#गटाकडून
Explore tagged Tumblr posts
nagarchaufer · 4 days ago
Text
केडगावमधून संग्राम जगताप यांनीच मारली बाजी , प्रभाग 16 आणि 17 मधून.. 
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही राष्ट्रीय राजकारणाला कलाटणी देणारी ठरलेली असून सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून भाजप समोर आलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक जागा भाजपच्या निवडून आलेल्या असून भाजप , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट यांनी एकत्रितरित्या ही निवडणूक महाविकास आघाडीच्या विरोधात लढवलेली होती.  नगर शहर मतदारसंघातून शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणारे…
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर,दिनांक: 25.10.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून, उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. येत्या २९ तारखेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. आजपर्यंत ५५२ उमेदवारांचे ७२० नामनिर्देशन पत्र दाखल झाली असल्याची माहिती माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दि��ी आहे.
****
झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या टप्प्यात १३ नोव्हेंबरला, ४३ मतदारसंघांत मतदान होणार असून, आतापर्यंत ७४८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
****
लातूर जिल्ह्यात लातूर शहर मतदारसंघातून काँग्रेसचे अमित देशमुख, लातूर ग्रामीण मधून धीरज देशमुख, तर अपक्ष उमेदवार रामराव मोरे यांनी काल अर्ज दाखल केले. अहमदपूर मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील यांच्यासह तीन अपक्ष उमेदवारांनी, उदगीर मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे यांच्यासह दोन अपक्षांनी, निलंगा इथून भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर, शिवसेना ठाकरे गटाचे लिंगनअप्पा रेशमे यांच्यासह दोन अपक्षांनी, तर औसा मतदारसंघातून शिवसेनाउद्धव ठाकरे गटाकडून संतोष सोमवंशी यांनी अर्ज दाखल केले.
भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दक्षिण - पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
****
नांदेडचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडला. काँग्रेसचे आमदार झिशान सद्दीकी यांनी देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आपलयासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी हा भावनिक क्षण असल्याचं सांगून सिद्दीकी यांनी, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचे आभार मानले.
****
धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. धुळे शहर विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार आपणच असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
****
निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं सात उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. नांदेड जिल्ह्यातल्या लोहा मतदारसंघातून प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबईतल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून झिशान सिद्दीकी यांना, अणुशक्तीनगर मतदारसंघातून माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना, इस्लामपूर मधून निशिकांत पाटील, तासगाव - कवठे महांकाळमधून संजय पाटील, वडगाव शेरी मधून सुनिल टिंगरे, तर शिरुर मतदारसंघातून ज्ञानेश्वर कटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****
मतदार ज��जागृतीसाठी सर्वत्र निवडणूक आयोगाकडून तसंच स्थानिक प्रशासनांकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. वाशिम इथं काल जिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके यांच्या मार्गदर्शनाखाली
श्री बाकलीवाल विद्यालयाच्या एनसीसी विद्यार्थी, विद्यार्थीनींनी आपल्या आईबाबांना पत्र लिहून मतदान करण्याचं आवाहन केलं.
****
देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा कार्यकाळ, येत्या दहा नोव्हेंबरला पूर्ण होत असून, न्यायमूर्ती खन्ना ११ नोव्हेंबरपासून सरन्यायाधिशपदाची सूत्रं स्वीकारतील.
****
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीनं ६ हजार ७९८ कोटी रुपये किमतीच्या २ रेल्वे प्रक��्पांना मंजुरी दिली. नरकटियागंज ते दरभंगा, सितामढी- मुझफ्फरपूर तसंच एरुपलेम-नामबुरू या दरम्यान हे रेल्वे मार्ग आहेत. येत्या पाच वर्षात अवकाश क्षेत्रासाठी १ हजार कोटी रुपयांच्या व्हेंचर कॅपिटल फंडालाही मंत्रीमंडळानं मंजुरी दिली. याअंतर्गत वर्षाला सरासरी दीडशे ते अडीचशे कोटी रुपये दिले जातील.
****
दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त रेल्वे सात हजार विशेष गाड्या चालवणार आहे. गेल्यावर्षीच्या साडे चार हजार गाड्यांच्या तुलनेत ही मोठी वाढ असल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
****
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील कांदा बटाटा मार्केटमध्ये काल ८० टन इजिप्तचा कांदा दाखल झाला. आकाराने मोठा आणि रंगाने गर्द गुलाबी असणाऱ्या या कांद्याला ४० रूपये प्रती किलोचा दर मिळत आहे. सध्या बाजारात राज्यभरातून कांदा दाखल होत असून, नाफेडकडून कांदा बाजारात आणल्याने कांद्याचे दर नियंत्रणात आहेत. स्थानिक कांद्याला २० ते २५ रूपये प्रती किलोचा दर मिळत आहे.
****
वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर आज सकाळी रासायनिक पदार्थ घेऊन जाणारा ट्रक बंद पडला, त्याची दुरुस्ती सुरु असताना या ट्रकला मागून येणाऱ्या ट्रकने स्पर्किंग दिल्याने दोन्ही ट्रकला भीषण आग लागली असून, अधून मधून स्फोट होत आहेत. त्यामुळे नागपूरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. घटनास्थळी कारंजा नगरपरिषद अग्निशामक दल तसंच समृद्धी महामार्गावरील अग्निशामक दल  यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथलं जायकवाडी धरण पूर्ण भरलं असून, धरणात सध्या पाच हजार ७५१ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणाच्या सहा दरवाजातून पाच हजार २४० घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
****
0 notes
6nikhilum6 · 3 months ago
Text
Amol Kolhe : भ्रष्टाचाराचे आणि महिलांच्या असुरक्षिततेचे संकट दूर होऊ दे -अमोल कोल्हे
��मपीसी न्यूज -राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यासाठी अद्याप आयोगाने कार्यक्रम जाहीर केला नसला तरी देखील आढावा घेण्यास सुरुवात करण्यात आली (  Amol Kolhe) आहे. त्यामुळे पक्षांचा प्रचार देखील वाढला असून नेत्यांच्या सभा वाढल्या आहेत. महायुतीसह माहविकास आघाडीमधील घटक पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. शरद पवार गटाकडून विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे.  खासदार…
0 notes
news-34 · 4 months ago
Text
0 notes
imranjalna · 7 months ago
Text
Loksabha election : छत्रपती संभाजी नगरमधून संदीपान भुमरेंना उमेदवारी; दोन मोठ्या नेत्यांसमोर कसा लागणार निभाव?
मुंबईः छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडून मंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे. ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे हे रिंगणात आहेत. छत्रपती संभाजी नगरसाठी शिवसेनेकडून कोण उमेदवार असेल, याचे तर्क लढवले जात होते. ठाकरे गटाने चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी घोषित केल्याने त्यांना लढत देणारा उमेदवार शिवसेनेने जाहीर केला आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री संदीपान…
Tumblr media
View On WordPress
0 notes
automaticthinghoagiezine · 8 months ago
Video
youtube
शिवसेना ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर..
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
ठाणे: शिंदे गटाकडून मुंब्रा येथील शिवसेना शाखा जमीनदोस्त
https://bharatlive.news/?p=186658 ठाणे: शिंदे गटाकडून मुंब्रा येथील शिवसेना शाखा जमीनदोस्त
ठाणे : पुढारी ...
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
Breaking News | सत्तासंघर्षाचा निकाल लागला; उद्धव ठाकरेंना ही चूक महागात पडली तर राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे !
Tumblr media
Breaking News | बहुचर्चित महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला. मागील काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष फक्त शिंदे व ठाकरे गटाच्या ( Shinde & Thackeray Sarkar) सत्ता संघर्षाच्या निकालाकडे लागले होते. अशातच आज हा निकाल जाहीर झाला आहे. या निकालाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले शिंदे व ठाकरे गटाकडून एकूण चार याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या. या चार याचिकां��र आज निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांची चुकीची भूमिका, उद्धव ठाकरे यांचा राजीनामा व भरत गोगावले यांचा व्हीपचा निर्णय या मुद्द्यावरून चांगलेच ताशेरे ओढले आहेत. सुप्रीम कोर्टाचा निकाल सुप्रीम कोर्टाने १६ आमदार अपत्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ( Rahul Narveka) यांच्याकडे देण्यात आला आहे. तसेच त्यांनी लवकरात लवकर निर्णय जाहीर करावा. असेही यामध्ये सांगितले आहे. भरत गोगावलेंची प्रतोदपदी नियुक्ती बेकायदेशीर असून राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे असल्याचे न्यायालयाने म्हंटले आहे. तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते. सुप्रीम कोर्टाच्या निकालात उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांच्या भूमिकेवरून निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत. उद्धव ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी स्वतःहून राजीनामा दिला नसता तर आज कोर्टाने सरकार परत आणलं असतं. त्यांनी राजीनामा दिल्यामुळे ठाकरे गट अडचणीत आला आहे. असे सांगण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या चार प्रमुख याचिका कोणत्या ? १) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी १६ आमदारांच्या निलंबनाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. २) ठाकरे गटाने बंडखोर आमदारांना निलंबित करण्याची मागणी केली होती. ३) ठाकरे गटातल्या १४ आमदारांच्या निलंबना संदर्भात सुद्धा याचिका सादर झाली होती. ४) ३-४ जुलैचे विशेष अधिवेशन अवैध ठरवण्याची मागणी सुभाष देसाई यांनी केली होती. Read the full article
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष, उद्धव ठाकरे यांची ‘ही’ मागणी सुप्रीम कोर्ट मान्य करणार?
महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष, उद्धव ठाकरे यांची ‘ही’ मागणी सुप्रीम कोर्ट मान्य करणार?
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर येत्या 10 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाने गेल्या सुनावणीवेळी मागणी केली होती की, संबंधित प्रकरण सात सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करण्यात यावे. पण हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे का वर्ग करण्यात यावं? याबाबत कोर्टाने ठाकरे गटाच्या वकिलांकडे लेखी स्वरुपात उत्तर मागितलं होतं. ठाकरे गटाकडून लेखी स्वरुपात संबंधित उत्तर सुप्रीम…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
शिंदे कॅम्प आमदार सदा सरवणकर अर्ज मुंबई महामंडळ दसरा मेळावा २०२२ एसएस ९७
��िंदे कॅम्प आमदार सदा सरवणकर अर्ज मुंबई महामंडळ दसरा मेळावा २०२२ एसएस ९७
मुंबई : शिवसेना आणि दसरा मेळावा हे एक अतूट नाते आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या शिवसेनेच्या सभेला राज्यभरातून शिवसैनिक हजेरी लावतात. पण, यंदा पाच ऑक्टोबरला येणाऱ्या दसऱ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात नेमका कोण मेळावा घेणार, यावरुन उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात चढाओढ सुरु झाली आहे. दसरा मेळाव्याला परवानगी मिळण्यासाठी शिवसेनेने मुंबई महापालिकेत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 4 days ago
Text
निवडणूक निकालानंतर अभिषेक कळमकर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत , आदरणीय मायबाप जनता म्हणत.. 
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही राष्ट्रीय राजकारणाला कलाटणी देणारी ठरलेली असून सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून भाजप समोर आलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक जागा भाजपच्या निवडून आलेल्या असून भाजप , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट यांनी एकत्रितरित्या ही निवडणूक महाविकास आघाडीच्या विरोधात लढवलेली होती.  नगर शहर मतदारसंघातून शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणारे…
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 25.10.2024 रोजीचे सकाळी: 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 25 October 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २५ ऑक्टोबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
विधानसभा निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेला वेग-राज्यभरात अनेक दिग्गजांकडून अर्ज दाखल
महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून उमेदवार यादी जाहीर
गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसला घड्याळ चिन्ह वापरण्यास सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी
आणि
न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाचा ५९ धावांनी विजय
सविस्तर बातम्या
राज्य विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. जवळपास सर्वच प्रमुख पक्षांच्या अनेक दिग्गज उमेदवारांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले.
बीड जिल्ह्यात परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज काल दाखल केला. भाजपच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे, माजी खासदार प्रीतम मुंडे यावेळी उपस्थित होत्या.
हिंगोली विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांनी, वसमत मधून जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार श्री गुरु पारदेश्वर शिवाचार्य महाराज यांनी, तर कळमनुरी मतदारसंघात विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी उमेदवारी अर्ज भरला.
परभणी जिल्ह्यात पाथरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार निर्मला विटेकर यांचा अर्ज त्यांचे पुत्र आमदार राजेश विटेकर यांनी दाखल केला.
जालना विधानसभा मतदार संघासाठी महायुतीकडून शिवसेनेचे अर्जुन खोतकर, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल तसंच त्यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल, तर भाजपा ज��लना विधानसभा प्रमुख भास्कर दानवे यांनी अर्ज दाखल केला. घनसावंगी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेश टोपे यांनी, बदनापूर मधून भाजपाचे आमदार नारायण कुचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बबलू चौधरी यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड मतदारसंघातून महायुतीकडून शिवसेनेचे अब्दुल सत्तार, कन्नड मधून महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उदयसिंह राजपुत, राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष कोल्हे, फुलंब्री मधून बसपाचे अमोल पवार, औरंगाबाद मध्य मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अभय टाकसाळ तसंच बहुजन समाज पार्टीचे विष्णू तुकाराम वाघमारे यांनी, औरंगाबाद पूर्वमधून बसपाकडून तीन अर्ज तर तीन अपक्ष, औरंगाबाद पश्चिम मधून बहुजन समाज पार्टीचे कुणाल दांडगे यांनी, पैठण मतदार संघातून महायुतीकडून शिवसेनेचे विलास भुमरे, तर गंगापूर मधून महायुतीकडून भाजपचे प्रशांत बंब, यांच्यासह तीन अपक्ष उमेदवारांनी काल उमेदवारी काल अर्ज दाखल केले.
लातूर जिल्ह्यात लातूर शहर मतदारसंघातून काँग्रेसचे अमित देशमुख, लातूर ग्रामीण मधून धीरज देशमुख, अहमदपूर मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील, उदगीर मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे, निलंगा इथून भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लिंगनअप्पा रेशमे, तर औसा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून संतोष सोमवंशी यांनी काल अर्ज दाखल केले.
धाराशिव जिल्ह्यात भूम - परंडा - वाशी विधानसभा मतदारसंघातून आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी अर्ज दाखल केला. उस्मानाबाद मतदारसंघात बसपाचे सुभाष गायकवाड, तुळजापूर मधून भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील तसंच माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, यांच्यासह बहुजन समाज पक्षाच्या वतीनं दोन तर एका अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केला. उमरगा मतदारसंघात दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
नांदेड लोकसभा मतदारसंघात काल काँग्रेसचे रविंद्र चव्हाण यांच्यासह अन्य एका इच्छुकाचा अर्ज दाखल झाला असून, लोकसभेसाठी आतापर्यंत तीन उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. आठ विधानसभा मतदारसंघासाठी १६ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत.
****
अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डी मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, पारनेर मधून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी, राहुरी मधून भाजपचे शिवाजी कर्डिले यांनी, अकोले इथून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर किरण लहामटे यांनी, तर अहमदनगर शहर मतदारसंघातून संग्राम जगताप यांनी अर्ज दाखल केला. 
****
येवल्यामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ, कोथरुड मधून भाजपचे चंद्रका��त पाटील, आंबेगाव मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे ��िलीप वळसे पाटील, इंदापूर मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हर्षवर्धन पाटील, मुंबईत मलबार हिल्स इथून भाजपचे मंगलप्रभात लोढा, कांदिवली पूर्व मधून भाजपचे अतुल भातखळकर, ठाणे विधानसभा मतदार संघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन विचारे तसंच मनसेचे अविनाश जाधव, महाविकास आघाडीकडू�� कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड, वरळी मधून आदित्य ठाकरे, यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातून भाजपचे अशोक उईके, दक्षिण सोलापूर मधून भाजपाचे माजी मंत्री सुभाष देशमुख, तर मोहोळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यशवंत माने यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला.
****
काँग्रेस पक्षानं ४८ उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली. यामध्ये कराड पश्चिम मतदार संघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, साकोली-नाना पटोले, ब्रह्मपुरी-विजय वडेट्टीवार, तेओसा-यशोमती ठाकूर, संगमनेर -विजय बाळासाहेब थोरात तर पलूस इथून विश्वजीत कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
लातूर शहर मतदारसंघातून अमित देशमुख यांना उमेदवारी देण्यात  आली आहे, लातूर ग्रामीण धीरज देशमुख, हदगाव माधवराव पाटील, भोकर - तिरुपती कोंडेकर, नायगाव - मिनल पाटील खतगावकर, पाथ्री - सुरेश वरपुडकर, तर फुलंब्री मतदारसंघातून - विलास औताडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने काल ४५ उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली. यामध्ये बारामती मतदार संघातून युगेंद्र पवार, कर्जत-जामखेडमधून रोहित पवार, मुंब्रा-जितेंद्र आव्हाड, तासगाव मधून रोहित आर पाटील तर मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मराठवाड्यात घनसावंगी मतदार संघातून माजी मंत्री राजेश टोपे यांना, वसमत-जयप्रकाश दांडेगावकर, अहमदपूर-विनायक पाटील, उदगीर -सुधाकर भालेराव, भोकरदन-चंद्रकांत दानवे, किनवट-प्रदीप नाईक, जिंतूर-विजय भांबळे, केज-पृथ्वीराज साठे, बदनापूर-रुपकुमार उर्फ बबलू चौधरी, आष्टी मतदार संघातून मेहबूब शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
परभणी जिल्ह्यात गंगाखेड मतदार संघाचे माजी आमदार सीताराम घनदाट यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी काल प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला.म्हाविकास आघाडीनं या मतदार संघात शिवसेनेचे विशाल कदम यांना उमेदवारी जाहीर दिली आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समीर भुजबळ यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून, नाशिक जिल्ह्यात नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, नाशिक शहरातल्या चारही मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी काल नाशिकमधल्या काँग्रेस भवनला कुलूप लावून आपला संताप व्यक्त केला.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
 या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
****
विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसला घड्याळ हे चिन्ह वापरण्याची सशर्त परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. यासंदर्भात काल झालेल्या सुनावणीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केलेला अर्ज फेटाळण्यात आला. अजित पवार गटाने घड्याळ हे चिन्ह वापरताना, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा उल्लेख प्रत्येक वेळी करावा, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत.
****
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी मतदार जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येत आहेत. प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे...
 Byte… 
छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय महाविद्यालयात काल मतदार जनजागृती कार्यक्रम तसंच युवा संवाद या कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.
****
नांदेड विधानसभा तसंच लोकसभा पोटनिवडणुकीत मतदान जनजागृतीसाठी जिल्हा परिषद कार्यालयात स्वीपकक्ष, उमेद आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी सहभाग घेऊन स्वाक्षरी केली.
****
महिला क्रिकेटमध्ये, न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारत���ने ५९ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत भारतीय महिला ४५व्या षटकात २२७ धावांवर सर्वबाद झाल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला न्यूझीलंडचा संघ १६८ धावाच करु शकला. या मालिकेतला दुसरा सामना परवा रविवारी अहमदाबाद इथं होणार आहे.
****
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान पुणे इथं सुरु असलेल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात काल पहिल्या डावात न्यूझीलंडच्या संघानं सर्वबाद २५९ धावा केल्या. न्यूझीलंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रविचंद्रन अश्विनने तीन तर वॉशिंग्टन सुंदरने सात गडी बाद क��ले. आज पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या एक गडी गमावत १६ धावा झाल्या होत्या.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया निर्भय तसंच निष्पक्ष वातावरणात होण्यासाठी सतर्क राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. काल जिल्हा नियोजन सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथं काल एका व्यक्तीकडून बेहिशेबी साडे सात लाख रुपये रोकड जप्त करण्यात आली. 
****
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं दाना चक्रीवादळ मध्यरात्रीच्या सुमारास ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकलं. परिणामी ओडिशाच्या केंद्रपाडा आणि भद्रक जिल्ह्यात सुमारे १२० किलोमीटर प्रतितास वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे. हे वादळ पश्चिम बंगालच्या किनारपट्टीकडे सरकलं आहे.
****
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
एकनाथ शिंदे गटाकडून नगरमध्ये जबाबदाऱ्यांचे वाटप, संघटन पातळीवर गट मजबूतीचे धोरण
एकनाथ शिंदे गटाकडून नगरमध्ये जबाबदाऱ्यांचे वाटप, संघटन पातळीवर गट मजबूतीचे धोरण
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेत एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट अशा दोन गटांची निर्मिती झालेली आहे. काही जण एकनाथ शिंदे गटाच्या जवळ असल्याचे समोर आले आहे तर उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी देखील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व शिवसैनिक असल्याचे दिसून येत आहे अशातच नगर शहरातील शिंदे गटात सहभागी झालेले नगरसेवक अनिल शिंदे यांची शिवसेना गटाच्या नगर जिल्हाप्रमुखपदी तर विकास रोहोकले यांची पारनेर तालुका…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago
Text
एकनाथ शिंदे गटाकडून नगरमध्ये जबाबदाऱ्यांचे वाटप, संघटन पातळीवर गट मजबूतीचे धोरण
एकनाथ शिंदे गटाकडून नगरमध्ये जबाबदाऱ्यांचे वाटप, संघटन पातळीवर गट मजबूतीचे धोरण
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेत एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट अशा दोन गटांची निर्मिती झालेली आहे. काही जण एकनाथ शिंदे गटाच्या जवळ असल्याचे समोर आले आहे तर उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी देखील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व शिवसैनिक असल्याचे दिसून येत आहे अशातच नगर शहरातील शिंदे गटात सहभागी झालेले नगरसेवक अनिल शिंदे यांची शिवसेना गटाच्या नगर जिल्हाप्रमुखपदी तर विकास रोहोकले यांची पारनेर तालुका…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years ago
Text
एकनाथ शिंदे गटाकडून नगरमध्ये जबाबदाऱ्यांचे वाटप, संघटन पातळीवर गट मजबूतीचे धोरण
एकनाथ शिंदे गटाकडून नगरमध्ये जबाबदाऱ्यांचे वाटप, संघटन पातळीवर गट मजबूतीचे धोरण
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेत एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट अशा दोन गटांची निर्मिती झालेली आहे. काही जण एकनाथ शिंदे गटाच्या जवळ असल्याचे समोर आले आहे तर उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी देखील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व शिवसैनिक असल्याचे दिसून येत आहे अशातच नगर शहरातील शिंदे गटात सहभागी झालेले नगरसेवक अनिल शिंदे यांची शिवसेना गटाच्या नगर जिल्हाप्रमुखपदी तर विकास रोहोकले यांची पारनेर तालुका…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years ago
Text
एकनाथ शिंदे गटाकडून नगरमध्ये जबाबदाऱ्यांचे वाटप, संघटन पातळीवर गट मजबूतीचे धोरण
एकनाथ शिंदे गटाकडून नगरमध्ये जबाबदाऱ्यांचे वाटप, संघटन पातळीवर गट मजबूतीचे धोरण
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेत एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट अशा दोन गटांची निर्मिती झालेली आहे. काही जण एकनाथ शिंदे गटाच्या जवळ असल्याचे समोर आले आहे तर उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी देखील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व शिवसैनिक असल्याचे दिसून येत आहे अशातच नगर शहरातील शिंदे गटात सहभागी झालेले नगरसेवक अनिल शिंदे यांची शिवसेना गटाच्या नगर जिल्हाप्रमुखपदी तर विकास रोहोकले यांची पारनेर तालुका…
Tumblr media
View On WordPress
0 notes