Tumgik
#पी��म मोदी
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 06 December 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ डिसेंबर २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं, चिंता वाढली आहे. सर्वांना आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड 19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·      भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वत्र अभिवादन.
·      स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ.
·      राज्यात कोविड निर्बंध कडक होणार नाहीत - आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा निर्वाळा.
आणि
·      मुंबई कसोटीत भारताचा न्यूझीलंडवर ३७२ धावांनी दणदणीत विजय; मालिकाही जिंकली.
****
महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज देशभर त्यांना अभिवादन करण्यात येत आहे.
नवी दिल्लीतल्या संसद भवन परिसरात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यावर पुष्पांजली अर्पण केली.
मुंबईत दादर इथल्या चैत्यभूमीवरही अभिवादनपर विविध कार्यक्रम होत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, यांच्यासह अनेक मान्यवरांनी चैत्यभूमीवर जाऊन आंबेडकरांना अभिवादन केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. आज आपण स्वातंत्र्याचे अमृत क्षण अनुभवत आहोत. त्यामागे डॉ. आंबेडकर यांचे सशक्त प्रजासत्ताक राष्ट्र उभारणीसाठीचं अमूल्य योगदान कारणीभूत आहे, अशी कृतज्ञताही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या आंबडवे या त्यांच्या मूळ गावी  महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं.
औरंगाबाद जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी अभिवादन करण्यात येत आहे. शहरातल्या भडकलगेट इथल्या पुर्णाकृती पुतळ्याला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी पुष्प वाहून आणि मेणबत्या पेटवून अभिवादन केलं.
 ****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं आज सकाळी मुंबईत आगमन झालं. त्यानंतर त्यांनी किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलं. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यावेळी उपस्थित होते. रायगड किल्ला विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजी यांनी राष्ट्रपतींचं स्वागत केलं. खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 'रायगड किल्ल्याला भेट देणं ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. या किल्ल्याला आपण तीर्थक्षेत्र मानतो' असं मत राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केलं. राष्ट्रपतींनी सपत्नीक होळीचा माळ, राजसदर या ठिकाणी भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचंही दर्शन घेतलं.
****
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशन पत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज दिली.
जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाचा पुरावा आणि विहीत नमुन्यातील हमीपत्र सादर करणं आवश्यक असल्याचं मदान यांनी सांगितलं. जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास निवडून आल्याच्या तारखेपासून १२ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा त्यासंदर्भातील पुरावा आणि विहीत नमुन्यातील हमीपत्र सादर करण्यासाठी उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
****
राज्यात कोविड निर्बंध अधिक कडक होणार नसल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे, जालना जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. राज्याच्या आज होणाऱ्या कोविड कृती दलाच्या बैठकीत राज्यातल्या ओ-मायक्रॉन विषाणू संसर्गाबाबत आढावा घेतला जाणार असून, त्यानंतर पुढील गोष्टी ठरवू, असं टोपे यांनी सांगितलं. ते म्हणाले...
आपण ज्या ओपन केलेल्या संपुर्ण बाबी आहेत, त्यांच्यामध्ये लगेच निर्बंध ला‍वणे हे लोकांसाठी खुप जाचक आणि कठीण होईल. त्यामुळे परिस्थितीवर आपण लक्ष ठेवू आणि परिस्थिती कशी कशी आहे, त्या सगळ्या अनुषंगाने मग केंद्र शासनाचं मार्गदर्शन, टास्क फोर्सचं मार्गदर्शन, माननीय मुख्यमंत्री महोदयांची त्यातली मतं या सगळ्यांच्या अनुषंगाने पुढील गोष्टी ठरवू.
लहान मुलांना लसीकरण करण्यासाठी केंद्राची परवानगी मिळावी यासाठी, तसंच बूस्टर डोससाठी या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. तसंच, औरंगाबाद आणि नागपूर इथं जिनोमिक सिक्वेसिंगच्या आणखी दोन प्रयोगशाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची परवानगी घेणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं. ते म्हणाले...
येणारा संभाव्य वाढत असलेली ओमायक्रॉनची संख्या लक्षात घेता जिनोमिक सिक्वेसिंग हा सगळ्यात महत्वाचा भाग असणार आहे. आणि सध्याच्या तीन लॅबवर खूप जास्त ताण पडेल आणि त्यामुळे अचानकपणे वाढ होण्यापेक्षा आत्ताच दोन लगेचच लॅब वाढवण्यासंदर्भात परवानगी मिळावी. एक औरंगाबादला, एक नागपूरला असं सुध्दा टास्कफोर्सचे चेअरमन श्री ओक यांचं म्हणन आहे. अशा संदर्भातला त्यांचा आग्रह आहे.
****
कोविड-१९ साठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीचे सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत. याबाबतचा शासननिर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. आरटीपीआर चाचणीसाठी आता ३५० ते ७०० रूपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे. याशिवाय रॅपिड ॲन्टीजेन तपासणीसाठी १०० ते १५० रूपये, ॲन्टीबॉडीज तपासणीसाठी ३०० ते ५०० रूपये दर प्रस्तावित आहेत. राज्यात कोणत्याही खाजगी प्रयोगशाळेला या कमाल मर्यादेपेक्षा अधिक दर आकारता येणार नाहीत असंही या निर्णयात स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
मुंबई इथं झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं न्यूझीलंडवर ३७२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. सामन्याच्या आजच्या चौथ्या दिवशी खेळ सुरु झाला तेव्हा न्यूझीलंडनं पाच बाद १४० धावांवर खेळण्यास सुरुवात केली होती. न्यूझीलंडला सामना जिंकण्यासाठी ५४० धावांची आवश्यकता होती. मात्र १६७ धावात हा संघ सर्वबाद झाला. दुसऱ्या डावात रविचंद्रन अश्विन आणि जयंत यादवनं प्रत्येकी चार, तर अक्षर पटेलनं एक गडी बाद केला. मयंक अग्रवालला सामनावीर, तर रवीचंद्रन अश्विनला मालिकावीर पुरस्काराचं गौरवण्यात आलं.
****
0 notes
abhay121996-blog · 3 years
Text
एमईआईएल ने ''मेक इन इंडिया'' के तहत निर्मित दूसरा रिग ओएनजीसी को सौंपा Divya Sandesh
#Divyasandesh
एमईआईएल ने ''मेक इन इंडिया'' के तहत निर्मित दूसरा रिग ओएनजीसी को सौंपा
अहमदाबाद। प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी के ”मेक इन इंडिया” और ”आत्मनिर्भर भारत” अभियान को संबल प्रदान करते हुए स्वदेशी प्रौद्योगिकी के साथ तेल और गैस निष्कर्षण रिग का निर्माण और उपयोग शुरु हो गया है। स्वदेशी तकनीक से गैस और पेट्रोलियम पदार्थों के निष्कर्षण के लिये इस रिग को ऑयल एंड नेचुरल गैस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) के सुपुर्द कर दिया गया। इटली से आयातित अत्याधुनिक तकनीक से स्वदेशी निर्मित तेल और गैस निष्कर्षण रिग सस्ती, सरल और सुरक्षित है। इस तकनीक से अब तेल और गैस निष्कर्षण की लागत में कमी आने के साथ ही समय की भी बचत होगी।
मेघा इंजीनियरिंग एंड इंफ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (एमईआईएल) के उपाध्यक्ष पी. राजेश रेड्डी ने गुरुवार को ”मेक इन इंडिया” और ”आत्मनिर्भर भारत” अभियान के लिये प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी का आभार व्यक्त करते हुए कहा कि मेक इन इंडिया और आत्मनिर्भर भारत की सफलता के लिए ऊर्जा आयात पर निर्भरता कम करना आवश्यक है। एमईआईएल को इन दोनों पहल में योगदान देने, घरेलू तेल उत्पादन को बढ़ावा देने और देश के ऊर्जा भविष्य को सुरक्षित करने में अपनी भूमिका निभाने पर गर्व है।
एमईआईएल के मुख्य अधिकारी (ऑयल रिग्ज डिवीजन) एन. कृष्ण कुमार ने इस प्रोजेक्ट के बारे में विस्तृत जानकारी देते हुए बताया कि, अभी तक भारत ज्यादातर तेल और ईंधन निष्कर्षण रिग की आयात पर निर्भर था, लेकिन एमईआईएल ने घरेलू रिग निर्माण क्षमता को काफी बढ़ाया है। ओएनजीसी को सुपुर्द की गई दूसरी रिग अत्याधुनिक हाइड्रोलिक और स्वचालित प्रौद्योगिकी के साथ निर्मित है। आधुनिक तकनीक से निर्मित इन उन्नत रिगों से ओएनजीसी को लाभ होगा।
यह खबर भी पढ़ें: अनोखा मामला: उड़ते प्‍लेन में महिला यात्री ने दिया नवजात बच्ची को जन्‍म, मां-बेटी दोनों सुरक्षित
उन्होंने कहा कि बेहतरीन हाइड्रोलिक तकनीक से लैस यह रिग ओएनजीसी अहमदाबाद एसेट के तहत गुजरात में कलोल के पास धमासना गांव में जिजीएस-IV तेल क्षेत्र के पास केलडीडीएच तेल कुएं में परिचालन शुरू करने के लिए तैयार है। यह तेल के कुओं को तेजी से खुदाई करता है और न्यूनतम ऊर्जा के साथ संचालित होता है। 1500 हार्सपावर की क्षमता वाला यह ड्रिलिंग रिग जमीन की सतह से 4000 मीटर (4 किलोमीटर) गहराई तक तेल कुओं को आसानी से खोद सकती है। रिग के 40 साल तक बिना रुकावट कार्यरत रहने की उम्मीद है और सुरक्षा मानकों के लिहाज से भी यह सबसे आधुनिक तकनीक के साथ निर्मित हुआ है।
एमईआईएल ने वर्ष 2019 में ओएनजीसी को 47 ड्रिलिंग रिग की आपूर्ति का करार किया था, इसके तहत दो रिग उसे सौंप दिए गये है। एन. कृष्ण कुमार ने बताया कि ओएनजीसी के लिये एमईआईएल का यह प्रोजेक्ट 6000 करोड़ की लागत का है।
उन्होंने आगे कहा कि ओएनजीसी को स्वदेशी प्रौद्योगिकी के साथ तेल और गैस निष्कर्षण के लिये पहला रिग इस साल अप्रैल में उसे सौंपा था, जो मेहसाणा में कलोल ऑयल फील्ड में कार्यरत है। कुमार ने बताया कि कुल 35 महीने में सभी 47 रिग ओएनजीसी को सौंप दिये जायेंगे।
यह खबर भी पढ़ें: इस मंदिर में लोगों को आने की जरूरत नही, चिट्टी भेजकर पूरी हो जाती हैं सारी मनोकामनाएं
उन्होंने कहा कि एमईआईएल को मिले ओएनजीसी के 47 रिग के ऑर्डर में 20 वर्क ओवर रिग और 27 लैंड (भूमि) ड्रिलिंग रिग सम्मिलित हैं। 20 वर्क ओवर रिग में 50 मीट्रिक टन की क्षमता वाले 12,100 मीट्रिक टन क्षमता वाले 4 और 150 मीट्रिक टन क्षमता वाले अन्य 4 रिग शामिल हैं।
27 भूमि ड्रिलिंग रिगों में से दो 1,500 हार्सपावर की क्षमता वाले मोबाइल हाइड्रोलिक रिग हैं और 17 एसी वीएफडी रिग हैं जिनकी क्षमता 1,500 हार्सपावर है। छह अन्य एसी वीडीएएफ रिग हैं जिनकी क्षमता 2,000 हार्सपावर है और दो अन्य 2,000 हार्सपावर के एचटी वीएफडी रिग हैं। 2,000 हार्सपावर के रिग 6,000 मीटर तक खुदाई कर सकते हैं।
कुमार ने आगे बताया कि एमईआईएल असम (शिब सागर, जोरहाट), आंध्र प्रदेश (राजमुंदरी), गुजरात (अहमदाबाद, अंकलेश्वर, मेहसाणा और कैम्बे), त्रिपुरा (अगरतला) और तमिलनाडु (कराइकल) में ओएनजीसी एसेट के लिए रिग का निर्माण और वितरण करेगा।
Download app: अपने शहर की तरो ताज़ा खबरें पढ़ने के लिए डाउनलोड करें संजीवनी टुडे ऐप
0 notes
airnews-arngbad · 6 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 04 September 2018 Time 6.50 AM to 7.00 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०४ सप्टेंबर २०१८ सकाळी ६.५० मि. **** • न्यायप्रविष्ट प्रकरणांची माध्यमांना माहिती देण्यावरून मुंबई उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त • दाभोलकर हत्या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी शरद कळसकर याचा सीबीआयकडे ताबा • जन्माष्टमी तसंच दहीहंडी उत्सव काल देशभरात उत्साहात साजरा आणि • ‘स्वच्छ भारत विद्यालय स्पर्धेत’ हिंगोली जिल्ह्यातली गोटेवाडी आश्रमशाळा राज्यातून पहिली **** न्यायप्रविष्ट प्रकरणांसंदर्भात माध्यमांना माहिती देण्यावरून मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. एखादं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना, त्यात पुरावा ठरू शकणाऱ्या कागदपत्रांचं जाहीर वाचन करणं चूक आहे, असं न्यायालयानं नमूद केलं आहे. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून देशभरातून पाच कार्यकर्त्यांना अटक प्रकरणी, अतिरिक्त पोलिस महासंचालक परमवीरसिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन, माहिती जाहीर केली होती. यासंदर्भात काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. भीमा कोरेगाव हिंसा प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांना न करू देता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवावा, अशी मागणी करणाऱ्या एका याचिकेला, न्यायालयानं काल स्थगिती दिली. दरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी शरद कळसकर याला चौकशीसाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआयकडे सोपवण्यात आलं आहे. दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करत असून मुंबई सत्र न्यायालयानं काल त्याला सीबीआयच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी वैभव राऊत आणि सुधन्वा गोंधळेकर या दोघांना १५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर जालन्याचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरच्या पोलीस कोठडीत ६ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. **** देशातलं जनमत बदलू लागलं असून, आता लोकसभा निवडणुका झाल्या, तर भारतीय जनता पक्षाला दोनशे जागाही मिळणार नाहीत, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. देशात भाजपा शिवाय पर्याय नाही, असा भ्रम निर्माण केला जात आहे. मात्र सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन आता जनता करेल, असंही ते म्हणाले. राज्यातल्या रस्त्यांच्या दुर्व्यवस्थेबद्दल त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. **** भगवान श्रीकृष्णाचा ज्न्मोत्सव, जन्माष्टमी काल देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीकृष्णाची ज्न्मभूमी असलेल्या मथुरा इथं या सणाचा मुख्य समारंभ मोठ्या श्रद्धेनं आणि उल्हासात साजरा झाला. मुंबई तसंच ठाण्यासह राज्यातही ठिकठिकाणी पारंपरिक पद्धतीनं दहीहंडी फोडून जन्माष्टमी साजरी झाली. ठाण्यात स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली, गोविंदा पथकांनी दहीकाल्याची हंडी फोडावी, अत्याचार-भ्रष्टाचाराची हंडी आपण फोडू, असं ते यावेळी म्हणाले. थरांवर थर लावून मानवी मनोरे रचणाऱ्या पथकांचं त्यांनी कौतुक केलं. नवी मुंबईतल्या अनेक प्रमुख मंडळांनी मात्र केरळ पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मोठ्या आणि मानाच्या मानल्या जाणाऱ्या बहुतांश दहीहंड्या रद्द करण्यात आल्या. मात्र अनेक गावांमध्ये पारंपरिक पध्दतीनं दहीहंडीचा उत्सव काल साजरा करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मुंबईत धारावी इथं एका गोविंदाचा मानवी मनोऱ्यावरून कोसळून मृत्यू झाला, तर ठिकठिकाणी घडलेल्या लहान मोठ्या घटनांमध्ये सुमारे शंभरावर गोविंदा जखमी झाल्याचं वृत्त आहे. औरंगाबाद जिल्ह्यातही विविध ठिकाणी जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातव्या महानुभाव आश्रमासह, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ - इस्कॉन मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. शहरात दहीहंडी पाहण्यासाठी आबालवृद्धांनी मोठी गर्दी केली होती. भाजप प्रणित सरकारच्या पापांची हंडी जनता २०१९ मध्ये फोडेल, असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. सातारा जिल्ह्यात कराड इथं दहीहंडीच्या कार्यक्रमात काल बोलत होते. काँग्रेसनं सुरू केलेल्या जन संघर्ष यात्रेचा एक भाग म्हणून, यावेळी सरकारच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. **** सार्वजनिक परिवहनासाठी भारत लवकरच ‘एक देश एक कार्ड’ धोरण जाहीर करेल, असं निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीत ‘फ्युचर मोबिलिटी समिट २०१८’ मधे बोलत होते. परिवहनाच्या विविध प्रकारांना जोडण्यासाठी हे पाऊल उचललं जात असल्याचं, त्यांनी सांगितलं. कोणत्याही अर्थव्यवस्थेचा विकासाचा कणा म्हणजे चांगलं परिवहन असून, सकल घरेलू उत्पादनाच्या चार टक्के इतका वाटा रस्ते परिवहनाचा असतो, असं कांत म्हणाले. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** केंद्र शासनाच्या वतीनं घेण्यात आलेल्या, ‘स्वच्छ भारत विद्यालय स्पर्धेत’ हिंगोली जिल्ह्यातल्या गोटेवाडी आश्रमशाळेनं राज्यात पहिला तर देशातून सातवा क्रमांक पटकावला आहे. प्रकल्प अधिकारी विशाल राठोड यांनी ही माहिती दिली. केंद्र शासनाच्या वतीनं देशभरात स्वच्छ भारत विद्यालय स्पर्धा घेण्यात आली होती. येत्या १८ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्पर्धेच्या पुरस्काराचं वितरण होणार आहे. **** राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीनं काल विविध मागण्यांसाठी परभणी आणि जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढण्यात आले. परभणीत काढण्यात आलेल्या सायकल मोर्चानं निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं. जालन्यातल्या मोर्चात आमदार राजेश टोपे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं. इंधन दरवाढ रद्द करावी, मागील वर्षी बोंडअळींनं नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, यासह अन्य मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे. **** पाणी अडवण्यासाठी राज्यकर्त्यांकडे योग्य दिशा नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचं, शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल अहमदनगर जिल्ह्यात राहुरी इथं महात्मा फुले कृषी विद्यापीठात आयोजित, शेतकरी परिषदेत बोलत होते. शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कुलगुरू डॉ के. पी. विश्वनाथ यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं. शरद जोशी यांच्याबरोबर काम केलेल्या तेरा कार्यकर्त्यांचा यावेळी सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. **** प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचं महत्त्व ग्रामीण भागातल्या जनतेलाही पटलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या मजगाव इथल्या जान्हवी शिवलकर या गृहिणीनं या योजनेचा लाभ घेतला असून या लाभाविषयी त्यांनी सांगितलं… माझं नाव जान्हवी जितेंद्र शिवलकर. मुक्काम मामूरवाडी, पोस्ट मजगाव, तालुका जिल्हा रत्नागिरी. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या योजनेचे लाभधारक आहे. या योजनेचे महत्त्व मला पटलेले आहे. म्हणून मी योजनेमध्ये सहभागी झाले. बॅक ऑफ महाराष्ट्रा मधून दर वर्षी माझे ३३० रूपये या योजने मध्ये जमा होतात. दरवर्षी कोणतेच कागद मला द्यायला लागत नाही. पुढे जिवनामध्ये माझे काही कमी जास्त झाले तर माझ्या पश्चात माझ्या कुटूंबाला २ लाख रूपये मिळतील म्हणून मी या योजनेचा लाभ घेतला आहे. **** लातूर इथं काल बहुभाषिक कवींनी दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींच्या कविता सादर करुन, त्यांना आदरांजली अर्पण केली. ज्येष्ठ कवी फ. म. शहाजिंदे या काव्यांजली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर विवेकानंद संस्कार संस्थेचे कार्याध्यक्ष विधीज्ञ संजय पांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी अजय पांडे, रेवण शहाबादे, संतोष कुलकर्णी, विनीता कुलकर्णी यांनी कविता सादर केल्या. **** माजी फुटबॉलपटू आर्थर परेरा यांचं काल मुंबईत निधन झालं. ते सत्तर वर्षांचे होते. १९७० च्या दशकात ते, राज्य तसंच राष्ट्रीय फुटबॉल संघाचे सदस्य होते. **** नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातल्या सवंदगाव शिवारात गिरणा नदीच्या पात्रालगत अवैधरीत्या वाळू उपसा करत असताना झालेल्या अपघातात काल एक जण ठार तर अन्य तीन जण जखमी झाले. अवैध वाळू व्यवसायानं एक बळी घेतल्यानं ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात काल मधुकर बनकर या खाजगी इसमाला जमिनीबाबतचे शासकीय काम करून देण्यासाठी, पंचावन्न हजार रुपये लाच घेताना, लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं. तो जिंतूर तालुक्यातल्या येलदरी कॅम्प इथला रहिवासी असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी खासदार संजय जाधव यांनी काल परभणी इथं धरणे आंदोलन केलं. खासदारांच्या मागण्यांचं निवेदन यावेळी प्रशासनाला देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. *****
0 notes