#आरोग्य शिबीर
Explore tagged Tumblr posts
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 26.09.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
संयुक्त राष्ट्र संघासह बहुराष्ट्रीय विकास बँकांच्या पुनर्रचनेची आवश्यकता भारतानं व्यक्त केली आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस.जयशंकर यांनी न्यूयॉर्क इथं जी-20 शिखर परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत ही भूमिका मांडली. संयुक्त राष्ट्र संघटना आजही भूतकाळातच रममाण असून, संघटनेनं जगासोबत विकसित होण्याची गरज असल्याचं, जयशंकर यांनी नमूद केलं. जुन्याच संरचनेत अडकून पडल्यामुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि स्थैर्य राखण्यात संयुक्त राष्ट्र अपयशी ठरत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. भेदभावरहित मुक्त आणि पारदर्शक अशा बहुराष्ट्रीय व्यापार व्यवस्थेचं भारत समर्थन करत असल्याचं, जयशंकर यांनी सांगितलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा नियोजित पुणे दौरा रद्द झाला आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे हा दौरा रद्द झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या बिडकीन औद्योगिक वसाहतीसह देशभरातल्या २२ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार होतं.
****
दरम्यान, पुणे शहर आणि परिसरात अतिवृष्टिमुळे जनजीवन ठप्प झालं आहे. खडकवासला धरण साखळीतून पाणी सोडण्यात येत असल्यानं सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात इतरही जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरु असून, पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात असून, प्रशासना��ं अनेक गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई मनपा क्षेत्रातल्या शाळांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९९ टक्क्यांच्या वर पोहोचला असून, धरणातून होणार्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. धरणाचे १८ दरवाजे तीन फूट उघडून, सुमारे ५६ हजार ६०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
****
रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. काल सर्वाधिक ७१ मिलिमीटर पाऊस खेडमध्ये पडला. हळव्या म्हणजे लवकर तयार होणाऱ्या जातीची भातपिकं तयार झाली असून, त्यासाठी असा मोठा पाऊस नुकसानकारक ठरत असल्याचं आमच्या वार्तहारानं कळवलं आहे.
****
पोषण जनजागृती संदर्भातील विविध उपक्रमात महाराष्ट्र देशात कायमच अव्वल राहिला असल्याचं, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल 'पोषण भी, पढाई भी' या राज्यस्तरीत परिसंवादात त्या बोलत होत्या. अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना उत्तम पोषण, आहार आणि शिक्षण देणं हा 'पोषण भी, पढाई भी' या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यावेळी उपस्थित होत्या. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधन वाढीसंदर्भात राज्य शासनाने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली असून, केंद्र शासनानेही याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती तटकरे यांनी, केंद्रीय मंत्री ठाकूर यांच्याकडे केली.
****
'स्वच्छता ही सेवा' पंधरवड्यात सफाईमित्र सुरक्षा अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वच्छता मित्रांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आलं. यामध्ये साडे तीन हजाराहून अधिक स्वच्छतामित्र आणि स्वच्छतासखींची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात रक्तदान शिबीराचंही आयोजन करण्यात आलं होतं.
****
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचं आज नागपुरात एका खाजगी रुग्णालयात निधन झालं. ते यकृताच्या आजारावर उपचारासाठी रुग्णालयात उपचार घेत होते. केंद्रीय मंत्री तथा नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. विद्यार्थी हिताला प्राधान्य देणारे मृदुभाषी कुलगुरू म्हणून ते कायम स्मरणात राहतील असं गडकरी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
****
मुख्यमंत्री त���र्थदर्शन योजनेअंतर्गत राज्यात पहिली रेल्वे कोल्हापूर जिल्ह्यातून अयोध्येसाठी २८ सप्टेंबरला निघणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. राज्यात सर्व धर्मियांच्या ६० वर्ष आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी सरकारकडून ही योजना राबवली जात आहे.
****
छत्रपती संभाजी नगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर सतीश पाटील यांनी शेवाळं या पाणवनस्पती पासून वीज निर्मितीचा यशस्वी प्रयोग केला आहे. पर्यावरण पूरक अशा या प्रयोगाचे पेटंट देखील त्यांनी मिळवलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उद्या सत्तावीस तारखेला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यातून शासकीय, निमशासकीय आणि खाजगी आस्थापनांमध्ये शंभर पदांची भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असं आवाहन अर्धापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विश्वंभर कंदलवाड यांनी केलं आहे.
****
0 notes
Text
A Free Health Awareness and Checkup drive at Samarthanagar, Kharadi, Pune Healing Hands Foundation reached 52 needy patients and helped them with free diagnosis, herbal medicines and counseling.
Thanks to Astitva Social Foundation-One Vision,Pune and Don Bosco for their support.
समर्थनगर, खराडी, पुणे येथे हीलिंग हॅन्डस फॉउंडेशन-पुणे,अस्तित्व सोशल फॉउंडेशन वन व्हीजन-पुणे, व डॉन बोस्को संस्था-पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.
शिबिरात मुळव्याध, बद्धकोष्ठता, हर्निया, भगंदर, व्हेरीकोस व्हेन्स व इतर पोटाचे विकार यावर तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले.
सदर शिबिरास ,हीलिंग हॅन्डस फाउंडेशन तर्फे डॉ. अश्विनी परगेवार यांनी रुग्णांना तपासले व तेजश्री खलाटे यांनी समुपदेशन केले व रुग्णांना संस्थे मार्फत औषध देऊन मार्गदर्शन केले,अनिता सैद (शिबीर व्यवस्थापक)यांनी शिबिराचे सर्व नियोजन केले, आनंद मिसाळ यांचे शिबिरास मोलाचे सहकार्य लाभले.
अस्तित्व सोशल फॉउंडेशन वन व्हीजन व डॉन बोस्को संस्थे तर्फे मोना मोरे, सागर निकाळजे, उदय कर्णे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
शिबिरात 52 रुग्णांनी मोफत तपासणी व औषधांचा चा लाभ घेतला.
हीलिंग हॅन्डस फॉउंडेशन चे अध्यक्ष-डॉ. अश्विन पोरवाल, सचिव-डॉ.स्नेहल पोरवाल व संस्था समन्व्यक- मधुरा भाटे यांचे मार्गदर्शन लाभले व शिबीर यशस्वी झाले.
bawasseer #colon #ibs #constipation #bhfyp #pregnancy #fistula #vaginalfistula #internalpiles #pilonidalsinus #nonprofit #ambulance #healing #hands #foundation #externalpiles #analpain #straining #haemorrohoid #digestion #guthealth #health #awareness #noblework #onecurestheothercares #hernia #varicoseveins #hygiene #freecamps
0 notes
Text
नाशिक : कणकापूर येथे बांधकाम कामगार व कुटंब आरोग्य तपासणी शिबीर
https://bharatlive.news/?p=182546 नाशिक : कणकापूर येथे बांधकाम कामगार व कुटंब आरोग्य तपासणी ...
0 notes
Video
youtube
शिवसेना स्थापना दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व प्रशिक्षण शिबीर संपन्न..
0 notes
Text
कोडेलोहारा येथे वृक्षारोपण व आरोग्य शिबीर
कोडेलोहारा येथे वृक्षारोपण व आरोग्य शिबीर
परसवाडा : तिरोडा तालुक्यातील कोडेलोहारा येथे राष्ट्र नेता ते राष्ट्र पितामह जंयती सेवा पंधरवाडा कार्यक्रमात आरोग्य शिबीर, वृक्षारोपण व बुस्टर डोज लसीकरण करण्यात आले. उदघाटन पंस सभापती कुंता पटले यांच्या हस्ते, पंस उपसभापती हुपराज जमईवार यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. या वेळी दीप प्रज्वलन जिप सदस्य तुमेशवरी बघेले व पंस सदस्य दिपाली टेंभेकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून संरपच…
View On WordPress
0 notes
Text
घोटगे येथील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
घोटगे येथील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी । कुडाळ : जि प आरोग्य विभाग सिंधुदुर्ग व साईलीला हॉस्पिटल नाटळ यांच्या संयुक्त विद्यमाने घोटगे येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत नुकतेच मोफत सर्वरोग निदान आरोग्य शिबीर संपन्न झाले.या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला.जि. प.सदस्य तथा आरोग्य समिती सदस्य लॉरेन्स मान्येकर यांच्या पुढाकाराने रविवार दि. 6 मार्च रोजी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आरोग्य विभाग व साईलीला हॉस्पिटल नाटळ यांच्या…
View On WordPress
0 notes
Video
youtube
आजच्या या धकाधकीच्या जीवनात आरोग्य चांगले राखा हेलोडॉक्स बरोबर
0 notes
Text
नाशिक तहसील कार्यालयात आरोग्य शिबीर
नाशिक तहसील कार्यालयात आरोग्य शिबीर
नाशिक ( प्रतिनिधी ) 🔶धान्य स्वस्त आहे पण जीवन अनमोल आहे 🔶नाशिक जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यलय अंतर्गत नाशिक तहसील कार्यालय ( पुरवठा शाखा ) यांच्या मार्फत . पुरवठा कार्यलय कर्मचारी . रेशन दुकानदार व हमाल . यांची मोफत अरोग्य तपासनी शिबीर आयोजीत करण्यात आले होते . शिबीराचे उदघाटन जिल्हा पुरवठा अधिकारी मा .डॉ . अरविंद नरसीकर साहेब. तहसिलदार . मा, .अनिल दौंडे साहेब नाशिक . नायब तहसिलदार . मा . मोनाली…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 09 January 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ जानेवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
महिला सक्षमीकरण अभियानाला गडचिरोली इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
माजी मंत्री सुनील केदार यांना नागपूर उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
विकसित भारत संकल्प यात्रेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
आणि
येत्या १८ ते २२ जानेवारी दरम्यान धाराशिव इथं श्री तुळजाभवानी कृषी महोत्सवाचं आयोजन
****
संपूर्ण समाजाला पुढे नेण्यासाठी महिला सक्षमीकरण अभियान सुरु केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. गडचिरोली इथं महिला सक्षमीकरण अभियान कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना यावेळी 'नवरत्न सन्मान' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. गडचिरोली जिल्ह्यात आता उद्योग येत असून, लवकरच रेल्वे, विमानतळ, वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे. यामुळे गडचिरोलीची मागास जिल्हा अशी ओळख पुसली जात असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. मोदी सरकारने १३ कोटी महिलांना उद्योगासाठी कर्ज दिल्याचे सांगून सर्व महिलांच्या हाताला काम मिळेपर्यंत मुख्यमंत्री सशक्तीकरण योजना सुरु राहील, अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली. याप्रसंगी विविध योजनांच्या लाभार्थीना साहित्य वाटप तसंच आर्थिक मदतीच्या धनादेशांचं वाटप करण्यात आलं.
****
येत्या काळात राज्यात दहा हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. पहिल्या पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेचं उद्घाटन मुख्यंत्र्यांच्या हस्ते आज मुंबईत झालं त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील सर्व महामार्गाच्या दुतर्फा बांबू लावण्याचा निर्णय ही राज्य शासनाने घेतला आहे. बांबू लागवडीसाठी प्रती हेक्टरी सात लाख रुपये अनुदान दिलं जातं त्यामुळे आर्थिक स्थैर्य देणाऱ्या या पिकाकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वळावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
****
नाशिकमध्ये येत्या १२ ते १७ जानेवारी दरम्यान होणाऱ्या सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या तयारीचा पालकमंत्री दादा भुसे यांनी आज आढावा घेतला. या महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. भुसे यांनी आज नाशिक इथं शासकीय विश्रामगृहावर सर्वपक्षीय बैठक घेतली आणि हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी सहकार्य देण्याचं आवाहन केलं.
****
माजी मंत्री सुनील केदार यांना नागपूर उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. एक लाखाच्या जातमुचलक्यावर ��ामीन मंजूर करण्यात आला आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेत दीडशे कोटी रुपये घोटाळा प्रकरणात सत्र न्यायालयाने केदार यांच्यासह सहा आरोपींना पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायालयाने केदार यांचा जामीन अर्ज फेटाळला होता, उच्च न्यायालयाने त्यांना आज जामीन मंजूर केला.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजन विचारे यांच्या घरांवर आयकर विभागाने आज छापे मारले. ठाणे परिसरातील विचारेंचे पिढीजात घर आणि हिरानंदानी येथील निवास अशा दोन्ही ठिकाणी सकाळपासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. खासदार विचारे यांच्याशी संबंधित काही व्यवसायिकांची देखील चौकशी करण्यात आली.तसेच काही कार्यालयांवर देखील छापेमारी करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
****
हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर इथं उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. दुपारी दोन वाजता होणाऱ्या या सभेला पालकमंत्री अब्दुल सत्तार, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती सभेचे आयोजक हिंगोली चे खासदार हेमंत पाटील यांनी दिली आहे.
****
विकसित भारत संकल्प यात्रा आज सांगली जिल्ह्यात इस्लामपूर जिल्ह्यात पोहचली. यात्रे दरम्यान आरोग्य शिबीर तसंच आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. या यात्रेत सांगली इथल्या वैशाली चव्हाण यांनी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आपल्याला मिळालेल्या लाभाची माहिती दिली.
धुळे जिल्ह्यातल्या आर्वी इथंही आज विकसित भारत संकल्प यात्रा पोहचली. खासदार डॉ.सुभाष भामरे यांच्या हस्ते यात्रेतल्या विविध उपक्रमांचं उद्घाटन झालं. या यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध ७२ योजनांचा लाभ गावागावांतील वंचित घटकांना दिला जात आहे. यानिमित्ताने आपणही भारताला विकसित बनविण्याचा संकल्प करण्याचं आवाहन भामरे यांनी यावेळी केलं.
विकसित भारत संकल्प यात्रा आज छत्रपती संभाजीनगर येथील मामा चौक इथे पोहचली स्थानिक नागरिकांनी केंद्र सरकारच्या विविध योजना जाणून घेतल्या.
विकसित भारत संकल्प यात्रेत मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत विविध योजनांचे लाभार्थी आपल्याला मिळालेल्या लाभाबाबत माहिती देत आहेत. परभणी जिल्ह्यातल्या नीलावती शिंदे यांनी त्यांना मिळालेल्या लाभाबाबत माहिती दिली.
****
येत्या १८ ते २२ जानेवारी दरम्यान धाराशिव इथं श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव होणार आहे. महाराष्ट्र शासन कृषि विभाग, आत्मा विभाग, कृषि विज्ञान केंद्र आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या महोत्सवामध्ये एकूण २०० दालनं उभारली जाणार आहेत. यामध्ये कृषी प्रदर्शन, परिसंवाद, चर्चासत्र, खरेदीदार विक्रेता संमेलन, गृहोप��ोगी वस्तुंचे दालन, तसंच उत्पादक ते थेट ग्राहक विक्री दालनाचा समावेश असून शेतकरी सन्मान समारंभ यावेळी होणार आहे. शेतकऱ्यांनी बदलत्या काळानुसार शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान, संधी, व्यवस्थापन जाणून घेण्यासाठी या महोत्सवास अवश्य भेट द्यावी, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केलं आहे.
****
ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाविरुद्धच्या टी-२० मालिकेतला भारताचा तिसरा आणि अंतिम सामना थोड्याच वेळात नवी मुंबईतल्या डी वाय पाटील मैदानावर होणार आहे. आतापर्यंत दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकून बरोबरी केली आहे. त्यामुळं तिसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याचं दोन्ही संघांचं उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या ५ टी-२० मालिकांमध्ये भारतानं केवळ एक मालिका जिंकली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज कोविडचे तीन नवे रुग्ण आढळले. जिल्ह्यात सध्या कोविडच्या सक्रीय रुग्णांची संख्या २९ झाली आहे. हे सर्व रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं.
****
0 notes
Text
AND HERE WE ARE AGAIN WITH ANOTHER IMPACTFUL HEALTH AWARENESS DRIVE!
Most of the population experience several health-related issues, including constipation (not passing stool), fissures, hemorrhoids, fistula, acidity, etc.
With the assistance of the Kushagra Kadam Youth Foundation, Shrimant Jagatguru Sai Pratishtan, Healing Hands Foundation reached Sai-Udyan, Sambhajinagar, Chinchwad, Pune for these companions and served 63 of them with free diagnosis and herbal medicines.
During the camp, qualified medical personnel provided free diagnosis and advice for hemorrhoids, fissures, fistulas, constipation, hernia, varicose veins and other problems.
साई-उद्यान, संभाजीनगर,चिंचवड,पुणे येथे हीलिंग हॅन्डस फॉउंडेशन-पुणे व कुशाग्र कदम युथ फॉउंडेशन, साई-उद्यान संभाजीनगर, चिंचवड,पुणे,यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.
अनेकांना बद्धकोष्टता (शौशास साफ न होणे), पित्तविकार, मूळव्याध अश्या त्रासाला सामोरे जावे लागते. अश्याच नागरिकांसाठी आपली हीलिंग हॅन्डस फॉउंडेशन,कुशाग्र कदम युथ फॉउंडेशन, श्रीमंत जा��तगुरू साई प्रतिष्टान सोबत,संभाजीनगर-साई उद्यान येथे पोहोचली.
शिबिरात मुळव्याध, बद्धकोष्ठता, हर्निया, भगंदर, व्हेरीकोस व्हेन्स व इतर पोटाचे विकार यावर तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले.
मंगलाताई कदम ह्यांचे शिबिरास मोलाचे सहकार्य लाभले.
सदर शिबिरास ,हीलिंग हॅन्डस फाउंडेशन तर्फे डॉ. अश्विनी परगेवार व प्रणिता झाडे यांनी सर्वांना तपासले व तेजश्री खलाटे यांनी समुपदेशन केले व रुग्णांना संस्थे मार्फत औषध देऊन मार्गदर्शन केले,अनिता सैद (शिबीर व्यवस्थापक)यांनी शिबिराचे सर्व नियोजन केले, आनंद मिसाळ व आदित्य सैद यांचे शिबिरास मोलाचे सहकार्य लाभले.
शिबिरात 63 नागरिकांनी , मोफत तपासणी व औषधांचा चा लाभ घेतला.
हीलिंग हॅन्डस फॉउंडेशन चे अध्यक्ष-डॉ. अश्विन पोरवाल, सचिव-डॉ.स्नेहल पोरवाल व संस्था समन्व्यक- मधुरा भाटे यांचे मार्गदर्शन लाभले व शिबीर यशस्वी झाले.
bawasseer #colon #ibs #constipation #bhfyp #pregnancy #fistula #vaginalfistula #internalpiles #pilonidalsinus #nonprofit #ambulance #healing #ElderFriendly #foundation #externalpiles #analpain #straining #haemorrohoid #digestion #guthealthforlife #healthcare #awareness #elderly #onecurestheothercare #hernia #Varicoseveins #hygiene #freecamp
0 notes
Text
Suraksha Bandhan : टीव्ही9 आणि गल्फ ऑईलकडून ट्रक ड्रायव्हरांसाठी महा आरोग्य शिबीर; 11 ऑगस्टपर्यंत मोहीम राबवली जाणार
Suraksha Bandhan : टीव्ही9 आणि गल्फ ऑईलकडून ट्रक ड्रायव्हरांसाठी महा आरोग्य शिबीर; 11 ऑगस्टपर्यंत मोहीम राबवली जाणार
Suraksha Bandhan : टीव्ही9 आणि गल्फ ऑईलकडून ट्रक ड्रायव्हरांसाठी महा आरोग्य शिबीर; 11 ऑगस्टपर्यंत मोहीम राबवली जाणार Suraksha Bandhan : टीव्ही 9 आणि गोल्फ ऑईलने आयोजित केलेल्या या शिबीराचं ट्रक चालकांनी प्रचंड स्वागत केलं आहे. आम्ही या शिबीराचा योग्य लाभ घेत आहोत. त्यातून आम्हाला फायदा होत आहे. शिवाय आम्हाला विम्याचीही सुरक्षा देण्यात आली आहे, असं एका ट्रकचालकाने सांगितलं. नवी दिल्ली: ट्रक…
View On WordPress
#‘महा#bandhan#suraksha#आजची बातमी#आ��ि#आताची बातमी#आरोग्य#ऑईलकडून#ऑगस्टपर्यंत#गल्फ#जाणार#टीव्ही9#ट्रक#ठळक बातमी#ड्रायव्हरांसाठी#ताजी बातमी#बातम्या#भारत बातम्या#भारत बातम्या मराठी#भारत लाईव्ह मीडिया#मराठी न्यूज#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र न्यूज#महाराष्ट्र बातम्या#महाराष्ट्र समाचार#मोहीम#राजकारण#राबवली#शिबीर’
0 notes
Text
सुपर वूमन ची जिल्हा कार्यकारणी घोषित
सुपर वूमन ची जिल्हा कार्यकारणी घोषित
गोंदिया : सुपर वूमन जिल्ह्यात सांस्कृतिक, क्रीडा, व्यावसायिक उपक्रम राबवून महिलांच्या सर्वांगीण विकासाकरिता विविध उपक्रम यशस्वीपणे आयोजित केले. सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य शिबीर, व्यासायिक मार्गदर्शन तसेच सामाजिक उपक्रम घेऊन महिलांना एक हक्काचा व्यासपीठ सुपर वूमनने दिला आहे. पुढेही विविध कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याकरिता सुपर वूमनची जिल्हा कार्यकारणी संचालिका प्राची गुडधे यांनी घोषित…
View On WordPress
0 notes
Text
शिवसेना विभाग हरकुळच्या वतीने मोफत आरोग्य शिबीरात 185 रुग्णांची तपासणी
शिवसेना विभाग हरकुळच्या वतीने मोफत आरोग्य शिबीरात 185 रुग्णांची तपासणी
गरजू रुग्णांनी मोफत तपासणी करत मोफत औषधांचा ही घेतला लाभ तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत यांचे आयोजन दिगंबर वालावलकर । कणकवली : शिवसेना विभाग हरकुळच्या वतीने मोफत आरोग्य शिबीरात 185 रुग्णांची तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार अरविंद सावंत, यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शिवसेना नेते सतिश सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिबीराचे…
View On WordPress
0 notes
Text
अमृता फडणवीस यांचे बुधवार पेठेत खळबळजनक विधान , म्हणाल्या की ?
अमृता फडणवीस यांचे बुधवार पेठेत खळबळजनक विधान , म्हणाल्या की ?
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी यांनी भारतात दे��ील देहविक्री व्यवसायाला ‘प्रोफेशन’ म्हणून मान्यता देण्याची सरकारकडे मागणी केली असून इतर व्यवसायांप्रमाणे देहविक्री व्यवसायाला सन्मान मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्या पुण्यात ११ जून रोजी दुपारी १ वाजता बुधवार पेठेतील महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर व मुलींसाठी सुकन्या कार्डचे वाटप…
View On WordPress
0 notes
Text
अमृता फडणवीस यांचे बुधवार पेठेत खळबळजनक विधान , म्हणाल्या की ?
अमृता फडणवीस यांचे बुधवार पेठेत खळबळजनक विधान , म्हणाल्या की ?
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी यांनी भारतात देखील देहविक्री व्यवसायाला ‘प्रोफेशन’ म्हणून मान्यता देण्याची सरकारकडे मागणी केली असून इतर व्यवसायांप्रमाणे देहविक्री व्यवसायाला सन्मान मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्या पुण्यात ११ जून रोजी दुपारी १ वाजता बुधवार पेठेतील महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर व मुलींसाठी सुकन्या कार्डचे वाटप…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 09 January 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ जानेवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
महिला सक्षमीकरण अभियानाला गडचिरोली इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
माजी मंत्री सुनील केदार यांना नागपूर उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
विकसित भारत संकल्प यात्रेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
आणि
येत्या १८ ते २२ जानेवारी दरम्यान धाराशिव इथं श्री तुळजाभवानी कृषी महोत्सवाचं आयोजन
****
संपूर्ण समाजाला पुढे नेण्यासाठी महिला सक्षमीकरण अभियान सुरु केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. गडचिरोली इथं महिला सक्षमीकरण अभियान कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना यावेळी 'नवरत्न सन्मान' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. गडचिरोली जिल्ह्यात आता उद्योग येत असून, लवकरच रेल्वे, विमानतळ, वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे. यामुळे गडचिरोलीची मागास जिल्हा अशी ओळख पुसली जात असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. मोदी सरकारने १३ कोटी महिलांना उद्योगासाठी कर्ज दिल्याचे सांगून सर्व महिलांच्या हाताला का�� मिळेपर्यंत मुख्यमंत्री सशक्तीकरण योजना सुरु राहील, अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली. याप्रसंगी विविध योजनांच्या लाभार्थीना साहित्य वाटप तसंच आर्थिक मदतीच्या धनादेशांचं वाटप करण्यात आलं.
****
येत्या काळात राज्यात दहा हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. पहिल्या पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेचं उद्घाटन मुख्यंत्र्यांच्या हस्ते आज मुंबईत झालं त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील सर्व महामार्गाच्या दुतर्फा बांबू लावण्याचा निर्णय ही राज्य शासनाने घेतला आहे. बांबू लागवडीसाठी प्रती हेक्टरी सात लाख रुपये अनुदान दिलं जातं त्यामुळे आर्थिक स्थैर्य देणाऱ्या या पिकाकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वळावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
****
नाशिकमध्ये येत्या १२ ते १७ जानेवारी दरम्यान होणाऱ्या सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या तयारीचा पालकमंत्री दादा भुसे यांनी आज आढावा घेतला. या महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. भुसे यांनी आज नाशिक इथं शासकीय विश्रामगृहावर सर्वपक्षीय बैठक घेतली आणि हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी सहकार्य देण्याचं आवाहन केलं.
****
माजी मंत्री सुनील केदार यांना नागपूर उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेत दीडशे कोटी रुपये घोटाळा प्रकरणात सत्र न्यायालयाने केदार यांच्यासह सहा आरोपींना पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायालयाने केदार यांचा जामीन अर्ज फेटाळला होता, उच्च न्यायालयाने त्यांना आज जामीन मंजूर केला.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजन विचारे यांच्या घरांवर आयकर विभागाने आज छापे मारले. ठाणे परिसरातील विचारेंचे पिढीजात घर आणि हिरानंदानी येथील निवास अशा दोन्ही ठिकाणी सकाळपासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. खासदार विचारे यांच्याशी संबंधित काही व्यवसायिकांची देखील चौकशी करण्यात आली.तसेच काही कार्यालयांवर देखील छापेमारी करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
****
हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर इथं उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. दुपारी दोन वाजता होणाऱ्या या सभेला पालकमंत्री अब्दुल सत्तार, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती सभेचे आयोजक हिंगोली चे खासदार हेमंत पाटील यांनी दिली आहे.
****
विकसित भारत संकल्प यात्रा आज सांगली जिल्ह्यात इस्लामपूर जिल्ह्यात पोहचली. यात्रे दरम्यान आरोग्य शिबीर तसंच आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. या यात्रेत सांगली इथल्या वैशाली चव्हाण यांनी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आपल्याला मिळालेल्या लाभाची माहिती दिली.
धुळे जिल्ह्यातल्या आर्वी इथंही आज विकसित भारत संकल्प यात्रा पोहचली. खासदार डॉ.सुभाष भामरे यांच्या हस्ते यात्रेतल्या विविध उपक्रमांचं उद्घाटन झालं. या यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध ७२ योजनांचा लाभ गावागावांतील वंचित घटकांना दिला जात आहे. यानिमित्ताने आपणही भारताला विकसित बनविण्याचा संकल्प करण्याचं आवाहन भामरे यांनी यावेळी केलं.
विकसित भारत संकल्प यात्रा आज छत्रपती संभाजीनगर येथील मामा चौक इथे पोहचली स्थानिक नागरिकांनी केंद्र सरकारच्या विविध योजना जाणून घेतल्या.
विकसित भारत संकल्प यात्रेत मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत विविध योजनांचे लाभार्थी आपल्याला मिळालेल्या लाभाबाबत माहिती देत आहेत. परभणी जिल्ह्यातल्या नीलावती शिंदे यांनी त्यांना मिळालेल्या लाभाबाबत माहिती दिली.
****
येत्या १८ ते २२ जानेवारी दरम्यान धाराशिव इथं श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव होणार आहे. महाराष्ट्र शासन कृषि विभाग, आत्मा विभाग, कृषि विज्ञान केंद्र आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या महोत्सवामध्ये एकूण २०० दालनं उभारली जाणार आहेत. यामध्ये कृषी प्रदर्शन, परिसंवाद, चर्चासत्र, खरेदीदार विक्रेता संमेलन, गृहोपयोगी वस्तुंचे दालन, तसंच उत्पादक ते थेट ग्राहक विक्री दालनाचा समावेश असून शेतकरी सन्मान समारंभ यावेळी होणार आहे. शेतकऱ्यांनी बदलत्या काळानुसार शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान, संधी, व्यवस्थापन जाणून घेण्यासाठी या महोत्सवास अवश्य भेट द्यावी, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केलं आहे.