्याचा अर्ज मागवून हात वर करणे हा सगळ्यात सोपा मार्ग त्याने मागे टाकला होता.
सिनेमा आला मोहबत्ते आणि सिनेमाचा प्रीमियर बघून शाहरुखला वाटले असणार. ��ुपरस्टार वापस आ गया.
पाठोपाठ आला अक्स. या सिनेमा त्याने खाऊन टाकला आहे. त्याला सिनेमात घेण्याचा मोह कारण जोहरला देखील आवरला नाही. त्याच्यासाठी स्क्रिप्टमध्ये तुफानी बदल करण्यात आले. त्याला शोभेल अशी भूमिका लिहिण्यात आली आणि चित्रपट आला कभी खुशी कभी गम. चित्रपट भिकारडा होताच पण बच्चन आणि काजोलने चार चांद लावले सिनेमाला. मग पांढऱ्याशुभ्र केसात अनिल कपूर सोबत अरमान. अनिलला हा चित्रपट आणि त्यात अभिनय करणे किती जड गेले असेल याचा मला अंदाज आहे. हे सगळे व्यवस्थीत सुरु असतांना बूम का केला असेल त्याने, कदाचित पैशासाठी. पैशाचे, कर्जाचे ओझे माणसाला काहीही करायला लावते.
पण मग आला बागबान आणि अमिताभ हेमाची तुफान केमेस्ट्री सगळ्यांना आवडून गेली. शेकडो वेळा हा सिनेमा टीव्हीवर लागला असेल. पण मी थांबतो बघत, मला या चित्रपटाचा अंत आणि त्यावेळी त्याने केलेले भाषण फार आवडते. साला त्याने बोललेले शब्द किठेतरी मनात आरापार उतरतात.
असाच अजून आवडता सिनेमा म्हणजे खाकी. खाकीने त्याला हवे तेव्हडे व्यावसायिक यश दिले नसेल पण बच्चन नावाचे नाणे बॉलीवूड मध्ये परत एकदा खणखणीत वाजायला लागले होते. संजय लीला भंसालीचा ब्लॅक अभिनेता म्हणून त्याची कसोटी बघणारा. बच्चनने तुफानी काम केले आहे. अमोल पालेकरने काढलेला पहेली. समांतर चित्रपट करायचा पण व्यावसायिक यश मिळवायचे हा किडा शाहरुखला चावला होता. शाहरुखने या चित्रपटात अतिशय सुंदर काम केले आहे. बच्चनचा गदारिया मात्र आपली वेगळी उंची दाखवून जातो.
बंटी और बबली कदाचित त्याने अभिषेक साठी केला असावा. कोणाला आपला मुलगा पुढे यावा असे वाटत नाही. त्यात चूक पण काही नाही. सिनेमा संपल्यावर मला उगाच वाटून गेले बाप बेटा एकत्र नको होते. अभिषेकच्या सुंदर कामावर बच्चन भारी पडलाय.
किती लिहिणार अजून, वाढदिवस आहे. थोडक्यात असावे. पिकू, पिंक, चीनी कम आणि असे अनेक.
त्याने काय नाही केले. सिनेमा केला, कविता वाचून दाखवल्या, रोज सकाळी उठून लोटापार्टीला बाहेर जाऊ न��ा असे सांगितले. पोलिओचे डोस द्यायला सांगितले. कचरा करू नका, त्याचे कम्पोस्ट करा असे सांगितले. गिरचे सिंह बघायचे त्याने आमंत्रण दिले तर ताडोबातल्या वाघाच्या पिल्लाचा जन्मोत्सव साजरा केला. आजही त्याचा कौन बनेगा करोडपती सारखा शो आला ��ी टीव्हीची संपूर्ण टीआरपी त्याने खेचलेली असते. मग त्यावेळी त्याच्या समोर कोणता चित्रपट किंवा कोणता क्रिकेटचा सामना दम मारू शकत नाही. अनेकांनी हे सगळे त्याने पैशासाठी केले असे बेछूट आरोप केले. पैशासाठीच केले. कर्जात बुडलेला असतांना पळून तर गेला नाही न तो.
अमिताभच हे ऑनस्क्रीन यश अनेकांना भावते. मला पण. पण मला त्याचे इतर अनेक गुण आवडतात. अनेक दुर्धर आजार उरावर घेवून तो धावतोय हे मला आवडते. बोफोर्स सारख्या प्रकरणात त्याने न केलेली शो बाजी आवडते आहे. मुख्यमंत्री जायचे आहेत म्हणून त्यांच्या जाण्याची वाट बघत उभा असलेला बच्चन आवडतो. आपल्या जुन्या सहकारयांना त्याने केलेली मदत आवडते. स्त्री मग कोणत्याही वयाची असो, तिला मान म्हणून उठून उभा राहणारा बच्चन आवडतो. स्वतः भीष्म पितामह असतांना अंगात असलेला नम्रपणा आवडतो.
बच्चन साहेब, आपणास वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. आप को अभी और बहोत काम करना है, क्यो कि आज भी आप जहां खडे हो जाते है, बॉलीवूड मे लाईन वही से शुरू होती है !!!
Feel free to share
Tumblr media
4 notes · View notes
gitaacharaninmarathi · 4 months ago
Text
32. मन:शांतीची आधारशिला
कर्मयोगामध्ये श्रीकृष्ण म्हणतात की, “या कर्मयोगात निश्चयात्म बुद्धी एकच असते. परन्तु अस्थिर विचार असणार्‍या माणसांच्या बुद्धी पुष्कळ फाटे फुटलेल्या असतात” (2.41).
श्रीकृष्ण म्हणतात की समत्व म्हणजे योग आहे आणि ते दोन द्वंद्वांचे एकत्रीकरण आहे, उदाहरणार्थ सुख आणि दु:ख, जीत आणि हार आणि नफा व तोटा इत्यादी. या द्वंद्वांना ओलांडून पुढे जाण्यासाठीचा मार्ग म्हणजे कर्मयोग आहे, जो अंतिमत: सुसंगत बुद्धिमत्तेकडे वळतो. दुसऱ्या बाजूला, असंतुलित बुद्धिमत्तेमुळे आपल्या मनाची शांतता ढळते (2.48 आणि 2.38).
सामान्यत: आपण असे गृहित धरतो की भौतिक सुखे, विजय आणि लाभ यातून मनाची शांतता आपोआप मिळते. मात्र श्रीकृष्ण म्हणतात की कर्मयोगाच्या सरावामुळे मिळालेली सुसंगत बुद्धिमत्ता आपल्याला सगळ्या द्वंद्वांच्या पल्याड जाण्यास आणि मनाची शांतता मिळविण्यास मदत करते.
चंचल बुद्धिमत्तेमुळे आपण विविध परिस्थिती, परिणाम आणि लोकांकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघतो. आपल्या कामाच्या ठिकाणी आपण आपल्या खाली आणि वर असलेल्या लोकांबद्दल वेगवेगळे निकष वापरतो. कुटुंबामध्ये वेगवेगळ्या परिस्थितीसाठी वेगवेगळे निकष वापरल्यास लहान मुलांच्या मनात स��त्व निर्माण होऊ शकत नाही. याचे कारण आपण आपल्या प्रिय व्यक्तींसाठी आणि इतरांसाठी वेगवेगळे नियम वापरतो.
आपल्या दैनंदिन जीवनात आपण धर्म, जात, राष्ट्रीयत्व, कट्टरता इत्यादी सामायिक मिथकांना बळी पडतो. अगदी लहान वयातच ते आपल्या मनात बिंबवले गेले आणि ते आपल्याला दीर्घकाळ वाटून घेतात. या सामायिक मिथकांच्या प्रत्येक दोन बाजूंसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारे प्रभावित होतो.
चंचल बुद्धिमत्तेमुळे आपल्या चुकांचे समर्थन करताना आपण वेगळे नियम वापरतो आणि इतरांच्या चुकांच्या बाबतीत आपले निकष वेगळे असतात. मदत मागताना आणि मदत करताना आपण वेगवेगळे मुखवट�� वापरतो.
श्रीकृष्ण म्हणतात, कर्मयोगाचा मार्ग वापरल्याने, समत्वापर्यंत नेऊ शकणारी संतुलित बुद्धिमत्ता आपल्याला प्राप्त होऊ शकते आणि तोच मन:शांतीचा आधारशिला असतो.
0 notes
bandya-mama · 2 years ago
Text
Pradip : कसला विचार करतोयस?
Bandya : जिममध्ये अ‍ॅडमिशन घेऊन तीन महिने झाले,ना बॉडी बनतेय!ना वजन कमी होतंय!
उद्या स्वत:च जिमला जाऊन बघतो,
प्रॉब्लेम काय आहे???
😁😁😁😆😆😆😅😅😅🙃🙃🙃😝😝😝
#marathijokes #funnyjokes #jokesinmarathi #jokesfordays #bandyamama #bandya #jokes
0 notes
pradip-madgaonkar · 7 months ago
Text
Pradip: मला तुझी आठवण आली कि,
मी तुझा फोटो बघतो.
मुलगी: अय्या, आणि माझा आवाज
ऐकावासा वाटला तर तू काय करतोस?
Pradip: शेजारच्या कुत्रीला दगड मारतो.
0 notes
pradyumn12 · 4 years ago
Text
#१९७
#खरोखर बघण्यासारखे...❣️
या अरुपाच रूप आरशात दिसू दे,
आज पहाटच्या पावलाला श्वास फुटू दे,
वाट दिसू दे गा देवा, वाट दिसू दे।
#नेमकं प्रगल्भता म्हणजे काय...?
खरंच, जेव्हा पण गिरीश सरांना ऐकतो, त्याच्यातला नटाचा अभिनय बघतो मग ते जाऊद्या��ा बाळासाहेब मधलं बाळासाहेबांच पात्र असोत, वळू मधील जीवन असोत, National award winner वाला देऊळ मधलं केश्या, फास्टर फेणे मधील आप्पा,खुद्द सलाम मधील वडिलांची भूमिका किंवा पोस्टकार्ड मधील पोस्टमन काका आणि बरेच भुमिका नावलौकिकच आहेत.
एकंदरीत अभिनय, विचारसरणी, अभ्यास, चित्रपट निवड, आता तर निर्माते ही सगळं बघून नेमकं प्रगल्भता म्हणजे काय...? हे स्पष्ट जाणवते.
youtube
youtube
#Those Words...❣️
विनायक पाचलट : तुमच्या या येणारे दशकाकडून काय आशा आहेत ?
गिरीश कुलकर्णी : माणसाला निरपेक्ष प्रेम करता यावं ।
youtube
#०२:०१:२०२०::१०:१५pm
3 notes · View notes
aptedhruv21 · 6 years ago
Text
पत्ता नसलेलं पत्र..
प्रिय आजोबा,
कसे आहात?
तुमचं First Class असं उत्तर ऐकायला मिळत नाही आता..
आज एक वर्ष पूर्ण झालं. तुमच्या नसण्याने अस्वस्थ करुन टाकणारं वर्ष होतं. या बारा महिन्यांत बऱ्याच लोकांशी बऱ्याचदा बोलून ओझं हलकं करायचा प्रयत्न केला. पण जमलंच नाही हो! परवा असंच एका मैत्रिणीशी बोलताना हा विषय निघाला. ती म्हणाली, सगळ्या जगाशी बोललास, पण ज्याच्याशी बोलायचं त्या माणसाला विसरलासच की. कोण काय? आजोबा तुम्हीच..
ती म्हणाली, मी बोलते माझ्या आजोबांशी. बरं वाटतं. मग म्हणलं चला, Try करुन बघू. 
म्हणून मग म्हणलं पत्रच लिहू. तुम्हाला आवडतं तसंच.. 
पत्रं जशी वर्षानुवर्षे बदलली नाहीत. तसंच तुम्हीही Constant राहिलात. आजच्या आमच्या दिवसादिवसाला बदलणाऱ्या जमान्यात, तुमचं ते Constant असणं किती अवघड आहे, हे सगळ्यांना नाही समजणार.
अर्थात, न बदलण्याच्या स्वभावामुळे खुप काही ऐकावं आणि सोसावं लागलंच की तुम्हाला.. का खुप काही ऐकावं आणि सोसावं लागल्यामुळे तुम्ही असे Constant झालात? 
मला तुमचे दोन ��्रसंगातले पाणावलेले डोळे आठवतात. एक चार-पाच वर्षांपूर्वीचा आणि एक आत्ता नोकरी लागल्यानंतरचा. 
मी बारावीत असताना, नवरात्रामध्ये तुम्ही पुण्यात आला होता. तुमच्या लहानपणच्या, एस पी काॅलेज मधल्या, आणिबाणीच्या काळातल्या गोष्टी तुम्ही ऐकवायचात. असंच एका दुपारी, आभाळ भरून आलेलं असताना तुम्ही मला जळीताची गोष्ट सांगितली होती. जलमंदिर प्रकरण सांगताना तुमच्या डोळ्यातलं पाणी, तेव्हा उमगलं नाही. पण आता विचार करताना, त्याचा Relevance, त्या अश्रूंचा Deepness, सगळंच गडद होऊन जातं.
आणि दुसरा प्रसंग म्हणजे नोकरी लागल्यानंतरच्या पहिल्या दिवाळीच्या वेळचा. नेहरु शर्टावरुन (हा पण तुमचाच शब्द) हात फिरवताना, तुमच्या डोळ्यातल्या पाण्यात जे समाधान तरळून गेलं, त्याला तोड नाही. मी पाहिलेली, सगळ्यात कमी शब्दातली, हृदयाच्या सगळ्यात जवळ जाणारी प्रतिक्रिया होती ती..
भले तुम्ही, दर दिवाळीत २५०₹ भेट दिलीत. तुमच्यामागे या गोष्टीची आम्ही चेष्टाही केली.
पण नरक चतुर्दशी दिवशी सकाळी लहानपणी दहा पैसे हातात टेकवून देवळात घेऊन जाणारे, आमच्या हातात कोऱ्या करकरीत नोटा टेकवणारे आणि लक्ष्मीपूजनाला नवीन अत्तराची बाटली आमच्या हातावरुन फिरविणारे हात Irreplaceable होते, हे या दिवाळीत तुम्ही नसताना समजलं.
पण काही प्रश्न अनुत्तरितच राहिले बरं का.. आता तुम्ही म्हणाल नातू रडवतो की काय आता... पण आधी प्रश्न तर ऐका..
१) चहाचा कप धुताना, नळ सुरु न करता.. फक्त ओंजळभर पाण्याने कप का धुवायचात हो तुम्ही???
२) अंगातला झब्बा- लेंगा पांढऱ्याचा मळ खाऊन पिवळा होईपर्यंत धुवायचा का नाहीत?
३) मळलेले कपडे, घराशेजारी शंभर Laundrya असताना, कोटेश्वर मंदिराजवळ जाऊन का धुवायला टाकायचात?
४) तुम्ही बसलेले असताना लांबची वस्तू घेताना, एक विशिष्ट आवाज का करायचात?
५) पुस्तकं, मासिकं, वर्तमानपत्र सगळ्यातल्या व्याकरणाच्या चुका शोधून, त्या बरोबर करुन का ठेवायचात?
६) आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, अगदी भारताचीही मॅच असली तरीही समोर असलेल्या आस्ट्रेलियाला का Support करायचात??
सगळे म्हणतात की तुझ्या एवढा आजी आजोबांचा सहवास कोणाला मिळत नाही... पण बघा ना, २३ वर्ष���ंत असले साधे साधे प्रश्न डोक्यात होते... आणि आता तुम्ही नसताना त्याची उत्तरं शोधतोय मी..
पण तुम्ही अशी अचानक Exit घ्याल असं वाटलं नव्हतं आम्हाला.. मलाच काय! कोणालाच नव्हतं वाटलं... रहाळकरांचं दुकान, चौकातला टेलर, एन् जीवराज कोणालाच नाही...
आई- बाबांचं तर मी काही बोलतच नाही... आईला करमतच नाही आता घरी... बाबा खुप बदलल्यासारखे वाटतात... तुम्ही असता तर तुम्हाला बाबांचा बदल नक्की सुखावून गेला असता.. आजी तुमची 'सु��ा ताई' अशी हाक Miss करते... दुर्गाचं काय सांगू... आई- बाबा वर्षभर वेगवेगळ्या नावांनी हाक मारत होते... पण तुमच्या चिन्या ची सर कशालाच नाही...
आणि मी कसाय विचारताय?
मी मजेत... तुम्हाला माहितीये? या क्षणी मी तुमच्या समोर येऊन उभा राहिलो, तर कदाचित तुम्ही ओळखणारही नाही, इतका बारीक झालोय... बाकी, पुण्याहून सातारला आलो की.. खालची खिडकी मात्र बंदच असते आता... सहन नाही होत हो अजून..
अजूनही आल्या आल्या तुमची शंभूनाथ अशी हाक येईल असं वाटतं... उगीचच खाली क्रिकेटच्या कमेंट्रीचे भास होतात... आई तर कितीवेळा रहाळकरकडून काही आणायचं असेल, तर आजोबांना सांग असं म्हणून जाते...
सातारला असताना अगदीच आठवण आली, तर मग खालच्या कपाटातली सगळी पुस्तकं काढून बघतो... पानं उलगडताना तुम्ही असल्याचा भास होतो... 
माटे सर, पुराणीक सर, कालगावकर सर दिसले/ भेटले की त्यांचा चेहरा तुमची कमी दाखवून जातो... 'आपटे सर' नावाचा धडा संपला याची जाणीव करुन देतो.. आणि कदाचित ती जाणीवच मला नको वाटते... ७६९, शनिवार पेठ म्हणलं की दारापेक्षा तुमचा हसरा चेहरा डोळ्यासमोर येतो...
असो...
पत्र तुमच्यापर्यंत पोहचेल की नाही माहित नाही... पण तुम्ही असताना सांगायची राहिलेली एकच गोष्ट लिहितो आणि थांबतो..
आजपर्यंत बऱ्याच लोकांना नमस्कार केले.. काहींना मनापासून तर काहींना Formality म्हणून... त्यांनी आशीर्वादही दिले.. काहींनी मनापासून तर काहींनी Formality म्हणून..
पण त्यातले तीनच लक्षात राहतात... एक आईचा.. 'यशस्वी भव' आणि बाकीचे दोन तुमचे...
शिक्षण चालू असतानाचा 'Always First'..
आणि नोकरी लागल्यानंतरचा 'Work is Worship'..
बाकी काय लिहू! शब्द नाहीत... विचार आणि भावना आहेत... त्या तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी आता कागद आणि शाईची गरज उरली नाही... 
पण तुमचं नसणं खूप अस्वस्थ करणारं ��हे... अजूनही Accept करता न येण्यासारखं आहे.. आणि तरीही तितकंच शाश्वत आहे... जिथे कुठे असाल, तिथून एकदाच आमच्या कसे आहात ला तुमचं First Class ऐकण्याची इच्छा आहे...
बाकी सगळं तुम्ही जाणताच..
इथेच थांबतो!
तुमचा,
धृव..
3 notes · View notes