#पंढरी
Explore tagged Tumblr posts
Text
This song always have chills down my spine. the passion, devotion and beauty is INSANE so couldn't help but share it.
तुला साद आली तुझ्या लेकरांची, अलंकापुरी आज भारावली
वसा वारीचा घेतला पावलांनी, आम्हा वाळवंटी तुझी सावली
गळाभेट घेण्या भीमेची निघाली, तुझ्या नाम घोषात इन्द्रायणी
Your children are remembering you. Oh! Lord Alankapuri, your devotees are all so excited. We are walking our way To seek your shelter, To feel your sweet embrace, here we come.. Chanting your name, oh Almighty Vitthal.
भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची, उभी पंढरी आज नादावली
तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी, जिवाला तुझी आस गा लागलीi
With the saffron flags raised up in the sky.. Devotees at Pandharpur are overwhelmed today. With your name on our lips, with your thoughts in our minds. Yearning for a glimpse of you, dear God.
जरी बाप साऱ्या जगाचा परि तू, आम्हा लेकरांची विठू माऊली
You are the Lord of the universe -But for us.. ..your countless children you will always be our sweet mother God.
🌺 vitthal-vitthal rakhumai-rakhumai 🌺
#vitthalrukmini#desiblr#krishnablr#ashadi ekadashi#pandharpur#gopiblr#krishna#poetry#maharashtra#Spotify
33 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 17 July 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०
****
आषाढी एकादशी भक्तिभावाने साजरी-पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा
राजर्षी छत्रपती शाहू महाराज मराठा सांस्कृतिक भवनाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
मुस्लिम धर्मियांच्या मोहर्रम निमित्त ताजियांच्या मिरवणुकांमध्ये भाविकांचा लक्षणीय सहभाग
आणि
सातारा जिल्ह्यात कोयनानगर परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का
****
आषाढी एकादशीचा सोहळा आज सर्वत्र उत्साहात भक्तिभावाने साजरा झाला. पंढरपूरसह राज्यभरातल्या विविध विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. आजच्या देवशयनी आषाढी एकादशीपासून हिंदुधर्मीयांच्या पवित्र चतुर्मासाला सुरुवात होत आहे.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा सपत्निक करण्यात आली. मंदिराचं जतन संवर्धन करून मूळ रूपात मंदिर आणण्यासाठी शासनानं ७३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आंध्रप्रदेशातल्या तिरुपती देवस्थानाच्या धर्तीवर पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शन व्यवस्थेसाठी १०३ कोटी रुपये निधीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आज ��ेली.
आषाढी वारीनिमित्त आरोग्य विभागाच्या वतीनं पंढरपुरात आरोग्य शिबीरं भरवण्यात आली असून, सुमारे ८ लाखांहून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला असून, आणखी सात लाख नागरिक या आरोग्य सुविधांचा लाभ घेतील, अशी अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं.
पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं देण्यात येणाऱ्या 'श्री विठ्ठल निर्मल दिं��ी‘ पुरस्कारांचं वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. देहूच्या श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या संत तुकाराम महाराज वंशज देहूकर दिंडीला एक लाखाचा प्रथम पुरस्कार तर पुण्याच्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या दानेवाला निकम दिंडीला ७५ हजार रुपयांचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. इंदापूरच्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या श्री गुरु बाबासाहेब आजरेकर दिंडीला ५० हजार रुपयांचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पंढरपुरातल्या भक्ती मार्गावर बांधण्यात येणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज मराठा सांस्कृतिक भवनाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं, या सांस्कृतिक भवनासाठी शासनानं ५ कोटी रुपये मंजूर केले असून, आणखी १० कोटी रुपये निधी देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. वारकऱ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
राज्यातल्या युवकांना, उद्योगांसोबत प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण अर्थात इंटर्नशिप देऊन, रोजगारासाठी सक्षम करणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा मुख्यमंत्र्यांनी आज पुनरुच्चार केला. या योजनेत १८ ते ३५ या वयोगटातल्या बेरोजगार तरुणांना उद्योगांमध्ये इंटर्नशिप आणि विद्यावेतन देण्यात येणार आहे.
बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या योजनेचं स्वागत असल्याचं सांगत, वकिलांनाही असं विद्यावेतन देण्याची मागणी केली. राज्यात योग्य गुंतवणूक आणून युवकांना खात्रीशीर रोजगार मिळवून द्यावेत, असंही त्यांनी नमूद केलं.
****
आषाढीचा सोहळा आज राज्यभरात भक्तिभावाने साजरा झाला. शिर्डी इथं आज साईबाबा मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
संत नामदेव महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथं भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.
जालना शहरातल्या आनंदी स्वामी महाराज मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. आज सकाळी सुरू झालेली आनंदी स्वामी महाराजांच्या पालखीची मिरवणूक नगर प्रदिक्षणा घालून रात्री मंदिरात पोहचणार आहे. विविध साहसी खेळ हे या मिरवणुकीचं वैशिष्ट्य आहे.
छत्रपती संभाजीनगर नजिक असलेल्या पंढरपुरातही आज दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. शहराच्या सर्वच रस्त्यांवरून टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरकडे पायी निघालेल्या भाविकां��े जत्थे लक्ष वेधून घेत होते.
आषाढी एकादशीच्या दिंडीच्या औचित्यानं परभणी जिल्ह्यातल्या मानवत रोड इथल्या जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयातून आज वृक्षदिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धन, निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारे फलक हाती घेतले होते, या दिंडीत विठ्ठल रुक्मिणींचा सजीव देखावा करण्यात आला होता.
बुलढाणा जिल्ह्यात विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगाव इथं श्री संत गजाननमहाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली होती.
****
येत्या विधानसभा निवडणुकीत आपली सगळ्या २८८ जागा लढण्याची तयारी आहे, मात्र आघाडी असल्यामुळे ९० जागांवर दावा करणार असल्याचं, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडीचे तीनही प्रमुख घटकपक्ष एकत्रितपणे ही निवडणूक लढवणार असून, प्रत्येकी नव्वद जागा लढवून बाकीच्या जागा अन्य मित्रपक्षांसाठी सोडण्याचा विचार आहे, असंही राऊत यांनी सांगितलं.
****
लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघातून पराभूत झालेले उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्राची पडताळणी करण्यासंदर्भात केलेल्या अर्जावर केंद्रीय निवडणूक आयोगानं जिल्हा निवडणूक विभागाला मॉकपोल अर्थात अभिरूप मतदान करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानुसार विखे यांनी आक्षेप घेतलेल्या चाळीस मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांची मेमरी रिकामी करून अभिरूप मतदान घेण्यात येणार आहे.
****
भारतातल्या सर्वात लांब सागरी पुलाचं दर्शन घडवणारं “ट्रान्स-हार्बर ट्रायम्फ: द अटल सेतू स्टोरी इन पिक्चर्स” या छायाचित्र प्रदर्शनाचं आज मुंबईत उद्घाटन झालं. मुंबईत दिलीप पिरामल आर्ट गॅलरीमध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. अटल सेतूचा संकल्पनेपासून ते पूर्णत्वापर्यंतचा प्रवास दाखवणारी छायाचित्रं या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. दररोज दुपारी बारा ते रात्री आठपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुलं राहणार आहे.
****
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२४ साठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली असून, इच्छुक पात्र व्यक्ती येत्या २१ जुलैपर्यंत आपली नामांकनं शिक्षण मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर सादर करू शकतात. त्रिस्तरीय निवड प्रक्रियेतून ५० शिक्षकांची निवड होणार असल्याचं शिक्षण मंत्रालयाच्या निव���दनात म्हटलं आहे.
****
गडचिरोली जिल्हा हा भविष्यात राज्यातला सर्वात अग्रेसर जिल्हा असेल असा विश्वास, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी तालुक्यात वडलापेठ इथल्या प्रस्तावित भव्य पोलाद प्रकल्पाचं भूमिपूजन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी इथे साडेतीनशे एकर जागेवर हा दहा हजार कोटी रुपये मूल्याचा प्रकल्प उभारणार आहे.
****
वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाच्या संपत्तीची पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चौकशी करणार आहे. खेडकर कुटुंबियांनी बेहिशेबी संपत्ती गोळा केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आता ही चौकशी होणार आहे. खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांच्यासह सात जणांच्या विरोधात शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवून धमकावल्याप्रकरणीही गुन्हा दाखल असून, या प्रकरणी पोलिस या दोघांच्या शोधात आहेत.
****
मुस्लिम धर्मियांचा मोहर्रमचा सण आज भक्तिभावाने पाळण्यात आला. करबलाच्या मैदानात प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसैन यांनी दिलेल्या बलिदानाचं स्मरण म्हणून हा दिवस पाळला जातो. या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर इथं आज मुस्लिम बांधवांच्या वतीनं ताजिये तसंच सवाऱ्यांची मिरवणूक काढण्यात आली. शिया बांधवांच्या वतीनं मातमी जुलूसही काढण्यात आला. शेकडो नागरिक या मिरवणुकांमध्ये सहभागी झाले होते.
****
सातारा जिल्ह्यातल्या कोयनानगर आणि पोफळी परिसराला आज दुपारी साडेतीनच्या सुमाराला भूकंपाचा सौम्य धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता दोन पूर्णांक आठ इतकी नोंदली गेली, या भूकंपाचा केंद्रबिंदू पाटण तालुक्यातल्या हेळवाक गावाजवळ होता.
****
पीएम सूर्यघर योजनेच्या प्रचारासाठी महावितरणच्या वाळूज शहर उपविभागातर्फे छत्रपती संभाजीनगर नजिक असलेल्या पंढरपूरच्या आषाढी एकादशी वारीमध्ये विशेष शिबीर लावून जनजागृती करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली ही सर्वात मोठी वारी असल्यामुळे महावितरणच्या या कँपला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
हवामान विभागानं कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येत्या पाच दिवसांसाठी पावसाचा ऑरेंज ॲलर्ट जारी केला आहे. या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
0 notes
Video
tumblr
माझ्या पांडुरंगाची वारी, माझ्या गाभारी पंढरी .दिवे घाटतील सुंदरमय दृष्य .Follow us for more Reels ..#pune #punecity #dive #diveghat #wari #pandharpur #vithumauli #vitthal #vithuraya #dnyaneshwari #wari2024 #insta #instagram #followforfollowback #reels
0 notes
Text
एक होऊनी राव-रंक
आम्ही वैष्णव होऊनी जातो,
भक्तीचा भाव मनी जपत
तुझी पंढरी गाठतो !!
#रामकृष्ण_हरी
#vitthal #pandharinath #Dnyandev #tukaram #mauli #pandharpur #wari #vari
@highlight
@followers
0 notes
Text
शॉर्ट सर्किट से घर में लगी आग घर का सामान पूरा हुआ खाक
आत्माराम पटेल – ग्राम बन्झर भेड़ाघाट मार्ग स्थित स्कूल के पास एक मकान में आग लग गई। जिससे घर मे रखा सारा सामान (अनाज कपड़े गेंहू आदि सब कुछ जलकर खाक हो गया। आग का कारण शार्ट सर्किट माना जा रहा है। ग्राम के ही राकेश पिता पंढरी के मकान में दोपहर 3 बजे अचानक आग लग गई। आग की लपटें इतनी भयानक थी कि देखते ही देखते पूरा घर जलकर खाक हो गया। घर केवल मजदूरी पर चलता था। पिता भी मजदूरी करते थे माता भी और…
View On WordPress
0 notes
Photo
देवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩 #महाराष्ट्राची_लोकयात्रा #ग्यानबातुकाराम #पंढरी #वैकुंंठ #vaikuntha #gyanbatukaram #saintkanhopatra #वारी #वारकरी #पांडुरंग #विठ्ठल #vaari #varkari #vitthal #pandurang #calligraphymarathi #calligraphylove #devnagricalligraphy #devanagari #devnagari_calligraphy #marathi #marathicalligraphy #calligraphersinindia #indianpenmanship #indiancalligraphy #calligraphymasters #calligraphydesigners #amarmoralecalligraphy #aksharkshudha #अक्षरक्षुधा https://www.instagram.com/p/Cf0zXmsPMD1/?igshid=NGJjMDIxMWI=
#महाराष्ट्राची_लोकयात्रा#ग्यानबातुकाराम#पंढरी#वैकुंंठ#vaikuntha#gyanbatukaram#saintkanhopatra#वारी#वारकरी#पांडुरंग#विठ्ठल#vaari#varkari#vitthal#pandurang#calligraphymarathi#calligraphylove#devnagricalligraphy#devanagari#devnagari_calligraphy#marathi#marathicalligraphy#calligraphersinindia#indianpenmanship#indiancalligraphy#calligraphymasters#calligraphydesigners#amarmoralecalligraphy#aksharkshudha#अक्षरक्षुधा
0 notes
Text
आषाढीच्या आदल्या दिवशी पंढरी भूकंपाने हादरली
आषाढीच्या आदल्या दिवशी पंढरी भूकंपाने हादरली
आषाढीच्या आदल्या दिवश�� पंढरी भूकंपाने हादरली आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून निघालेल्या पालख्या आणि दिंड्या पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पंढरी नगरी भक्तीरसात बुडाली आहे. आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून निघालेल्या पालख्या आणि दिंड्या पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पंढरी नगरी भक्तीरसात बुडाली आहे. अशातच आज पहाटे निसर्गाने धक्का दिला आहे. पंढरपूरसह…
View On WordPress
#आजची बातमी#आताची बातमी#आदल्या#आषाढीच्या#ठळक बातमी#ताजी बातमी#दिवशी#पंढरी#बातम्या#भारत बातम्या#भारत बातम्या मराठी#भारत लाईव्ह मीडिया#भूकंपाने#मराठी न्यूज#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र न्यूज#महाराष्ट्र बातम्या#महाराष्ट्र समाचार#राजकारण#हादरली
0 notes
Photo
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने प्रक्षाळपुजा निमीत्त श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात.श्री.संत.नामदेव पायरी तसेच सोळखांबी येथे आकर्षक व नयनरम्य अशी फुलाची आरास करण्यात आली आहे. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन* गुरुवार दि-२९ जुलै २०२१ *🌸नित्य पुजा🌸* *🌹काकडा आरती🌹* *🙏🏻राम कृष्ण हरी.🙏🏻* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 ॥विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ॐ विठ्ठला॥ Images by - श्री विठ्ठल - रुक्मिनी मंदीर समिती पंढरपूर.... (Through WhatsApp) ॥ श्री विठ्ठल - रुक्मिनी नमो नम:॥ ॥ कानडा राजा पंढरीचा ॥ ॥ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ॥ ॥ विठुरायाची पंढरी ॥ ॥ विठ्ठल विठ्ठल जय हरी ॥ ॥ जय जय राम कृष्ण हरी ॥ ॥ निवृत्ती ज्ञानदेव सोपान म���क्ताबाई जय जय विठोबा रखुमाई ॥ #JaiJaiPandurangHari #RamKrushnaHari #PandurangHari #VitthalVitthalVitthalaHariOmVitthala #JAIJAIRAMKRUSHNAHARI #VitthalVitthalJaiHariOmVitthala ॐ केशवाय नम: । ॐ नारायणाय नम: । ॐ माधवाय नम: । ॐ गोविंदाय नम: । ॐ विष्णवे नम: । ॐ मधुसूदनाय नम: । ॐ त्रिविस्र्माय नम: । ॐ वामनाय नम: । ॐ ��्रीधराय नम: । ॐ हृषीकेशाय नम: । ॐ पद्मनाभाय नम: । ॐ दामोदराय नम: । ॐ संकर्षणाय नम:। ॐ वासुदेवाय नम: । ॐ प्रद्युम्नाय नम: । ॐ अनिरुध्दाय नम: । ॐ पुरुषोत्तमाय नम: । ॐ अधोक्षजाय नम: । ॐ नारसिंहाय नम: । ॐ अच्युताय नम: । ॐ जनार्दनाय नम: । ॐ उपेन्द्राय नम: । ॐ हरये नम: । ॐ श्रीकृष्णाय नम: । #Ashadhiekadashi #pandharichiwari #pandharpur #vithal https://www.instagram.com/p/CR55FsxLFCg/?utm_medium=tumblr
#jaijaipanduranghari#ramkrushnahari#panduranghari#vitthalvitthalvitthalahariomvitthala#jaijairamkrushnahari#vitthalvitthaljaihariomvitthala#ashadhiekadashi#pandharichiwari#pandharpur#vithal
2 notes
·
View notes
Photo
आम्ही कष्टाळू शेतकरी........ काळी माती आमची पंढरी🙏 . . . . . . . . . . #maharastramaza #bananafarm #banana #farmers #farming #farmerslife #nature #village #evening #photography #pixelography #mobilephotography #poshinda #mypixeldiary #pixel #mobileshoot_photography (at Savkhede BK) https://www.instagram.com/p/CGr7YDjhUNq/?igshid=1u37zzjpa3kry
#maharastramaza#bananafarm#banana#farmers#farming#farmerslife#nature#village#evening#photography#pixelography#mobilephotography#poshinda#mypixeldiary#pixel#mobileshoot_photography
2 notes
·
View notes
Text
It was an emotional trip for me as I was going back to my roots after 4 long years.
As the tears rolled down my eyes, the only thing that echoed in my head was this beautiful Abhang (Marathi devotional song) by Pt. Bhimsen Joshi Ji - “माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी
बाप आणि आई, माझी विठठल रखुमाई!”
Which translates to - “My mother’s home is Pandharpur, located on the banks of Bhima river.
There’s only one mother and father for the world, Vitthal and Rukmini”
1 note
·
View note
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 23 June 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २३ जून २०२४ दुपारी १.०० वा.
****
विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या श्रीक्षेत्र शेगाव येथून निघालेली मानाची श्री संत गजानन महाराजांची पालखी आज मराठवाड्यात दाखल झाली. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाढोणा फाटा इंथ ही दिंडी मराठवाड्याच्या भूमीत पोहचली. दिंडी दाखल होताच परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. या पालखीचा पहिला मुक्काम सेनगाव इंथ तर उद्या दुसरा मुक्काम हिंगोली जिल्ह्यातीलच डिग्रस कऱ्हाळे इंथ होणार आहे. त्यानंतर औंढा मार्गे ही पालखी पंढरपुरकडे रवाना होईल.
****
वैद्यकीय पदवी प्रेवशासाठीच्या नीट-युजी अंतर्गत एक हजार पाचशे त्रेसष्ट विद्यार्थ्याची पुर्नपरीक्षा आज देशभरातील विविध सात केंद्रांवर दुपारी दोन ते सव्वापाच दरम्यान होत आहे. ५ मे रोजी झालेल्या परीक्षेत उशीर झाल्यामुळे या विद्यार्थांना ग्रेस म्हणजेच वाढीव गुण प्रदान केले होते. ते सर्वोच्च न्यायालयात रद्द करण्यात आले. त्यानंतर ही पुर्नपरीक्षा घेतली जात आहे.
त्याचवेळी वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीची आज नियोजीत नीट-पीजी परीक्षा रद्द केली आहे. आता या परीक्षेचं सुधारित वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केलं जाईल, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
दरम्यान, नीट परीक्षेच्या गोंधळावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यावर पहिल्या शंभर दिवसांत अनेक क्रांतिकारी निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते, त्याप्रमाणेच अनेक क्रांतीकारी गोष्टी घडल��या आहेत. पहिल्या दहा दिवसांतच यूजीसी नेट परीक्षा रद्द झाली, आता नीटची पदव्युत्तर परीक्षा देखील पुढे ढकलली. देशाच्या भविष्यासोबत केंद्र सरकार अक्षरशः खेळत आहे असा आरोप पाटील यांनी केला.
****
आज जागतिक ऑलिम्पिक दिन. यान���मित्त देशभरात क्रिडाविषयक विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करणाऱ्या ऑलिम्पियन आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान, ऑलिम्पिक दौड, हॉकी स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांनी हा दिवस साजरा होत आहे.
केंद्रीय क्रिडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीया यांनी यानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. खेळातून एकता आणि शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस सर्वांनी साजरा करावा असं आपल्या संदेशात म्हटलं असून, यावर्षी होत असलेल्या पॅरीस ऑलिम्पिकसाठी तयारी करणाऱ्या खेळाडूंनाही शुभेच्छा दिल्या आहे.
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. खेळांच्या माध्यमातून समाजात एकता, समता, बंधुता, खिलाडूपणाची भावना रुजवणं. याद्वारे सुसंस्कृत, समर्थ, सशक्त, निरोगी समाज घडवण्याचा प्रयत्न राज्य शासनासह क्रीडा संघटना - कार्यकर्ते करत आहेत. या दिनाच्या निमित्तानं या सर्वांसह खेळाडू आणि क्रीडाप्रेमी नागरिकांचे आभार मानतो असं पवार यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
ऑलिम्पिक पदक विजेते घडविण्यासाठी, खेळाडूंचा दर्जा उंचावण्यासाठी काम केलं जात असून आगामी ऑलिंपिक स्पर्धेत महाराष्ट्र देशाला सर्वाधिक पदकं जिंकून देईल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला आहे.
****
भारताचा टेनिसटू सुमित नागल यानं या वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये आयोजित ऑलिंपिकमध्ये टेनिसच्या पुरुष एकेरीत आपलं स्थान पक्क केलं आहे.तर,भारतच्या के. रोहन बोपन्ना आणि एम. श्रीराम बालाजी यां जोडीची टेनिसच्या पुरुष दुहेरीसाठी याआधीच पात्र ठरले आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इंथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रशासकीय इमारतीसमोर मागील चार दिवसांपासून विद्यार्थी विविध मागण्यासाठी साखळी उपोषणाला बसले आहेत. एसएफआय विद्यार्थी संघटनेनं या आंदोलनाचं नेतृत्व केलं असून, विविध विद्यार्थी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मीक सरवदे यांच्यासोबत उपोषणकर्त्यांची चर्चा झाली. मात्र, त्यात तोडगा निघाला नसल्यामुळं आज चौथ्या दिवशीही उपोषण सुरूच असल्याचं आमच्या वार्ताहारनं कळवल आहे.
****
टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत, आज झालेल्या सामन्यात अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियावर २१ धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियासमोर अफगाणिस्ताननं सहा बाद १४८ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला विसाव्या षटकाचे चार चेंडू शिल्लक असतांना सर्वबाद १२७ धावा करता आल्या.
दरम्यान, ��ता सुपर एट फेरीच्या गट एकमध्ये गुणांकनानुसार पहिल्या स्थावर असलेल्या भारताचा उद्या ऑस्ट्रेलियासोबत सामना आहे. सुपर एटमधील दोन्ही सामन जिंकणाऱ्या या भारताची स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेशाकडे दमादार वाटचाल सुरु आहे. सद्यस्थितीत सुपर एटमधील अद्याप काही सामने शिल्लक असतानाच सर्वच संघांची परस्परांच्या यशापयशावर मिळणाऱ्या गुणांकनानुसार उपांत्य फेरीत प्रवेशासाठीची चुरस कायम आहे.
****
0 notes
Text
मुंबई शहर ग्रंथोत्सवाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई शहर ग्रंथोत्सवाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई, दि. 16 : वाचाल तर वाचाल, ग्रंथ हेच गुरू, ग्रंथ देवो भव, ग्रंथ आमुचे साथी- ग्रंथ आमुचे हाती, ग्रंथ उजळती-अज्ञानाच्या अंधाऱ्याच्या राती, वाचन संस्कृती घरोघरी- तिथे फुलती ज्ञान पंढरी, पुस्तकांशी करता मैत्री- ज्ञानाची मिळते खात्री, असा संदेश देणारी ग्रंथ दिंडी काढत आजपासून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, मुंबई शहर व मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर (पूर्व), मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने…
View On WordPress
0 notes
Text
#यशाची_पंढरी पहायची तर
ब्रॅण्ड उभारणीसाठी
#डिजिटल_मार्केटिंगची_वारी
करावीच लागते, आणि
#पंढरी येईपर्यंत सातत्याने
पाऊलं टाकावीच लागतात!!
#DIGITAL_MARKETING
आपल्या व्यवसायाची मार्केटिंग आम्ही करू !!
अधिक माहितीसाठी
9049494938
#JagdambⓇ #Vyavsaywala™️
(CONTENT COPYRIGHT)
#Jagdamb #vyavsaywala
#SocialMediaMarketing #DigitalMarketing #socialmedia #marketing #digital #socialmedia #pune
0 notes
Text
मुंबई शहर ग्रंथोत्सवाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई शहर ग्रंथोत्सवाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई, दि. 16 : वाचाल तर वाचाल, ग्रंथ हेच गुरू, ग्रंथ देवो भव, ग्रंथ आमुचे साथी- ग्रंथ आमुचे हाती, ग्रंथ उजळती-अज्ञानाच्या अंधाऱ्याच्या राती, वाचन संस्कृती घरोघरी- तिथे फुलती ज्ञान पंढरी, पुस्तकांशी करता मैत्री- ज्ञानाची मिळते खात्री, असा संदेश देणारी ग्रंथ दिंडी काढत आजपासून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, मुंबई शहर व मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर (पूर्व), मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने…
View On WordPress
0 notes