#प्राधिकरणात
Explore tagged Tumblr posts
Text
AAI Recruitment: भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरी करण्याची संधी, जाणून घ्या तपशील
AAI Recruitment: भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरी करण्याची संधी, जाणून घ्या तपशील
AAI Recruitment: भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरी करण्याची संधी, जाणून घ्या तपशील AAI Recruitment 2022: भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये ग्रॅज्युएट/डिप्लोमा प्रशिक्षणार्थी पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत एकूण १२५ रिक्त पदे भरली जाणार आहेत. ४ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांना AAI ची अधिकृत वेबसाइट aai.aero वर जाऊन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी…
View On WordPress
#aai#recruitment#करण्याची#करियर#घ्या#जाणून#जॉब#तपशील#नोकरी?#नौकरी#प्राधिकरणात#प्रायव्हेट जॉब्स#भरती#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#भारतीय#रोजगार#विमानतळ#शासकीय भरती#शिक्षण#संधी#सरकारी नौकरी
0 notes
Text
Airports Authority of India (AAI) Recruitment 2023
AAI Recruitment 2023’s full form is Airports Authority of India Recruitment 2023. Airports Authority of India (AAI) Recruitment 2023 has the following new vacancies. Airports Authority of India (AAI), a Government of India Public Sector Enterprise, constituted by an Act of Parliament, is entrusted with the responsibility of creating, upgrading, maintaining, and managing civil aviation…
View On WordPress
#Airports Authority of India (AAI) Recruitment 2023#भारतीय विमानतळ प्राधिकरणात 342 जागांसाठी भरती 2023#भारतीय विमानपत्तन प्राधिकरण में 342 रिक्तियों के लिए भर्ती 2023
0 notes
Link
भारतीय विमानतळ प्राधिकरणात 490 जागांसाठी भरती - Airports Authority of India AAI Recruitment 2024, जाहिरात क्र.: 02/2024/CHQ.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 February 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ सकाळी ७.१० मि.****
राज्यातल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा युक्तिवाद
राज्यात ८४६ शाळांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या पीएम श्री योजनेची अंमलबजावणी करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
पैनगंगा नदीवरील ११ बंधाऱ्यांसाठीच्या ७८७ कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता, हिंगोली जिल्ह्यातलं दोन हजार हेक्टर्स क्षेत्र सिंचनाखाली येणार
राज्यात दहावी आणि बारावीच्या परिक्षा केंद्रांवर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी “कॉपीमुक्त अभियान” राबवणार
बीबीसी वृत्त वाहिनीच्या मुंबई आणि दिल्लीतल्या कार्यालयावर टाकलेले छापे संवैधानिक असल्याचा भारतीय जनता पक्षाचा दावा
कांद्याचं दोन टक्के निर्यात प्रोत्साहन अनुदान दहा टक्के करण्याची महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी
आणि
दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या महिलांच्या टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा वेस्ट इंडिजविरुद्ध सामना
****
राज्यातल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा युक्तिवाद न्यायालय ऐकून घेणार आहे. काल पहिल्या दिवशी घटनापीठानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा युक्तिवाद ऐकला. राज्यातल्या सत्ता संघर्षावर कालपासून नियमित सुनावणी सुरु झाली, काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनु संघवी यांनी युक्तिवाद केला.
विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, नबाम राबिया ��्रकरण, आमदारांची अपात्रता या मुद्यांवर हा युक्तिवाद केंद्रीत होता. नियमानुसार पदमुक्तीची नोटीस दिल्यानंतर अध्यक्ष निर्णय घेऊ शकत नाही, मात्र ज्यावेळी आमदारांना अपात्रतेसंदर्भात नोटीस देण्यात आली, त्यावेळी विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव नव्हता, असं त्यांनी सांगितलं. अधिवेशन सुरू असतानाच अध्यक्षांना हटवण्याची नोटीस दिली जाते, अशाने कुणीही सरकार पाडू शकेल, असं सिब्बल म्हणाले. मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय अधिवेशन बोलावण्याचा राज्यपालांना अधिकार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
ठाकरे गटाच्या तब्बल चार तासांच्या युक्तिवादानंतर शिंदे गटाकडून हरीश साळवे यांनी युक्तीवाद केला. यावेळी त्यांनी नबाम रेबिया निकालाचा दाखला दिला. मात्र त्याचा या निर्णयावर परिणाम होणार नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. आज पुन्हा साळवे यांचा युक्तिवाद होणार आहे.
****
राज्यातल्या ८४६ शाळांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या पीएम श्री योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय, काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. देशभरात पहिल्या टप्प्यात १५ हजाराहून अधिक शाळा, उच्च दर्जाचं गुणात्मक शिक्षण देणाऱ्या सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून विकसित करण्यात येणार असून, यात राज्यातल्या ८४६ शाळांचा समावेश करण्यात येईल. पीएम श्री योजनेत सहभागी होण्यासाठी राज्य शासनानं केंद्र सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. पीएम श्री योजनेत केंद्राचा ६० तर राज्यांचा ४० टक्के हिस्सा असेल. प्रत्येक शाळेसाठी एक कोटी ८८ लाख एवढी तरतूद पाच वर्षांसाठी करण्यात येईल. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ४०८ गट, २८ महानगरपालिका आणि ३८३ नगरपालिका तसंच नगरपरिषदांमधून, पीएम श्री शाळांची निवड केली जाईल. अभ्यासक्रम, आध्यापन शास्त्र आणि मुल्यमापन, प्रवेश आणि पायाभूत सुविधा, मानव संसाधन आणि शालेय नेतृत्व, समावेशक पद्धती आणि लैंगिक समाधान, व्यवस्थापन, देखरेख आणि प्रशासन, लाभार्थी समाधान या सहा प्रमुख आधारांवर या शाळांचा विकास केला जाईल.
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत पैनगंगा नदीवरील ११ बंधाऱ्यांच्या कामांना गती देण्यासाठी, जवळपास ७८७ कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता देण्याचा निर्णय देखील, राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. या निर्णयामुळे वाशिम तालुक्यात पाच हजार ५५४ हेक्टर,तर हिंगोली जिल्ह्यात दोन हजार १३६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
राज्यातल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यासाठी, एक हजार कोटी इतक्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्याचा निर्णयही, काल मंत्रिमंडळानं घेतला. याचा पाच लाख शेतकऱ्यांना लाभ होईल. या संदर्भात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन���त मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होत���.
मंत्रिमंडळानं महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण अधिनियमास मान्यता दिली असून, मुख्य सचिवांच्या उच्चस्तरीय समितीमार्फत औषधी, वैद्यकीय उपकरणं खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री असून, या प्राधिकरणात एकूण १४ जणांचा समावेश असेल.
रायगड जिल्ह्यात लोणेरे इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र आणि पुणे इथल्या महाराष्ट्र कॉलेज ऑफ इंजिनिअरींग तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या, कुलगुरूंच्या निवडीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय, मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. विविध अकृषी विद्यापीठांमधल्या कुलगुरु पदांच्या निवडीच्या पद्धतीत करण्यात आलेल्या बदलाप्रमाणे, या विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या निवड पद्धतीत सुधारणा करण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यात तुळापूर आणि वढू बुद्रुक इथं छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ, जेजुरी तीर्थक्षेत्र तसंच वर्धा जिल्ह्यात सेवाग्राम विकास आराखड्यांचं काल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण करण्यात आलं. यावेळी या कामांना अधिक गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचं अभिनंदन करण्याचा ठरावही राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काल मंजूर करण्यात आला.
****
राज्यात दहावी आणि बारावीच्या परिक्षा केंद्���ांवर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी “कॉपीमुक्त अभियान” राबवण्याचा निर्णय, कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. हे अभियान राबवण्याच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा प्रशासनानं एकत्रित काम करावं, तसंच, यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषदा घेऊन जनजागृती करावी, असाही निर्णय यावेळी घेण्यात आला. कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत, संवेदनशील समजल्या जाणाऱ्या परीक्षा केंद्रांवर चित्रीकरण करण्यात येईल, पोलीस बंदोबस्तावरही भर देण्यात येईल आणि परिक्षा केंद्रांपासून पन्नास मीटर्स अंतरातली झेरॉक्स दुकानं बंद ठेवण्यात येतील, असं यावेळी सांगण्यात आलं.
****
प्राप्तीकर विभागातर्फे बीबीसी वृत्त वाहिनीच्या मुंबई आणि दिल्लीतल्या कार्यालयावर टाकलेले छापे संवैधानिक असल्याचं, काल भारतीय जनता पक्षातर्फे सांगण्यात आलं. काँग्रेसनं या छाप्यांच्या कारवाईवर टिका करण्याआधी प्राप्तिकर विभागाच्या अहवालाची वाट बघायला हवी होती, असं पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटीया यांनी वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. देशाच्या विरोधातल्या लोकांबरोबर काँग्रेस आणि तमाम विरोधी पक्ष नेहमी उभे राहतात, असा आरोपही त्यांनी केला. बीबीसी या संस्थेचे दहशतवाद्यांबरोबर संबंध आहेत, बीबीसाचा पूर्वेतिहास कलंकित आहे, भारत प्रगती करत असल्यामुळे काहींना त्याची खंत वाटत आहे, असाही आरोप त्यांनी केला.
****
सध्या कांद्याला मिळणारं दोन टक्के निर्यात प्रोत्साहन अनुदान दहा टक्के करून, सरकार��ं कांद्याच्या दरवाढीसाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी, महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी काल नाशिक इथं केली. भारतातल्या कांद्याच्या एकूण उत्पादनात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र सध्या राज्यात कांद्याचे भाव घसरल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत.
दरम्यान, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर भारती पवार यांनीही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कांदा उत्पादकांच्या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. पवार यांचा नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी मतदारसंघ हा मोठा कांदा उत्पादक भाग आहे.
****
जालना जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर कालपासून सतरा वर्षांखालच्या राज्यस्तरीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेला प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या हस्ते मशाल पेटवून या स्पर्धेचं उद्घाटन झालं. खेळाडूंनी सांघिक भावनेनं खेळाचं प्रदर्शन करून भविष्यात ऑलम्पिक स्पर्धेत सहभागी होऊन देशाचा नावलौकिक वाढवावा, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत आठही विभागातून मुला- मुलींचे संघ सहभागी झाले आहेत.
****
औरंगाबाद महापालिका आणि औरंगाबाद स्मार्ट सिटीतर्फे शहरातल्या सगळ्या व्यावसायिकांना, हॉटेल, शोरूम्स् आणि शैक्षणिक संस्थांना जी-२० परिषदेनिमित्त कमीत कमी तीन दिवस शहरात त्यांच्या कार्यालयाचा परिसर स्वच्छ करून रोषणाई करण्याचं, तसंच आपल्या मालमत्तेवर विविध देशांच्या प्रतिनिधींचं स्वागत करण्यासाठी जी-२० च्या लोगो सोबत पोस्टर्स किंवा बॅनर्स लावण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या संदर्भात काल स्मार्ट सिटी कार्यालयात आयोजित बैठकीत प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी उद्योजकांसह शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बैठकीत सर्व उपस्थितांनी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. येत्या २७ आणि २८ फेब्रुवारीला औरंगाबाद शहरात जी-२० महिलांशी संबंधित विषयांवर बैठक होणार आहे.
****
२०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरं केलं जात आहे. भरड धान्याचा आहारात उपयोग केल्यास यापासून आपणास बरेच फायदे मिळतात. कुट्टु या भरड धान्यापासून मिळणारे फायदे सांगत आहेत आहारतज्ज्ञ स्नेहा वेद -
****
दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या महिलांच्या टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पराभव केला होता.
दरम्यान, या स्पर्धेत काल ऑस्ट्रेलियानं ब��ंग्लादेशवर आठ खेळाडु राखून विजय मिळवला.
****
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शिवजन्मोत्सवाचं उद्घाटन काल माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते झालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या गड, किल्ल्यांचं शास्त्रीय पध्दतीने संवर्धन करणं, हेच खरं शिवरायांच्या स्वराज्याचा वसा आणि वारसा जतन करण्याचं काम असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. शिवाजी महाराजांची जयंती येत्या १९ तारखेपर्यंत हा महोत्सव चालणार आहे.
****
आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातल्या तिंत्रज इथं, कृषी विभाग आणि पर्यटन समितीच्या वतीनं, हुरडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. भूम आणि परंडा हे तालुके राज्यातल्या रबी ज्वारीचं कोठार म्हणून ओळखले जातात. हुरडा महोत्सवामुळे या भागातल्या कृषी पर्यटनाला चालना मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.
****
राज्य सरकारनं काल औरंगाबादमधल्या सिडकोच्या मुख्य प्रशासक दीपा मुधोळ-मुंडे यांची बीडच्या जिल्हाधिकारी पदावर, तर बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची सिडकोच्या मुख्य प्रशासकपदी बदली केली आहे.
****
औरंगाबाद इथं येत्या २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान होणार्या वेरूळ - अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवानिमित्त शहरात विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यात आज संध्याकाळी "लोककलांचा जागर" हा कार्यक्रम क्रांती चौकातल्या झांशीच्या राणी पुतळा प्रांगणात होणार आहे.
****
0 notes
Text
2022: भारतीय क्रीडा प्राधिकरणात नोकरी, ६० हजारपर्यंत मिळेल पगार
2022: भारतीय क्रीडा प्राधिकरणात नोकरी, ६० हजारपर्यंत मिळेल पगार
SAI Recruitment 2022:भारतीय क्रीडा प्राधिकरण (Sports Authority of India, SAI) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.भारतीय क्रीडा प्राधिकरणाने असिस्टंट न्यूट्रिशनिस्ट (Assistant Nutritionist) च्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत.…
View On WordPress
0 notes
Text
Sports Authority of India (SAI) : 320 Posts [मुदतवाढ]
भारतीय क्रीडा प्राधिकरणात (SAI)मध्ये 320 पदांची भरती, सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचा. भारतीय क्रीडा प्राधिकरणात (SAI) Recruitment 2021 #MyCareer #governmentjob #privatejob #freshersvacancy #Freshersjob #currentaffair #dailyquiz #career #jobin2021 Read the full article
0 notes
Video
youtube
MMRDA Requirement 2020 | मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 16726 जाग...
0 notes
Link
[MMRDA] मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 215 जागांसाठी भरती | MMRDA Recruitment 2020 | Job Marathi , जॉब मराठी MMRDA RecruitmentMumbai Metropolitan Region Development Authority, commonly abbreviated as MMRDA, is a body of the Government of Maharashtra that is responsible for the infrastructure development of the Mumbai Metropolitan Region. Maha Mumbai Metro Operation Corporation Limited (MMMOCL). MMRDA Recruitment 2020 (MMRDA Bharti 2020, Mumbai Metro Bharti 2020) for 215 Non-Executive Posts.
0 notes
Text
सिंधुदुर्गनगरी प्राधिकरणात भुरट्या चोऱ्या वाढल्या
सिंधुदुर्गनगरी प्राधिकरणात भुरट्या चोऱ्या वाढल्या
ओरोस : सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रात भुरट्या चोरांचा उपद्रव वाढला आहे. येथील बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी साहित्याची चोरी मागील ��र्षभर होत आहे. काही भुरट्या चोरांकडून चोरी होत असल्याची तक्रार सिंधुदुर्गनगरी पोलीस स्थानकात दिली आहे. कदम यांच्या बंगल्याच्या गॅलरीतून १२ जानेवारीला हेल्मेट व त्यांच्या बंगल्यासमोर उभ्या असलेल्या सहा सीटर रिक्षा टेम्पोतून टेपरेकॉर्डर व उशी चोरीस गेली आहे. अश्या…
View On WordPress
0 notes
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २३ डिसेंबर २०२१ सकाळी ११.०० वाजता ****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी इथं विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत. उत्तर प्रदेश राज्य औद्योगिक विकास प्राधिकरणात बनास दुग्धव्यवसाय संकुलाची पायाभरणी ते करतील. या प्रकल्पासाठी सुमारे ४७५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, दररोज पाच लाख लीटर दुधावर प्रक्रिया करण्याची क्षमता या डेअरीत असेल.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासाठीच्या समितीची दुसरी बैठक काल पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली इथं पा�� पडली. कोरोना संकटानं आपल्याला नवी शिकवण देऊन सध्य���च्या यंत्रणा मोडीत काढल्यामुळे, कोरोनानंतरच्या काळात एक नवी जागतिक यंत्रणा उभी राहील, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.
****
ओडिशातल्या अब्दुल कलाम बेटावर काल ‘प्रलय’ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था - डीआरडीओनं तयार केलेलं हे क्षेपणास्त्र, ५०० किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेऊ शकतं. हे क्षेपणास्त्र एक हजार किलो वजनापर्यंतची स्फोटकं वाहून नेण्यास सक्षम आहे.
****
शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर अधिकाऱ्यांनी सौरभ त्रिपाठीला लखनौमधून अटक केली. त्रिपाठी विनर कंपनीचा संचालक असून सध्या याच कंपनीकडे उत्तर प्रदेशातल्या शिक्षण विभागाच्या परीक्षा घेण्याचं कंत्राट आहे.
दरम्यान, पुणे सायबर विभागात काल एका व्यक्तीने दहा लाख रुपये रोकड आणून दिली आणि राज्य परीक्षा परिषदेचे माजी आयुक्त तुकाराम सुपे यांनी ते ठेवायला दिले होते, असा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे.
****
ओमायक्रॉन विषाणूचा वाढता प्रसार पाहता, स्थिती नियंत्रणात आली नाही, तर पुन्हा शाळा बंद कराव्या लागतील, असं राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. कोविडस्थिती पूर्व पदावर आल्यानंतर राज्यातल्या शाळा आणि महाविद्यालयं पुन्हा सुरु करण्यात आली आहेत. वाढत्या प्रसारावर सरकार लक्ष ठेवून असल्याचं, त्यांनी सांगितलं.
****
ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिकासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेण्यात येऊ नये, या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं काल राज्यभरात “नो रिजर्व्हेशन - नो इलेक्शन” आंदोलन करण्यात आलं.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 23 September 2021 Time 1.00 to 1.05 PM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २३ सप्टेंबर २०२१ दुपारी १.०० वा. ****
देशव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं ८३ कोटीचा टप्पा पार केला आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईतील हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. काल दिवसभरात ७१ लाख ३८ हजार २०५ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या ८३ कोटी ३९ लाख ९० हजार ४९ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या ३१ हजार ९२३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर २८२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या तीन कोटी ३५ लाख ६३ हजार ४२१ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत चार लाख ४६ हजार ५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ३१ हजार ९९० रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी २८ लाख १५ हजार ७३१ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या तीन लाख एक हजार ६०४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
महाराष्ट्र हे निर्यात क्षेत्रात अग्रेसर रहावं यासाठी उद्योग संचालनालय आणि केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागामार्फत मुंबईत आयोजित दोन दिवसाच्या ‘वाणिज्य उत्सवा’ची काल सांगता झाली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या परिषदेचं आयोजन करण्यात आलं ��ोतं. यापुढे प्रत्य��क जिल्हा स्तरावर जिल्हा उद्योग केंद्रामार्फत निर्यात जागरुकता कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचं, उद्योग विभागाचे आयुक्त तथा राज्याचे निर्यात आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी यावेळी सांगितलं. प्रत्येक जिल्ह्यात एक्स्पोर्ट प्रमोशन कमिटी स्थापन करण्यात आली असून, जिल्हानिहाय निर्यात आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचं ते म्हणाले. शासनाच्या पाठिंब्याच्या माध्यमातून द्विपक्षीय व्यापार संधी, पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्स, डेव्हलपमेंट क्रेडिट गॅरंटी इत्यादी विषयांवर या दोन दिवसीय परिषदेत सविस्तर चर्चा झाली.
****
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी ही माहिती दिली. प्राधिकरणात सध्या कार्यरत दोन हजार ११८ अधिकारी, कर्मचाऱ्यांना तसंच ११ हजार सेवानिवृत्त कर्मचारी अशा एकूण १३ हजार ११८ कर्मचाऱ्यांना, या निर्णयाचा लाभ होणार आहे. एक जानेवारी २०१६ पासून या सर्वांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ देण्यात येणार आहे.
****
राज्यात चालू हंगामात कापूस खरेदीचं योग्य नियोजन करून शेतकरी हितासाठी कापूस खरेदीला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरवात करावी, अशा सूचना सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या आहेत. कापूस खरेदी नियोजनाबाबत झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. राज्यात यावर्षी कापूस पेरा गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे साडे सहा टक्क्यांनी घटला असला, तरीही सद्यस्थितीत कापूस पिकाची परिस्थिती पाहता, राज्यात ८०-८५ लाख गाठी एवढे कापूस उत्पादन अपेक्षित आहे. त्यानुसार योग्य नियोजन करून खरेदी केंद्रं नोव्हेंबरमध्ये सुरू करण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत करावी आणि या केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यातल्या सर्व आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या स्वीप अर्थात, मतदारांचं पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग या कार्यक्रमाअंतर्गत साक्षरता मंडळाची स्थापना करण्यात येणार असून, वैद्यकीय शिक्षण आणि औषधीद्रव्ये विभागानं याबाबत परिपत्रक जारी केलं आहे. प्रत्येक वर्गातील निवडलेले प्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांकडून निवडलेली समिती या मंडळाचं कामकाज पाहतील.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास आणि संशोधन संस्थेच्या सल्लागार समितीचं पुनर्गठन करण्यात आलं आहे. विद्यापीठाच्या अंतर्गत लोकनेते ग��पीनाथराव मुंडे ग्रामीण विकास आणि संशोधन संस्थेच्या नावाने स्वतंत्र पदवी आणि पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचं स्वायत्त या संस्थेला बहाल करण्यात आलं आहे. या��ाबतचा शासन निर्णय उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं काल जारी केला. सल्लागार मंडळास आवश्यक असणारा निधी, त्याचे स्वतंत्र लेखापरीक्षण तसंच फेलो, सिनिअर फेलो अशा विविध पदांची आणि कंत्राटी पदांची भरती करण्याबाबतही मुभा देण्यात आली आहे.
****
उस्मानाबाद आणि परिसरात सतत पडत असलेल्या पावसामुळे उस्मानाबादला पाणीपुरवठा करणारं तेरणा धरण शंभर टक्के भरलं असून, पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू असल्याचं सोयाबीन पिकाला फटका बसला आहे. नर्सी परिसरात पावसामुळे सोयाबीनच्या शेंगांना मोड फुटल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. जिल्ह्यात अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली असून, अतिपावसामुळे पिकाचं नुकसान सुरू झालं आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 16 September 2021 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १६ सप्टेंबर २०२१ सकाळी ७.१० मि.
देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरुणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· ५० टक्के आरक्षणाची मर्यादा कायम ठेऊन इतर मागास प्रवर्गासाठीच्या आरक्षणाकरता अध्यादेश काढण्याचा राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय
· इतर मागासवगर्गियांच्या राजकीय आरक्षणासाठी भारतीय जनता पक्षाचं राज्यभर आंदोलन
· राज्यात तीन हजार ७८३ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात १९६ बाधित
· १२ राष्ट्रीय बँकाच्या अध्यक्षांची आज औरंगाबादमध्ये बैठक, वाहन उद्योगातील अग्रेसर टेस्ला कंपनीचे अधिकारी संभाव्य गुंतवणुकीबाबत विचार करण्यासाठी औरंगाबादला येणार असल्याची केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांची माहिती
आणि
· औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथल्या संतपीठाचा अभ्यासक्रम सुरू करण्याबाबतचा शासननिर्णय जारी
****
५० टक्के आरक्षणाची मर्यादा कायम ठेऊन इतर मागास प्रवर्गासाठीच्या आरक्षणाकरता अध्यादेश काढण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळानं घेतला असल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. मंत्रीमंडळ बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यामध्ये इतर मागासवर्गीयांसह एकूण मागासवर्गीय जागांपैकी एकत्रित आरक्षण ५० टक्क्यांहून जास्त होणार नाही. हाच अध्यादेश सध्याच्या पोटनिवडणुका आणि यापुढे येणाऱ्या निवडणुकांना देखील लागू असेल, असं ते म्हणाले. अनुसूचित जाती-जमातींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिलं जाईल, तसंच केंद्राकडून इम्पिरिकल डेटा मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात लढा सुरु राहणार असल्याचं, भुजबळ यांनी यावेळी सांगितलं.
****
इतर मागास वर्ग - ओबीसीला राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका न घेण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत झालेला असतानाही, पाच जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुकांची घोषणा करण्यात आल्यामुळे, तसंच राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ��बीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळालं नसल्याचं सांगत, भाजपतर्फे राज्यात काल एक हजार ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आलं.
औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात दहा ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. शहरात आमदार अतुल सावे यांच्या तर फुलंब्री इथं माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. उस्मानाबाद इथं जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली, लातूर जिल्ह्यात खासदार सुधाकर शृंगांरे, आमदार संभाजी पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांच्या नेतृत्वाखाली, परभणी इथं ओबीसी आघाडीचे प्रदेश चिटणीस रामकिशन रौंदळे, जिल्हाध्यक्ष भालचंद्र गोरे, यांच्या नेतृत्वाखाली अआंदोलन करण्यात आलं. नांदेड इथं आसना पुलाजवळ भाजपाचे शहराध्यक्ष प्रविण साले आणि भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष व्यंकटेश जिंदम यांच्या नेतृत्वाखाली, तर जालना जिल्ह्यात भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आलं.
****
राज्यात काल तीन हजार ७८३ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६५ लाख सात हजार ९३० झाली आहे. काल ५६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३८ हजार २७७ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल चार हजार ३६४ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६३ लाख १७ हजार ७० रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९७ पूर्णांक शून्य सात शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ४९ हजार ३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल १९६ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली. उस्मानाबाद जिल्ह्यात ७४, बीड ६८, औरंगाबाद २१, लातूर १८, नांदेड सात, जालना चार, तर परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्ण आढळले.
दरम्यान, मराठवाड्यात काल कोविड संसर्गानं एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.
****
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या उपस्थितीत मराठवाड्यात पहिल्यांदाच १२ राष्ट्रीय बँकाच्या अध्यक्षांची आज बैठक होणार आहे. यामध्ये बँकांशी निगडित विविध विषयांवर सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यत बैठका आणि चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. संध्याकाळी होणाऱ्या समारोप सत्राला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री र���वसाहेब दानवे तसंच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याचं, कराड यांनी सांगितलं.
दरम्यान, या बैठकीच्या पूर्वसंध्येला काल औरंगाबाद फर्स्ट च्या वतीनं स्नेहमेळावा घेण्यात आला. वाहन उद्योगातील अग्रेसर टेस्ला कंपनीचे अधिकारी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात संभाव्य गुंतवणुकीबाबत विचार करण्यासाठी औरंगाबाद इथं येत असल्याची माहिती, कराड यांनी यावेळी दिली. शहरातल्या उद्योगांमध्ये गुंतवणूक वाढवण्याच्या शक्यतेवर या मेळाव्यात चर्चा झाली.
****
दिल्ली पोलिसांनी काल अटक केलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईत कोणत्याही प्रकारची रेकी केली नव्हती, तसंच महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक - एटीएस च्या कामात कोणत्याही प्रकारची कुचराई झालेली नाही, असं एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबई दहशतवाद विरोधी पथकाची काल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली, त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. या सहा दहशतवाद्यांपैकी जान मोहम्मद शेख हा धारावीत राहणारा असून, त्याचे दाऊदशी संबंध असल्याचं उघडकीला आलं आहे, असंही अग्रवाल यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथल्या संतपीठाचा अभ्यासक्रम सुरू करण्याबाबतचा शासननिर्णय उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं जारी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानंतर हा निर्णय घेण्यात आला. संतपीठाचं शैक्षणिक व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे सोपवण्यात आलं आहे. या संतपीठामध्ये भारतीय परंपरा, संस्कृती, संत संप्रदाय, संत साहित्य, कीर्तन, प्रवचन, तत्वज्ञान आदी बाबींशी संबंधित प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवण्यात येणार आहेत. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या संतपीठाचं लोकार्पण केलं जाणार आहे.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या लेखी पुरवणी परीक्षेला आजपासून सुरूवात होत आहे. ही परीक्षा ११ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. प्रात्यक्षिक, श्रेणी तसंच तोंडी परीक्षेला कालपासून सुरूवात झाली. इयत्ता दहावीची लेखी पुरवणी परीक्षा २२ सप्टेंबर ते आठ ऑक्टोबर दरम्यान, आणि प्रात्यक्षिक, श्रेणी तसंच तोंडी परीक्षा, २१ सप्टेंबर ते चार ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येणार आहेत.
****
परभणी जिल्ह्यातल्या ऊसतोड कामगारांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्याकरता जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक झाली. जिल्ह्यातल्या सर्व साखर कारखान्यांना पत्र देवून कारखान्याचे मुकादम तसंच त्यांच्या क्षेत्रांत मागील तीन वर्ष सलग काम करणाऱ्या ऊस तोड कामगारांची सविस्तर माहिती घेऊन, ग्रामसेवकांनी ओळखपत्र देण्याची कार्यवाही करावी, तसंच सर्व कारखान्यांनी त्यांच्याकडील सर्व ऊस तोड कामगारांचे सप्टेंबर अखेरपर्यंत लसीकरण करून घेण्याचे निर्देशही, जिल्हाधिकारी गोयल यांनी यावेळी दिले.
****
औरंगाबाद विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाचं उद्धाटन पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांच्या हस्ते काल झालं. या विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणात मराठवाडा विभागातल्या आठही जिल्ह्यातल्या नागरिकांना पोलीसांबद्दलची तक्रार नोंद करता येणार असून, कायद्याप्रमाणे तक्रारींच निरसन करण्यात येणार आहे. तक्रारी, समस्यांचा तात्काळ निपटारा झाल्यानं पोलीस, नागरिक यांना न्याय आणि सुविधा मिळणं सुलभ होणार असल्याचं गुप्ता यांनी यावेळी सांगितलं.
****
औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्गावर औट्रम घाटातला रस्ता, औरंगाबाद ते धुळे वाहतूक करणाऱ्या दुचाकी आणि हलक्या तसंच छोट्या वाहनांसाठी कालपासून खुला करण्यात आला. ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे घाटात जागोजागी दरड कोसळल्यामुळे, हा रस्ता तात्पुरता बंद करण्यात आला होता. सध्या घाटात रस्ता दुरुस्तीचं काम सुरु असुन अवजड वाहनांसाठी रस्ता सुरु करणं सुरक्षित न��ल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे.
****
अनंत भालेराव प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा ‘अनंत भालेराव स्मृती पुरस्कार’, यंदा ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांना जाहीर झाला आहे. १४ नोव्हेंबर रोजी एका विशेष कार्यक्रमात डॉ. नाडकर्णी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानच्या सचिव डॉ. सविता पानट यांनी ही माहिती दिली.
****
मराठवाडा बहुजन विकास आघाडीतर्फे आज औरंगाबाद इथं मराठवाडा पाणी हक्क परिषद होणार आहे. महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन होईल.
****
मराठवाड्यातले ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक प्रल्हाद लुलेकर यांनी लिहिलेल्या मराठवाड्यातील मराठी वाड्मयाचा इतिहास या ग्रंथाचं प्रकाशन आज औरंगाबाद इथं होणार आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते मसापच्या सभागृहात हे प्रकाशन होणार आहे.
****
नाशिक पाठोपाठ अहमदनगर जिल्ह्यातल्या धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं काल सकाळपासून जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. धरणाचा पाणीसाठा काल सायंकाळपर्यंत ६७ टक्क्यांवर पोहोचला आहे.
****
हवामान :
राज्यात येत्या दोन दिवसात कोकणात बबुतांश ठिकाणी, तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 06 May 2021 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०६ मे २०२१ सकाळी ७.१० मि. ****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
· राज्य सरकारचा मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण देणारा कायदा, सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द.
· आरक्षणाबाबत पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी तातडीनं निर्णय घेण्याची मुख्यमंत्र्यांची विनंती; आज केंद्र सरकारला पत्र पाठवणार.
· राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात योग्य प्रकारे माहिती न मांडल्यामुळे आणि संपूर्ण प्रक्रियेत समन्वय न ठेवल्यामुळे आरक्षण रद्द - विरोधी पक्षनेते, देवेंद्र फडणवीस.
· देशात कोरोना विषाणू संसर्गाची तिसरी लाट अटळ असल्याचा मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांचा इशारा.
· राज्यात ५७ हजार ६४० नविन कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात १४१ जणांचा मृत्यू तर सहा हजार ६५८ बाधित.
· आरोग्य सुविधांसाठी ५० हजार कोटी रुपयांचा निधी रेपो दराने पुढील तीन वर्षासाठी बँकांना उपलब्ध करुन देण्याची भारतीय रिझर्व बँकेची घोषणा.
आणि
· सहकार अधिनियमात दुरुस्ती करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता.
****
राज्य सरकारचा मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण देणारा कायदा, सर्वोच्च न्यायालयानं रद्द ठरवला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला निर्णय आणि मागास आयोगाचा अहवाल, यावरुन मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास ठरवलं जाऊ शकत नाही, असं न्यायालयानं आपल्या निकालात म्हटलं आहे. १९९२ मध्ये इंद्रा सहानी खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं, ५० टक्के आरक्षण मर्यादा घालून दिली होती. राज्यानं मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणामुळे, या मर्यादेचं उल्लंघन होत असल्या कारणानं, या कायद्याच्या घटनात्��क वैधतेला विविध याचिकांच्या माध्यमातून आव्हान देण्यात आलं होतं. या याचिकांवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर, न्यायालयानं काल हा निकाल दिला.
५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून आरक्षण देण्यासारखी परिस्थिती नाही, असं सांगत इंद्रा सहानी खटल्याबाबत पुन्हा एकदा तपासणी करण्याची गरज वाटत नसल्याचंही, न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, ९ सप्टेंबर २०२० पर्यंत झालेले वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश न्यायालयानं वैध ठरवले आहेत.
****
न्यायालयाचा निर्णय हा महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी आणि लढवय्या समाजाच्या दृष्टीनं दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. आरक्षण देण्याचा राज्य सरकारला अधिकार नसल्याचं, सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केल्यामुळे, आता मराठा आरक्षणाबाबतचा तातडीचा निर्णय, पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनीच घ्यावा, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. याआधी शहाबानो प्रकरण, ॲट्रॉसिटी कायदा तसंच ३७० कलम काढण्यासंदर्भात, केंद्रानं तत्पर निर्णय घेऊन न्याय प्रियता दाखवली आहे. यासाठी घटनेतही बदल केले आहेत, आता तीच गती मराठा आरक्षणाबाबत दाखवावी, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या निमित्तानं कुणी महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करु नये, जनतेनं उगाच डोकी भडकवून घेऊ नयेत, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. मराठा आरक्षणाबाबत कायद्याची लढाई विजय मिळेपर्यंत सुरुच राहील, असंही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुढाकार घेण्यासाठी आपण केंद्र सरकारला पत्र पाठवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी काल जनतेशी संवाद साधताना सांगितलं, ते म्हणाले –
सर्वोच्च न्यायालयाने निकाल देतांना पुढचा मार्ग दाखवलेला आहे. आरक्षण देणं हा अधिकार केंद्र सरकारचा आणि माननीय राष्ट्रपतींचा आहे. महाराष्ट्रामधे ज्या वेळेला हा निर्णय घेतला गेला, तेव्हा जे सर्व पक्ष एकत्रित आले होते, ते सर्व पक्ष आजसुध्दा एकत्रित आहेत. आम्ही एकमुखी आापल्याला विनंती करतो आहे की आपल्याला जे जे काही सहकार्य आमच्या राज्यातून पाहिजे असेल ते आम्ही करतो आहोत. या समाजाला न्याय देण्यासाठी आता केंद्र सरकारनी जास्त वेळ न लावता निर्णय घ्यावा. जर का आम्हाला तिकडे येऊन भेटण्याची आवश्यकता असेल तर ते ही आम्ही करायची तयारी आहे.
****
सर्वोच्च न्यायालयानं नमूद केल्याप्रमाणे, एकशे दोनाव्या घटनादुरुस्तीमुळे राज्यांना अधिकार राहत नसतील, तर मराठा आरक्षणाचा सामाजिक आणि शैक्षणिक मागास कायदा, केंद्र सरकारकडे पाठवण्याची राज्य शासनाची तयारी आहे, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष, अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. न्यायालयाचं विस्तृत निकालपत्र उपलब्ध झाल्यानंतर या पर्यायासह इतरही सर्व पर्यांयाचा विचार करून अंतिम निर्णय घेतला जाईल, ��राठा समाजाला दिलासा मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले.
****
राज्य सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात योग्य प्रकारे माहिती मांडली नाही, या संपूर्ण प्रक्रियेत राज्य सरकारचा समन्वय नव्हता, त्यामुळे मराठा आरक्षण रद्द करण्याचा निराशाजनक निर्णय पाहायला मिळत आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभेतले विरोधी पक्षनेते, देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरात वार्ताहरांशी बोलतांना व्यक्त केली. या निर्णयानंतर राज्य शासनानं सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील तज्ज्ञ विधीज्ञांची एक समिती तयार करून, मराठा आरक्षणासंदर्भातील या निर्णयाची न्यायिक रणनिती ठरवून सर्वपक्षीय बैठकीसमोर मांडावी, मराठा समाजाच्या कल्याणासाठी असलेल्या योजना, विकास महामंडळ यांना निधी देऊन त्यांच्या योजना जोमानं सुरु ठेवाव्यात, अशी सूचना फडणवीस यावेळी केली.
****
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारनं जोमानं बाजू मांडली, केंद्र सरकारनंही सर्वतोपरी प्रयत्न केले, त्यामुळे कोणालाही दोष देण्यात अर्थ नाही, असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाला आता कायमस्वरुपी टिकणारं आरक्षण देण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनानं मिळून मार्ग काढावा, असं त्यांनी म्हटलं आहे.
****
राज्य सरकार न्यायालयात बाजू मांडण्यात अपयशी ठरल्याबद्दल मराठा क्रांती मोर्चानं खंत व्यक्त करत, या निषेधार्थ राज्यात विविध ठिकाणी आंदोलन केलं. औरंगाबाद इथं रमेश केरे पाटील आणि अप्पासाहेब कुढेकर यांनी क्रांती चौकात आत्मक्लेश आंदोलन केलं. परभणी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
जालना इथं छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर, केंद्र आणि राज्य शासनाच्या विरोधात अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकात, सरकार विरोधात सामूहिक मुंडण करत कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.
****
देशात कोरोना विषाणू संसर्गाची तिसरी लाट अटळ असल्याचा इशारा, केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी दिला आहे. नवी दिल्लीत काल ते वार्ताहरांशी बोलत होते. या तिसऱ्या लाटेसाठी तयार राहण्याचं आवाहन त्यांनी यंत्रणेला के��ं आहे. देशातील संसर्गाची सध्याची परिस्थिती, आणि भविष्यातील परिस्थिती, याविषयी त्यांनी यावेळी माहिती दिली. तिसरी लाट कधी येईल आणि किती काळ राहील याचा अंदाज वर्तवणं कठीण आहे, असं ते म्हणाले.
दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य तयारी करत असल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यातली आरोग्य व्यवस्था सक्षम केली जात असल्याचं सांगताना ते म्हणाले –
येत्या काही दिवसांत महाराष्ट्र हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालाच पाहिजे ही आपली अटकळ नव्हे हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्यादृष्टीने आपण हालचाल ही करतो आहोत. रेमडि��ीवरचा पुरवठा हा आवश्यकतेनुसार आपण प्रत्येक जिल्ह्याला करतो आहोत. या सगळ्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने वाटचाल करतो आहोत की जेणेकरून तिसरी लाट, दुसरी लाट तर लवकर थोपवायची आहेच, पण तिसरी लाटसुध्दा जर का आली तर तिचा घातक दुष्परिणाम आपल्या राज्यावर होऊ द्यायचा नाही हा चंग बांधून आपलं महाराष्ट्र सरकार काम करत आहे.
****
राज्यात काल ५७ हजार ६४० कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ४८ लाख ८० हजार ५४२ झाली आहे. काल ९२० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ७२ हजार ६६२ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ४९ शतांश टक्के झाला आहे. काल ५७ हजार ६ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ४१ लाख ६४ हजार ९८ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८५ पूर्णांक ३२ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात सहा लाख ४१ हजार ५६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल सहा हजार ६५८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १४१ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या २७, बीड ३७, लातूर ३१, नांदेड २१, परभणी ११, जालना आणि हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी आठ, तर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सात रुग्णांचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात ९४४ रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात एक हजार ४३९, लातूर एक हजार ३०६, जालना ८२८, परभणी ७८५, उस्मानाबाद ७८३, नांदेड ४२२, तर हिंगोली जिल्ह्यात १५१ रुग्ण आढळले.
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात आलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं काल विविध उपायांची घोषणा केली. बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काल माध्यमांना याबाबत माहिती दिली. देशाच्या आरोग्य सुविधांसाठी ५० हजार कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, बँकांना रेपो दराने पुढील तीन वर्षांसाठी हा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, विशेष खिडकी योजना ३१ मार्च २०२२ पर्यंत खुली राहील, त्याचबरोबर वैयक्तिक कर्जदार तसंच सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजकांना कर्ज पुनर्रचनेची संधी पुन्हा खुली असेल, असं दास यांनी सांगितलं. राज्यांची ओव्हरड्राफ्टची सुविधा ३६ दिवसांऐवजी ५० दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्यांना ३० सप्टेंबर पर्यंत या सुविधेचा लाभ घेता येईल, असं त्यांनी सांगितलं. बँकेत खाते उघडण्यासाठी विविध श्रेणीत व्हीडिओद्वारे केवायसी प्रक्रिया राबवणार असल्याचंही दास यांनी सांगितलं.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या साथीमुळे सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा होऊ शकल्या नाहीत, या पार्श्वभूमीवर या सहकारी संस्थांचे अनेक सदस्य, अक्रियाशील सदस्य ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन, सहकार अधिनियमात दुरुस्ती करण्यास काल राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. पाच वर्षांच्या कालावधीत सर्व सदस्य मंडळाच्या किमान एका बैठकीला ��पस्थित असणं बंधनकारक आहे. मात्र कोविड साथीमुळे या बैठकाच होत नाहीत, परिणामी गेल्या पाच वर्षात जे सदस्य एकाही बैठकीला उपस्थित राहु शकले नाहीत, ते अक्रियाशील सदस्य ठरून, संस्थेच्या निवडणुकीत मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या अधिनियमात सुधारणा करण्यास मंत्रीमंडळानं मान्यता दिली.
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण विसर्जित करून, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात त्याचं विलीनीकरण करण्यासही, काल मंत्रीमंडळानं मंजुरी दिली. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ हे नियोजन विभागाकडे हस्तांतरण करण्याचा निर्णयही, या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर सातारा इथं कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, हे समूह विद्यापीठ स्थापन करण्यासही मान्यता देण्यात आली.
****
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ, राज्यात काल भाजपनं ठिकठिकाणी आंदोलन केलं. विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे आणि नागपूरचे जिल्हाध्यक्ष प्रवीण दटके यांनी, नागपुरात टिळक पुतळा इथं आंदोलन केलं.
औरंगाबाद शहरात माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अतुलजी सावे यांच्यासह कार्यककर्त्यांनी, निषेधाचे फलक हातात घेऊन घोषणाबाजी केली. वैजापूर इथं भाजपच्या कार्यकर्त्यांनी, नायब तहसीलदार दीपाली खेडकर यांना याबाबत निवेदन दिलं.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही, बीड इथल्या भाजपा कार्यालयाबाहेर निषेध व्यक्त केला. यावेळी कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी दरेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उस्मानाबाद इथं जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. परभणी जिल्ह्यात गंगाखेड जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम यांच्या उपस्थितीत, निषेध आंदोलन करण्यात आलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या काटगाव इथल्या घट्टेवाडी शिवारात, काल दुपारी वीज पडून ३० शेळ्यांसह एका अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. धर्मेश कोळी असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वेनं प्रवासी संख्या कमी झाल्यामुळे दोन रेल्वे गाड्या तात्पुरत्या रद्द केल्या आहेत. मुंबई -जालना- मुंबई ही रेल्वे गाडी १० मे ते एक जुलैपर्यंत, आणि कोल्हापूर- नागपूर- कोल्हापूर ही रेल्वे गाडी, १० मे ते २८ जून दरम्यान धावणार नसल्याचं, रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे. लातूर - मुंबई रेल्वेही ३० जूनपर्यंत बंद राहणार असल्याचं मध्य रेल्वेनं कळवलं आहे.
****
परभणी इथं कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी ला��ू केलेली असतांना, काही व्यापारी आणि विक्रेते छुप्या पद्धतीनं व्यवहार सुरु ठेवत आहेत. याबद्दल महसूल प्रशासनाने नाराजी व्यक्त केली आहे. नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करुन गुन्हे नोंदवले जाईल, असा इशारा उपविभागीय अधिकारी डॉक्टर संजय कुंडेटकर यांनी दिला आहे.
दरम्यान, परभणी शहरात संचारबंदीच्या नियमांचं उल्लंघन करत दुकानं सुरु ठेवण्याऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध महापालिकेनं काल कारवाई केली. यावेळी शहरात शिवाजी चौकातली १० दुकानं आणि वसमत रोडवरील एका दुकानाविरुध्द कारवाई करत ४९ हजार ५०० रुपये दंड वसूल केला. विनामास्क फिरणाऱ्या ४० नागरिकांनाही दंड ठोठावत आठ हजार रुपये वसूल करण्यात आले.
****
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, औंढा, सेनगाव तालुक्यातील डोंगरी भागात सध्या मोहफुले संकलनाचं काम जोरात सुरू आहे. शासनानं मोहफुलांवरील निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतल्यानं अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
****
0 notes
Link
[MMRDA] मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 215 जागांसाठी भरती | MMRDA Recruitment 2020 | Job Marathi , जॉब मराठी MMRDA RecruitmentMumbai Metropolitan Region Development Authority, commonly abbreviated as MMRDA, is a body of the Government of Maharashtra that is responsible for the infrastructure development of the Mumbai Metropolitan Region. Maha Mumbai Metro Operation Corporation Limited (MMMOCL). MMRDA Recruitment 2020 (MMRDA Bharti 2020, Mumbai Metro Bharti 2020) for 215 Non-Executive Posts.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 22 November 2018 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २२ नोव्हेंबर २०१८ सकाळी ७.१० मि. **** मराठा आरक्षणासंदर्भातला मागसवर्गीय आयोगाचा अहवाल विधीमंडळाच्या पटलावर मांडण्याची प्रक्रिया सुरू मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा विस्तार; पालघर आणि रायगड जिल्ह्यातला उर्वरीत भागाचा समावेश पद्मविभूषण गोविंद भाई श्रॉफ स्मृती पुरस्कार ज्य���ष्ठ स्वातंत्र्यसैनिक ना.वि देशपांडे यांना प्रदान आणि तीन टी-ट्वेंटी क्रिके�� सामन्याच्या मालिकेतला पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची भारतावर चार धावांनी मात **** राज्य सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भातला मागसवर्गीय आयोगाचा अहवाल विधीमंडळाच्या पटलावर मांडण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अभिनंदन वग्यानी यांनी काल मुंबई उच्च न्यायालयात दिली. औरंगाबादचे मराठा समाजाचे कार्यकर्ते विनोद पाटील यांच्यासह इतरांनी दाखल केलेल्या याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू असताना सरकारच्यावतीनं ही माहिती देण्यात आली. विधीमंडळात आ अहवाल मांडल्यानंतर त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं वग्यानी यांनी न्यायालयाला सांगितलं. न्यायालयानं यापूर्वी दिलेल्या निर्णयानुसार आयोग अणि सरकारनं कारवाई केली असल्यामुळे प्रलंबित याचिकांवर आणखी सुनावणी घेण्याची आवश्यकता नसल्याचं सांगत न्यायालयानं मराठा समाजाच्यावतीनं दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका काल निकाली काढल्या. **** मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा विस्तार करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातल्या पालघर तालुका, वसई तालुक्यातला उर्वरित भाग आणि रायगड जिल्ह्यातला अलिबाग, पेण, पनवेल आणि खालापूर तालुक्यांचा उर्वरित भाग प्राधिकरणात समाविष्ट करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बृहन्मुंबई आणि परिसराचा सुयोग्य आणि नियोजित पद्धतीनं विकास व्हावा, यासाठी हा परीसर प्राधिकरणात समाविष्ट करण्यात आला असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. प्राधिकरणाचं क्षेत्र आता ४ हजार २५४ चौरस किलोमीटरवरून ६ हजार २७२ चौरस किलोमीटर इतके झाले आहे. याच बैठकीत मुंबई आणि परिसरासाठी १८ हजार कोटी रुपये खर्चाच्या तीन मेट्रो मर्गांच्या प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली. **** अणुऊर्जा प्रकल्पांना आवश्यक विविध उपकरणं आणि सामग्रीचा पुरवठा करणाऱ्या जगप्रसिद्ध होलटेक इंटरनॅशनल या कंपनीनं राज्यात अणुऊर्जा प्रकल्पांसाठी लागणारी उच्च दर्जाची सामग्री उत्पादित करणारा प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शवली आहे. यासाठी काल या कंपनीनं राज्य सरकारसमवेत सामंजस्य करार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थिकतीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. जवळपास चार हजार ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पामध्ये होणं अपेक्षित आहे. **** आदिवासींसाठी वन हक्क कायदा लागू करणं तसंच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, यासह अन्य मागण्यांसाठी आदिवासी आणि शेतकऱ्यांचा मोर्चा काल सकाळी ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं निघाला. मॅगेसेसे पुरस्कार विजेते राजेंद्र सिंह हे देखील या मोर्चात सहभागी झाले आहेत. या मोर्चात ठाणे आणि भुसावळ इथले आदिवासी आणि मराठवाड्यातले शेतकरी सहभागी झाले आहेत. लोकसंघर्ष मोर्चा या संघटनेच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा आज विधानभवनावर पोहोचण्याची ��क्यता आहे. **** स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या वतीनं देण्यात येणारा पद्मविभूषण गोविंद भाई श्रॉफ स्मृती पुरस्कार काल औरंगाब��द इथं ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक ना.वि देशपांडे यांना समर्थ अभ्यासक डॉ. राम साठे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. साठे यांनी यावेळी केलेल्या भाषणात ना.वि. देशपांडे यांनी उत्तम ग्रंथालयाची निर्मिती करत मराठवाडा सुसंस्कृत घडवण्याचं कार्य केलं, असे गौरवोद्गार काढले. देशपांडे यांच्या आयुष्यावर लिखीत 'संस्कृती उपासक आणि संवर्धक' या गौरव ग्रंथाचं संतसाहित्याचे अभ्यासक डॉ.रामचंद्र देखणे यांच्या हस्ते प्रकाशन झालं. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या तीन टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्याच्या मालिकेतला कालचा पहिला सामना ऑस्ट्रेलियानं चार धावांनी जिंकला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम ऑस्ट्रेलियाला फलंदाजीला पाचारण केलं. ऑस्ट्रेलियानं १७ षटकांत चार बाद १५८ धावा केल्या होत्या. मात्र पावसाचा व्यत्यय आल्यानं भारताला विजयासाठी डकवर्थ लुईस नियमानुसार १७ षटकांत १७४ धावा करण्याचं आव्हान देण्यात आलं होतं. निर्धारित भारत १७ षटकांत सात बाद १६९ धावांच करू शकला. मालिकेतला दुसरा सामना उद्या मेलबर्न इथं होणार आहे. **** पालघर जिल्ह्यातल्या केळवे मांगेला वाडी इथल्या माधुरी कैलास पाटील यांनी दोन मुलींनंतर कुटुंब नियोजन केलं. “माझी कन्या भाग्यश्री” योजनेअंतर्गत त्यांना २५ हजार रुपयांचा डिमांड ड्रॉफ्ट सरकारकडून मिळाल्याच्या त्यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या…… माझी कन्या भाग्यश्री कन्या बाईंनी सांगितले हे हे फार्म भरायचे आहेत. मग मी ते फार्म आणून भरले आणि बाईंनी ते पूढे पाठविले. मग पूढे आम्हाला पालघरला आमच्या मुलींना २५ हजार रूपयांची एफडी मिळाली. हे आमचं खूपचं भाग्य आहे. की, आमच्या मुलीसाठी एवढ आम्हाला योजना करून मिळाली. **** नाशिक जिल्ह्यात येवला-मनमाड मार्गावर भीषण अपघात होऊन एकाच कुटुंबातल्या सहा जणांचा मृत्यू झाला. कार आणि आयशर ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. काल पहाटे अंकाई बारी जवळ ही दुर्घटना घडली. मृत्युमुखी पडलेले सर्व जण अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव इथले रहिवासी होते. **** कर्नाटकात विजापूर जिल्ह्यात झालेल्या अन्य एका रस्ता अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला, मृतांमध्ये लातूर इथल्या तिघांचा तर नांदेड इथल्या एकाचा समावेश आहे. पुण्याहून विजापूरकडे जाणाऱ्या जीपला ट्रकने धडक दिल्याने ��ा अपघात झाला. **** लातूर तालुक्यात चिकलठाणा-भातखेडा मार्गावर मांजरा नदीवरच्या मोठ्या पुलाचं बांधकाम पूर्ण करण्यासाठी शासनानं सुधारीत अंदाजपत्रकाव्दारे पाच कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. तालुक्यातून जाणाऱ्या कोळपा-कासारखेडा-कारेपूर तसंच रेणापूर तालुक्यात धानोरा-अरजखेडा या दोन्ही रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी दोन कोटी रुपये, असा एकूण नऊ कोटी रुपये निधी सार्वजनिक बांधकाम विभागानं नुकताच मंजूर केला आहे. **** लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी जिल्ह्यातल्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यामध्ये जिल्हा रुग्णालय, जिल्हा न्यायालयाचं विस्तारीकरण तसंच औद्योगिक वसाहतीचं तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याचं विस्तारीकरण या प्रमुख मागण्या आहेत. विधीमंडळ अधिवेशनानंतर जिल्ह्यातल्या सर्व प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी मान्य केलं **** औरंगाबाद इंथल्या जैन अतिशय क्षेत्र कचनेरजी इथं उद्यापासून तीन दिवस वार्षिक यात्रा महोत्सव होणार आहे. यादरम्यान विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून भाविकांसाठी विविध सोयी सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती संयोजक समितीनं दिली आहे. *****
0 notes