Tumgik
#गिलच्या
Text
शुभमन गिलच्या निशाण्यावर सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विश्वविक्रम!
https://bharatlive.news/?p=147115 शुभमन गिलच्या निशाण्यावर सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विश्वविक्रम!
पुढारी ...
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 19 January 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १९ जानेवारी  २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत ३८ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन
दाओसमध्ये विविध उद्योगांशी संबंधित एक लाख ३७ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार, प्रकल्प लवकरात लवकर सुरु होतील- मुख्यमंत्र्यांना विश्वास
पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी २७ फेब्रुवारीला मतदान; नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा राज्यांमध्ये सार्वत्रिक निवडणुका घोषित 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना  परळी न्यायालयाकडून ५०० रुपये दंड, अटक वॉरंट रद्द
महिलेची छेडछाड केल्याप्रकरणी औरंगाबादचे सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे निलंबित
रायगड जिल्ह्यात माणगावच्या रेपोली गावाजवळ आज पहाटे झालेल्या अपघातात ९ जणांचा मृत्यू  
आणि
शुभमन गिलच्या रोमांचक द्वी-शतकी खेळीच्या बळावर भारताचा पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडवर १२ धावांनी विजय, १९ वर्षांखालील मुलींच्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारताची स्कॉटलंडवर ८३ धावांनी मात
सविस्तर बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते मुंबईत ३८ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. यामध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेतल्या २० नवीन दवाखान्यांचं लोकार्पण, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सात मल जल प्रक्रिया केंद्रांचं भूमिपूजन, महानगरपालिकेच्या तीन रुग्णालयांच्या इमारतींचं भूमिपूजन आणि महानगरपालिकेच्या अखत्यारितील ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं भूमिपूजन, पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत एक लाखांहून अधिक फेरीवाल्यांना कर्ज वितरणाचा शुभारंभ, तसंच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजन, त्यांच्या हस्ते होणार आहे. संध्याकाळी साडेसहाच्या सुमाराला पंतप्रधान मुंबई मेट्रोच्या दोन मार्गिकांचं उद्घाटन करतील आणि मेट्रोतून प्रवास करतील, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
दाओस दौऱ्यात विविध उद्योगांशी एक लाख ३७ हजार कोटी गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. या गुंतवणूकदारांचे प्रकल्प लवकरात लवकर सुरु होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. दाओस दौऱ्यावरून परतल्यावर ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. हा दौरा मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले..
दावोसची जी व्हिजीट होती, त्याबद्दल मी अतिशय आनंदी आहे, समाधानी आहे. खऱ्या अर्थाने जे फलित आहे, दावोसच्या दौऱ्याचं, त्याच्यामधून राज्यासाठी जवळपास एक लाख सदोतीस हजार कोटीचे एम ओ यू झालेले आहेत. आणि हा दौरा जो आहे तो अतिशय फ्रुटफुल ठरलेला आहे. या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांची आणि आपल्या भारत देशाची दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमि फोरमवर छाप पहायला मिळाली
****
नदीमार्गे जलप्रवास करणारं जगातलं सर्वाधिक लांबीचं गंगा विलास हे जहाज काल बिहारमधल्या मुंगेर इथं पोहचलं. मूळ नियोजित प्रवास आराखड्यानुसार हे जहाज बेगूसराय मधल्या सिमरिया इथं जाणार होतं, मात्र सुधारित आराखड्यांत मार्ग बदलण्यात आला आहे. या जहाजातल्या प्रवाशांनी काल बिहार योग विद्यालयासह मुंगेर परिसरातल्या अन्य ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या.
****
इच्छामरणाबाबतचा निर्णय 'व्यावहारिक' असण्याची आवश्यकता सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केली आहे. यासंदर्भात २०१८ च्या न्यायालयीन निकालात रुग्णांच्या राहणीमानात मार्गदर्शक तत्त्वे मांडण्यासाठी 'किंचित सुधारणा' करण्याची गरज असल्याचं, सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या पीठानं म्हटलं होतं. मृत्यूपत्र बनवून ठेवलेल्यांना, सन्मानानं मृत्यू मिळणं हा त्यांचा अधिकार आहे, तसंच ज्या गंभीर आजारी रुग्णांना उपचार नको आहेत, त्यांच्यासाठी कायदा करण्याची जबाबदारी विधिमंडळांवर आहे, अशी टिप्पणी न्यायालयानं केली आहे.
****
राज्यात पुण्यातल्या कसबा आणि पिंपरी चिंचवड या विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. याठिकाणी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, दोन मार्च ला मतमोजणी होणार आहे. आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने या जागा रिक्त झाल्या आहेत.
दरम्यान, निवडणूक आयो��ानं नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा या तीन राज्यांमध्ये सार्वत्रिक निवडणुका घोषित केल्या आहेत. याबरोबरच विविध राज्यांच्या विधानसभेच्या सहा आणि लक्षद्वीप लोकसभा मतदार संघासाठी पोटनिवडणुकीची घोषणाही निवडणूक आयोगानं केली आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे पुत्र फराज यांच्या विरोधात बनावट व्हिसा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुर्ला पोलीस ठाण्यात मुंबई विशेष गुन्हे शाखेकडून आलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ५०० रुपये दंड ठोठावत परळी न्यायालयाने त्यांच्या विरुद्धचं अटक वॉरंट रद्द केलं आहे. चिथावणीखोर वक्तव्यप्रकरणी परळी न्यायालयानं ठाकरे यांना अजामीनपात्र वॉरंट बजावलं होतं. यासाठी ते काल परळी न्यायालयासमोर हजर झाले होते. या प्रकरणावर आता २३ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. ठाकरे यांनी परळी दौऱ्यात गोपीनाथ गडावर जाऊन माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेऊन आदरांजली अर्पण केली.
****
महिलेची छेडछाड केल्याप्रकरणी औरंगाबादचे सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे याला निलंबित करण्याचे आदेश गृह विभागानं दिले आहेत. गृह विभागाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी याबाबतचं पत्र काल जारी केलं. महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार हे निलंबन करण्यात आलं असून, जोपर्यंत निलंबनाचे आदेश अस्तित्वात असतील तो पर्यंत विशाल ढुमे याला औरंगाबाद पोलीस मुख्यालय पूर्वपरवानगीशिवाय सोडता येणार नसल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
****
मुंबई - गोवा महामार्गावर प्रवासी मोटार आणि मालट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यात माणगावच्या रेपोली गावाजवळ आज पहाटे हा अपघात झाला.
****
राज्यात सरल प्रणालीद्वारे शालेय विद्यार्थ्यांची नोंदणी सक्तीची असून, सप्टेंबर २०२२ मध्ये राज्य शासनाच्या अहवालानुसार २६ लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड वैध असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र यासंदर्भात काल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात झालेल्या सुनावणीत ही संख्या शून्यावर आल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे चार महिन्यात २६ लाख विद्यार्थ्यांचे अवैध आधार वैध कसे झाले, अशी विचारणा न्यायालयानं केली आहे. या आदेशात अतिरिक्त शपथपत्र दाखल करण्याचे आदेशही खंडपीठाने दिले आहेत. या संदर्भात पुढची सुनावणी २२ सप्टेंबरला होणार आहे.
****
औरंगाबाद शहरात अवैध होर्डिंग्ज लावल्याबद्दल आकारला जाणारा दंड वाढवण्यासंदर्भात महानगरपालिकेनं नगरविकास विभागाकडे पाठपुरावा करावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. यासंदर्भात दाखल जनहित याचिकेवर काल झालेल्या सुनावणीत खंडपीठाने, बेकायदा होर्डिंग्जचा शोध घेण्यासाठी वॉर्डनिहाय किती भरारी पथकं स्थापन केले, याची माहिती देण्याचे आदेश दिले. यासंदर्भात पुढची सुनावणी २३ फेब्रुवारीला होणार असून, त्यावेळी महापालिकेने शहरात होर्डिंगसाठी कुठे आणि किती जागा निश्चित केल्या, याची माहिती सादर करण्याचे देखील आदेश दिले आहेत.
****
संगीतकार, गायक, अभिनेते पद्मभुषण मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री इथं आजपासून दोन दिवसीय संगीत महोत्सवाला सुरुवात होणार आहे. याच महोत्सवात फुलंब्रीकरांच्या १२६ व्या जयंती दिनी म्हणजेच उद्या २० जानेवारीला संत सावता माळी शैक्षणीक संकुलात फुलंब्रीकरांच्या नावानं उभारण्यात आलेल्या सभागृहाचं लोकार्पणही भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते होणार आहे. फुलंब्री इथल्या संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालयाच्या प्रांगणात संध्याकाळी साडे सहा वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती आयोजकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
****
स्वातंत्र्यप्राप्तीच्या नंतर देश एकसंघ ठेवून त्याला प्रगतीच्या दिशेनं नेण्याचं महान कार्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, असं मत, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, नाटककार तथा प्रसिद्ध विचारवंत, प्रा.दत्ता भगत यांनी व्यक्त केलं आहे. हिंगोली इथं बौद्ध संस्कृती मंडळाच्या वतीनं आयोजित, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेत, "डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रातील राहून गेलेल्या गोष्टी", या विषयावर प्रथम पुष्प गुंफतांना भगत काल बोलत होते. सर्वसामान्य जनतेतून लोकप्रतिनिधी निवडले जावेत आणि सर्वसामान्य जनतेला एकाच मताचा अधिकार असावा ही मांडणी डॉ आंबेडकर यांनी केल्याचंही भगत यांनी सांगितलं.
****
मेळघाटातल्या आदिवासी समाजाचं प्रेम ही कार्याची प्रेरणा ठरली, असं  पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे यांनी सांगितलं. औरंगाबाद इथल्या विवेकानंद कला, सरदार दलिपसिंग वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात विवेकानंद व्याख्यानमालेत, मेळघाटातील प्रबोधन पर्व या विषयावर ते काल बोलत होते. आपल्यावर झालेले समाजसेवेचे संस्कार पालक, शिक्षक आणि चांगल्या पुस्तक वाचनातून झाल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी डॉ. कोल्हे यांच्या संस्थेच्या कार्यासाठी विवेकानंद शिक्षण संस्था आणि कर्मचार्यांच्या वतीने दोन लाख रुपयांचा धनादेश सुपुर्द करण्यात आला.  
****
शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण केल्यास, नवी पिढी सक्षम भविष्य घडवेल, असा विश्वास नांदेड जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केला आहे. मराठी भाषा पंधरवाडा साजरा करण्यासाठी शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी यांना ग्रंथालयाचे सभासद होण्याचा उपक्रम, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने हाती घेण्यात आला आहे, काल कुसुम माध्यमिक विद्यालयात या उपक्रमाचा आरंभ घुगे यांच्या हस्ते झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. राष्ट्रपुरुषांची चरित्रे, प्रवास वर्णन, तसंच विज्ञान, कला, संस्कृती या विषयावरील गोष्टीरूप पुस्तकं विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावीत, असं त्यांनी  यावेळी सांगितलं.
****
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात केंद्र शासनाच्या महत्त्वकांक्षी बेटी बचाव-बेटी पढाओ या योजनेअंतर्गत कालपासून ते येत्या २४ जानेवारी या राष्ट्रीय बालिका दिनापर्यंत, जनजागृती सप्ताह राबवला जात आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी ही माहिती दिली. लिंग निवडीस प्रतिबंध करणं, मुलीच्या शिक्षणाबाबत आणि त्यांच्या जीवनमानाच्या सुरक्षितेबद्दल खात्री देणं हा या जनजागृतीचा उद्देश असल्याचं त्यांनी काल यासंदर्भातल्या बैठकीत सांगितलं.
****
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सर्व उत्तरपत्रिकांचं मूल्यांकन ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यासाठी परीक्षा भवनात डिजिटल व्युक्यूबेशन सेंटरचं उद्घाटन कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते काल झालं. या केंद्रात १५ संगणकावर तीन हजार उत्तरपत्रिकांचं मूल्यांकन होईल. या प्रक्रियेमुळे निकालात अधिक पारदर्शकता, गतीमानता आणि सुसूत्रता येईल, अशी प्रतिक्रिया कुलगुरु येवले यांनी यावेळी दिली.
****
आगामी जी-20 परिषदेनिमित्त और���गाबाद शहरात सुरू असलेल्या विविध सुशोभीकरण आणि सौंदर्यकरणाच्या कामांची महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी काल पाहणी केली.
दरम्यान, चौधरी यांनी काल एका बैठकीत नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामांच्या आढावा घेतला. नवीन जलवाहिनी टाकताना बाधित होणारी मालमत्ता, विजेचे खांब आणि जमिनीच्या खालून गेलेले केबल स्थलांतर करण्याबाबत त्यांनी आढावा घेतला.
****
शुभमन गिलच्या रोमांचक द्वी-शतकी खेळीच्या बळावर भारतानं पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडवर १२ धावांनी विजय मिळवला. काल हैदराबाद इथं झालेल्या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत ३४९ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीला आलेल्या शुभमन गिलने १४९ चेंडूत १९ चौकार आणि ९ षटकारांच्या सहाय्याने द्वीशतक झळकावलं. प्रत्यूत्तरादाखल आलेला न्यूझीलंडचा संघ शेवटच्या संघात ३३७ धावांवर सर्वबाद झाला. मोहम्मद सिराजनं चार, शार्दुल ठाकूर आणि कुलदिप यादवनं प्रत्येकी दोन, तर हार्दिक पंड्यानं एक गडी बाद केला. 
शुभमन गिल द्वीशतक करणारा पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सहवाग, रोहित शर्मा, आणि ईशान किशन या भारतीयांनी एकदिवसीय सामन्यात द्वीशतकी खेळी केली आहे.
या मालिकेतला दुसरा सामना येत्या शनिवारी रायपूर इथं खेळला जाणार आहे.
****
१९ वर्षांखालील मुलींच्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं काल स्कॉटलंडचा ८३ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजीचा करत भारतीय संघाने निर्धारित २० षटकांत भारतानं चार बाद १४९ धावा करत, स्कॉटलंड संघाला दीडशे धावांचं आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना, स्कॉटलंडचा संघ तेरा षटकं आणि एका चेंडूत ६६ धावांवर सर्वबाद झाला. चार षटकांत बारा धावा देऊन चार बळी घेणारी मन्नत कश्यपनं सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला.
****
औरंगाबाद इथलं शासकीय नेत्र रुग्णालय चिकलठाणा इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात स्थलांतरित करण्याला स्थगिती देण्यात आली आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी ही माहिती दिली. हे नेत्र रुग्णालय आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीत स्थलांतरित होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आमखास इथल्या नेत्र रुग्णालयाच्या जागेवर कर्करोग रुग्णांच्या उपचारासाठी शासनस्तरावरुन यापूर्वीच नविन प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानं नेत्र रुग्णालय स्थलांतरण करणं गरजेचं असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे.
****
चला जाणूया नदीला या उपक्रमांतर्गत हिंगोली जिल्ह्यातल्या आसना आणि कयाधू या दोन नद्यांची निवड करण्यात आली आहे. जनतेला या उपक्रमात सामावून घेण्यासाठी संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेतून नदी पुनरुज्जीवनाच्या चळवळीतील लोकसहभाग वाढेल असं जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात रब्बी हंगाम २०२२-२३ ची ई-पीक पाहणी १०० टक्के पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांसाठी आजपासून तीन दिवस विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून या विशेष मोहिमेत जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन, १०० टक्के ई-पीक नोंदणी करावी, असं आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी काल पत्रकार परिषदेत केलं.
****
0 notes
loksutra · 2 years
Text
शहनाज गिल आपल्या ताज्या ट्विटमुळे प्रचंड ट्रोल झाली
शहनाज गिल आपल्या ताज्या ट्विटमुळे प्रचंड ट्रोल झाली
‘बिग बॉस’ फेम आणि अभिनेत्री शहनाज गिल दररोज ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती अनेकदा तिच्या बबली स्टाईलने लोकांचे लक्ष वेधून घेते. शहनाज गिल पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली असून यावेळी तिचे एक ट्विट कारण ठरले आहे. यावेळी लोकांनी त्याला ट्रोल केले आहे. खरं तर शहनाज गिल जागतिक दाढी दिन पण ट्विट करून एकाने अडचण घेतली आहे. यानंतर ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर गेली. हेही वाचा – Exclusive:…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
येथे पाहण्यासारखे काहीही नाही, फक्त शहनाज गिल धबधब्याखाली चिलिंग करत आहे
येथे पाहण्यासारखे काहीही नाही, फक्त शहनाज गिल धबधब्याखाली चिलिंग करत आहे
शहनाज गिलच्या व्हिडिओमधला एक स्टिल. (शिष्टाचार: shehnaazgill) नवी दिल्ली: लोकांनो, ऐका. शहनाज गिल आणखी एका मजेदार सोशल मीडिया पोस्टसह परत आले आहे. यावेळी तिने निसर्गाच्या कुशीत काही वेळ घालवतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या क्लिपमध्ये शहनाज गिल धबधब्याच्या खाली ध्यानधारणा करताना बसली आहे. ती एका टेकडीवर उभी राहून वाऱ्याचा आनंद घेत आहे, नाचत आहे आणि आनंदाने उड्या मारत आहे,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
बॉलिवूड कथा | Happy Birthday Shehnaaz: जाणून घ्या पंजाब फिल्म इंडस्ट्रीत शहनाज गिलवर बहिष्कार का टाकला होता?
बॉलिवूड कथा | Happy Birthday Shehnaaz: जाणून घ्या पंजाब फिल्म इंडस्ट्रीत शहनाज गिलवर बहिष्कार का टाकला होता?
अद्यतनित : 27 जानेवारी 2022 05:26 PM (IST) आज अमित भाटिया शहनाज गिलबद्दल बोलणार आहेत. आज त्याचा वाढदिवस असून शहनाज गिलच्या चाहत्यांनी एकत्र काय केले हे अमित सांगणार आहे. अमित म्हणतो की, शहनाज बनणे सोपे नाही. काय आहे शहनाजची कहाणी? शेवटी, पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतील लोकांनी त्याला का टोमणे मारले, ती एक किरकोळ अभिनेत्री शहनाझ गिल कशी झाली? अमित भाटिया यांच्या आजच्या एपिसोडमध्ये त्यांच्या…
View On WordPress
0 notes
digimakacademy · 5 years
Text
Gill’s unbeaten century has given India the ‘A’ team strong ground abn 97 | गिलच्या नाबाद शतकामुळे भारत ‘अ’ संघाची दमदार मजल
Gill’s unbeaten century has given India the ‘A’ team strong ground abn 97 | गिलच्या नाबाद शतकामुळे भारत ‘अ’ संघाची दमदार मजल
[ad_1]
भारत-न्यूझीलंड ‘अ’ कसोटी मालिका
शुभमन गिलच्या नाबाद शतकाच्या (१०७) जोरावर भारत ‘अ’ संघाने न्यूझीलंड ‘अ’ संघाच्या पहिल्या डावातील ९ बाद ३८६ धावांना उत्तर देताना १ बाद २३४ अशी दमदार मजल मारली. चार दिवसीय कसोटीत तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा गिलसह चेतेश्वर पुजारा ५२ धावांवर खेळत होता.
कर्णधार हनुमा विहारीच्या साथीने सलामीला आलेल्या गिलने भारताला दमदार सुरुवात करून दिली. विहारीने ५९ धावा…
View On WordPress
0 notes
Text
ICC U-19 वर्ल्ड कप: भारताची झिंबाब्वेवर मात
ICC U-19 वर्ल्ड कप: भारताची झिंबाब्वेवर मात, माउंट माँगानुईः आयसीसी अंडर 19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियानं आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. झिम्बाब्वेनं दिलेलं 155 धावांचं आव्हान भारताच्या सलामीवीरांनीच पार करून टाकलं आणि राहुल द्रविडच्या शिष्यांनी सलग तिसऱ्या मोठ्या विजयाची नोंद केली. त्यामुळे यंग टीम इंडियाची वर्ल्ड कपवरील दावेदारी आणखी भक्कम झाली आहे. शुभम गिलच्या तडाखेबंद 90 धावा आणि हार्विक देसाईचं संयमी अर्धशतक या जोरावर टीम इंडियानं 22 व्या षटकातच विजय साकारला. 14 चौकार आणि एक षटकार ठोकून शुभमनं 59 चेंडूतच 90 धावा तडकावल्या, तर दुसरी बाजू लावून धरणाऱ्या हार्विकनं 8 चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 73 चेंडूत 56 धावांची खेळी केली.
अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत पूर्ण तयारीनिशी उतरलेल्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया आणि पपुआ न्यू गिनी यांच्याविरुद्धचे सामने जिंकून उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला होता. त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धचा सामना भारतासाठी खरं तर औपचारिकताच होती. पण, पृथ्वी शॉच्या संघाने जराही ढिलाई न दाखवता टिच्चून खेळ केला आणि दहा विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. सलामीच्या सामन्यात तगड्या ऑस्ट्रेलियाचा 100 धावांनी धुव्वा उडवून पृथ्वी शॉच्या शिलेदारांनी आपले इरादे स्पष्ट केले होते. त्यानंतर, दुसऱ्या सामन्यात त्यांनी पपुआ न्यू गिनी या तुलनेनं दुबळ्या प्रतिस्पर्ध्यांचा 'खेळ खल्लास' करून टाकला होता. स्वाभाविकच, झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारताचं पारडं जड होतं. याआधी भारत आणि झिम्बाब्वेच्या 19 वर्षांखालील संघांमध्ये चार सामने झाले होते आणि टीम इंडियानं विजयाचा चौकार लगावला होता. या लौकिकाला साजेशी कामगिरी करतच, भारतानं झिम्बाब्वेला डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. आधी अनुकूल रॉय (4 विकेट), अर्शदीप सिंग (2 विकेट) आणि अभिषेक शर्मा (2 विकेट) या गोलंदाज त्रिकुटाने झिम्बाब्वेला 154 धावांत गुंडाळलं आणि मग हार्विक-शुभम जोडीनं या पायावर विजयाचा कळस चढवला. तीनही सामने जिंकल्यामुळे भारत 'ब' गटात अव्वल स्थानी आहे, तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे.,,http://www.maharashtracitynews.com/icc-u-19-world-cup/
0 notes
Text
पृथ्वी शॉच्या अडचणी वाढल्या, सपना गिलच्या याचिकेवर कोर्टाने खेळाडूला नोटीस पाठवली
https://bharatlive.news/?p=86249 पृथ्वी शॉच्या अडचणी वाढल्या, सपना गिलच्या याचिकेवर कोर्टाने खेळाडूला ...
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 January 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ जानेवारी २०२३ सायंकाळी ६.१०
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या मुंबईत ३८ हजार ८०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन तसंच भूमिपूजन.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ५०० रुपये दंड ठोठावत परळी न्यायालयाकडून अटक वॉरंट रद्द.
औरंगाबाद इथं महिला छेडछाड प्रकरणात सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे निलंबित.
देश एकसंघ ठेवून प्रगतीच्या दिशेनं नेण्याचं महान कार्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलं - प्रा.दत्ता भगत यांचं मत.
आणि
शुभमन गिलच्या द्वी-शतकी खेळीच्या बळावर भारताचं पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडसमोर ३५० धावांचं आव्हान.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. संध्याकाळी ५ च्या सुमाराला पंतप्रधान मुंबईत दाखल होतील. त्यांच्याहस्ते ३८ हजार ८०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. यामध्ये मुंबई मेट्रो रेल्वे 2A आणि 7 या मार्गांचे लोकार्पण, मुंबई इथे सात सांडपाणी प्रक्रिया केंद्र, रस्त्यांचे काँक्रिटीकरण प्रकल्प आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजन, आदींचा समावेश आहे. संध्याकाळी साडेसहाच्या सुमाराला पंतप्रधान मुंबई मेट्रोच्या दोन मार्गिकांचं उद्‌घाटन करतील आणि मेट्रोतून प्रवास करतील.
****
दाओस दौऱ्यात विविध उद्योगांशी १ ��ाख ३७ हजार कोटीं गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. या गुंतवणूकदारांचे प्रकल्प लवकरात लवकर सुरु होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. दाओस दौऱ्यावरून परतल्यावर ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. दाओस दौरा मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले –
दावोसची जी व्हिजीट होती, त्याबद्दल मी अतिशय आनंदी आहे, समाधानी आहे. खऱ्या अर्थाने जे फलित आहे, दावोसच्या दौऱ्याचं, त्याच्यामधून राज्यासाठी जवळपास एक लाख सदोतीस हजार कोटीचे एम ओ यू झालेले आहेत. आणि हा दौरा जो आहे तो अतिशय फ्रुटफुल ठरलेला आहे. या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांची आणि आपल्या भारत देशाची दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमि फोरमवर छाप पहायला मिळाली.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे पुत्र फराज यांच्या विरोधात बनावट व्हिसा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुर्ला पोलीस ठाण्यात मुंबई विशेष गुन्हे शाखेकडून आलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
****
निवडणूक आयोगानं नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा या तीन राज्यांमध्ये सार्वत्रिक निवडणुका घोषित केल्या आहेत. याबरोबरच विविध राज्यांच्या विधानसभेच्या सहा आणि लक्षद्वीप लोकसभा मतदार संघासाठी पोटनिवडणुकीची घोषणाही निवडणूक आयोगानं आज केली. राज्यात पुणे जिल्ह्यातल्या कसबा आणि पिंपरी चिंचवड या विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. याठिकाणी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून २ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानं या जागा रिक्त झाल्या आहेत.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ५०० रुपये दंड ठोठावत परळी न्यायालयानं त्यांच्या विरुद्धचं अटक वॉरंट रद्द केलं आहे. चिथावणीखोर वक्तव्यप्रकरणी परळी न्यायालयाने ठाकरे यांना अजामीनपात्र वॉरंट बजावलं होतं. यासाठी राज ठाकरे आज परळीत दाखल झाले होते. या प्रकरणावर आता २३ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.
****
औरंगाबाद इथं महिलेला छेडछाड केल्याप्रकरणी सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे याला निलंबित करण्याचे आदेश गृह विभागानं आज दिले. गृह विभागाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी याबाबतचं पत्र आज जारी केलं आहे. महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार हे निलंबन करण्यात आलं असून जोपर्यंत निलंबनाचे आदेश अस्तित्वात असतील तो पर्यंत विशाल ढुमे याला औरंगाबाद पोलीस मुख्यालय पूर्वपरवानगीशिवाय सोडता येणार नसल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
****
स्वातंत्र्यप्राप्तीच्या नंतर देश एकसंघ ठेवून त्याला प्रगतीच्या दिशेनं नेण्याचं महान कार्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलं असं मत, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, नाटककार तथा प्रसिद्ध विचारवंत प्रा.दत्ता भगत यांनी व्यक्त केलं आहे. हिगोली इथं बौद्ध संस्कृती मंडळाच्या वतीनं सलग ३६ व्या वर्षी आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेत “डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रातील राहून गेलेल्या गोष्टी” या विषयावर प्रथम पुष्प गुंफतांना भगत बोलत होते. सर्वसामान्य जनतेतून लोकप्रतिनिधी निवडले जावेत आणि सर्वसामान्य जनतेला एकाच मताचा अधिकार असावा ही मांडणी डॉ आंबेडकर यांनी केल्याचंही भगत यांनी सांगितलं.
****
संगीतकार, गायक, अभिनेते पद्मभुषण मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री इथं उद्यापासून दोन दिवसीय संगीत महोत्सवाला सुरुवात होणार आहे. याच महोत्सवात फुलंब्रीकरांच्या १२६ व्या जयंती दिनी म्हणजेच २० जानेवारीला संत सावता माळी शैक्षणिक संकुलात फुलंब्रीकरांच्या नावानं उभारण्यात आलेल्या सभागृहाचं लोकार्पणही भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते होणार आहे. फुलंब्री इथल्या संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालयाच्या प्रांगणात संध्याकाळी साडे सहा वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती आयोजकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
****
शुभमन गिलच्या रोमांचक द्वी-शतकी खेळीच्या बळावर भारतानं पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडसमोर ३५० धावांचं लक्ष्य दिलं आहे. हैदराबाद इथं सुरू असलेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीला आलेल्या शुभमन गिलने १४९ चेंडूत १९ चौकार आणि ९ षटकारांच्या सहाय्यानं द्वीशतक झळकावलं. द्वीशतक करणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सहवाग, रोहित शर्मा, आणि ईशान किशन या भारतीयांनी एकदिवसीय सामन्यात द्वीशतकी खेळी केली आहे.
****
शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण केल्यास, नवी पिढी सक्षम भविष्य घडवेल, असा विश्वास नांदेड जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे य��ंनी व्यक्त केला आहे. मराठी भाषा पंधरवाडा साजरा करण्यासाठी शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी यांना ग्रंथालयाचे सभासद होण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने हाती घेण्यात आला आहे, आज कुसुम माध्यमिक विद्यालयात या उपक्रमाचा आरंभ ठाकूर-घुगे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. राष्ट्रपुरुषांची चरित्रे, प्रवास वर्णन, तसंच विज्ञान, कला, संस्कृती या विषयावरील गोष्टीरूप पुस्तकं विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावीत, असं ठाकूर घुगे यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद इथलं शासकीय नेत्र रुग्णालय चिकलठाणा इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात स्थलांतरित करण्याला स्थगिती देण्यात आली आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी ही माहिती दिली. हे नेत्र रुग्णालय आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीत स्थलांतरित होणार असल्याचं खासदार जलील यांनी सांगितलं. आमखास इथल्या नेत्र रुग्णालयाच्या जागेवर कर्करोग रुग्णांच्या उपचारासाठी शासनस्तरावरुन यापूर्वीच नविन प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानं नेत्र रुग्णालय स्थलांतरण करणे गरजेचं असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे.
****
चला जाणूया नदीला या उपक्रमांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील आसना आणि कयाधू या दोन नद्यांची निवड करण्यात आली आहे. जनतेला या उपक्रमात सामावून घेण्यासाठी संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेतून नदी पुनरुज्जीवनाच्या चळवळीतील लोकसहभाग वाढेल असं जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी म्हटलं आहे.
****
औरंगाबाद इथल्या विवेकानंद कला, सरदार दलिपसिंग वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात होत असलेल्या विवेकानंद व्याख्यानमालेचा आज समारोप होत आहे. या व्याख्यानमालेत आज डॉ. रवींद्र कोल्हे हे ‘मेळघाटातील प्रबोधन पर्व’ या विषयावर व्याख्यानाचं तिसरं पुष्प गुंफणार आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यासाठी चालू वर्षासाठीच्या स्थानिक सुट्ट्या जाहीर झाल्या आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या सुट्ट्या जाहीर केल्या. २१ फेब्रुवारी रोजी औंढा नागनाथ इथल्या रथ उत्सवानिमित्त, २२ सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी पूजनानिमित्त तर १३ नोव्हेंबर रोजी दीपावली अमावस्येनिमित्त सुटी देण्यात आली आहे.
****
नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस रेल्वेगाडी उद्या नांदेड इथून उशिरा सुटणार आहे. ही रेल्वे नांदेडहून तिचा निर्धारित वेळ सकाळी साडेनऊ वाजता सुटते. मात्र, उद्या ही गाडी १७० मिनिटे उशिरा म्हणजेच बारा वाजून वीस मिनिटांनी नांदेडहून सुटणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं दिली आहे. 
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
शहनाज गिलच्या हातात सिद्धार्थ शुक्लाचा टॅटू
शहनाज गिलच्या हातात सिद्धार्थ शुक्लाचा टॅटू
शहनाज गिलच्या हातात सिद्धार्थ शुक्लाचा टॅटू अभिनेत्री शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला मध्ये चांगली मैत्री होती. ते लग्न देखील करणार असल्याचे निश्चित झाले होते.परंतु सिद्धार्थ वर काळाने झडप घेतली आणि तो कमी वयात जगाचा निरोप घेऊन गेला. सिद्धार्थच्या एकाएकी निघून गेल्यामुळे शहनाज कोलमडून गेली … Instagram अभिनेत्री शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला मध्ये चांगली मैत्री होती. ते लग्न देखील करणार असल्याचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Shubman Gill-Sara Ali Khan: ‘सारा तो सारा होवे है…, शुभमन गिलच्या व्हायरल फोटोवर जबरदस्त मीम्स, पाहा
Shubman Gill-Sara Ali Khan: ‘सारा तो सारा होवे है…, शुभमन गिलच्या व्हायरल फोटोवर जबरदस्त मीम्स, पाहा
Shubman Gill-Sara Ali Khan: ‘सारा तो सारा होवे है…, शुभमन गिलच्या व्हायरल फोटोवर जबरदस्त मीम्स, पाहा shubman gill with sara ali khan: टीम इंडियाचा क्रिकेटपटू शुभमन गिल सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. शुभमन गिल बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानसोबत स्पॉट झाला आहे. यानंतर दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर चाहत्यांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. shubman gill with…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
क्रिकेटर शुभमन गिलच्या प्रेमात पडली सारा अली खान, डिनर डेटचा व्हिडिओ व्हायरल
क्रिकेटर शुभमन गिलच्या प्रेमात पडली सारा अली खान, डिनर डेटचा व्हिडिओ व्हायरल
क्रिकेटर शुभमन गिलच्या प्रेमात पडली सारा अली खान, डिनर डेटचा व्हिडिओ व्हायरल मुंबई – बॉलिवूडला आणखी एक नवी अभिनेत्री-क्रिकेटर जोडी मिळणार आहे का? असा प्रश्न सध्या सोशल मीडिया चांगलाच चर्चेत आला आहे. अभिनेत्री सारा अली खान आणि शुभमन गिलचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका चाहत्याने दोघांना रेस्टॉरंटमध्ये एकत्र बसलेले पाहिले आणि हा व्हिडिओ सोशलवर शेअर केला. व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर सारा आणि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
तेंडुलकरच्या लेकीशी ब्रेकअप करून पुन्हा साराच्याच प्रेमात शुभमन?
तेंडुलकरच्या लेकीशी ब्रेकअप करून पुन्हा साराच्याच प्रेमात शुभमन?
तेंडुलकरच्या लेकीशी ब्रेकअप करून पुन्हा साराच्याच प्रेमात शुभमन? Is Shubman Gill Dating Sara Ali Khan: भारतीय युवा सलामीवीर शुभमन गिलच्या डिनर डेटचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो सैफ अली खानची मुलगी सारा अली खानसोबत दिसत आहे. Is Shubman Gill Dating Sara Ali Khan: भारतीय युवा सलामीवीर शुभमन गिलच्या डिनर डेटचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो सैफ अली खानची…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
INDvsZIM: शुभमन गिलच्या शतकावर चाहत्यांनी उडी मारली, मीम्स शेअर केले आणि म्हणाले – बिनोद पाहत आहे
INDvsZIM: शुभमन गिलच्या शतकावर चाहत्यांनी उडी मारली, मीम्स शेअर केले आणि म्हणाले – बिनोद पाहत आहे
शुभमन गिलने आपल्या कामगिरीने तमाम क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत. झिम्बाब्वेविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात त्याने शानदार खेळी खेळली आणि अवघ्या 82 चेंडूत शतक झळकावले. त्याचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे. शुभमन गिलने शतक झळकावल्यावर चाहत्यांनी आनंदाने उड्या मारल्या प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter अलीकडच्या काळात, युवा क्रिकेटपटू शुभमन गिल हा एक उत्तम खेळाडू…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
#ZIMvIND 3rd ODI : गिलची शतकी खेळी, भारताचे झिम्बाब्वेसमोर 290 धावांचे लक्ष्य
#ZIMvIND 3rd ODI : गिलची शतकी खेळी, भारताचे झिम्बाब्वेसमोर 290 धावांचे लक्ष्य
#ZIMvIND 3rd ODI : गिलची शतकी खेळी, भारताचे झिम्बाब्वेसमोर 290 धावांचे लक्ष्य हरारे – शुभमन गिलच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने झिम्बाब्वेसमोर 290 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 50 षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात 289 धावा केल्या. Innings Break! A brilliant 130 from @ShubmanGill as #TeamIndia post a total of 289/8 on the board. Scorecard – https://t.co/ZwXNOvRwhA…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
19 ऑगस्ट 2022 रोजीच्या मनोरंजनाच्या बातम्या राजा श्रीवास्तव ब्रेन डेड नाहीत, मॅनेजर विजय देवरकोंडा यांनी शहनाज गिलच्या लग्नात टेबलावर पाय ठेवल्याच्या वादावर प्रतिक्रिया दिली
19 ऑगस्ट 2022 रोजीच्या मनोरंजनाच्या बातम्या राजा श्रीवास्तव ब्रेन डेड नाहीत, मॅनेजर विजय देवरकोंडा यांनी शहनाज गिलच्या लग्नात टेबलावर पाय ठेवल्याच्या वादावर प्रतिक्रिया दिली
दिवसाच्या मनोरंजन बातम्या 19 ऑगस्ट 2022 राजा श्रीवास्तव ब्रेन डेड नाहीत, मॅनेजर विजय देवरकोंडा यांनी लग्नाच्या वेळी टेबलवर पाय ठेवल्याच्या वादावर प्रतिक्रिया दिली – शहनाज गिल – आजच्या मनोरंजन बातम्या: राजू श्रीवास्तव ब्रेन डेड नाही, मला तिचा भावी पती हवा आहे दर्जेदार शहनाज गिल ,
Tumblr media
View On WordPress
0 notes