#कापड दुकानाला आग
Explore tagged Tumblr posts
Text
कापड दुकानाला आग, लाखोंचे नुकसान..
मोठा अनर्थ टळला अर्जुनी मोरगाव : शहरातील आनंद वस्त्रालय या प्रतिष्ठानाला 7 मे रोजी दुपारी तीन वाजतादरम्यान अचानक आग लागली. चार मजली या वास्तूला लागलेल्या आगीमुळे लाखावर नुकसान झाले, मात्र मोठा अनर्थ टळला. प्राप्त माहितीनुसार, शहराच्या मुख्य रस्त्यावरील आनंद वस्त्रालय या दुकानला अचानक आग लागल्याची घटना घडली. या मार्गाने जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला आग लागल्याचे लक्षात आले. त्याने आरडाओरडा केली.…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 03 April 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती सं���ाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ एप्रिल २०२४ दुपारी १.०० वा.
****
२०२४ मध्ये भारताचा आर्थिक विकासदर सात पूर्णांक पाच टक्के दरानं वाढेल, असा अंदाज जागतिक बँकेनं व्यक्त केला आहे. याआधीच्या अंदाजात सुधारणा करून, जागतिक बँकेनं यात एक पूर्णांक दोन टक्क्यांनी वाढ केली आहे. दक्षिण आशियाचा या वर्षीचा विकास दर सहा टक्के इतका अपेक्षित आहे. पुढील दोन वर्षांसाठी दक्षिण आशिया हा जगातला सर्वात वेगवान आर्थिक विकास दर असलेला प्रदेश राहणार असल्याचं जागतिक बँकेनं म्हटलं आहे.
****
काँग्रेस नेते आणि केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार राहुल गांधी आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राहूल गांधी यांची कल्पेट्टा बसस्थानक परिसरातून रॅली निघाली असून त्यांच्यासोबत पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, के. सी. वेणुगोपाल आणि इतर नेते उपस्थित आहेत. या मतदार संघात दुसऱ्या टप्प्यात २६ तारखेला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या शेवटची तारीख आहे. ५ तारखेला अर्जांची छाननी होणार असून या ८ तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.
****
तैवानच्या पूर्व किनाऱ्यावर आज सकाळी झालेल्या तीव्र भुकंपाच्या धक्क्यात चार जणांचा मृत्यू झाला. या भूकंपाची तीव्रता ७ पूर्णांक ४ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. यामुळं या प्रदेशात त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे. गेल्या पंचवीस वर्षांतला हा सर्वात तीव्र भूकंपाचा धक्का असल्याचं तैपेईच्या भूकंपविज्ञान केंद्रानं सांगितलं आहे. या भूकंपामुळं दक्षिण जपानमध्येही त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, भुकंपाच्या पार्श्वभुमीवर तैपेई इथंल्या भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी भारत तैपैई संघटनेकडून हेल्पलाईन क्रमांक आणि इ-मेल आयडी जारी करण्यात आला आहे.
****
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या संकेतस्थळ चालकांना त्यांच्या संकेत स्थळावर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचं योग्य वर्गीकरण करण्यास सांगितलं आहे. दुध, तृणधान्य आणि माल्टोजपासून बनवलेली पेय ह�� हेल्थ ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंक्सच्या श्रेणीत विकली जात असल्याचं निदर्शनास आलं आहे. प्राधिकरणानं कुठेही आरोग्य पेयांची व्याख्या केली नसून संकेतस्थळावरून हे चुकीचं वर्गीकरण त्वरित दुरुस्त करण्यास सांगितलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात छावणी परिसरातल्या एका कापड दुकानाला भीषण आग लागून एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू झाला. आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कपड्याच्या दुकानात चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक बाईकच्या चार्जरचा स्फोट झाल्यानं ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्नीशमन दलानं वर्तवला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. दुकानाला आग लागली तेव्हा हे सर्व वरच्या मजल्यावर झोपलेले होते. त्यामुळं त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
****
सोलापूर इथं अक्कलकोट रस्त्यावरील एमआय��ीसीतल्या अन्नपूर्णा टॉवेल कारखान्याला आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत कोणतीही प्राणहानी झाली नसून लाखो रुपयांचा माल जळाला आहे. आगीचं नेमकं कारण अजून कळालं नसून आग आटोक्यात आणण्यासाठी काही तास लागतील, असं महानगर पालिकेच्या अग्निशामक दलाकडून सांगण्यात आलं आहे आहे.
****
राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद -एनसीईआरटीच्या सर्व शालेय अभ्यासक्रमांची पुस्तकं विद्यार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं परिषदेनं सांगितलं. सर्व विद्यार्थी आणि पालकांना पुस्तकं वेळेवर मिळण्याचं आश्वासन देत, अनेक राज्यांमध्ये शालेय पुस्तकं उपलब्ध नसल्याच्या या सामाजिक माध्यमांवरील वृत्तानंतर परिषदेनं हे स्पष्ट केलं.
****
रायगड लोकसभा मतदारसंघात ११ हजार २८२ दिव्यांग मतदार असून त्यांना मतदान करणं सोयीचं व्हावं म्हणून सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मदतानाला जाण्यासाठी १ हजार ७७ व्हीलचेअर उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळं यावर्षी दिव्यांगांचं मतदान वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन आग्रही असून गाभिर्यानं सुधारणा केल्या जात आहेत.
****
धर्माबाद -मनमाड मराठवाडा एक्सप्रेस तीन, सात आणि दहा एप्रिल रोजी धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. या तिनही दिवशी ही गाडी मनमाडला जाण्यासाठी धर्माबाद ऐवजी नांदेड इथून सुटेल, असं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं कळवलं आहे. आदिलाबाद ते मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस ही गाडी एक एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान दादरपर्यंतच धावणार आहे. या कालावधीत दादर ते मुंबई दरम्यान ही गाडी धावणार नाही. तसंच ��रंगाबाद-हैदराबाद एक्स्प्रेस नऊ एप्रिल रोजी औरंगाबाद येथून वेळेवर सुटणार आहे.
****
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज आकाश ढगाळ राहील. तर राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील. पाच एप्रिलपासून राज्याच्या काही भागांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०३ एप्रिल २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
छत्रपती संभाजीनगर शहरात छावणी परिसरातल्या एका कापड दुकानाला भीषण आग लागून एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू झाला. आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कपड्याच्या दुकानात चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक बाईकच्या चार्जरचा स्फोट झाल्यानं ही आग लागल्याचं अग्नीशमन दलानं सांगितलं. वसीम शेख, आसिम वसीम शेख, परी वसीम शेख, तन्वीर वसीम, हमीदा बेगम, शेख सोहेल, रेश्मा शेख अशी मृतांची नावं आहे. दुकानाला आग लागली तेव्हा हे सर्व वरच्या मजल्यावर झोपलेले होते. त्यामुळं त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
****
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था बालरंगभूमी परिषदेच्या २०२४ ते २०२९ या पाच वर्षांच्या अध्यक्षपदासाठी अभिनेत्री निलम शिर्के-सामंत यांची निवड करण्यात आली. काल झालेल्या सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आलेल्या १७ कार्यकारी मंडळ सदस्यात लातूर इथून विधिज्ञ शैलेश गोजमगुंडे, परभणी इथून त्र्यंबक वडसकर यांची निवड करण्यात आली.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२२ चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, १०१ उमेदवारांची शासनाकडे शिफारस करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातले ओंकार संजय निकुंभ हे खुला आणि मागास वर्गवारीतून, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या स्वप्नाली तांदुळजे या महिला वर्गवारीतून राज्यात प्रथम आल्या आहेत.
****
प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेनं जालना - छपरा- जालना या साप्ताहिक विशेष गाडीला मुदतवाढ दिली आहे. २६ जूनपर्यंत ही गाडी नियमित वेळेनुसार धावेल, अशी माहिती रेल्वेच्या नांदेड कार्यालयानं दिली आहे.
****
भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर तालुक्यात आष्टी बावनथडी इथं काल वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या सात ट्रॅक्टर चालकांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत एक कोटी ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
****
नवी दिल्लीत झालेल्या ५६ व्या राष्ट्रीय खो -खो अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्रातल्या पुरुष आणि महिला दोन्ही संघांनी विजेतेपद पटकावलं.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 17 March 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १७ मार्च २०१९ सकाळी ७.१० मि. **** मतदानापूर्वी ४८ तास अगोदर निवडणूक घोषणा पत्र जारी करण्यास निवडणूक आयोगाची बंदी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची काँग्रेसची चौथी तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाची पहिली यादी जाहीर, भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवड समितीच्या बैठकीत उमेदवारांच्या नावावर चर्चा मराठवाड्यातल्या आठ लोकसभा मतदार संघातल्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींचा आज औरंगाबादमध्ये मेळावा आणि स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा बी साई प्रणित अंतिम फेरीत **** राजकीय पक्षांना मतदानापूर्वी ४८ तास अगोदर निवडणूक घोषणा पत्र जारी करण्यास निवडणूक आयोगानं बंदी घातली आहे. अशा प्रकारचं घोषणापत्र हे आदर्श आचार संहितेचाच एक भाग असल्याचा निर्वाळा आयोगानं दिला आहे. यामुळे राजकीय पक्षांना निवडणुकीच्या घोषणेनंतर नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. सुधारित आदर्श आचार संहिते नुसार लोकप्रतिनधित्व कायदा १९९५ च्या कलम १२६ अंतर्गत प्रतिबंधित काळात घोषणा पत्र जारी करता येणार नाही. टप्प्या टप्प्यानं मतदान असल्यास संबंधित टप्प्यातल्या प्रतिबंधित ४८ तासामध्ये कुठेच घोषणा पत्र जारी करता येणार नाही. **** काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीसाठी २७ उमेदवारांची चौथी यादी काल जाहीर केली. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीनं जाहीर केलेल्या यादीत अरूणाचल प्रदेश��तल्या २, तर छत्तीसगड मधल्या ५ उमेदवारांचा समावेश आहे. याशिवाय केरळमधून १२, उत्तर प्रदेशातून ७ आणि अंदमान-निकोबार इथून एक उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षानंही ४५ उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली. या पहिल्या यादीनुसार नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी लोकसभा मतदार संघातून जीवा गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हा मतदार संघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत काल दिल्लीत बैठक झाली. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी अंतिम करण्यावर या बैठकीत चर्चा झाली. सकाळी दोन वाजेपर्यंत ही बैठक चालली. आज पक्षाध्यक्ष अमित शहा, पक्षाच्या निष्कर्ष समितीची बैठक घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. **** लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मुंबईत मंत्रालयात २४ तास नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ०२२ -२२ ०४ ०४ ५१ आणि २२ ०४ ०४ ५४, असा आहे. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी ही माहिती दिली. **** राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल पद्म पुरस्कार प्रदान केले. छत्तीसगडच्या पंडवानी गायिका तीजनबाई, मुंबईले उद्योजक अनिलकुमार नाईक यांना पद्मविभूषण, अंतराळ संशोधन संस्था- इस्रोचे माजी वैज्ञानिक नांबी नारायण तसंच लातूर इथले डॉ.अशोक कुकडे यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. अभिनेता मनोज वाजपेयी, क्रिकेटपटू गौतम गंभीर, बास्केटबॉलपटू प्रशांत सिंग, फूटबॉलपटू सुनिल छेत्री आणि गिर्यारोहक बचेंद्री पाल, सिकलसेल आजाराबाबत प्रबोधन करणारे प्राध्यापक सुदाम काटे, सुमारे आठ हजारावर झाडं लावणाऱ्या १०७ वर्षांच्या वृक्षमाता सालूमराडा थिम्मक्का आणि बीड इथले गो-पालक शब्बीर सय्यद यांना पद्मश्री पुरस्कार देऊन, त्यांचा गौरव करण्यात आला. **** मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज औरंगाबाद शहरात श्रीहरि पॅव्हेलियन, इथं मराठवाड्यातल्या आठ लोकसभा मतदार संघातल्या शिवसेना आणि भाजप पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे, भाजप प्रदेश अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, औरंगाबादचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, समन्वय समितीचे प्रमुख राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित असतील. **** जालना लोकसभा मतदार संघाचा तिढा सोडवण्याबाबत, आज औरंगाबाद इथं, मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत चर्चा ��ोण्याची शक्यता आहे. काल यासंदर्भात मुंबईत मातोश्रीवर झालेल्या बैठकीतून तोडगा निघू शकला नव्हता. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सध्या या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असून, राज्यमंत्री अर्जुन खोतकर या जागेवरून यंदा लोकसभा निवडणूक लढवायला उत्सुक आहेत. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांनी काल औरंगाबाद, जालना, पूर्णा, परभणी आणि नांदेड रेल्वेस्थानकांची पाहणी केली. वाहतूक समस्या लक्षात घेता जालना रेल्वेस्थानकालगत लवकरच भुयारी पुलाचं काम सुरू करण्यात येणार असल्याचं माल्या यांनी सांगितलं. जालना रेल्वे स्थानकावरच्या पादचारी पुलासह फलाटांची उंची वाढवण्यात येणार आहे, तसंच स्थानकात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचंही रेल्वे महाव्यवस्थापकांनी सांगितलं. **** परभणी शहरात एका फर्निचरच्या दुकानाला काल दुपारच्या सुमारास आग लागून मोठं नुकसान झालं. आगीनं रौद्ररूप धारण केल्यामुळे, शेजारच्या काही आस्थापनांचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी सुमारे दोन तास प्रयत्न केल्यानंतर ही आग आटोक्यात आली. शॉर्टसर्कीट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. **** वंचित बहुजन आघाडीचे परभणी मतदार संघाचे उमेदवार आलमगीर खान आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धर्मराज चव्हाण यांनी परभणी इथं काल पत्रकार परिषद घेतली. परभणी लोकसभा मतदार संघातली परिस्थिती पाहता रस्ते, पाणी, आरोग्य, बेरोजगारी या प्रश्नाकडे कायम दुर्लक्ष करण्यात आल्यानं सुविधांचा अभाव असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. **** आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात शेतकरी संघटनेची भूमिका १९ मार्च रोजी अकोला इथं होणाऱ्या बैठकीनंतर जाहीर करण्यात येणार आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी आणि एकूणच देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी शेतकरी संघटनेनं पुरस्कृत केलेला जाहीरनामा स्वीकारण्यास जे उमेदवार तयार असतील, त्यांना स्वतंत्र भारत पक्षातर्फे उमेदवारी देण्याचाही निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे. **** स्वित्झर्लंड मध्ये सुरू असलेल्या स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या बी साई प्रणितनं अंतिम फेरी गाठली आहे. पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत बी साई प्रणितनं चीनच्या चेन लोंग चा २१-१८, २१-१३ अशा फरकानं पराभव केला. यानंतर प्रणितचा अंतिम फेरीत चीनच्याच षी युकीसोबत सामना होईल. **** विभागीय हातमाग कापड स्पर्धेत, विकी ढालकरी आणि लबिका गि��ाम यांनी विभागून प्रथम क्रमांक पटकावला आहे. औरंगाबादचे अपर विभागीय आयुक्त डॉ. विजयकुमार फड यांच्या अध्यक्षतेखाली समितीने स्पर्धकांची निवड केली. स्पर्धेमध्ये एकूण ३७ विणकरांनी, पैठणी साडी, घागरा, दुपट्टे, टॉप, स्कार्फ, शर्ट, जॅकेट, टाय, अशा विविध प्रकारच्या वस्त्रांसह सहभाग नोंदवला. स्पर्धेत द्वितीय क्रमांक अरुण भोसले, तालेब गिराम आणि तृतीय क्रमांक विकास पसारे, नेहा ढालकरी यांनी पटकावला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलं. **** हिंगोली शहरात काल शोभायात्रा काढून १४व्या विद्रोही साहित्य संमेलनाला सुरूवात झाली. प्राचार्य डॉ. नागनाथ पाटील यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झालं, तर डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी अध्यक्षपद भूषवलं. ***** ***
0 notes